काल “हिंदू” वर्तमान पत्रात “ Your Money , My Money “ हा एक लेख वाचला. आणि
विचारांचे अनेक तरंग मनात उमटले. आजकाल नव्या पिढीत दोघे पती-पत्नि अर्थाजन करीत
असतात. बायको शिकलेली असावी, कमावती असावी, अर्थार्जन करणारी असावी, असे बहुतेक
सर्वांनाच वाटू लागले आहे. त्यात चूक अशी काहीच नाही. ३० -४० वर्षापूर्वी मलाही
असेच वाटत असे. मी तर असा निर्णय घेतला होता की पत्नी ही अर्थार्जन करणारीच असावी.
ती शिक्षीतच असावी. स्त्रीने अर्थार्जनाच्या बाबतीत स्वावलंबी असावे ,असे माझे
त्यावेळपासूनचे मत होते आणि आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात उत्पन्नाची साधने म्हणजे
मिळणारा पगार. त्यात मौजमजा कशी होणार? आपल्याला जगणे सुखकर असावे असे वाटते तर
कुटुंबाचे उत्पन्न वाढवणे आवश्यकच आहे. छोट्या one room kitchen च्या ऐवजी दोन किंवा तीन
बेड रूम चा फ्ल्याट असावा,छोटी कार असावी, आठवड्यात एकदा सिनेमा-नाटक बघावे, बाहेर
जेवायला जावे, मुलांना नवे नवे खेळ आणून द्यावेत, वर्षातून एकदा भारतात कुठेतरी
प्रवास करावा आणि सुट्टी मजेत घालवावी. एकदा तरी परदेशवारी करावी . चांगले कपडे – महागड्या
साड्या घ्याव्यात. एक ना अनेक. स्त्रियांना तर सोनेचांदी आणि हिर्यांचे वेड . ते
ही हवे असतात. ही अगदी छोटी छोटी स्वप्ने. जीवनमान महागले आहे. सर्वच किमती वाढतच
असतात. मुलांच्या शिक्षणावरचा खर्च वाढलेला आहे. अशावेळी स्त्रियांनी नोकरी करून
घराला हातभार लावला तर बिघडले कुठे? त्यांनी नोकरी केली तर ही छोटी छोटी स्वप्ने लवकर पूर्ण होतात. आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा
वाढतच असतात. त्या गरजा नसून आवश्यक वस्तू वाटू लागतात. मग बाजारात आलेला नवा फोन
हवा असतो. आय प्याड हवा असतो. हाय स्पीड इंटरनेट हवा असतो . चांगला क्यामेरा हवा
असतो. आय म्याकस मध्ये थ्री डी सिनेमा पहायचा असतो. हे सारे आवश्यक आहे असे वाटू
लागते. मिळणारा पगार ( त्यातून वजा होणारे हप्ते , कर, सर्व प्रकारच्या बचतीचे
हप्ते, इंशुरन्सचे हप्ते, वगैरे वगैरे ) म्हणजे टेक होम स्यालरी फारच तुटपंजी आहे
असे वाटू लागते. आणि म्हणूनच आपली पत्नी कमावती हवी असे वाटणे काहींच चूक नाही. ती
असावीच. तिच्याही इच्छा लवकर पूर्ण होऊ शकतात. आणि आर्थिक कारणावरून होणारी घरातील चिडचिड कमी होते. पण
.... इथेच नवा तणाव सुरु होतो. “तुझा पैसा आणि माझा पैसा”.
मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबातील स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने अर्थार्जन करतात . त्यांना परुषापेक्षा कमी मजुरी मिळते. परंतु दिवसभराचे काम संपल्यावर मिळालेल्या पैशाचे रेशन घेऊन स्वयंपाक करून त्या आपल्या मुलांना भरवतात तर त्यांचे नवरे देशी दारू ढोसून निपचित पडतात. धुणी-भांडी करणारी किंवा स्वयंपाक करून अर्थार्जन करणारी स्त्री घराला हातभार लावतच असते. कनिष्ठ मध्यमवर्गातील स्त्रीला पुरुषापेक्षा कमी पैश्याची नोकरी असते. त्यामुळे तिला थोडासा न्यूनगंड असतो. आणि पुरुषाला वाटते की आपला पगार जास्त आहे. तिच्या पगारात काय होणार?आपणच तर घर चालवतो. ह्या उलट ज्यास्त शिकलेल्या आणि पुरुषाइतकेच किंवा त्यांच्यापेक्षा अधिक पैसा कमावणार्या स्त्रीयांचे प्रश्न मोठ्या शहरात दिसून येतात. म्हणूनच “ तुझा पैसा , माझा पैसा “ हा वाद अनेक कुटुंबात दिसून येतो आहे. आयटी इंडस्ट्रीमुळे पुणे,मुंबई,दिल्ली,बंगलोर ह्या शहरात ही वस्तुस्थिती आहे.” हा आपला पैसा आहे . दोघांचा आहे. आपल्यासाठीच आहे” ही जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे. पण पुरुषी अहंकार मध्ये अडवा येतो. माझेच उदाहरण देतो. माझी पत्नी महाविद्यालयात प्राध्यापक होती. स्थिरस्थावर असल्यामुळे दरमहा उत्पन्नाचे साधन होते. त्यामुळेच मी व्यवसाय करावयाचे ठरविले. व्यवसायात स्थिर होण्यास आणि यश मिळण्यास काही कालावधी जावा लागला. पण घरचे रेशन अडले नाही. घर व्यवस्थित चालू राहिले. त्यानंतर माझे आर्थिक उत्पन्न खूपच वाढले परंतु तिचा आर्थिक सहभाग नसता तर मी व्यवसाय करूच शकलो नसतो. म्हणजे माझे आजचे आर्थिक यश हे आम्हा-दोघांचेच आहे. हा तुझा पैसा आणि हा माझा पैसा असे मला वाटत नव्हते . तिचा पगार ब्यांकेत सरकार खजिन्यातून जमा होत असल्यामुळे तिने पगार कधीच माझ्या हातात दिला नाही तेंव्हा मी गंमतीने म्हणत असे की “ मी तर तुझा पगार पाहिलाच नाही. मला कुठे हातात दिलास? “ माझे हे बोलणे तिला अनेकदा लागले हे माझ्या फार उशिरा लक्षात आले. तेंव्हा “ तुझा पैसा, माझा पैसा” असे म्हणणे योग्य नव्हे. हे खरे.
अशा पैशाच्या गोष्टी फक्त छोटे मोठे व्यावसायिकच करीत असत. आता ह्या गोष्टी सर्व सुशिक्षित व नोकरी करणाऱ्या स्त्रियांचा घरात होत असतात व एक तणावाचे वातावरण निर्माण करतात हे सत्य आहे. डबल आर्थिक इंजिन असणारी ही कुटुंबे. हा सर्व कमावलेला पैसा जातो कुठे ? असा प्रश्न जेंव्हा ते एकमेकाला विचारतात तेंव्हाच भांडणाला सुरुवात होते. आपण बचत का करीत नाहीत? असे प्रश्न दोघे एकमेकाला विचारत सुटतात. पैश्यावरुन कुरबुरी सुरु होतात. लग्न व्यवस्थेला तडा जातो की काय अशीही अवस्था काही कुटुंबात दिसून येते. मुख्यतः पुरुषाला अर्थ व्यवहार स्वतःकडेच हवे असतात. “माझा पैसा हा माझा पैसा आणि तुझा पैसा हा आपला पैसा. माझे उत्पन्न तुझ्यापेक्षा अधिक त्यामुळे पैसे कसे खर्च करावयाचे हे मीच ठरवणार” अशी बहुतेक सर्व पुरुषांची भूमिका असते. त्यामुळेच खरा तणाव निर्माण होतो,हे त्याच्या लक्षातच येत नाही. त्याकरिता दोघामध्ये अधिक सुसंवाद हवा. एकमेकांच्या गरजा लक्षात घ्यावयास हव्यात. हे तणाव वरचेवर वाढतच जाणार. कुटुंब व्यवस्थेला हे हानिकारक आहे. पाश्चिमात्य देशात हा प्रश्न भेडसावत होता. आता तो आपल्याकडे ही मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे.त्यामुळे तुझा – माझा न करता सामोपचाराने , दोघांनी एकत्रित विचार करून आर्थिक निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

No comments:
Post a Comment