|
कैलास |
आयुष्य
फार सुंदर आहे. आपण ते अधिक सुंदर करावयाचे असते. त्या करिता निसर्गाकडे बघावे
लागते. हिमालयात गेलात तर आयुष्याचे नवे नवे अर्थ जाणवू लागतात. त्यासाठी
हिमालयाचे यात्रिक व्हावे लागते. मी तो अनुभव घेतला आहे. मी तर हिमालयाच्या
प्रेमातच पडलो आहे. स्विस मध्ये आल्प्स पर्वताच्या रांगा बघितल्या.ऑस्ट्रियामधून
झेककडे जाताना आणि क्रोएशिआतून स्लोवेनियामार्गे ऑस्ट्रिया कडे येताना आल्प्सची
विविध रूपे पाहिली. निसर्ग सोन्दार्याने नटलेला हा परिसर नितांत सुंदर आहे ह्यात
वाद नाहीच.तसेच डेनवर च्या परिसरातील अमेरिकन पर्वतांच्या रांगाही विलोभनीय आहेत.
ग्र्यांड क्यनिअनचे सौंदर्य तर विलक्षण आहे. थक्क करणारे आहे. तरीही हिमालयाचे
सौंदर्य वेगळेच आहे. हिमालय म्हणजे “ या सम नसे कोणी" असाच आहे. दर ३ ते ५ किलोमीटर नंतर, तो आपले रूप बदलत असतो.
२००० किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचा हा हिमालय बघणे तसे अवघडच आहे. परंतु
त्याची विविध रूपे बघणे विलोभनीय आहे. हिमालय सुंदर आहे. विलोभनीय आहे. रौद्र आहे. Charming आहे. दु:खं देणारा आहे.
त्रास देणारा आहे. प्रवासात आनंदाचे वेगळे रूप दाखवणारा आहे. प्रत्येक वेळी नवा
अनुभव देणारा आहे. नवीन काही शिकवणारा आहे. अजिंक्य आहे. तुम्हाला तुमचे खुजेपण
दाखविणारा आहे. तो तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याच्याशी स्पर्धा करू शकत
नाहीत. त्याला जिंकू शकत नाहीत. तुम्ही निसर्गावर मात करू शकत नाहीत. तो तुम्हाला
एकाकी करतो. त्याच्याकडे बघितले की तुम्हाला वेगळेच वाटू लागते. कधी कधी तो एक
निसर्ग कविता असतो. त्याचे गाणेच आपण गात असतो. तो त्याची उंची सांगत असतो. आपण
त्या उंचीवर गेलो की आपल्याला खोली जाणवू लागते. एकाबाजूला अधिक उंचीची नवी शिखरे
दिसतात तर दुसर्या बाजूला खोली बघून जीव घाबरा होतो. तो आपल्याला सारखा आमंत्रित
करीत असतो. आपण १०,००० फुटावर गेलो की १४००० फुटावर जाण्याचे
आमंत्रण मिळते. पुनः १७,००० फुटावर पोहोचलो की अधिक वर जावे
असे वाटते. पण ते फक्त गिर्यारोहकच करू शकतात. त्या बर्फाछादित शिखरांचे रंग सारखे
बदलतात. सकाळी आणि संध्याकाळी दिसणारी ती सोनेरी शिखरे मनात तशीच जपून ठेवलेली
असतात. ती कधीच विसरू शकत नाहीत. त्या थंड वातावरणातही ती कोवळी सोनेरी किरणे
उबदार असतात.
मी हिमालय बराचसा पालथा घातलाय. पहलगाम, सोनमर्ग ,गुलमर्ग तर सुंदर आहेतच.
परंतु मनालीचे सौंदर्य न्यारेच आहे. एकदा रोहतांग पास ओलांडला आणि लेह कडे जाणारा
रस्ता पकडला की ४५० किलोमीटर लांबीचा हा हिमालय पाहिला की डोळे भरून जातात. जगातील
कोणतीही पर्वतराजी अशी नसेल. प्रत्येक ५ किलोमीटर नंतर ह्याचे रूप बदलत असते. हा
एक अवर्णनीय प्रवास आहे. पण हा प्रवास सतत बदलत असतो. लेह मार्गावर भागीरथी
नदीचा प्रवाह सोबत असतो. लेहला गेल्यावर लडाखची विविध रूपे दिसू लागतात. खारदुंगला
पास ओलांडला की नुब्रा कडे जाताना मन थक्कच होते. हिंदकुश पर्वतराजी ही समोर दिसू
लागते. लडाख मधील पोगांग लेक डोळ्याचे पारणे फेडते. सिंधू नदीच्या काठाने पण
उंचावरून जाताना नदीचे रूप डोळ्यात मावत नाही. जेंव्हा सिंधू आणि झंकार ह्या
दोन नद्या मिळतात त्या ठिकाणच्या हिमालयाच्या पर्वत रांगा डोळे विस्फारित करतात.
त्यांच्या बरोबर काराकोरम पर्वताच्या रांगाही सोबत करीत असतात. चंद्रावर जशी जागा
आहे तशीच हिमालयात आहे. त्याला Moon land म्हणतात. आपण जणू काही
पृथ्वीवरील चंद्रावरच आहोत असे भासते. अति पूर्वेकडील सिक्कीम दार्जीलिंग ,भूतान ,तवांग ह्या परिसरातील हिमालयाच्या रांगा अगदीच वेगळ्या आहेत. उत्तराखंड
मधील प्रवास अधिक कठीण आहे.
असा
हा हिमालय. वेगळा हिमालय. हिरवा हिमालय.( झ्याग्मू जवळचा ), शुभ्र हिमालय. सुंदर
हिमालय. देखणा हिमालय. रौद्र हिमालय ( कैलास-मानस सरोवाराकडे जाताना). फुलांचा
हिमालय (Valley of Flowers) . वेलींचा
हिमालय. तरू-लतांचा हिमालय ( भूतानमध्ये). नद्यांचा हिमालय (उत्तराखंडमध्ये ).
धबधब्यांचा हिमालय ( तवांगकडे जाताना). खळाळनार्या पाण्याचा हिमालय. अल्लड
धावणाऱ्या नद्यांचा हिमालय ( मनाली ते लेह ). फेसाळणारया पाण्याचा - नद्यांचा
हिमालय (गोविंद घाट ते घांगरीया) , घोंगावनारे आवाज , त्या पाण्याची वाटणारी
विचित्र भिती ( सिंधू नदीच्या काठाने उंचावरून पाहताना), तर कधी त्याच पाण्याची
वाटणारी गंमत ( अलकनंदा नदीच्या काठाने जातांना) ,आजूबाजूचे निसर्ग वैभव
(भूतान), ती
दाट झाडी . ती हिरवाई . सारेच काही अप्रतिम ,अवर्णनीय ,जीव घेणे सौंदर्य
(हेमकुंड) ) , कासावीस करणारे सौंदर्य(
नुब्राला जाताना) , कधी खूप शांत (देवप्रयाग)
तर कधी खूप रौद्र (बद्रिनाथजवळ) , कधी उल्हासित करणारे
(मानस सरोवर), तर
कधी उदास करणारे (मधेच पाउस पडला आणि अडकलो तर) अवघड रस्ते .
हिमालय
डोळ्यात मावत नाही. कसा मावणार . प्रचंड लांबी रुंदीचा. लांबी –रुंदी तशीच खोली किंवा
उंची. लांबी – रुंदी
पाहिली . लेह-लडाख , मनाली-लेह (४५० कि.मी. ) ,लेह- नुब्रा व्ह्याली , काठमांडू ते मानसरोवर
(९५० कि.मी.) , खारदुंगला पास ( १७५००
फुट) , भूतान ( पूर्व-पश्चिम
भाग), हेमकुंड
( १४००० फुट ),सिक्कीम – दार्जीलिंग रस्त्यावर
तिस्ता नदीच्या काठाने जाताना, अतिपूर्वेकडे तवांगला असममधून
जाताना दिसणारा हिमालय तर फारच कठीण आहे. हा प्रवास सर्वात कठीण आहे.
नुसत्या खडकाळ रस्त्यांचा. रस्ते नाहीतच.
हिमालय
तसा ठिसूळ आहे. आपला सह्याद्री तसा टणक आणि कणखर. हिमालय सारखा ढासळत असतो. पाणी
आणि बर्फ त्याला नाजूक करतात. त्याच्या चिरा चिरा करतात. नद्यांचे प्रवाह बदलून
टाकतात ( ब्रम्हपुत्रा सारखी बदलत असते.). तवांगला जाताना तो किती ठिसूळ आहे ,कसा सारखा ढासळत असतो ते
लक्षात येते.
बद्रीनाथला भीम पुलाजवळ सरस्वती नदी ज्या बोगद्यातून भरधाव वेगाने
बाहेर पडते, तो
प्रचंड वेग बघण्यासारखा आहे. कोठून निघते ही सरस्वती कळत नाही. त्या पर्वतापलीकडे
तिबेट आहे. तिचा उगम त्या बाजूला. पर्वत फोडून ती भरधाव बाहेर येते. डोंगर फोडून
ती आली कशी? अगम्य.
आणि काही किलोमीटर अंतरावर ती अलकनंदास मिळते. अलकनंदाच खरी मोठी नदी. मंदाकिनी, नंदाकिनी,भागीरथी ,सरस्वती ह्या नद्या तिलाच
मिळतात. देवप्रयाग-रुद्रप्रयाग नंतर तिला गंगा म्हणतात.गंगोत्रीहून निघालेली
भागीरथी-गंगा शेवटी अलकनंदास मिळतात. यमुना ही नंतर गंगेला येऊन मिळते.
अलकनंदेच्या काठाने केलेला प्रवास खरोखरच अविस्मरणीय आहे. कोणीही हिमालयाच्या
प्रेमात पडणारच. मी तर आहे हिमालयाचा प्रेमी आणि यात्रिक.
( हिमालयाची झलक दाखविणारी आमच्या प्रवासातील काहीं क्षणचित्रे
|
लडाख |
|
सिंधू नदीचा काठ - लेह |
|
हिमालयातील चंद्र प्रदेश |
|
चांगला १७,८०० फुट |
|
पोन्गंग लेक - ३ किलोमीटर अंतरावरून |
|
पोन्गांग लेक , पलीकडे चीनची सीमा |
|
पुष्पावती नदी - अवखळ -अल्लड -प्रचंड वेगात धावणारी |
|
VALLEY OF FLOWERS |
|
VOF |
|
गोविन्द्घाट ते घांगरीया |
|
गंगा |
|
सरस्वती - डोंगर फोडून बाहेर येते - पलीकडे तिबेट |
|
भूतान |
|
हिमालय - भूतान- पलीकडे तिबेट |
|
हिमालयाच्या रांगा |
|
अलकनंदा |
|
भूतान - ही फुले हृदयरोग बारा करतात |
|
भूतान मधील हिमालयाच्या पर्वतराशी |
|
खारदुंगला - पलीकडे नुब्रा व्हाली - सियाचीनला जाणारा रस्ता |
|
नुब्रा कडे जाताना |
|
खारदुंगला - नुब्राहून परतताना |
|
SAND DUNES - नुब्रा |
|
अलकनंदा रुद्रप्रयाग जवळ |
|
रुद्रप्रयाग - अलकनंदा आणि मंदाकिनी संगम |
|
अलकनंदा च्या काठाने प्रवास |
|
पुष्पावती - VOF ला जाताना |
|
VOF |
|
VOF |
|
सरस्वती |
|
पुष्पावती - VOF कडे जातांना |
|
हिमालयातील नद्यांच्या काठाने चाललेले प्रवास |
|
तवांगला जाताना - ० डिग्री |
|
तवांगला जाताना |
|
धबधबा - तवांगला जाताना असे अनेक धबधबे |
|
तवांगला बर्फाने गाठले |
|
तवंग - चीन सीमा फक्त ६० किलोमीटरवर |
|
बर्फात अडकलो - तवांग कडून परतताना |
|
उन्हाळ्यात एवढा बर्फ - तवांगला जाताना |
|
सूर्योदय - हिमालयातला |
|
पुष्पावती |
|
गंगा |
No comments:
Post a Comment