Follow by Email

Friday, June 28, 2019

सावरकर


सध्या वि दा सावरकर ह्यांच्यावर खूप उलट सुलट चर्चा चालू आहे . पुरोगामी समजणारे रोज नवे विषय शोधून सावरकर आणि त्यांचे हिंदुत्व ह्यावर अनेक प्रश्न विचारीत असतात . महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले पु ल देशपांडे ह्यांचे सावरकर ह्यांच्यावर केलेले भाषण यु ट्यूबवर दोन भागात उपलब्ध आहे . मी फार पूर्वी ते ऐकले होते .आज ते पुन्हा ऐकले . पु ल ह्या भाषणात सावरकर ह्याचा विज्ञानवादी मानवतावाद , सावरकर आणि त्यांचा खरा सेक्युलरवाद , सावरकर आणि अंधश्रद्धा निर्मुलन , मदर तेरेसा ह्यांचा कुटुंब नियोजनाला असलेला विरोध म्हणजे राजद्रोह , सावरकर आणि त्यांचे हिंदुत्व इत्यादी अनेक विषयावर ते गंभीरपणे बोलले . महाकवी सावरकर ह्यावर ही  ते बोलले . नास्तिकतेवर बोलले . हे भाषण ह्या सावरकरद्वेष्ट्यानी अवश्य ऐकावे . सावरकरांना पुन्हा एकदा नीट समजून घ्यावे . त्या नंतर अटल बिहारी ह्यांचे भाषण झाले होते . ते नाही ऐकले तरी चालेल .पण पु ल ह्यांना समजलेले आणि भावलेले सावरकर अधिक समजून घ्या . उगाच फालतू चर्चा थांबवा . मणीशंकर अय्यर ह्यांना हा माणूस समजणे कठीण आहे . हे त्यांच्या वक्तव्यावरून समजतेच . १९६३ - ६६ मध्ये सावरकर द्वेष नव्हता . पाठ्यपुस्तकातून सावरकर दिसत होते . आम्ही त्यांच्या कविता वाचल्या .पाठ केल्या .निबंध वाचले . १९७५ नंतर सावरकरद्वेषाचे वारे सुटले . सध्या तर हिंदुत्व ह्या विषयावर डावे  ,पुरोगामी ,समाजवादी आणि कॉंग्रेसवाले तुटून पडताना दिसतात . त्यांना उठताबसता सावरकर दिसत असतात आणि त्यांच्यात मणी शंकर अय्यर संचारतो . एकदा पु ल काय म्हणतात ते समजून घ्या . मुद्दाम पु ल ह्यांचा उल्लेख करीत आहे . पु ल हे नास्तिक , समाजवादी ,पुरोगामी विचारांचे , राष्ट्र सेवादल आणि 'साधने 'शी जवळचे , विनोदी लेखक असले तरी गंभीर विचार मांडणारे लेखक होते . त्यांनी सावरकरांना समजून घेतले .नव्हे त्यांना सावरकर हे व्यक्तिमत्व समजले .

स्वातंत्र्यवीर आणि क्रांतिकारक असलेल्या सावरकरांचा असा अपमान करणाऱ्या Congrss च्या नेत्याला  थोडी शिक्षणाची गरज आहे.
मणीशंकर अय्यर नंतर असे वक्तव्य करणारा हा दूसरा नेता.
'सामना ' च्या संपादकांनी ह्या नेत्याला त्यांच्या  दिल्ली भेटीत थोडे  समजावून सांगावे.
हिंदूह्रदयसम्राट' बाळासाहेब ठाकरे ह्यांना सावरकरांची  अशी नक्कल बघून किती वेदना झाल्या असतील ह्याची कल्पना करवत नाही.
संजय राऊत  अलिकडेच कलर टीव्ही channel वर सावरकरांवर भरभरून बोलले होते  त्याचीच आठवण झाली.

कोहिमा आणि मणिपूरला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर मला जे जाणवले ते असे ...........
कोहिमाच्या युद्धामुळे ब्रिटिश बिथरले होते . जपानी सैन्य खूप पुढे आले होते .आझाद हिंद सेना होती म्हणूनच ते इतके आंत घुसू शकले . ब्रम्हदेश ते सिंगापूर पर्यंत आझाद हिंद सेनेचे जाळे होते . कोहिमाला ब्रिटिश सैन्याची सर्वात मोठी हानी झाली . आपल्या वडिलांना / आजोबाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आजही ब्रिटिश लोक कोहिमाला भेट देत असतात . 'रणाविण स्वातंत्र्य कोणा  मिळाले' ,हे  अर्धसत्य  आहे .कोहिमा युद्धामुळेच  ब्रिटिशांनी गाशा गुंडाळण्याचे  ठरविले असे जे म्हणतात त्यात थोडे तथ्य आहे .
नेताजींनी आझाद हिंद सेना उभी केली . त्याला  मर्यादित यश मिळाले.
सावरकरांनी  'लेखण्या तोडा आणि बंदुकी हातात घ्या' ,असे म्हंटले खरे पण ते सेना उभी करू शकले नाहीत . ब्रिटिशांनी त्यांची हालचालच बंद केली होती .त्यांना मुस्लिम  लीगच्या  राजकारणाविरुद्ध पर्यायी पक्ष सुद्धा उभा करता आला नाही .'एकला चलो रे  ' ही क्रांतिकारकांची वृत्ती त्यांना आडवी आली असावी.
शेवटी स्वातंत्र्याचे श्रेय दोघांनाही मिळाले नाही . गांधीजींची यशस्वी राजनीती जगापुढे आली व त्यांनाच  सारे श्रेय मिळाले .

Wednesday, June 26, 2019

पुरोगामी - समाजवादी- हिंदुत्ववादी

समाजवादी मंडळींची शोकांतिका कशामुळे झाली? ,हे आजचे समाजवादी तपासून बघत नाहीत ,हेच लक्षांत घेणे आवश्यक आहे. त्यांना पक्ष बांधणी जमली नाही. सगळेच नेते. कार्यकर्ते नाहीतच. पक्षफुटीचा रोग लागलेला. आतां तर घराणेशाही चालू आहे. कुठे डॉ लोहिया ? कुठे जयप्रकाशजी ? ह्या समाजवादी मंडळीनी Congress  सोडली नसती तर चित्र बदलले असते .
ह्या मंडळींनी आधी वेगळा गट केला . मग Congress सोडली. पक्ष बांधनी केलीच नाही. सगळेच बुध्दीवादी. स्वयंभू नेते. एकत्र राहिले नाहीत. लोहिया- जयप्रकाश, एस एम - गोरे  वगैरे...

पुरोगामी कोणाला म्हणायचं ? सेक्युलर म्हणजेच पुरोगामी का ?
 राज्यघटनेत सेक्युलर शब्द नंतर घातला .तो घातला तसा काढूनही टाकता येतो . समाजवादी हा शब्द असाच घातला . जगातूनच समाजवाद नाहीसा होत आहे . माओचा किंवा कार्ल मार्क्सचा साम्यवाद आहे कुठे ? एकपक्षीय लोकशाही मान्य आहे काय ?
भारतात समाजवाद्यांच्या बारा पार्ट्या . कोणता समाजवाद खरा ? ते सर्व समाजवादी सेक्युलर आहेत काय ? सेक्युलरमध्ये जातीयवाद येत नाही का ?
गांधीजी समाजवादी होते का ? नेहरू रशियन दौऱ्यावरून आल्यावर समाजवादी समाजरचनेच्या गोष्टी बोलू लागले . त्यापूर्वीच जयप्रकाश - लोहिया वगैरे समाजवादी गट काँग्रेसमधून बाहेर पडला . इंदिरा गांधींनी बँकांचे राष्टियीकरण करून समाजवादी पाऊल उचलले तेव्हा धारिया - चंद्रशेखर समाजवादी तरुण तुर्क बाहेर पडले . काँग्रेस खरेच समाजवादी आहे का ? राहुल गांधी ह्यांची विचारसरणी कोणती ?
गांधीजींनी समाजवादी समाजरचनेचा कधी उल्लेख केला नाही .डॉ आंबेडकरांनी कम्युनिझमचा विरोधच केला . त्यांनी समाजवादी आणि सेक्युलर शब्द राज्यघटनेमध्ये समाविष्ट का केले नसावेत

एक  वर्षापुर्वीचा प्रतिगामी पुरोगामित्व ' हा गिरीश कुबेर ह्यांचा झणझणीत अंजन घालणारा अग्रलेख अप्रतिम आहे . ह्यातील महत्वाचे मुद्दे :
* काँग्रेसचा मुस्लिम अनुनय
* सनातनी मुस्लिम धर्ममार्तंड आणि त्यांच्या आवाजात  आवाज मिसळणाऱ्या अन्य तथाकथित पुरोगामी मंडळींचा बोटचेपेपणा
* पुरोगामित्वाचे ध्वजधारक म्हणविणारे डावे आणि समाजवादी
* पुरोगाम्यांची तोंडपाटीलकी आणि डाव्यांचे खेळ
* पुरोगाम्यांची भंपक बोटचेपी बौद्धिके आणि बेगडी पुरोगामित्व
ह्यावर टाकलेला प्रकाश खूप काही सांगून जातो .
ह्यामुळेच पुरोगामी ,  समाजवादी  आणि निधर्मी ह्या शब्दांचा अर्थ हरवून बसला आहे .
* नेहरू असो का गांधी , लोहिया असो का जयप्रकाश, सावरकर असो का हेडगेवार प्रत्येकाने काहीतरी चांगले दिलेच आहे . ते घेतलेच पाहिजे.
भारतातील मुस्लिमांनी एकदा अंतर्मुख होऊन नव्याने विचार करावयास हवा. आझमखान किंवा ओवैसी ह्यांच्या मागे राहून जीनांचा 'मुस्लिम भारत 'हा विचार सोडून द्यावा .मुस्लिमांनी एकदा झडझडून द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला विरोध करण्याची आवश्यकता आहे . आरिफ मोहमद खान ह्यांनी हाच मुद्दा अनेकदा स्पष्टपणे मांडला.
मुलायम , मायावती , ममता , डावे- उजवे कम्युनिस्ट , समाजवादी आणि काँग्रेस ह्यांनी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अल्पसंख्य असलेल्या मुस्लिम जनतेची कायम मनधरणी केली आणि त्यांच्यासाठी फक्त तोंडपाटीलकी केली. त्यांच्या विकासासाठी काहीच केले नाही. हे भारतीय मुस्लिमांच्या लक्षात आले नाही.
नेहमी गोध्रा - बाबरी कांडचा उल्लेख होतो. दोन्ही बाजूच्या तरुणांच्या उकळत्या रक्तात आततायी विचार प्रकट झाल्यामुळे अशा घटना घडल्या . त्या जखमा तशाच राहाव्यात म्हणून राजकीय पक्षांनी प्रयत्न केलेत हे ह्या देशाचे दुर्दैव .गांधीजींचे नाव उठताबसता घेणार्यांनी त्यासाठी काहीच प्रयत्न न करता बहुसंख्य हिंदूंना जबादार धरून अल्पसंख्य मुस्लिमांचा स्वतःच्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला आणि हिंदूंमध्ये जातीयवादाची पेरणी करून फूट पाडली व सत्तेचे राजकारण केले. मायावती मुसलमानांना १०० तिकिटे देतात तर मुलायम सिंग ही तशीच खेळी  करीत आले आहेत.
भारतातील मुस्लिमांची सद्यस्थिती काय आहे? भारतातले बहुतेक पक्ष मुसलमानांच्या अपेक्षांना अनुसरून एकजात कुचकामी आहेत . ह्या सर्वांनी निवडणुकीत मुसलमानांचा एक गठ्ठा मते मिळवण्यासाठीच उपयोग करून घेतला व हिंदूत जातीय विद्वेष निर्माण केला .
भारतातील मुसलमानांना सर्व पक्षांनी असे सतत बजावले की बहुसंख्य असलेल्या हिंदूंचा धर्मवाद फार भयंकर असू शकतो. मुसलमानांना ह्या देशात चांगले दिवस बघावयाचे असतील तर त्यांनी हिंदू जातीयवादी शक्ती वाढणार नाहीत म्हणून आमच्याकडेच बघावे , आम्हालाच निवडणून द्यावे ,  असे राजकारण ज्यांनी केले त्यामुळेच हिंदू एकजुटीचे प्रयत्न झाले , ही वस्तुस्थिती आहे. हिंदुत्वाची पताका त्यामुळे फडकू लागली .
आझमखान ह्यांचा मुस्लिम धर्मवाद मुलायमसिंग ह्यांनी पोसला . दिल्लीचे जामे मशिदीचे इमाम बुखारी आणि एमआयएम चे ओवैसी ह्यांच्या 'मुस्लिम इंडिया' ला प्रत्युत्तर म्हणून 'हिंदू इंडिया' विचारधारा वाढते आहे. पडद्यामागे जातीयवाद पोसणारी ही मंडळी धोकादायक आहेत. हेच लक्षात येऊ नये , हे दुर्दैव.
भारतात मुसलमान मोकळेपणाने मागण्या तरी करू शकतात . त्यांचे प्रतिनिधित्व संसदेत आणि राज्यांच्या विधानसभेत दिसून येते.
काही लोकांना देशाच्या अखंडतेपेक्षा बाबरी मशिदीचा बचाव अधिक महत्वाचा का वाटतो ? बाबरी- गोध्रा ही जखम त्यांना बरी व्हावी असे वाटत नाही.
हा देश सर्वधर्मसमभाव  मानणारा देश आहे हे येथील मुसलमानांना मान्य असेल तर त्यांनी त्यांच्या धर्माच्या प्रभावाच्या मर्यादा ठरवून घेतल्या पाहिजेत .
धर्माचा आधार पोकळ आणि चुकीचा असेल तर काश्मीरला वेगळा दर्जा मागून चालणार नाही व समान नागरी कायदा अंमलात आणण्यास विरोध करता कामा नये.
समान नागरी कायदा, मुस्लिम स्त्रियांना तलाख मुक्ती, काश्मीरचे ३७० कलम रद्द करणे , राम मंदिराचा वाद  सामोपचाराने मिटवणे ह्यातच सर्वांचे हित आहे.
अल्पसंख्य मुस्लिम नकळत जीनांच्या 'मुस्लिम इंडियाची 'ची भाषा बोलत असतात त्यामुळेच 'हिंदु राष्ट्रा'च्या गोष्टी येथे बोलल्या जातात . पाकिस्तान हे 'मुस्लिम राष्ट्र ' जिनांच्यामुळे उदयास आले आहे . भारत हे बहुसंख्य हिंदूंचे राष्ट्र असले तरी ते येथील 'भारतीय मुसलमानां'चेही राष्ट्र आहे. पाकिस्तानात 'हिंदू पाकिस्तान' कुठे आहे? हा फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.
आझमखान असो का ओवैसी , ह्यांच्यासारख्या मुसलमानात जिना सारखा ' मुस्लिम भारत ' डोक्यात असतो. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून योगी आदित्यनाथ सारखे ' हिंदू भारत ' ह्या संकल्पनेसाठी प्रयत्नशील असतात.
स्वतःला सेक्युलर समजणारे समाजवादी मुस्लिम लोकांना ठणकावून सांगत असतात की बहुसंख्य हिंदूंचा धर्मवाद हा भयंकर आहे व तुम्हाला आम्हीच खरे संरक्षण देत असतो. हा गेम प्लॅन माहित असल्यामुळे हिंदुत्ववादी संपूर्ण हिंदू राष्ट्राचे स्वप्न पहात आहेत .
धर्मनिरपेक्षतेचा अर्थ तथाकथित पुरोगाम्यांनी फ़ारच सवंग करून टाकला आहे. मुस्लिम जातीयवाद नको तसा आक्रमक राष्ट्रवाद नको.
अहौ! प्रंचड बहुमताने अनंत कोटी ब्रम्हांड नायक निवडून आलेत,तुमच्या मागण्यांची पूर्तता करायचा त्यांना आग्रह का करत नाही? फुकट जुनी घिसीपिटी तुणतुणं वाजवताय!..
आपला इतिहास आणि राजकारणी फार गुंतागुंतीचे आहे . डॉ हेडगेवार  हे काँग्रेसमध्ये होते . डॉ शामा प्रसाद मुखर्जी हे सुद्धा काँग्रेसमध्ये होते. ते हिंदू महासभेत होते. ते पंडित नेहरूंच्या सर्वपक्षीय मंत्रिमंडळात मंत्री होते. डॉ शामा प्रसाद मुखर्जी बंगालमध्ये हिंदू महासभा - मुस्लिम लीग ह्या संयुक्त मंत्रिमंडळात होते. मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा ह्यांची संयुक्त सरकारे अनेक राज्यात होती .
सुरुवातीला एका हिंदू महासभेच्या अधिवेशनाला महात्मा गांधी उपस्थित होते.
मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय हिंदुमहासभेचे नेते होते. डॉ हेडगेवारांनी हिंदुमहासभा सोडून रा स्व सं स्थापन केला व सक्रिय राजकारण सोडले . डॉ शामा प्रसाद मुखर्जी ह्यांनी हिंदू महासभा सोडून जनसंघ स्थापन केला. बंगालच्या राजकारणात ते मुस्लिम लीग बरोबर सत्तेत होते. काश्मीर प्रश्नावर त्यांची मते सर्वांना माहीतच आहेत . आज त्याच काश्मीरमध्ये त्यांचा पक्ष पीडीपी बरोबर सत्तेत आहे. हिंदू महासभा आणि भाजप एकमेकांजवळ नाहीत . रा स्व सं हा हिंदू महासभेला जवळचा नाही . अलीकडे सत्तेच्या राजकारणामुळे अनेक दुसऱ्या विचाराचे लोक भाजपत आहेत त्यांचा रास्वसंशी कसलाही संबंध नाही. काँग्रेसमध्ये अनेक नेते हिंदूमहासभा विचारसरणीचे होते. त्यांना नेहरूंचे सेक्युलर विचार मान्य नव्हते.
जीना आणि मुस्लिम लीग काँग्रेसला हिंदूंचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष असे समजत होती. त्यांनी महात्मा गांधींना हिंदूंचाच नेता मानले होते. 
मोदीना गांधी जवळचे तर नेहरू दूरचे
मोदी पंतप्रधान झाल्यापासून गांधीजींचे नाव सतत घेत असतात. कॉंग्रसचे लोक गांधीजींना केव्हाच विसरून गेले आहेत. त्यांच्या तोंडात नेहरू, इंदिरा , राजीव आणि राहुल ह्यांचेच नाव असते.
गांधीजी आणि नेहरू ह्यांच्यात वैचारिक मतभेद होते. त्यांच्या दोघांमध्ये झालेला पत्र व्यवहार खूप काही सांगून जातो. एम जे अकबर ( अलीकडे भाजपकडे वळलेले ) ह्यांनी नेहरूवर एक पुस्तक लिहिले आहे. त्यात गांधी- नेहरू ह्यांच्यातील मतभेदावर चांगला प्रकाश पडतो.
नेहरू १९२७ साली रशियाला जाऊन आले आणि समाजवादी / साम्यवादी विचारसरणीमुळे खूप प्रभावित झाले. ते भारतात परतले ते क्रांतिकारी बदलाच्या स्फूर्तीने फुद्फुदतच. ते इतके उत्तेजित झाले की गांधीजींना त्यांच्या पोरकटपणाकडे दुर्लक्ष करावे लागले असे म्हणतात .
त्याचवेळी राष्ट्रीय नियोजन समिती स्थापित झाली. नेहरू त्याचे अध्यक्ष होते. गांधीजींना ते फारसे आवडले नसावे. 'नेहरुंना आकाशात उंच भरार्या घ्यायला आवडते. मला नाही. ' अशी त्यांची धारणा होती.
मोदीनी नियोजन आयोग रद्द केला त्यावर किती टीका होते आहे. गांधीजींना नियोजन आयोगाची साम्यवादी विचारांनी प्रेरित झालेली संकल्पना आवडली नव्हती. मोदीनी गांधीजींच्या विचारांनाच पुढे नेले , असे म्हंटले तर चुकीचे नाही.
मोदींना नेहरूसारखे उंच भरार्या मारणे आवडते हे ही लक्षात घेण्यासारखे आहे. नेहरू रशियाला गेले आणि समाजवादी विचारांनी प्रभावित झाले तर मोदी गेल्या अनेक वर्षात माओनंतरच्या चीनला अनेकदा भेटी देऊन प्रभावित झाले आणि ' मेक इन इंडिया ' चे स्वप्न घेऊन आले .
गांधीजी म्हणत , 'मला जो भारत अभिप्रेत आहे , त्यात मी राजे महाराजे , संस्थानिक आणि जमीनदार या सर्वाना जागा ठेवली आहे '
मोदींना अदानी- अंबानी हवे आहेत असा आरोप केला जातो. कारण ते समाजवादी विचारसरणीचे नाहीत म्हणून ते गांधीजीच्या विचारांशी जवळचे आहेत. म्हणूनच ते बोलताना गांधी - लोहिया - दिनदयाळ उपाध्याय ह्यांचा उल्लेख करतात. ते गांधीजींच्या विचारांशी जवळचे पण कृती करताना त्यांची बाह्य वागणूक ही नेहरू सारखी दिसते. नेहरूंचे शेरवानीवरचे गुलाब पुष्प जसे प्रसिद्ध तसे मोदींचे सेल्फी फोटो घेणे लोकांना माहित झाले आहे. नेहरूंचे कपडे इंग्लंडला धुण्यासाठी जात असत असे म्हणतात तर मोदींचा डिझायनर त्यांच्यासाठी खास खास कपडे शिवत असतो. त्यामुळे मोदी सरकार म्हणजे सूटबूट सरकार असे त्यांचे विरोधक म्हणतात. तरी बरं , मणीशंकर अय्यर त्यांना कॉंग्रेस अधिवेशनात 'चाय की दुकान' साठी stall देण्यास तयार झाला.
गांधी 'खेड्यात चला ' म्हणत असत तर नेहरू शहरी विकासाकडे लक्ष केंद्रीय करीत. मोदी स्मार्ट सिटीचा विचार करतात. त्यांना खेड्यात किंवा शहरात न जाता मध्यम असलेल्या छोट्या शहरांचा विकास करावयाचा आहे . खेड्यांना शहरी सोयी सुविधा मिळवून द्यावयाच्या आहेत.
गांधी खेड्यात वास्तव्य करा असे म्हणत तर मोदी मोठ्या खेड्यांना स्मार्ट शहर बनवा असे म्हणतात.
गांधीजी म्हणत , ' मला आधुनिक विज्ञानाविषयी आदर असला तरी जुनेच आधुनिक विज्ञानाच्या उजेडात तपासून योग्य पद्धतीने पुनरुज्जीवित करायला हवे ' . मोदी एका बाजूने ' डिजिटल इंडिया ' हा विज्ञानवादी दृष्टीकोन मांडतात तर जुन्या संस्कृतीला चिकटून राहतात.
नेहरुंना वाटते खेडे हे वैचारिक व सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेले असते व मागासलेल्या भोवताल मधून प्रगती साधने अशक्य असते . कारण संकुचित वृत्तीचे लोकच खोटारडे असण्याची शक्यता असते. ह्याउलट मोदींना दिनदयाळ उपाध्याय व नानाजी देशमुख ह्यांची ग्रामविकास योजना अधिक आवडते म्हणून ते प्रत्येक खासदाराला एक गाव विकसित करण्यासाठी पैसे देण्याची योजना आखतात . ही योजना गांधीजींच्या खेड्याकडे चला ह्या विचारांशी जुळती आहे. विकसित खेडे असेल तर शहरात कोण येईल ?
गांधीजींची ' हिंद स्वराज ' ही संकल्पनाच नेहरुंना ६०-७० वर्षापूर्वी जुनाट वाटली होती.
आतातर जग खूप बदलले आहे. मोदींना त्याची जाणीव आहे. ह्या बदललेल्या जगात भारताला टिकायचे असेल तर ' मेक इन इंडिया  , डिजिटल इंडिया , स्मार्ट सिटी , स्किल इंडिया , बुलेट ट्रेन,  स्वच्छ भारत  ' ह्या नव्या योजना त्यांनी पुढे आणल्या आहेत.
नेहरू - गांधी ह्यांच्यात भारत विकासाच्या कल्पना फार भिन्न होत्या . गेल्या अनेक वर्षात नेहरू नंतर नरसिंह राव आणि अटलजी ह्यांनीच विकासाच्या दिशा बदलून वेगळा मार्ग निवडला. आता मोदीनी नेहरूंच्या विचारापासून दूर जावून गांधी विचारातील काही संकल्पना समोर ठेऊन नव्या भारताची नवी स्वप्ने दाखविली आहेत.
( Based on  my  observations -  political essay )


Sunday, June 16, 2019

पुस्तके : 1) ओळख सियाचीनची 2) रावा


ओळख सियाचीनची
ग्रंथालीने प्रकाशित केलेले अनुराधा गोरे ह्यांचे ' ओळख सियाचेनची ' हे पुस्तक हाती आले . थोडेसे चाळले आणि लक्षात आले की हे पुस्तक वाचायलाच हवे . मला हिमालयाची ओढ आहे . तो मला सारखा खुणावत असतो . मनाली ते लेह हा प्रवास केला तेव्हा हिमालयाची विविध रूपे पाहीली . लेह ते नुब्रा व्हॅली हा प्रवास तर अवर्णनीय होता. नुब्रा व्हॅलीला सियाचेनच्या प्रवेश द्वारापर्यंत गेलो तेव्हाच सियाचेनला  जाणे किती कठीण असेल ह्याची कल्पना आली होती . उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर नुब्रा व्हॅलीला जाणेच इतके कर्म कठीण . अलीकडे बीएसएफ मुळे रस्ते आहेत आणि सैनिकी चौक्या आहेत म्हणून तरी ह्या भागात प्रवास करता येतो . गिर्यारोहकांचे ठीक आहे . आपल्यासारख्या सामान्य प्रवाशाला हा सर्व प्रवास करणे तसे अशक्यच . १२ महिने सियाचेन ह्या ८० किलोमीटर लांब  व २०  हजार  फूट  उंचीवरील हिमनदीवर चौकी करून पहारा करणे किती कठीण . त्याचीच कहाणी सांगणारे हे पुस्तक . एका बाजूला पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला चीन असलेला हा काराकोरम पर्वतीय प्रदेश . आपण हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत असं भारताचे वर्णन करतो . त्या ऐवजी काराकोरम ते कन्याकुमारीपर्यंत असंच म्हणायला पाहिजे . सियाचेन हा भारताचा उत्तरेकडील सर्वात शेवटचा भू प्रदेश .
काश्मीर प्रश्नाचा गुंता १९४७  पासून सुटलेला नाहीच .ह्या पुस्तकात काश्मीर प्रश्नाचा इतिहास इतका व्यवस्थित मांडला आहे की जो वाचल्यानंतर आपल्या राज्यकर्त्यांनी केलेल्या असंख्य चुकांमुळे हा प्रश्न आज अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे हे लक्षात येते .
१९४७ साली पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर पाकिस्तानच्या सैनिकांनी ब्रिटिश सेनाधिकारी ह्यांच्या सहकार्याने गिलगिट - कारगिल ह्या सिंधू नदीच्या आजूबाजूने दौड करीत लेह काबीज केले होते . त्यावेळी आपले दिल्लीश्वर गाफीलच राहिले होते आणि जीनांच्या आक्रमक लष्करी कारवाया चालूच होत्या . काश्मीरचा हिंदू राजा हरिसिंग जेव्हा हतबल झाला तेव्हा मदतीसाठी धावला पण शेख अब्दुल्ला स्वतंत्र काश्मीरचे स्वप्न बघत दोन्ही डग्र्यावर पाय रोवित होते .ह्या  पुस्तकातील एका  प्रकरणात काश्मीरचा सर्व इतिहास संक्षेपाने लिहिला आहे . तो वाचणे आणि समजून घेणे फार महत्वाचे आहे . हा इतिहास जितका महत्वाचा आहे तितकाच ह्या भागाचा भूगोल . काश्मीर - सियाचेन - लेह लडाख - अकसाई चीन ह्या भूभागाची पूर्ण माहिती समजून घेतल्याशिवाय तेथील लष्करी कारवाई समजणे अवघड आहे . हा  ह्या पुस्तकाचा मुख्य विषय आहे . अतिशय अभ्यासपूर्ण माहिती असलेले हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला आपल्या  संरक्षण प्रश्नाविषयी अधिक जाण होते . वेळ काढून अवश्य वाचावे असे हे पुस्तक .
आपल्या सेनाधिकाऱ्याला रस्त्यावरचा गुंड म्हणणारे माजी संसद सदस्य व अनेक वर्षे राज्य करणारा त्यांचा पक्ष . ह्या लोकांना ह्या भागातील संरक्षणाच्या प्रश्नांची जाण नसल्यामुळेच ते अशी विधाने करतात हे आपले दुर्भाग्य . त्यांनाच शत्रूच्या तोफेच्या तोंडी देण्यासाठी सियाचीनच्या चौकीवर पाठवले म्हणजे कळेल लष्करी नेतृत्व म्हणजे काय असते ते ?
ह्या पुस्तकावर विस्ताराने खूप लिहिण्यासारखे आहे . वेळ काढून वाचा एव्हढेच सांगावेसे वाटते . ह्या पुस्तकाचा इंग्रजी आणि हिंदी अनुवाद झाला तर ते अधिक लोकांपर्यंत पोहचेल असे वाटते .


रावा : शुभांगी गोखले
मी Ph.D. साठी मुंबईत यु डी सी टी त प्रवेश घेतला आणि त्या वेळपासून विरंगुळा म्हणून नाटकं बघणं सुरु केलं . प्रायोगिक नाटकासाठी मी तेजपाल , छबिलदास आणि एन सी पी ए ह्या सर्व ठिकाणी आवर्जून जात असे . शुभारंभाचे प्रयोग पहात असे . १९८८ ला एन सी पी ए तील 'आत्मकथा 'चा पहिला प्रयोग पाहिला होता . डॉ श्रीराम लागू जेवढे आठवतात तेवढीच अपोझिट असलेली शुभांगी संगवई आठवते . एक कमी उंची असलेली अल्लड मुलगी. काम एकदम सुंदर केलेलं . त्याच शुभांगी गोखलेचं ' रावा ' हे काहीसं आत्मचरित्रात्मक पुस्तक हाती आलं आणि एका दमात वाचून टाकलं .तसे हे पुस्तक आत्मचरित्रात्मक नाही . स्वतः च्या जगण्यातील अनुभव , आजूबाजूची माणसे ,जगताना अनुभवास येणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ह्यांच्यावर लिहिलेलं . वाचकाशी संवाद साधणारे लिखाण .

एका स्त्री कलाकाराचा हा प्रवास . हे वाचताना आजचे कलाकार नाटक - सिनेमा - सिरियल ह्या चक्रात कसे अडकले आहेत व त्यांच्या जीवनात उसंत अशी नाही हे लक्षात येते . त्यांचं जगणं छान चित्रित झालं आहे . ते विश्व उभं केलं आहे . पुस्तक आवडलं . 
वडिलांच्या नोकरीमुळे परभणी ,हिंगोली ,जालना आणि औरंगाबाद ह्या मराठवाड्यातील गावातून लहानपण गेलेलं असल्यामुळे ही मुलगी मराठवाड्यात वाढली आणि नंतर पुणे - मुंबईकर झाली असे दिसते .
'इंद्रायणी काठी माझ्या नावे पिंपळ वृक्ष लावा ' , ही आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी सांगितलेली आळंदी ची आठवण  मनाला चटका लावून जाते .Sunday, June 9, 2019

पाहिलेल्या कलाकृती आणि माझ्या प्रतिक्रिया

हैदर ते Hamlet
विशाल भारद्वाज ( विभा ) हा डाव्या विचारसरणीचा लेखक. “मी डाव्या विचारसरणीचा आहे म्हणूनच कलावंत / कलाकार/ लेखक आहे” असे ज्यांना वाटते त्यांचा हा नवा चित्रपट “ हैदर “ . सध्या खूप चर्चेत असलेला. शेक्सपियरच्या Hamlet ह्या नाटकावर आधारलेला किंवा बेतलेला. “शेक्सपियर /Hamlet” ही नावे घेतलीकी प्रेक्षक थोडे आकर्षित होतात. मी ही त्यापैकी एक. काही परीक्षणे वाचली. विभाच्या मुलाखती वाचल्या.  म्हणून सिनेमा पहावयास गेलो. शेवटी शेवटी कंटाळलो. सिनेमा पूर्ण पाहिला. ह्या शेक्सपियरला ( विभा ) नेमके काय म्हणायचे आहे ह्याचा शोध घेऊ लागलो. कलाकृतीची एक मोठी गंमत असते. प्रेक्षक आपला आपला अर्थ लावतो. त्याच्यासाठी दोन शब्द पुरे असतात . १) आवडले २) नाही आवडले. पण समीक्षक खूप लिहून जातात. मग माझ्यासारखा गोंधळून जातो. समीक्षकाला आवडलेले आपल्याला आवडत नाही तेंव्हा मन जास्त विचार करू लागते. कलाकृतीचा असा आस्वाद घेण्याची मला सवय झाली आहे.
हैदरची गोष्ट अशी. हैदरचा काका त्याच्या डॉक्टर असलेल्या वडिलांना मारतो आणि त्याच्या आईशी लग्न करतो. आपल्या वडिलांना कोणी मारले हे त्याला समजते आणि आपली आई त्याच्याशी लग्न करणार आहे हे त्याला जेंव्हा समजते तेंव्हा ह्या हैदरचा शेक्सपियरचा Hamlet होतो. “ सूड घ्यायचा की घ्यायचा नाही “ अशा द्विधा मनस्थितीत तो असतो.
अशी ही विभाच्या  शेक्सपियरच्या Hamlet वर बेतलेली कलाकृती. काहीजणांना ती खूप लक्षवेधी वाटली. ह्या कलाकृतीत काश्मीर हे एक नवीन पात्र. विभाच्या ह्या काश्मीरमध्ये शिकारा आणि शम्मीकपूरची प्रेमाची गाणी नाहीत. तेथे आहे भारतीय सैन्य. सैन्य आणि तेथील नागरिक ह्यांच्यातील तणाव. डाव्या विचारसरणीचा लेखक असल्यामुळे मानवी अधिकाराची गळचेपी करणारे सैनिक अधिकारी तेथे नकोसे वाटतात.
हैदरचे डॉक्टर वडील हिलाल मीर एका आतंकवादी काश्मिरीला आपल्या घरी आणतात आणि त्याच्यावर घरातच शस्त्रक्रिया करतात . हे त्याच्या बायकोला धोक्याचे वाटते. डॉक्टर म्हणून मानवतावादी प्रवृतीचा असलेला हा डॉक्टर हा धोका पत्करतो. मिलिटरीच्या लोकांना ह्या आतंकवादीचा सुगावा लागतो. ते डॉक्टरला पकडतात . त्याला बंदिस्त करतात. त्याचे घर उध्वस्त करतात कारण त्यात आतंकवादी असतात व ते सैनिकावर उलट गोळीबार करीत असतात. ह्या डॉक्टरला  छावणीत ठेवतात व  माहिती काढून घेण्यासाठी त्याचा छळ करतात. हा डॉक्टर तेथून सुटतो खरा पण त्याचाच भाऊ त्याला झेलम नदीत बुडवून मारण्याचे षड्यंत्र रचतो कारण त्याला आपल्या वहिनीबरोबर लग्न करावयाचे असते. आणि अलीगढला शिकण्यासाठी गेलेला हैदर परत येतो. आपले उधवस्त घर पाहतो. वडिलांचा शोध घेतो. आई काकाबरोबर रमलेली पाहून दु:खी कष्टी होतो. आणि ह्या सर्वांचा बदला कसा घ्यावयाचा ह्याचाच विचार करीत तो आतंकवादी होतो.
असा हा हैदर. माणसे आतंकवादी कां होतात ? ह्याचा शोध घेण्यासाठी विभाने घेतलेला शेक्सपियरचा आधार.
मुख्य भाष्य आहे ते AFSPA ह्या आर्मीला दिलेल्या विशेष अधिकारावर. स्वतंत्र काश्मीर कां हवे ? भारतापासून आणि पाकिस्तानपासून स्वातंत्र्य कां हवे हे मांडण्याचा केलेला प्रयत्न. सार्वमतावर मांडलेले हैदारचे विचार. हे लेखकाचे भाष्य की तेथील सध्याच्या परिस्थितीचे वर्णन. सैनीक अधिकारी कसे छळ करतात व त्यांना मिळालेल्या अमर्याद अधिकाराचा दुरुपयोग करतात असे सांगण्याचा प्रयत्न ह्या कलाकृतीतून करण्याचा प्रयत्न दिसून येतो. हे सर्व हैदरच्या तोंडून व्यक्त होते. सिनेमाला प्रेमाची  गोष्ट असावी लागते म्हणून ती सारी पात्रे आहेतच. कुटुंबातील गुंतागुंतीचे संबंध असावे लागतात म्हणून हैदर , त्याचे काका व त्याची आई ह्यांच्यातील संबंध , हैदरची प्रेयसी , प्रेयसीचे वडील आणि त्यांचा काकाला असलेला छुपा पाठींबा . अशा अनेक कौटुंबिक व राजकीय गुंतागुंती. त्याचा काका म्हणजे तेथील राजकारणातील एक कारस्थान करणारे पात्र.
ह्या सिनेमातील काश्मीरमधील अलगतावादी म्हणजे शेक्सपियरच्या नाटकातील राजे , हैदरचा काका खुर्रम म्हणजे क्लाऊडीयस हे पात्र,
विभा एका बाजूला म्हणतात की मी राजकीय भाष्य करीत नाही. मी फक्त माणूस म्हणून राजकीय प्रश्नाकडे बघतो आहे. काश्मीरमधील विचित्र परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबातील निरनिराळ्या व्यक्तींच्या दृष्टीकोनातून बघतो आहे. AFSPA ह्या राजकीय समस्येकडे मी लक्ष वेधून घेतो आहे. त्या पैलूचा काय परिणाम होतो आहे ते शोधतो आहे. त्याचप्रमाणे असंख्य विधवा बायकांच्या प्रश्नाकडे पाहतो आहे.
हाच तर ह्या फिल्मचा उद्देश होता. पण भाष्य करताना विभांचा कल कोणत्या बाजूला आहे हे सतत जाणवते आणि त्यांच्या डाव्या विचारसरणीमुळे ह्या संपूर्ण प्रश्नाकडे कसे बघतात हे प्रकर्षाने जाणवते. आणि तेथेच ह्या कलाकृतीचे कलामूल्य नाहीसे होते व शेक्सपियरच्या पात्राशी  ह्याचा काहीच संबंध नाही असे वाटू लागते.
आतंकवादी का होतात ? हे शोधताना एका बाजूला आतंकवादी समर्थन, सार्वमताचा मुद्दा ठासून मांडणे , मानव हक्क चळवळीचे आपण विचारवंत असल्यामुळे भारतीय सैनिकांनी केलेला अत्याचार योग्य नाही अशी भूमिका घेणे हाच तर ह्या कलाकृतीचा उद्देश असावा हे चित्रपट पाहून जाणवते. काश्मीर मधील अलगतावादी मंडळीना हा सिनेमा अधिक आवडण्याची जास्त शक्यता आहे. ते अंतर्मुख होऊन विचार करणारे असतील असे वाटत नाही. आपल्यासारख्या प्रेक्षकांना हा विचार मुळीच योग्य वाटणार नाही म्हणून हा चित्रपट कितीही कलात्मक करण्याचा प्रयत्न केला असला तरी आवडत नाही. काश्मीरचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. तेथील राजकर्ते , केंद्रात राज्य करणारे आपले सरकार , तेथील अलगतावादी  गट आणि भारतीय सेनेला देण्यात आलेले विशेष अधिकार ह्या सर्वांचा विचार सर्वांनी करावा म्हणून मी हा चित्रपट काढला असे विभांचे म्हणणे आहे. पण त्यांचे भाष्य हे संतुलित नसल्यामुळे पटणारे नाही असे चित्रपट पाहिल्यानंतर वाटते. 
विभा म्हणतात मी हे सारे मला मांडायचे म्हणून मांडतो.  मी अंतर्मुख होऊन विचार केला आहे. तुम्हीही विचार करा असे ते एका बाजूला सांगतात तर मला प्रेक्षकाशी काही देणं घेणं नाही. त्यांना पाहिजे तो अर्थ त्यांनी लावावा. मी लोकप्रियतेच्या मागे लागून काहीही लिहित नाही, असेही ते म्हणतात.
शेक्सपियरकडे लोक पुन्हा पुन्हा जातात. त्याच्या Hamlet चा आधार घेऊन काश्मीर प्रश्नाकडे तेथील आतंकवादी चळवळीकडे एक छोटीशी गोष्ट घेऊन जाणारा हा कलावंत उगाचच साम्य शोधतो आहे असे मला तरी सिनेमा बघितल्यावर वाटले. शेक्सपियरच्या नाटकात मानवी संबंधाचे गुंतागुंतीचे संबंध दिसून येतात. अनेक भावभावनांना वाट करून दिलेली असते. प्रेम , राग , द्वेष , मत्सर , कुटुंब व त्यातील विविध प्रकारची माणसे आणि देश आणि प्रांत ह्या सर्वांचे विलक्षण मिश्रण त्याच्या नाटकात होते. तसे काही ह्या चित्रपटात दिसून आले नाही. तेंव्हा शेक्सपियरचा आधार घेऊन असा चित्रपट काढला असे म्हणणे योग्य नाही.

वाडा चिरेबंदी....

'वाडा चिरेबंदी' नंतरचा दुसरा भाग 'मग्न तळ्याकाठी' चा देखणा नाट्यप्रयोग पाहिला . हे नाटक अधिक कसदार आणि काव्यात्म आहे . ह्या  नाटकात निसर्गकविता ( नाट्यकाव्य ) आहे . विश्व निर्मिती करणारा कोण हा निर्माता ? ह्या संबंधीचे  थोडेसे गूढ चिंतन आहे .
वाडा चिरेबंदी आहे कारण कॊटुंबिक नात्यात घट्ट वीण आहे .Intimacy at a Distance असे ज्याला म्हणतात त्याचे उदाहरण म्हणजे हे कुटुंब .
महेश एलकुंचवार हा मराठी नाट्यसृष्टीला लाभलेला  जबरदस्त नाटककार आहे . चंद्रकांत कुलकर्णी ह्यांनी आपला दिग्दर्शनाचा ठसा उमटवला असून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले . सगळे कलाकार ह्या नाटकामुळे अधिक लोकप्रिय होतील ते त्यांच्या कलागुणांमुळे . त्यांनी ह्या नाटकाचे सोने केले आहे . एक कायमचा लक्षात राहणारा नाट्यप्रयोग .

एका निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी

ह मो मराठे ह्यांची ' एका निष्पर्ण  वृक्षावर भर दुपारी ' ही कादंबरी खूप वर्षापूर्वी वाचली होती . वेगळी होती. तशी निराश आणि दु:खी करणारी .  त्या नंतर त्यांच्या काही कथा दिवाळी अंकातून वाचल्या होत्या. खूप वर्षांनी त्यांच्या ' न्यूज स्टोरी ' ह्या कथेवरून क्षितीज पटवर्धन ह्यांनी ' दोन स्पेशल ' हे नवे नाटक रंगमंचावर आणले . ते सध्या गाजते आहे . १६ पुरस्कार मिळाल्यामुळे प्रेक्षक नाटक पाहायला येऊ लागले आहेत . नाट्यनिर्मिती छान . कलाकार मन लावून काम करणारे . जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक गोडबोले ह्यांचा अप्रतिम अभिनय . जितेंद्र जोशी ह्यांची सहनिर्मिती . दोन जीवांच्या संवादावर चाललेले नाटक. दोघेही पत्रकार . एकाच वर्तमानपत्रात काम करणारे . दोघांचे एकमेकावर प्रेम . नियतीमुळे घटना घडत जातात आणि ते एकमेकांच्या आयुष्यातून नाहीसे होतात . पुन्हा काही वर्षांनी ते समोरासमोर येतात तेव्हा एकदम वेगळेच असतात . परस्पर विरोधी . असहाय . आयुष्याचे भजं असं होतं . हे असं कां होतं ?, काहीच माहित नाही . बहुधा त्याला नियती असे म्हणतात. माणसाचं आयुष्य फार कमी वेळा आखीवरेखीव असतं . त्यामुळेच अशी दोन जीवांची वेगळी गोष्ट पाहायला मिळते . तशी दु:खदायक . निराश करणारी.
पत्रकारितेत असलेला हा नायक . कोणताही दबाव न मानणारा . निर्भीड . पैश्याने विकत न घेता येणारा . संवेदनशील मनाचा . आपल्यापरीने लढणारा . न वाकणारा. आज असे पत्रकार फार थोडे . आजच्या च्यानेल्च्या दुनियेत कोट्याधीश झालेले पत्रकार पाहीले म्हणजे  हा पत्रकार आणि त्याचे असहाय जीवन मनाला निराश करून जाते . पब्लिक रिलेशन ऑफिसर असलेली नायिका काय काय करते आणि तिचे जगणं कसं तिचं रहात नाही. असहाय जगणारी ही स्त्री .
लेखक - नाटककार ह्या दोघांची गोष्ट संवादातून चांगली सांगत जातात. कलाकारांच्या अभिनयामुळे आपण ती शेवट पर्यंत पहात जातो . एक चांगला नाट्यानुभव. आनंद देणारा नसला तरी अंतर्मुख करणारा . प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत हेच ह्या नाटकाचे खरं यश .
खरं म्हणजे मराठी नाटकाचे आजचे प्रेक्षक हे जेष्ठ नागरिकच . कलाकार तसे तरुण . आणि प्रेक्षक वय झालेले. हा प्रेक्षक वर्ग अधिक वयाचा झाला की मराठी नाटक बंदच पडेल असे दिसते .


Saturday, June 8, 2019

खाकी वेषातील माणुसकीची कहाणी


 लोकसत्तेच्या ' चतुरंग ' मध्ये ' वळणवाटा ' ह्या सदरात माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार ह्यांचा लेख वाचला. ' आज आई नाही , पण गीताई आहे ' , अशी सुरुवात करून लिहिलेले हे लिखाण खूप काही सांगून जाते. मी एकदाच त्यांना जवळून पाहिले. त्यांच्याबद्दल खूप ऐकून होतो. पण त्यांना जवळून पाहणे , ऐकणे आणि हे व्यक्तिमत्व कसे आहे हे समजून घेण्याचा योग जुळून येणे कठीणच होते. पोलिस ह्या व्यक्तीची लहानपणापासून भीतीच. त्यामुळे मी पोलिस आणि पोलिस चौकीला फार भितो. पण पोलिसातील माणसे खूप वेगळी असतात. अभ्यासू असतात. विलक्षण कर्तृत्वान असतात. जिद्दीची असतात. तत्वनिष्ठ असतात. खूप प्रामाणिक आणि मदत करणारी असतात. हे समजायला खूप वर्षे गेली.  अरविंद इनामदार ह्यांना मी एकदाच जवळून पाहिले . ते पत्रमहर्षी ' मराठवाडा 'कार अनंत भालेराव ह्यांना भेटण्यासाठी घाटकोपरला त्यांच्या मुलाच्या घरी आले होते. त्यावेळी मी तेथे होतो. अनंतराव ह्यांच्यावर केइएम मध्ये मोठी शस्त्रक्रिया झाली होती. ते घरी परतले होते . अनंतरावांना भेटण्यासाठी इनामदार आले होते. त्यांची जुनी ओळख होती. त्यांच्या अनेक विषयावर गप्पा चालल्या होत्या. मी ऐकत होतो. पोलिस खात्यातील हे वेगळे व्यक्तिमत्व आहे,  हे माझ्या लक्षात आले.
आज त्यांचा लेख वाचला आणि त्यांचे अनुभवाचे बोल खूप काही सांगून गेले. माणूस घडतो तो संस्कारामुळेच. ' आज आई नाही , पण गीताई आहे ' हेच वाक्य खूप काही सांगून जाते.
गेल्या काही दिवसापासून ' पुरोगामित्वाच्या र्हासामागे दलितांचा ब्राम्हणद्वेष ' ह्या विषयावर उलटसुलट चर्चा चालू आहे. ब्राम्हणेतर मंडळींचा हिंसक ब्राम्हणद्वेष सुरु झाला तो गांधी हत्तेनंतर. अरविंद इनामदार हे सांगलीच्या ब्राम्हण कुटुंबातील. गांधी हत्त्या झाली आणि गांधीच्या नावाखाली लोकांनी दगडफेक आणि जाळपोळ सुरु केली आणि ब्राम्हणांची घरे जाळण्यास सुरुवात केली. ह्या लेखात त्यांनी त्यावेळचे जे वर्णन  केलं आहे ते वाचलं की लक्षात येतं की ह्या लोकांना अहिंसा पूजक गांधी समजला नव्हताच. आणि येथून पुढे ब्राम्हणद्वेष सुरु झाला. तो हिंसक होत गेला . जेंव्हा त्यांचे घर जळत होतं तेंव्हाच इनामदारांनी प्रेमळ माणुसकी अनुभवली , हे ही विलक्षण आहे.
त्यांचे वडील त्यावेळी त्यांना म्हणाले , ' आता इनामदारी विसरा , भरभर शिका . मोठे व्हा . कुणावर अन्याय करू नका ' ते पुढे म्हणतात , ' बरं झालं सर्व गेलं . भांडणाचं मूळ गेलं ' . अशा प्रसंगी सुचलेलं जगण्याचं हे तत्वज्ञान.
इनामदार पुढे लिहितात .... ' जसजसं कळूं लागलं तसतसं गांधीजी जास्त आवडू लागले . आणि आईनी पाठ करून घेतलेली गीताई आयुष्यभर साथ देऊ लागली ....
' अरे असं चोरी करून मोठ्ठं होता येणार नाही रे ! खूप डोळसपणे कष्ट करा .चांगलं ध्येय पुढे ठेवा ... '  हे    वर्गमास्तर कुलकर्णीसरांचे संस्कार पुढे कामी आले. आणि इनामदार मोठ्या पदावर जाऊन पोहोचले. ' ' माणुसकी खाकीपेक्षा मोठी ' हे त्यांना चांगलंच माहित होतं म्हणूनच एका असहाय मातेनं प्रेमाने दिलेला चहा पिताना त्यांना वाटलं ' तो माझ्या आयुष्यातील सर्वात छान , चवदार , माणुसकीनं वाफाळलेला चहा होता ... परत असा चहा मिळाला नाही.'  माणसं जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते. खाकी वेषातील ही माणुसकीची अनोखी कहाणी आहे.
पोलिस आणि राजकारणी. एक वेगळच समीकरण असतं. फार गुंतागुंतीचं. माणसाना अधिकार मिळाला की माणसं कशी बदलतात हे त्यांनी चांगलच अनुभवलं आहे. त्याचा एक किस्सा त्यांनी ह्या लेखात दिला आहेच.
त्यांच्या बरोबर काम केलेलं , त्यांच्याच तालमीत तयार झालेले आणि एसीपी म्हणून निवृत्त झालेले एक अधिकारी माझ्या परिचयातले आहेत . त्यांनी पोलिस खात्यातील अनेक गमतीजमती आणि राजकारणी लोकांच्या हस्तक्षेपाबद्दल सहज गप्पा मारताना खूप काही सांगितलं आहे . इनामदारासारखी माणसे पोलिसात राहून खूप काही करतात पण त्यांना खूप काही त्रास होत असतो हे ही तितकेच खरं.

फेसबुकवरील लिखाणावर काही प्रतिक्रिया आल्या होत्या ,त्याची लिंक खाली दिली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1119982558017182&id=100000163447478

पोलिस म्हंटलं की लहानपणी घाबरून जायला होत असे . तक्रार करायला पोलिस चौकीत जायचं म्हणजे अंगावर काटा येत असे . सोसायटीच्या वाचमनला एकदा पकडून नेलं होतं . गरीब होता . त्याचा काहीच गुन्हा नव्हता . तेव्हा पहिल्यांदा चौकीत गेलो आणि त्याला सोडवून आणलं .  काही पोलिस अधिकारी  पुढे संपर्कात आले आणि ओळखीचे झाले . पोलिस म्हणजे मित्र , हे खरं आहे असं मत झालं . ह्या पोलिसांचे आयुष्य फारच धकाधकीचं असतं हे लक्षात येऊ लागलं . एक पोलिस अधिकारी मित्र झाले . त्यांच्याशी गप्पा मारताना अनेक सुरस कथा ऐकल्या . गुन्हेगारी विश्व भन्नाट असतं .आपण कल्पनाच करू शकत नाही . अनेक प्रकारची गुन्हे करणारी माणसे ,त्यांचे नातेवाईक , भ्रष्टाचार , राजकारणी मंडळी ,कोर्ट कचेर्या ,संप ,मोर्चे ,बंद ,व्ही आय पी .एक ना अनेक कटकटी .कौटुंबिक आयुष्य असं नसतेच .मी त्यांना पुस्तक लिहिण्यास सांगितलं . नाही म्हणाले .नको त्या आठवणी . असा वैताग दिसला . पण गप्पा मारताना मात्र ते रंगून जात .मूड असेल तर .
' खाकीतील माणूस ' हे अशोक कुमार ह्या आय पी एस अधिकार्याचे गणेश रामदासी ह्यांनी अनुवादित केलेलं पुस्तक वाचतोय . पण मला माझ्या मित्र असलेल्या पोलिस अधिकार्याची सारखी आठवण होते . ह्या पोलिस अधिकार्यांनी निवृत्त झाल्यावर लिहित रहावे . माणूस समजायला ही पुस्तके खूप कामी  येतील . साहित्यात एक वेगळं दालन उघडेल .

पामचित्रे आणि लेखनकला


सध्यां इंटरनेट , टेस्टटूब बेबी ह्या विषयाची  राजकीय मंडळी चर्चा करीत असतात . त्यामुळे आठवण झाली .
मध्यप्रदेशातील दहा हजार वर्षापूर्वीचे भीमबेटका लेण्यांमधील रंगचित्रे पाहिल्यानंतर त्याकाळी माणूस कसा व्यक्त होत असे ह्याची कल्पना येते . अशमयुगातील चित्रकला . तेव्हाचे फेसबुक . सोशल मीडिया . अभिव्यक्ती स्वातंत्र्य .
पुरीहून भुवनेश्वरला जाताना रघूराजपूर हे १०० चित्रकार रहात असलेले गांव पहाण्यात आले . इ स पूर्वीच्या ५ व्या शतकातील माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीची कल्पना आली . अश्मयुगातून माणूस दगडावर कोरून व्यक्त होऊ लागला . कागदाचा शोध लागला नव्हता . पामपत्राला वाळवायचे . अणुकुचीदार धातूच्या लेखणीने लिहायचे  किंवा  चित्र  काढायचे आणि त्यात नैसर्गिक झाडाझूडपापासून तयार केलेले रंगद्रव्य वापराचे आणि सुरेख चित्रनिर्मिती करायची . रामायण - महाभारत मुद्रित करायचे .
पामपत्रावरील लिखाण आणि चित्रकला आजही त्या गावातील चित्रकार  तशीच  साकार करतात ही त्यांना मिळालेली दैवी देणगी आहे . पट्टचित्रकला - पामलिफ पेंटिंग्स - हे विलक्षण तंत्र मन वेधून घेतेच आणि त्या काळची माहिती - कला तंत्रज्ञाची कल्पना देते .
आज डाइज - पिगमेंटचे हजारो कारखाने आहेत पण निसर्गातून वनस्पतीपासून मिळणारे रंग अदभूत आहेत . इंडिगो - नील शेती संपली पण भारतीय स्वातंत्र्याची चळवळ तेथूनच सुरु झाली हे ही लक्ष वेधते . हे त्यावेळचे इंटरनेट युग - सोशल मीडिया माझे लक्ष वेधून घेते .

Thursday, June 6, 2019

समाजवादी मंडळींची शोकांतिका

समाजवादी मंडळींची शोकांतिका कशामुळे झाली? ,हे आजचे समाजवादी तपासून बघत नाहीत ,हेच लक्षांत घेणे आवश्यक आहे. त्यांना पक्ष बांधणी जमली नाही. सगळेच नेते. कार्यकर्ते नाहीतच. पक्षफुटीचा रोग लागलेला. आतां तर घराणेशाही चालू आहे. कुठे डॉ लोहिया ? कुठे जयप्रकाशजी ? ह्या समाजवादी मंडळीनी Congress  सोडली नसती तर चित्र बदलले असते .
ह्या मंडळींनी आधी वेगळा गट केला . मग Congress सोडली. पक्षबांधनी केलीच नाही. सगळेच बुध्दीवादी. स्वयंभू नेते. एकत्र राहिले नाहीत. लोहिया- जयप्रकाश, एस एम - गोरे  वगैरे...

पुरोगामी कोणाला म्हणायचं ? सेक्युलर म्हणजेच पुरोगामी का ?
 राज्यघटनेत सेक्युलर शब्द नंतर घातला .तो घातला तसा काढूनही टाकता येतो . समाजवादी हा शब्द असाच घातला . जगातूनच समाजवाद नाहीसा होत आहे . माओचा किंवा कार्ल मार्क्सचा साम्यवाद आहे कुठे ? एकपक्षीय लोकशाही मान्य आहे काय ?
भारतात समाजवाद्यांच्या बारा पार्ट्या . कोणता समाजवाद खरा ? ते सर्व समाजवादी सेक्युलर आहेत काय ? सेक्युलरमध्ये जातीयवाद येत नाही का ?
गांधीजी समाजवादी होते का ? नेहरू रशियन दौऱ्यावरून आल्यावर समाजवादी समाजरचनेच्या गोष्टी बोलू लागले . त्यापूर्वीच जयप्रकाश - लोहिया वगैरे समाजवादी गट काँग्रेसमधून बाहेर पडला . इंदिरा गांधींनी बँकांचे राष्टियीकरण करून समाजवादी पाऊल उचलले तेव्हा धारिया - चंद्रशेखर समाजवादी तरुण तुर्क बाहेर पडले . काँग्रेस खरेच समाजवादी आहे का ? राहुल गांधी ह्यांची विचारसरणी कोणती ?
गांधीजींनी समाजवादी समाजरचनेचा कधी उल्लेख केला नाही .डॉ आंबेडकरांनी कम्युनिझमचा विरोधच केला . त्यांनी समाजवादी आणि सेक्युलर शब्द राज्यघटनेमध्ये समाविष्ट का केले नसावेत ?

एक  वर्षापुर्वीचा प्रतिगामी पुरोगामित्व ' हा गिरीश कुबेर ह्यांचा झणझणीत अंजन घालणारा अग्रलेख अप्रतिम आहे . ह्यातील महत्वाचे मुद्दे :
* काँग्रेसचा मुस्लिम अनुनय
* सनातनी मुस्लिम धर्ममार्तंड आणि त्यांच्या आवाजात  आवाज मिसळणाऱ्या अन्य तथाकथित पुरोगामी मंडळींचा बोटचेपेपणा
* पुरोगामित्वाचे ध्वजधारक म्हणविणारे डावे आणि समाजवादी
* पुरोगाम्यांची तोंडपाटीलकी आणि डाव्यांचे खेळ
* पुरोगाम्यांची भंपक बोटचेपी बौद्धिके आणि बेगडी पुरोगामित्व
ह्यावर टाकलेला प्रकाश खूप काही सांगून जातो .
ह्यामुळेच पुरोगामी ,  समाजवादी  आणि निधर्मी ह्या शब्दांचा अर्थ हरवून बसला आहे .

 पुरोगामी - समाजवादी - सेक्युलर वगैरे वगैरे लोक बोलतात ,लिहितात तेंव्हा अधूनमधून नरहर कुरुंदकर ह्यांची सुभाषिते पेरतात .'शिवरात्र' चा उपयोग म्हणजे त्यांचे जणू काही बायबलच असते. पोपटासारखे बोलत असतात.

तसे राष्ट्रसेवादलाच्या पठडीत तयार झालेले काही बोलघेवढे नेते प्रामाणिक असले तरी राजकारणी नाहीत. सगळेच नेते. कार्यकर्ते नाहीतच. युपी बिहार मध्ये तर घराणेशाहीच चालू आहे. कुठे लोहिया ? कुठे कर्पुरी ठाकूर?
समाजवादी विचाराचे पत्रकार कोण ? असा प्रश्न विचारावा अशी परिस्थिती आहे.

अस्तु


अस्तु : म्हातारपणची शोकांतिका
काही दिवसापूर्वीच Being Mortal हे अतुल गवांडे ह्यांचे ‘म्हरातारपणाचं  जगणं’ ह्या विषयावरचं पुस्तक वाचलं आणि गेले कित्येक दिवस म्हातारपण आणि वृद्धाश्रम  ह्या विषयाचा भुंगा पाठीमागे लागला. काल “ अस्तु “ हा ह्याच विषयावरचा मराठी चित्रपट पाहिला. डिसेंबर २०१३ चा हा चित्रपट . दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि अनेक पुरस्कार प्राप्त झालेला . मुंबईत आतां चित्रपटगृह मिळाले. फारच थोड्या ठिकाणी चालू आहे .मुद्दाम जिथे चालू आहे तेथे जाऊन पहावा लागतोय. तिकडे सलमान खानचा चित्रपट ५०० कोटीचा गल्ला मिळवतोय आणि इकडे ह्या सुंदर चित्रपटाला १०० म्हातारी डोकी काठी टेकवत येत आहेत . कोण पहाणार? शरीराने जिवंत पण मनाने मेलेल्या असलेल्या (स्मृतीभंश झालेल्या )  एका म्हाताऱ्याची शोकांतिका ?
म्हातारे होणं ( Ageing ) मोठं कठीण असतं .परावलंबी असलेलं म्हातारपण अधिक कठीण असतं . आपण धडधाकड राहून निवृत्तीनंतरचं शांतपणे सुखाने जगणं वेगळं आणि स्मृतीभंश होऊन म्हातारपण जगणं अधिक कठीण . ती एक शोकांतिकाच असते. आपल्या मुला-मुलीनी ह्या शोकांतिकेला बरोबर घेऊन आणि स्वीकारून कसं जगायचं ? हा खरा प्रश्न आहे . त्यांच्याकरिता हे महाकठीण काम आहे . संवेदनशील मुलामुलींना ते अधिक त्रास देणारं आहे.
एक बुध्दिमान संशोधक प्राध्यापक . संपूर्ण जीवन रसरसून जगलेला . दोन मुलीना जेवढे देता येईल तेवढे देऊन सुखी शांत जगणारा हा म्हातारा. अल्झायमरसारख्या रोगामुळे लहान मुल झालेला . शरीराने जिवंत पण मनाने मेलेला . अशा ह्या मुलाला सांभाळणारी त्याची मुलगी आणि तिचा डॉक्टर जावई. आपण असताना आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात कशाला ठेवायचे ? असा विचार करून वडिलांचीच आई झालेली ही मुलगी संवेदनशील मनाची असल्यामुळे खूप काही सहन करीत वडिलांचे सर्व काही करीत असते आणि एक दिवस तिचे हे म्हातारे वडील नाहीसे होतात . त्यावेळी तिची जी अवस्था झाली आहे त्याची  गोष्ट सांगणारा हा चित्रपट. माणूस संवेदनशील असला की त्याची जी फरफट होते ते आपण अनेक कुटुंबातून पहात असतोच. तिची धाकटी बहिण. दूर राहणारी . Intimacy at a distance असा Rational विचार करणारी आणि स्वतःच्या करिअरमध्येच रमलेली . दूर असलेल्या मुलीला मात्र असे वाटत असते की बाबांचे प्रेम जवळ असलेल्या मुलीवरच अधिक आहे . अनेक कुटुंबात असे प्रकर्षाने जाणवते . ते कौटुंबिक ताणतणाव सर्वत्रच दिसून येतात.
म्हाताऱ्या मंडळीकडे सुखाने जगण्यासाठी पैसा आहे , घर आहे. तरीपण अधिक म्हातारे होणं आणि कसल्याही प्रकारचे पंगुत्व येणे हे आपल्या अपत्यासाठी त्रासदायक आहेच. आपल्याला लहान मुलासारखं जपताना त्यांना बरेच काही सहन करावे लागते. ती मुलं अधिक संवेदनशील असतील तर त्यांचा अधिक कोंडमारा होत असतो. त्यांच्या जगण्याच्या वेगात आपण एक अडथळाच असतो. असे होणे फार क्लेशकारक असते. आपल्याकडे वृद्धाश्रम इतके चांगले नाहीत. Assisted Living हा प्रकार फारसा उपलब्ध नाही.
आपण ज्या वडिलावर प्रेम करतो आणि त्यांना सांभाळतो ते वडील ( अप्पा) आपल्याला साधे ओळखत नाहीत हे दु:ख फार मोठं आहे . त्या मुलीची ( इराची) भूमिका  इरावती हर्षे ह्यांनी फार सुंदर केली आहे . मनाला चटका लावून देणारी ही भूमिका पहाण्यासाठी तरी हा चित्रपट एकदा पहावा. वडिलांची भूमिका करणारे मोहन आगाशे म्हणजे डॉ लागू नंतरचे नटसम्राट . अतिशय सुंदर भूमिका करणारे . त्यांची ही भूमिका पाहिल्यानंतर असे म्हातारपण आपल्या वाटेला येऊ नये असा विचार अनेकदा डोक्यात येतो आणि मग आपल्या डोक्यातून जातच नाही. अर्थात हे आपल्या हातात नसते. जावई ( मिलिंद सोमण ) आणि धाकटी मुलगी ( देविका दप्तरदार ) ह्यांच्या भूमिका उल्लेखनीय आहेत. अमृता सुभाष पारितोषिक विजेती आहेच. तिच्या भूमिकेतील 'माणूसपण' कायम लक्षात राहतं. चित्रपट अस्वस्थ करणारा आहे .

ओळख सियाचेनची
ग्रंथालीने प्रकाशित केलेले अनुराधा गोरे ह्यांचे ' ओळख सियाचेनची ' हे पुस्तक हाती आले . थोडेसे चाळले आणि लक्षात आले की हे पुस्तक वाचायलाच हवे .
१९४७ साली पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर पाकिस्तानच्या सैनिकांनी ब्रिटिश सेनाधिकारी ह्यांच्या सहकार्याने गिलगिट - कारगिल ह्या सिंधू नदीच्या आजूबाजूने दौड करीत लेह काबीज केले होते . त्यावेळी आपले दिल्लीश्वर गाफीलच राहिले होते आणि जीनांच्या आक्रमक लष्करी कारवाया चालूच होत्या . काश्मीरचा हिंदू राजा हरिसिंग जेव्हा हतबल झाला तेव्हा मदतीसाठी धावला पण शेख अब्दुल्ला स्वतंत्र काश्मीरचे स्वप्न बघत दोन्ही डग्र्यावर पाय रोवित होते .ह्या पुस्तकातील एका प्रकरणात काश्मीरचा सर्व इतिहास संक्षेपाने लिहिला आहे . तो वाचणे आणि समजून घेणे फार महत्वाचे आहे . हा इतिहास जितका महत्वाचा आहे तितकाच ह्या भागाचा भूगोल . काश्मीर - सियाचेन - लेह लडाख - अकसाई चीन ह्या भूभागाची पूर्ण माहिती समजून घेतल्याशिवाय तेथील लष्करी कारवाई समजणे अवघड आहे . हा ह्या पुस्तकाचा मुख्य विषय आहे . अतिशय अभ्यासपूर्ण माहिती असलेले हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला आपल्या संरक्षण प्रश्नाविषयी अधिक जाण होते . वेळ काढून अवश्य वाचावे असे हे पुस्तक .

Tuesday, June 4, 2019

भाई

'भाई ' चा उत्तरार्ध आज संध्याकाळी ६ चा शो-  बिग  सिनेमा  संगम , अंधेरी  येथे पाहिला . मोजून १६ प्रेक्षक होते . पहिल्या भागावर लोकसत्तेतील लेखामुळे परिणाम झाला  होता . टीव्ही चॅनेल्सवर उलटसुलट चर्चा झाली . दुसऱ्या भागाकडे प्रेक्षक वळलेच नाही असे दिसते . मिडीयाचा असा परिणाम होतो आणि चित्रपट डब्यात जातो . मीडियावर फारसा विश्वास ठेऊ नका .
हा चित्रपट मला तर आवडला . ज्यांनी पुलंना पाहिले आहेत ,त्यांना ऐकले आहे ,त्यांचे साहित्य वाचले आहे, त्यांना  ह्या चित्रपटातून पुलं सतत भेटत राहतात , त्यांचे संवाद  आपल्या कानांत घुमत राहतात , त्यांचे गाजलेले विनोद  आपल्याला हसवत राहतात .  ' आहे मनोहर तरी ' ह्या त्यांच्या पुस्तकातील सुनीताबाई  आणि पुलं सतत भेटत राहतात . पुलं आणि त्यांचे गायक मित्र - कुमार गंधर्व ,वसंतराव देशपांडे आणि भीमसेन जोशी  चित्रपटातील संगीत मैफलीतून भेटतात आणि त्या सर्वांच्या  अजरामर गाण्यामुळे आपण मंत्रमुग्ध होतो . आपण ती गाणी असंख्य वेळा ऐकलेली असली तरी ह्या मंडळींच्या एकत्र मैफलीची आपल्याला नुसती ऐकीव माहिती असते . त्यांच्या ऋणानुबंधाच्या गाठी ह्या संगीतामुळेच पडल्या  होत्या .त्यांचे  ते  विलक्षण मैत्री असलेले लोभस चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसते . ह्या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम खूप काही सांगून जाते . बाबा आमटे ह्यांच्या आनंदवनात  रमणारे  पुलं बघताना  आपल्याला त्यांचे मोठेपण जाणवत राहते.  पुलं हा  नुसता विनोदाचा बादशहा नाही  तर 'देणार्याने देत जावे ' हे  सांगणारा  महामानव आहे . मध्यांतर होण्यापूर्वी असलेले  ते प्रसंग  नकळत  आपल्या डोळ्यात पाणी आणतात. आणीबाणीतील पुलं आपल्याला माहित आहेतच.   पहिला ' महाराष्ट्र भूषण ' हा राज्य पुरस्कार ज्यांनी त्यांना दिला त्यांचे  त्या मागचे नंतरचे राजकारण आपल्यात विलक्षण  चीड निर्माण करते . पण  पुलं ह्या माणसाची मान कशी ताठ होती ह्याचे दर्शन आपल्याला अधिक आनंद देते .
हा चित्रपट अवश्य पहा . हा एक सुंदर चित्रपट आहे . उत्तरार्ध मला अधिक आवडला . सर्वच कलाकारांचे काम अप्रतिम .पुलंसाठी  पहा  पण ह्या  सर्व कलाकारासाठी  अवश्य पहा . पुलं च्या चित्रपटासाठी   रिकाम्या खुर्च्या  पाहतांना मला थोडं वाईटच वाटलं .

'आहे मनोहर तरी' मधील पु ल आणि आपण पाहिलेले , ऐकलेले आणि आपल्याला समारंभातून दिसलेले पु ल थोडेसे वेगळे आहेत. तसेच मांजरेकर दिग्दर्शित 'भाई 'मधील पु ल अनेक बाबतीत वेगळे आहेत . 'भाई 'मधील संवाद रत्नाकर मतकरी ह्यांचे आहेत .त्यांनी पु ल ना जवळून बघितले असेलच .म्हणूनच पटकथाकार गणेश मतकरी ह्यांनी मांजरेकर ह्यांना रत्नाकर मतकरी ह्यांच्याकडून संवाद लिहून घेण्यास  सांगितले असावे. मांजरेकर ह्यांनी त्यांचे स्वातंत्र्य वापरले असेलच. शेवटी सिनेमाच्या गुणदोषात सर्वच थोडेबहूत जबाबदार आहेत. शेवटी हा सिनेमा त्या सर्वानी मिळून तयार केला आहे. प्रेक्षकांनी ज्याचेत्याचे पु ल शोधावेत .

मुकुंद संगोराम हे चांगले कला समीक्षा करणारे लेखक आहेत. आजचा लोकसत्तेतील त्यांचा ' भाई : पुलंचे भंपक चित्रण ' हा लेख वाचला. त्यांची टीका मला तरी चुकीची वाटते. सिनेमा भंपक नाही. तो बघण्यासारखा आहे. असामान्य माणसेही रोजच्या जीवनात तशी सामान्यच असतात.पुलंचं  ' आहे मनोहर तरी ' असं जे वर्णन सुनीताबाईनी  केलं आहे ते खरं असलं तरी त्यामुळे पुलंचे मोठेपण कमी होत नाही. पु लं च्या जीवनाची विविध रूपे पहायला मिळतात. त्यांच्या आयुष्यातील दु:खद घटना मनाला चटका लावून जातात. हा सिनेमा भंपक मुळीच नाही. असे हेडींग देउन सनसनाटी निर्माण करण्याचा हा प्रयत्न वाटतो.

बायोपिक चित्रपटात असे होत रहाणारच.
आत्मचरित्रात तरी सगळे कुठे खरे असते.

खरं म्हणजे अनेक नावाजलेले कलाकार हे दारू पिल्यानंतर अधिक खुलतात . त्यांच्या संगीत मैफिली त्यानंतर अधिक रंगतात. ह्याची अनेक उदाहरणे माहितीची आहेत. बायोपिक सिनेमात ह्याचा खुबीने वापर करणारे दिग्दर्शक गल्ला भरण्यासाठी ह्याचा उपयोग करून घेतात असे म्हणणे तसे चूकच आहे.

गिर्यारोहक

गिर्यारोहक मंडळी भन्नाट जीवन जगत असतात . त्यांच्या  जगण्यात  एक थ्रिल असतं . किती विविधता अनुभवतात ! निसर्गाशी नातं जुळलेलं असतंच . निसर्ग साथ देतो असं नाहीच . किती तयारी करावी लागते ? प्रवास , व्हिसा , प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम , इतर देशातील वकिलातीतील  माणसं , वाटाडे , कुक , बांधून घ्यायचं सामान , होणारी चिडचिड , बरोबर घ्यावी लागणारी औषधं , सहप्रवासी असलेल्या लोकांचे स्वभाव , निराश होणारं मन , अत्युच्च आनंदाचे क्षण , निसर्गाची विविध रूपं . एक ना अनेक .
एरीक न्युबीचं हिंदुकुश पर्वतावरील शिखरं गाठण्याचं प्रवास वर्णन वाचत असताना मीच त्या गिर्यारोहणाचा अनुभव घेत होतो .
विशेष म्हणजे भौगोलिक परिसराचे वर्णन करताना जुना  इतिहासही तितकाच महत्वाचा . ग्रेट अलेक्सझांडर ह्याने हिंदुकुश पर्वताच्या बाजूने प्रवास करीत हिंदुस्थान कसा गाठला ?न्यूरिस्तान / काफिरीस्तान ओलांडून बाबर भारतात कसा आला ? लॉर्ड कर्झन ह्यांनी ह्या भागाला भेट कशी दिली ? युरोपियन लोकांनी अनेकदा स्वाऱ्या करून ह्या भागातील सुंदर स्त्रियांशी संग साधून युरोपियन रंगाची संतती कशी निर्माण झाली ? अशी आणि विविध माहिती ह्या पुस्तकातून मिळते . बाबरनामा इंग्रजीतून अनुवादित झाला आहे . इंग्रजांनी त्याचा अभ्यास करून हा भाग पादांक्रत केला आहे . तो जणू रोड मॅप टू इंडिया . इतिहास आणि भूगोल एकत्रच वाचले पाहिजेत . हा ऐतिहासिक भाग वाचायचा नसेल तर सरळ पुढच्या प्रकरणाकडे जा , अशी नोट दिली आहे .
ह्या भागातून निघालेल्या नद्या पुढे सिंधू नदीला कशा मिळतात ह्या संबंधीचे वर्णन सुंदर आहे . आपण लेहला सिंधू नदी पहातो . त्यानंतर ती पाकिस्तानात जाते . नुब्रा व्हॅलीला आपण काराकोरम पर्वतांच्या रांगा पहातो . सियाचेनचा पुढील भाग लष्करी परवानगीशिवाय आपण पाहू शकत नाही . हिंदुकुश पर्वतांच्या रांगा विलोभनीय आहेत . हे लक्षात येते . बाबर किंवा अलेक्झांडर त्या मार्गाने भारतात कसे आले असतील  ?, आणि इंग्रजांनी हा भाग कसा पालथा घातला असेल, ह्याचे चित्र ह्या पुस्तकातून समोर उभे राहते . हे नुसते गिर्यारोहणाचे प्रवास वर्णन नाही . ह्यातून ह्या भागाचा इतिहास - भूगोल डोळ्यासमोर उभा राहतो . एक अप्रतिम प्रवासवर्णन .

गुजरातचा विकास


खरं म्हणजे गुजरातचा विकास गेल्या २० - २२ वर्षात झाला का ? असा प्रश्न काही जणांना पडतो . मी १९८० ते २००० ह्या वर्षात अनेक वेळा - महिन्यातून चारदा - व्यवसायानिमित्त गेलो होतो . वापी - अंकलेश्वर - भरूच - बडोदा - सुरत -  अहमदाबाद - जामनगर ह्या भागात संचार होता . दत्ता सामंत ह्यांच्या गिरणी कामगार संपानंतर गुजरातमधील कापड गिरण्या भरभराटीस आल्या होत्या . रासायनिक उद्योगात वेग आला होता . शहरे बकाल झाली होती . सर्वत्र घाणीचेच राज्य होते . साबरमती गचाळ नाला झाली होती . अनेक छोटे उद्योग पुढे येत होते . त्यानंतरच्या काळात खूप काही बदलले . एका नव्या उत्साहाने उद्योग निर्मिती झाली . जागतिक बाजारपेठ गुजरातला मिळाली . आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात गुजरात चमकू लागला . नवीन शिक्षित गुजराती  पिढी सर्वत्र दिसू लागले . नवी पिढी शिक्षित व्यावसायिक मंडळी म्हणून जगा समोर आली . उद्योगात' घरना माणूस' कन्सेप्ट संपला . इतर प्रांतातले लोक गुजरातमध्ये स्थायिक होऊ लागले . हा बदल गेल्या २० वर्षातला . गुजरात मॉडेल म्हणजे काय ? हे समजून घ्यायचे असेल तर आधीचा गुजरात आणि आजचा  गुजरात समजून घ्यावा लागेल .
तोच अनुभव मध्यप्रदेशचा . एका बिमारू राज्याचा . आज मध्यप्रदेश अधिक पुढे आहे .
अंबानी आणि अदानी म्हणजे गुजरात नव्हे . तेथे छोट्या मोठ्या उद्योगात अनेक लहान मोठे अंबानी आहेत .
अंबानी ह्यांचे नाव जगातील श्रीमंत लोकात गणले जाते . पण ह्याच अंबानीमुळे अनेक जण खूप श्रीमंत झाले , हे लोकांच्या लक्षात येत नाही . साध्या माणसांनी रिलायन्स मध्ये पैसे गुंतवून खूप पैसे कमविले . फ्लॅट घेतले .गाड्या घेतल्या . छोटे उद्योग सुरु केले . पैशातून पैसे कमविले . हे इतरांना जमले नाही . पैसे कमविणे हे काही पाप नसते . गरिबीला गोंजारत जगणे पाप असते .
ह्या लोकांना हे यंत्र सापडले आहे .
Aisi machine lagaunga, iss side se aaloo ghusega, uss side se sona niklega. हे शक्य आहे . ते तर  ह्या गुजराती समाजाला चांगले जमते .


सौदी अरेबियात भेटलेला मराठी माणूस

मी एकदा सौदी अरेबियात एका कंपनीत ट्रेनिंग देण्यासाठी गेलो होतो . त्या कंपनीत अनेक मराठी लोक कामाला होते . माझी येण्या - जाण्याची सोय करण्यासाठी एक कार होती . त्याचा ड्रायव्हर कोकणातील मराठी मुलगा होता . ८ वर्षांपासून तेथे आहे . कारखान्यात मराठी तंत्रज्ञ होते . एक आर अँड डी मॅनेजर होता .पुण्याचा .वय ४५  .बायको आणि मुले पुण्यात. १२ वर्षांपासून तेथे . २ - ३ वर्षाला पुण्याला येऊन जातो . प्रत्येक वेळी त्याला परत जायचे नसते . त्याची बायको आणि मुलगी त्याला म्हणते , ' तुम्ही येथे परत येऊ नका . तुमच्या पैशाची सवय झाली आहे . आमचे कसे होणार ? येथे फारसे पैसे मिळणार नाही .मग आमचे कसे होईल? ' . अतिशय निराश चेहरा करून तो हे मला सांगत होता .'  माझ्या बायको - मुलीला मी येथेच राहून त्यांना पैसे पाठवावे असे वाटते .मी त्यांना नकोच आहे ' , असे म्हणताना त्याच्या डोळ्यात पाणी आले .
अतिशय हुशार , उच्च विद्याविभूषित तंत्रज्ञ पुणेकरांची ही अवस्था . मन हेलावले 

प्रणव मुखर्जी ह्यांच्या आत्मचरित्रातून ......


प्रणव मुखर्जी ह्यांच्या आत्मचरित्रातील पुस्तकात ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्या आहे त्या प्रांतात राजकारणाची वळणं वेगळी असतात ह्याचा परामर्श त्यांनी घेतला . बंगाल , आसाम आणि पंजाब ह्या तीन प्रांताचा विशेष उल्लेख त्यांनी केला  आहे . इंग्रजी राजवटीत प्रांतिक निवडणुका घेतल्या त्यावेळपासून त्यांनी आढावा घेतला . त्यावेळी मुस्लिम लिगचे  जे राजकारण चालले होते त्या  पुढे काँग्रेस back  फुटवरच होती . काँग्रेसला हिंदूंचा पक्षच मानले जात असे .
काँग्रेस मुस्लिम नेत्यांना पुढे करून इंग्रजांना आपण खरे प्रतिनिधी असे दाखविते म्हणून जिना त्यांच्या मुस्लिम लीगच्या प्रतिनिधी मंडळात एक दलित वर्गाचा प्रतिनिधी घेत असत .
त्या वेळच्या बंगालमध्ये मुस्लिम बहुसंख्य असल्यामुळेच पु .पाकिस्तानची निर्मिती झाली . एव्हढेच नव्हे तर कलकत्ता हे शहर पु .पाकिस्तानची राजधानी व्हावी ह्यासाठी मुस्लिम नेते प्रयत्नशील होते . सरतचंद्र बोस सारखे काँग्रेस नेते फझहूल गटाच्या जवळचे होते. सरदार पटेल ह्यांनी त्यांना चांगलेच फटकारले .नाहीतर कलकत्ता पु .पाकिस्तानची राजधानी झाली असती .
बंगालची फाळणी व्हावी ह्यासाठी डॉ शामा प्रसाद मुखर्जी अनुकूल होते .कारण मुस्लिम बहुसंखेमुळे हिंदूंना सुरक्षीत वाटत नव्हते .
आजही मुस्लिम लोकसंखेमुळेच काँग्रेस किंवा ममताची टीएमसी ह्यांना मुस्लिम अनुनयामुळेच निवडणूक जिंकणे शक्य झाले आहे .सीपीएमची भूमिका तशीच आहे .
मुस्लिम अनुनय ह्यावरच तेथील राजकारण चालते .
शेख मुजिबर रहमान आणि बंगला देश निर्मिती ह्याचा आढावा घेताना बंगाली भाषिकांचा सबनॅशनलइझम कसा जन्माला आला ह्याचा इतिहास खूप काही सांगून जातो .
काश्मीरचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा आहे , ते तेथील ९८ टक्के मुस्लिम संखेमुळेच .
बंगला देशाची निर्मिती हा बंगला भाषा हीच आमची मातृभाषा ह्या चळवळीतून झाली आणि त्यांना उर्दू भाषेसारखाच दर्जा हवा होता .
अवामी लीगला १९७१ साली पाकिस्तान नॅशनल असेम्ब्लीत सर्वात अधिक जागा मिळाल्या होत्या आणि पश्चिम पाकिस्तानवर त्यांनी राज्य केले असते .
जीनांनी बंगाली भाषेला उर्दूसारखा दर्जा कधीच देणार नाही म्हणून स्पष्टपणे सांगितले होते त्यामुळेच पूर्व बंगालचे मुसलमान विरुद्ध गेले .
पूर्व बंगालच्या मुसलमानांना कलकत्ता शहर त्यांच्याकडेच हवे होते .
अनेक हिंदू आणि बौद्ध लोकांची शहरे पूर्व बंगालमध्ये गेली होती .
इंग्रजांनी बंगाल आणि पंजाब ह्या प्रदेशांची फाळणी करण्यासाठीच कमिशन नेमले होते .
फोडा आणि झोडा हीच इंग्रजांची नीती होती .
कलकत्ता आणि नौखालीच्या दंगली त्यामुळेच झाल्या . गांधीजी ही फाळणी थांबवू शकले नाहीत .
पश्चिम पाकिस्तान विरुद्धचा लढा जेव्हा शेख मुजाबर  रहमान ह्यांनी सुरु केला त्यावेळी १ कोटी बंगला देशी भारतात आले . त्यावेळी ते प बंगाल , आसाम आणि त्रिपुरात ते आले . ते परत गेलेच नाहीत . आणि त्यामुळेच इंदिरा गांधी ह्यांनी बंगला देशाला पाठिंबा दिला . तो दिला नसता तर अधिकांश बंगला देशी भारतातच घुसले असते .
All these points are mentioned in Autobiography of Pranav Mukherjee .

मुसाफिर

'मुसाफिर' अच्युत गोडबोले ह्यांचे ४७४ पानाचे ( आवृत्ती ४५ ) आत्मचरित्र वाचायला घेतलं. आज वाचून संपवलं. हा इन्फोटेकमधला दादा माणूस. नारायण मूर्ती ह्यांनी पटणी कॉम्पुटर सोडली तेंव्हा त्या खुर्चीवर जाऊन बसलेला हा गृहस्थ. पुढे अनेक मोठ्या आय टी  कंपन्यात सीइओ. हे माहित असल्यामुळे पुस्तकातील त्या भागापासून वाचायला सुरुवात केली. मी गणकयंत्राशी त्यावेळपासून संबंधित असल्यामुळे मला विशेष उत्सुकता होती. अर्थात मी बिझिनेस Application मध्ये कधीच नव्हतो. पण technical application मध्ये सर्व जनरेशनचे कॉम्पुटर वापरले होते. त्यामुळे हा भाग मी प्रथम वाचला. हा तर भारतीय आय टी व्यवसायाचा इतिहास. प्रत्येक आयटीवाल्याने अवश्य वाचावा. सुंदर. अच्युत गोडबोले ह्यांच्या करिअरचा ग्राफ.
सोलापूरच्या मध्यमवर्गीय ब्राम्हण कुटुंबातील एक हुशार विद्यार्थी. मुंबईला आय आय टीत प्रवेश घेतो. अभ्यासाव्यतिरिक्त अनेक विषयात रस. चौफेर वाचन. त्याच्यासारखेच त्याचे अनेक मित्र. डाव्या विचारसरणीकडे झुकलेले. वेगळं काहीतरी करू पाहणारे. बीटेक झाल्यावर नोकरीचा विचार सोडून आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी चळवळ उभारणारे.
दहा दिवसाची तुरुंगाची हवा खाल्यानंतर अच्युतच्या लक्षात येते की हे आपलं काम नाही. मुंबईला परतल्यानंतर असेच भटकणे. वाचत राहणे. बेकारीचे दु:ख सोसणे. नाटक , साहित्य , तत्वज्ञान , चित्रकला . अर्थशास्त्र , कामगार  चळवळी दलित चळवळी, ह्या सर्वच क्षेत्रात रस. केमिकल  इंजिनीअरिंग विसरून जाणे. आणि मग नुकत्याच नव्याने सुरु झालेल्या आयटी क्षेत्रात नोकरी. तेथे मन लागतच नाही. Jack of All - Master of  None अशी अवस्था. विलक्षण जिद्दीने प्रोग्रामिंग मध्ये तज्ञ होणे. हा प्रवास उल्लेखनीय. मग वाटचाल व्यवस्थापकीय पदाकडे. यशामागून यश. आर्थिक सुबत्ता. एक देखणे यश. हा प्रवास म्हणजे हे आत्मवृत्त. वाचण्यासारखे.
ह्या आत्मचरित्राचा मन हेलावून सोडणारा भाग म्हणजे अच्युत आणि त्याच्या पत्नीने सोसलेले दु:ख . त्यांच्या मुलाला ऑटीझमचे दुखणे आहे. कोणताही माणूस कोलमडून पडेल. पण अच्युत त्यातून कसा उभा राहतो हे वाचताना आपण त्याच्या जिद्दीने प्रभावित होतो.
असा हा चौफेर व्यक्तिमत्वाचा माणूस समजून घेतला तर आपलेही जीवन समृद्ध होते. एक विलक्षण व्यक्तिमत्व.