धृतराष्ट्र आणि कौरवा पार्टी
कौरवा पार्टी आणि महंमद अली कर्णाची मुस्लिम लीग ह्यांच्यात तीव्र मतभेद होते. इंग्रजांनी आपल्याशी बोलणी केल्याशिवाय आपण स्वातंत्र्याच्या वाटाघाटी करणार नाही असा स्पष्ट संदेश कर्णाने व्हाइसरॉयला दिला होता. कौरवा पार्टी मोठी असली तरी अनेक प्रांतात मुस्लिग लीगचे बळ लक्षणीय होते. करणीस्तानची मागणी जोरात होती. व्हाइसरॉय व्हिसकाऊन्ट Drewpad ह्यांची नव्याने भारतात नेमणूक झाली. त्याच्याबरोबर लेडी Georgina Drewpad ह्याही भारतात आल्या. त्यांचे हस्तिनापुरात जंगी स्वागत झाले. भारताला स्वातंत्र्य कधी द्यायचे हाच अजेंडा घेऊन व्हाइसरॉय भारतात आला होता. मुस्लिम लीगचे महंमद अली कर्ण आणि कौरवा पार्टीचे गंगाजी ह्यांची व्हाइसरॉय बरोबर बोलणी सुरु झाली होती. धृतराष्ट्र कौरवा पार्टीचा प्रतिनिधी म्हणून व्हाइसरॉयला अनेक वेळा भेटत असे . गंगाजीचा फाळणीला विरोध होता तर कर्ण स्वतंत्र देश हवाच अशा विचारांनी पेटलेला होता. गंगाजी कर्णाला नव्या अखंड देशाचे पंतप्रधानपद देण्यास तयार होते. विदुर आणि धृतराष्ट्र ह्यांना गंगाजींचे हे विचार मान्य नव्हते. त्यांना करणिस्तानची मागणी मान्य करावी व उर्वरीत भारताचे वेगळे राष्ट्र म्हणून मान्य करावे, असेच वाटत होते. महंमद अली कर्णाला अखंड भारताचे पंतप्रधानपद देण्यास दोघेही तयार नव्हते. गंगाजी त्यामुळे एकटे पडले. गंगाजींच्या आश्रमात कौरवा पार्टीची एक उच्चस्तरीय बैठक झाली. रफी ह्या मुस्लिम नेत्याला कौरवा पार्टीचे अध्यक्षपद देण्यात आले. ते महंमद अली कर्णाच्या विरोधातच होते . गंगाजींना देशाचे पंतप्रधानपद हे धृतराष्ट्रालाच द्यायचे होते. कौरवा पार्टीतील बहुसंख्य प्रतिनिधींना ते विदुरासारख्या शासकीय कामात तज्ज्ञ असलेल्या व अनुभवी असलेल्या व्यक्तीस द्यावे असेच वाटत होते.. गंगाजीच्या पुढे कोणाचे काही चालणार नव्हतेच. तरीही फाळणीचा ठराव बहुसंख्य मताने कौरवा पार्टीने मान्य केला. तुम्ही माझे हृदय कापीत आहात असे गंगाजी बैठकीत म्हणाले व तेथून रागारागाने निघून गेले. If you agree to break the country , you will break my heart असे हे शेवटचे वाक्य उच्चारून गंगाजी सभा सोडून निघून गेले. त्यानंतर व्हाइसरॉयने देशाची फाळणी केली व स्वतंत्र करणीस्तानची निर्मिती झाली. धृतराष्ट्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले तर महंमद अली कर्ण करणिस्तानचे पहिले प्रमुख झाले. धृतराष्ट्राने भारताच्या स्वातंत्र्यदिनी हस्तिनापुरातील किल्ल्यावर जे भाषण दिले ते खूपच गाजले. देशभर लोकांनी आनंद व्यक्त केला. त्यावेळी गंगाजी मात्र दुखी होते व त्यांच्या आश्रमात ते सुन्नपणे बसून राहिले. फाळणीचे परिणाम दोन्ही देशांना अनेक दिवस भोगावे लागले. निर्वासितांचे लोंढे दोन्ही देशात आश्रयासाठी जात होते. खूपच मोठ्या प्रमाणावर मनुष्यहाणी झाली . नवनिर्मित देशासाठी तो अतिशय कठीण असा काळ होता. गंगाजींना फाळणीचे दुःख असह्य झाले. त्यांच्या शांततेसाठी पदयात्रा चालू झाल्या . एका बाजूला हिंदू मुस्लिम दंगली पेटत होत्या. तर दुसऱ्या बाजूला गंगाजी पदयात्रा आणि उपोषण करून लोकांना शांत करीत होते. त्यांच्या प्रार्थनासभा चालूच होत्या. रोज फाळणीची नवी दुःखे घेऊन लोक त्यांच्याकडे येत होते . सर्वत्र तीव्र असंतोष होता. ह्याच काळात म्हातारपण आणि स्वभावातील विक्षिप्तपणा ( Eccentricity ) ह्यामुळे गंगाजी अधिक त्रस्त झाले आणि त्यांनी त्यांचे सत्याचे नवे प्रयोग त्यांच्या आश्रमात सुरु केले.
इकडे धृतराष्ट्र देशाचा पंतप्रधान झाला आणि त्याने जोमाने राज्यकारभार सुरु केला. व्हाइसरॉयशी बोलणी करतानाच धृतराष्टाचे व्हाइसरीन जीऑग्रिना हिच्याबरोबर मैत्रीचे संबंध वाढले. लोकांना ते लक्षात येऊ लागले . त्यावर बरीच कुजबुज होऊ लागली. स्वातंत्र्यानंतर व्हाइसरॉय आणि त्याची पत्नी इंग्लंडला परत गेले. पण काही महिन्यानंतर जिऑग्रिना एकटीच भारतात परत आली . तिला भारताची सफर करावयाची होती. ती पंतप्रधानांची पाहुणी म्हणून त्यांच्याकडेच रहात होती. त्यावेळी त्यांनी भारतातील अनेक प्रसिद्ध ठिकाणांना भेटी दिल्या. ती धृतराष्ट्राबरोबर सामाजिक कामात लक्ष घालू लागली. त्यांच्याबरोबर कार्यक्रमाला जाऊ लागली. लोक धृतराष्ट्र आणि जिऑग्रिनाच्या प्रेमसंबंधावर बोलू लागले. शशी थरूर ह्यांनी हे प्रेमप्रकरण खूपच रंगवून सांगितले आहेत व त्यावर पानेच्या पाने खर्च केली आहेत. त्या प्रेमसंबंधातूनच द्रौपदी ही कन्या जन्माला आली . जिऑग्रिना इंग्लंडला गेल्यानंतर तिचे पालनपोषण एका ओळखीच्या भारतीय कुटुंबाने केले . नंतर हीच द्रौपदी मॉक्रॅसी पाच पांडवांची पत्नी झाली. त्यावर थरूरांनी बरिच पाने लिहिली आहेत . तसा ह्या सर्व प्रकरणांचा मूळ महाभारताशी कसलाही संबंध नाही. हे थरूरांचे अफाट कल्पनाविश्व असलेले महा भारत आहे. आणि ते एके ठिकाणी म्हणतात की 'मी महाभारताशी प्रामाणिक राहून ही कादंबरी लिहिली आहे'.
ह्याच काळात गंगाजींवर प्राणघातक हल्ला झाला. त्यांचा खून करण्यात आला. मुसलमानांना ते हिंदूंचे नेते वाटत असत तर काही हिंदूंना ते मुसलमानांची बाजू घेतात असेच नेहमी वाटत असे . महंमद अली कर्णाला त्यांना पंतप्रधान करावयाचे आहे , म्हणजे ते हिंदूंवर मोठा अन्याय करतात असे हिंदूंना वाटत असे. त्यांचा खून एका हिंदूनेच केला. धृतराष्ट्राला आपल्यावर आभाळ कोसळले असे वाटले.
' एक दिवा मावळला . अंधार झाला " असे उद्गार त्यांच्या तोंडून निघाले. 'आपण पोरके झालो. आपला महागुरू गेला ', असे त्यांना वाटले . त्याचवेळी महंमद अली कर्णाने शोक व्यक्त करताना म्हंटले , 'भारतातील हिंदूंच्याकरीता हा मोठा धक्का आहे'. कर्णाने गंगाजींना कायमचे हिंदूंचाच नेता मानले होते. आपणच मुस्लिमांचे हित जपतो असे कर्णाला वाटत असे. ह्या संकटातून सावरण्यासाठी धृतराष्ट्राचा थोडा वेळ गेला. कौरवा पार्टीत धृतराष्ट्रशिवाय इतर ही मोठे नेते होते. त्यापैकी काहीजणांना धृतराष्ट्राने आपल्या मंत्रिमंडळात सामील करून घेतले होते. जयप्रकाश द्रोण , विदुर , रफी आदी मंडळी त्याच्या मंत्रिमंडळात होती. त्याचवेळी निवृत्त होऊन लंडनला परत जाणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना आपण भारतातून जाण्यापूर्वी आपल्याला मोठा मेहनताना मिळावा असे वाटत होते व त्यासाठी त्यांचे जोराचे प्रयत्न चालू होते. ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने जयप्रकाश द्रोणाची त्यांच्या राजवटीत खूप निर्भत्सना केली होती , त्यांचा अपमान केला होता. त्याच अधिकाऱ्याला कसलाही विशेष बोनस न देता द्रोणाने इंग्लंडला रिकाम्या हाताने रवाना केले. हे प्रकरण मोठे मजेशीर आहे. थरूरांनी ते खूप रंगवून सांगितले आहे. त्याचवेळी भारताला नवा राष्ट्रपती मिळाला. त्याचे आणि धृतराष्ट्राचे तसे फारसे संख्य नव्हते. त्याच्यांत बरेच मतभेद होते.
धृतराष्ट्रासमोर मनिमीरचा मोठा प्रश्न उभा राहिला होता . विदुराला ह्या प्रश्नात लक्ष न घालण्याचा सल्ला धृतराष्ट्राने दिला होता व तो प्रश्न स्वतःच हाताळायचे त्यांने ठरविले होते . शेख अझरुद्दीन ह्या मनिमिरच्या मुस्लिम नेत्याशी त्यांचे चांगले संबंध होते .मणिमीरचा राजा व्यभिचारसिंग हा हिंदू राजा होता तर तेथील मुस्लिम लोकांवर शेख अझरुद्दीनचा अधिक प्रभाव होता. मुस्लिम बहुसंख्य असलेला प्रदेश भारतात सामील होणे म्हणजे भारत हा हिंदूंचाच देश नसून तो एक सेक्युलर देश आहे असे धृतराष्ट्राला जगाला दाखवून द्यावे असे वाटत असे. असे केले की भारत हा खरा सेक्युलर देश आहे हे जगाला आपल्याला सांगता येईल असे धृतराष्ट्राला वाटत असे. विदुराला मात्र तसे वाटत नसे. ते बरोबर नाही असेच त्यांना वाटत असे. पण पंतप्रधानांशी खटका उडवणे बरे नाही म्हणून ते शांतपणे बसले. शेखला कौरवा पार्टीने अनेकवर्षे पाठिंबा दिला होता. त्यामुळे शेखच्या मदतीने मनिमीरला भारतात सामील करून घेणे सहज शक्य होईल असे धृतराष्ट्राला वाटत असे. मनिमीरच्या व्यभिचारसिंग ह्या राजाने भारताच्या अटी मान्य नाहीत असेच धृतराष्ट्राला ठासून सांगितले होते . तिकडे महंमद अली कर्णाने मणिमीरवर आपले सैन्य पाठविले होते व मणिमीरचा बराचसा भाग ताब्यातही घेतला होता . विदुराने धृतराष्ट्राला कर्णाची धूर्तचाल काय आहे? ह्याची पूर्ण कल्पना दिली होती . धृतराष्ट्र हा शेखवर अधिक विसंबून होता . त्याचवेळी धृतराष्ट्राच्या संरक्षण मंत्र्यांनी करणिस्तानचे सैनिक मणिमीरमध्ये आंतपर्यंत घुसले आहेत ही ताजी बातमी दिली. धृतराष्ट्राने आपला माणूस व्यभिचारसिंगाकडे बोलणी करण्यासाठी पाठविला. तो भारताच्या राजदूताशी बोलण्यासाठी तयार नव्हता. तो त्याच्या रंगमहालात त्याच्या रंभाउर्वशी बरोबर रंगून गेला होता. हे पाहून विदुर स्वतः व्यभिचारसिंग ह्याच्या रंगमहालात घुसला व त्या रंभा ऊर्वशीत रंगलेल्या राजाशी त्याच्या शयनगृहातच वाटाघाटी करू लागला. व्यभिचारसिंगचा तो रंगमहाल आणि त्याच्या अनेक रमणींचे वर्णन थरूरांनी इतके बेफाम केले आहे की आपण एका रंगील राजाची कामसूत्राची टेप पाहतो आहोत की काय असे आपल्याला वाटते व आपण रंगून जातो.अर्धनग्न अवस्थेतील मणिमीरचे महाराज आणि त्याच्या रंगमहालात अनेक ललना समोर असताना विदुर राजाला करारावर कशा सह्या करावयास लावतो हे वाचताना आपण एकीकडे हसत असतो आणि मणिमीरचा प्रश्न हा व्यभिचारसिंगामुळे निर्माण झाला आहे की शेखमुळे निर्माण झाला आहे असा विचार करायला लागतो. धृतराष्ट्राची ही मोठी चूक असते व त्या चुकीचेच परिणाम आजचा भारत भोगतो आहे ह्याची आपल्याला जाणीव होते. जेंव्हा विदूर व्यभिचारसिंगाला ठणकावून सांगतो की भारताचे सैन्य मणिमीरला पाठवीत आहोत ते भारताची भूमी भारतात रहावी ह्यासाठीच . तुझे राज्य खालसा होणार हे नक्की. तेंव्हा व्यभिचारसिंग शांतपणे मणिमीर भारतात विलीनीकरण करण्याच्या करारावर सही करतो. विदुर तो करार घेऊन हस्तिनापूरला पोहोचतो . त्याचवेळी करणिस्तानचे सैन्य मणिमीरचा बराचसा प्रदेश काबीज करून पुढे सरकलेले असते. भारतीय सैन्य आणि ते सैन्य समोरासमोर आलेले असते.
धृतराष्ट्र ह्याचवेळी अजून एक मोठी चूक करतो. मणिमीरच्या राजाचा हा करार घेऊन हा प्रदेश भारताचाच आहे असे सांगण्यासाठी युनोकडे धांव घेतो. युनो हा भूभाग डिस्प्युटेडआहे म्हणून जाहीर करते आणि करणिस्तानने गिळंकृत केलेला प्रदेश त्यांच्याच ताब्यात राहतो .धृतराष्ट्राची ही खेळी चुकते व हा प्रदेश वादग्रस्त होऊन बसतो. हे जे घडते त्यावर कौरवा पार्टीच्या बैठकीत खूप चर्चा होते. धृतराष्ट्र विरोध करणाऱ्या नेत्यांना सांगतो की, 'ज्यांना माझा हा निर्णय मान्य नाही त्यांनी कौरवा पार्टी सोडून जावे'. काही दिवसातच अनेक जण कौरव पार्टी सोडून जातात . थरूरांनी धृतराष्ट्राचा युनोत जाण्याचा निर्णय हा एक स्टुपिड निर्णय होता असे स्पष्टपणे लिहिले आहे. धर्मावर आधारित देशाची विभागणी होते , हा गंगाजींच्या स्वप्नांला चक्काचूर करण्याचा प्रयत्न होता. ते स्वप्न धृतराष्ट्राला पूर्ण करता आले नाही. ही ह्या नव्या महा भारताची शोकांतिका आहे .
ह्याचवेळी जयप्रकाश द्रोणाने आणि पांच पांडवानी कौरावा पार्टी सोडन दिलेली असते.व त्यांनी इतर सामाजिक कार्य करायचे ठरविलेले असते. जयप्रकाश द्रोणांनी सर्वोदयाचा नवा मार्ग स्वीकारलेला असतो. भूदान चळवळीत त्यांचा सहभाग असतो. युधिष्ठिर ह्याने भारतभ्रमण सुरु केलेले असते . Travel broadens the horrizon असे त्याला वाटत असते .अर्जुन दक्षिणेत जातो . त्याची व श्रीकृष्णाची भेट होते . श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिच्याबरोबर त्याचे लग्न जुळते. ही अर्जुनाची कहाणी थरूरांनी रंगवून सांगण्यात अनेक पाने खर्च केली आहेत . थरूरांचे अर्जुन - सुभद्रा प्रकरण मोठे मजेशीर आहे . ह्याच वेळी धृतराष्ट्राला परराष्ट्रसेवेतील एक अधिकारी व्ही कणिका मेनन भेटते. ती त्याची सहकारी होते . काही दिवसांनी तो कणिकेला मंत्रिमंडळात अतिशय महत्वाचे स्थान देतो . कणिका मेनन ही जयप्रकाश द्रोणाची लंडनमध्ये चांगली मैत्रीण होती व तेथील सोशालिस्ट ग्रुपचे ते दोघे प्रमुख कार्यकर्ते होते. अशी ही कणिका मेनन धृतराष्ट्राचा खरी सल्लागार होते व अनेक प्रश्नावर तो तिचा सल्ला घेत असतो .
धृतराष्ट्राने विकासाची अनेक कामे धडाक्याने सुरु केलेली असतात . भाक्रा नानगल सारखे सर्वात मोठे धरण बांधून आपण आधुनिक देवळे बांधतो आहोत असे तो लोकांना सांगून हिंदूच्या देऊळ ह्या धर्म कल्पनेला नवा धक्का देतो . त्याने आपण अशीच आधुनिक देवळे उभारणार आहोत अशी घोषणा केलेली असते . ह्याच काळात प्रिया दुर्योधनी धृतराष्ट्राची खरी मदतनीस होते . तिने कारभारात लुडबुड करण्यास सुरवात केलेली असते . तिने भारतभ्रमण करणाऱ्या पांडवांचा नाश करण्याचा डाव रचलेला असतो . तो यशस्वी होत नाही. ह्याच काळात करणिस्तानचा निर्माता महंमद अली कर्ण अल्लाघरी जातो .
मणिका मेनन शिवाय धृतराष्ट्राला राज्यकारभार करणे कठीण होत जाते . प्रमुख निर्णयात तिचाच सल्ला मानायचा असे त्याने ठरविलेले असते . मणिमीरच्या शेखने नव्याने उपद्रव करणे सुरु केलेले असते व स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी पुढे केलेली असते . म्हणून धृतराष्ट्राने त्याला तुरुंगात पाठविले असते . कणिकाने युनोमध्ये मनिमीर प्रश्नावर सर्वात लांबलचक भाषण देऊन नवा विक्रम केलेला असतो . धृतराष्ट्र आणि प्रिया दुर्योधनी ह्यांची राज्यकारभारावर घट्ट पकड बसते . आय आय टी , सी एस आय आर , आय आय एम , आय सी एस -आय एफ एस शिक्षण संस्था , अणुशक्ती विभाग , ए आय एम, एस ह्या संस्था धृतराष्ट्राने त्याच काळात उभारल्या व नवा भारत उभा केला . आपण अलिप्त राष्ट्र आहोत अशी भूमिका धृतराष्ट्राने घेतली व नव्याने स्वतंत्र झालेल्या अलिप्त देशांचा एक गट निर्माण केला. त्यामुळे त्याचे नेतेपद धृतराष्ट्राकडेच आले. त्याच वेळी कणिका मेनन ही संरक्षण मंत्री होती. आणि चीनने भारतावर हल्ला केला आणि तिबिया आणि भारताचा लगतचा भाग गिळंकृत केला. त्यापूर्वी धृतराष्ट्र चक्र ( चीन )च्या दौऱ्यावर गेलेला होता . 'हिंदी चिनी भाई भाई ',अशी घोषणा त्यांनीच दिली होती. आणि चीनने हा असा धक्का दिला. चक्रचे युद्ध हिमालयात लढले जात होते . जवानांना थंडीचे कपडे नव्हते . रेशन मिळत नव्हते. बूट नव्हते .टेनिस शूज घालून ते हिमालयात लढाई लढत होते. लोकांना धृतराष्ट्राचे हे युद्ध हरण्याचे प्रकरण आवडले नाही. त्यामुळे देशभर असंतोष व्यक्त झाला आणि ह्या प्रकरणात संरक्षण मंत्री कणिका मेननचा बळी गेला व तिला राजीनामा देणे भाग पडले.
धृतराष्ट्र ह्या चक्र युद्धामुळे गांगरून गेले . हताश झाले . हा घाव त्यांना जिव्हारी बसला . त्यांचे वय झाले होते. लोकप्रिय असूनही त्यांना आपले अपयश सहन होत नव्हते. असा हा पहिला महा भारताचा पंतप्रधान . तो लोकप्रिय तर होताच . तसाच दूर दृष्टीचा होता. तरीही चक्र युद्धाचे अपयश तो पचवू शकला नाही आणि लवकरच देवाघरी गेला . त्याची रक्षा भारतातील सर्व नद्यांत विसर्जित करण्याचे आली. गंगाजींच्या मृत्यूनंतर देशाला बसलेला हा दुसरा मोठा धक्का होता. कौरवा पार्टीने विचारविनिमयानंतर शिशुपालाची नवे पंतप्रधान म्हणून नेमणूक केली .

No comments:
Post a Comment