स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर |
सुनील नभ हे सुंदर नभ हे नभ हे अतलची हा
सुनील सागर सुंदर सागर सागर अतलची हा
सुनील सागर सुंदर सागर सागर अतलची हा
ह्या ओळी शाळेतील पुस्तकात वाचल्या तेव्हाच पाठ झाल्या होत्या . शिक्षकांनी ही कविता खूप छान शिकवली होती . त्यानंतर ' सागरा प्राण तळमळला ...' हे गीत जेव्हा जेव्हा ऐकलं तेव्हा तेव्हा सावरकरांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली . ' १८५७ चे बंड की स्वातंत्र्य युद्ध ' ह्या वादविवाद स्पर्धेत भाग घेतला होता त्यापूर्वी सावरकरांची पुस्तके वाचली होती . सावरकर गेले तेव्हा शाळकरी मुलगाच होतो .औरंगाबादच्या बळवंत मोफत वाचनालयात वर्तमानपत्र वाचायला जात असे . तेथे ' मराठा ' तील आचार्य अत्रे ह्यांचा सावरकरावरील लेख वाचला तो आजही आठवतो . त्यांचे मराठी साहित्य संमेलनातील भाषण सर्वात वेगळं होतं, ते ही वाचलेलं आठवतं .त्यांचा गायीवरचा लेख आणि इतर विज्ञानवादी निबंध वेगळी दृष्टी देऊन गेले . मणीशंकर अय्यर ह्या केंद्रीय मंत्र्यांनी जेव्हा त्यांच्या विरुद्ध मोहीम सुरु केली तेव्हा सावरकर विरोधकांची दुसरी बाजू समोर आली . तो पर्यंत सावरकर द्वेष प्रखरपणे जाणवला नव्हता . पु ल नी अटलजींच्या बरोबर ठाण्यातील एका सभेत सावरकरांच्यावर केलेलं भाषण आजही आठवतं . अलीकडे फेसबुकवर सावरकरविरोधी जे लिहिलं जातंय ते पाहिलं म्हणजे ह्या लोकांना हा क्रांतिकारक , मराठी कवी , वैज्ञानिक दृष्टी असलेला राजकारणी समजलाच नाही . भले त्यांचा हिंदुत्ववाद लोकांना मान्य नसेल पण ह्या सो कॉल्ड सेक्युलरवादी लोकांनी ७० वर्षात देश कुठे नेऊन ठेवलाय ? तो मणीशंकर अय्यर काश्मीरमध्ये जाऊन त्या गिलानीबरोबर कसली खलबतं करीत असतो आणि दुसर्यांना राष्ट्रद्रोही म्हणतो . त्या अरुंधती रॉयची बाजू घेणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारताना तिच्या फुटीरतावादी मंडळीबरोबरच्या गाठीभेटीबद्दल एक चकार शब्द बोलत नाहीत . तो कन्हय्या काहीही बोलला तरी चालतं . विक्रम गोखले/ परेश रावळ बोलले की किरट्या समजेचे वाचाळपंथी अशी संभावना करणारे हे डावे , पुरोगामी , समाजवादी आणि निधर्मी विचारवंत . गांधीजींचा पराभव करणारे हे गांधीवादी . ह्यांना गांधीही समजले नाहीत , नेहरूही समजले नाहीत . सावरकर असो का नेताजी सुभाष , त्यांना समजून घेता येतील असे वाटत नाही . गांधी , नेहरू , नेताजी आणि सावरकर ह्यांचे जे योगदान आहे ते आहेच . त्यांच्या काही चुका झाल्या असतील . पण त्यांनी जेवढं दिलंय तेच अधिक महत्वाचं आहे .मला हे सारेच वंदनीय.
.पु ल ना समजलेले सावरकर
सध्या वि दा सावरकर ह्यांच्यावर खूप उलट सुलट चर्चा चालू आहे . पुरोगामी समजणारे रोज नवे विषय शोधून सावरकर आणि त्यांचे हिंदुत्व ह्यावर अनेक प्रश्न विचारीत असतात . महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले पु ल देशपांडे ह्यांचे सावरकर ह्यांच्यावर केलेले भाषण यु ट्यूबवर दोन भागात उपलब्ध आहे . मी फार पूर्वी ते ऐकले होते .आज ते पुन्हा ऐकले . पु ल ह्या भाषणात सावरकर ह्याचा विज्ञानवादी मानवतावाद , सावरकर आणि त्यांचा खरा सेक्युलरवाद , सावरकर आणि अंधश्रद्धा निर्मुलन , मदर तेरेसा ह्यांचा कुटुंब नियोजनाला असलेला विरोध म्हणजे राजद्रोह , सावरकर आणि त्यांचे हिंदुत्व इत्यादी अनेक विषयावर ते गंभीरपणे बोलले . महाकवी सावरकर ह्यावर ही ते बोलले . नास्तिकतेवर बोलले . हे भाषण ह्या सावरकरद्वेष्ट्यानी अवश्य ऐकावे . सावरकरांना पुन्हा एकदा नीट समजून घ्यावे . त्या नंतर अटल बिहारी ह्यांचे भाषण झाले होते . ते नाही ऐकले तरी चालेल .पण पु ल ह्यांना समजलेले आणि भावलेले सावरकर अधिक समजून घ्या . उगाच फालतू चर्चा थांबवा . मणीशंकर अय्यर ह्यांना हा माणूस समजणे कठीण आहे . हे त्यांच्या वक्तव्यावरून समजतेच . १९६३ - ६६ मध्ये सावरकर द्वेष नव्हता . पाठ्यपुस्तकातून सावरकर दिसत होते . आम्ही त्यांच्या कविता वाचल्या .पाठ केल्या .निबंध वाचले . १९७५ नंतर सावरकरद्वेषाचे वारे सुटले . सध्या तर हिंदुत्व ह्या विषयावर डावे ,पुरोगामी ,समाजवादी आणि कॉंग्रेसवाले तुटून पडताना दिसतात . त्यांना उठताबसता सावरकर दिसत असतात आणि त्यांच्यात मणी शंकर अय्यर संचारतो . एकदा पु ल काय म्हणतात ते समजून घ्या . मुद्दाम पु ल ह्यांचा उल्लेख करीत आहे . पु ल हे नास्तिक , समाजवादी ,पुरोगामी विचारांचे , राष्ट्र सेवादल आणि 'साधने 'शी जवळचे , विनोदी लेखक असले तरी गंभीर विचार मांडणारे लेखक होते . त्यांनी सावरकरांना समजून घेतले .नव्हे त्यांना सावरकर हे व्यक्तिमत्व समजले .
गोपीनाथ तळवलकर ह्यांचे ' आनंदभुवन ' हे नेहरूंचे पुस्तक आम्हाला नॉनडिटेल म्हणून अभ्यासक्रमात होते . त्याचे जवळजवळ पाठांतर केले होते . नेहरू औरंगाबादला आले तेव्हा त्यांना पहाण्यासाठी आम्ही मुलं किती उत्सुक होतो . त्यांच्या शेरवाणीवर असलेल्या गुलाबाच्या फुलाचे आम्हाला खूप कौतुक होते . अलाहाबादला जाऊन 'आनंदभुवन 'पहायचे राहून गेले पण दिल्लीला पहिल्यांदा गेलो तेव्हा 'त्रिमूर्ती'ला आवर्जून भेट दिली . आम्ही नेहरूभक्त लहानपणापासूनच होतो .
त्याच वेळी शाळेत वादविवाद स्पर्धा असत . एके वर्षी विषय होता ' १८५७ चे बंड की स्वातंत्र्य युद्ध ' . आणि सावरकरांचे पुस्तक हातात पडले आणि भारावून गेलो . तात्या टोपे , महाराणी लक्ष्मीबाई आणि बहादुरशहा जफार खान ह्यांच्या इंग्रजांविरुद्धच्या लढ्याची ओळख झाली . झांशीला अलीकडे गेलो तेव्हा सावरकर आठवले . योगायोगाने जो गाईड होता तो त्या भागातील मुस्लिम होता . त्याच्या अंगात जणूकाही वीरश्रीच संचारली होती . त्याने आपल्या आवाजात त्यावेळचे चित्र उभे केले . मला सावरकरांच्या लिखाणाचीच आठवण झाली . तसेच शब्द . तशीच भाषा .
ग्वाल्हेरला झांशीची राणी जिथे मारली गेली त्या जागेवर जेव्हा गेलो तेव्हा ग्वाल्हेरच्या शिंद्यानी सहकार्य न दिल्यामुळे राणी कशी दुःखी कष्टी झाली असेल ते आठवले . त्या ग्वाल्हेरच्या फंदफितुरी करणाऱ्या घराण्याबद्दल आजही मनात राग आहे .
सावरकरांचे ' माझी जन्मठेप ' दोनदा वाचले . अंदमानला गेलो तेव्हा त्यांच्या खोलीच्या बाहेरील निळा समुद्र पाहिला तेव्हा ' सागरा प्राण तळमळला ' ही त्यांची कविता आठवली .
मणीशंकर अय्यर सारखा माणूस इतका सावरकर द्वेषाने बोलतो तेव्हा ह्या पाकिस्तानप्रेमी माणसाविषयी संताप येतो . त्याला सावरकर समजलेच नाहीत म्हणून कींव करावीशी वाटते .
अलीकडेच मुक्ता बर्वे ह्यांनी' चॅलेंज ' हे सावरकर ह्यांच्या जीवनावरचे सुरेख नाटक रंगभूमीवर आणले आहे . ज्यांना सावरकर थोडे समजून घ्यावयाचे आहेत त्यांनी ते अवश्य बघावे .
समाजवादी नेते एस एम जोशी ह्यांना १९२३ पूर्वीचे सावरकर मान्य आहेत ,असे ते म्हणाले होते . नंतरचे 'हिंदुत्ववादी 'सावरकर त्यांना आणि इतर समाजवाद्यांना मान्य नाहीत . नसतील मान्य .
मला सावरकरांचे एक वाक्य नेहमी आठवते ...
' तुम्ही तुमचे अमेरिकत्व विसरणार असाल , तुम्ही तुमचे इंग्रज असणे विसरणार असाल , तुम्ही तुमचे जर्मन असणे विसरणार असाल तर मी माझे भारतीयत्व विसरायला तयार असेल .' त्यांच्या प्रखर राष्ट्रवादाची ही व्याख्या .
असा प्रखर राष्ट्रवाद मला व्हिएतनामी लोकात दिसून आला .
शालेय जीवनात सावरकरांचा प्रभाव पडला तो त्यांच्या साहित्यामुळे . विशेषतः कवितेमुळे . साहित्यिक सावरकर नेहमीच मनाच्या कोपऱ्यात वस्तीला असतात . आचार्य अत्रे ह्यांचा सावरकरांच्या वरचा मृत्यू लेख आजही आठवतो . मुंबईला १९६८ साली प्रथम आलो तेव्हा शिवाजी पार्कला भेट दिली तेव्हा सावरकर सदनाच्या जवळ जाऊन थोडा वेळ उभा राहिलो तेव्हा मला दारात सावरकर उभे आहेत असाच भास झाला होता .
सावरकरांच्याविषयी जो विद्वेष पसरविला जातो त्यामुळे मन उदास होते . पटत नसतील त्यांचे विचार .पण द्वेष का ? तसे पाहिले तर नेहरू - गांधींचे सर्व विचार सर्वांना पटतातच असे नाही . त्यांचे मोठेपण त्यामुळे कमी होत नाही .
मार्ग भिन्न . विचार भिन्न . वाटा निराळ्या . मला तरी नेहरू - गांधींसारखे सावरकर - नेताजी सुभाष तेवढेच वंदनीय आहेत . I salute Vinayak Damodar Savarkar .
त्याच वेळी शाळेत वादविवाद स्पर्धा असत . एके वर्षी विषय होता ' १८५७ चे बंड की स्वातंत्र्य युद्ध ' . आणि सावरकरांचे पुस्तक हातात पडले आणि भारावून गेलो . तात्या टोपे , महाराणी लक्ष्मीबाई आणि बहादुरशहा जफार खान ह्यांच्या इंग्रजांविरुद्धच्या लढ्याची ओळख झाली . झांशीला अलीकडे गेलो तेव्हा सावरकर आठवले . योगायोगाने जो गाईड होता तो त्या भागातील मुस्लिम होता . त्याच्या अंगात जणूकाही वीरश्रीच संचारली होती . त्याने आपल्या आवाजात त्यावेळचे चित्र उभे केले . मला सावरकरांच्या लिखाणाचीच आठवण झाली . तसेच शब्द . तशीच भाषा .
ग्वाल्हेरला झांशीची राणी जिथे मारली गेली त्या जागेवर जेव्हा गेलो तेव्हा ग्वाल्हेरच्या शिंद्यानी सहकार्य न दिल्यामुळे राणी कशी दुःखी कष्टी झाली असेल ते आठवले . त्या ग्वाल्हेरच्या फंदफितुरी करणाऱ्या घराण्याबद्दल आजही मनात राग आहे .
सावरकरांचे ' माझी जन्मठेप ' दोनदा वाचले . अंदमानला गेलो तेव्हा त्यांच्या खोलीच्या बाहेरील निळा समुद्र पाहिला तेव्हा ' सागरा प्राण तळमळला ' ही त्यांची कविता आठवली .
मणीशंकर अय्यर सारखा माणूस इतका सावरकर द्वेषाने बोलतो तेव्हा ह्या पाकिस्तानप्रेमी माणसाविषयी संताप येतो . त्याला सावरकर समजलेच नाहीत म्हणून कींव करावीशी वाटते .
अलीकडेच मुक्ता बर्वे ह्यांनी' चॅलेंज ' हे सावरकर ह्यांच्या जीवनावरचे सुरेख नाटक रंगभूमीवर आणले आहे . ज्यांना सावरकर थोडे समजून घ्यावयाचे आहेत त्यांनी ते अवश्य बघावे .
समाजवादी नेते एस एम जोशी ह्यांना १९२३ पूर्वीचे सावरकर मान्य आहेत असे ते म्हणाले होते . नंतरचे 'हिंदुत्ववादी 'सावरकर त्यांना आणि इतर समाजवाद्यांना मान्य नाहीत . नसतील मान्य .
मला सावरकरांचे एक वाक्य नेहमी आठवते ...
' तुम्ही तुमचे अमेरिकत्व विसरणार असाल , तुम्ही तुमचे इंग्रज असणे विसरणार असाल , तुम्ही तुमचे जर्मन असणे विसरणार असाल तर मी माझे भारतीयत्व विसरायला तयार असेल .' त्यांच्या प्रखर राष्ट्रवादाची ही व्याख्या .
असा प्रखर राष्ट्रवाद मला व्हिएतनामी लोकात दिसून आला .
शालेय जीवनात सावरकरांचा प्रभाव पडला तो त्यांच्या साहित्यामुळे . विशेषतः कवितेमुळे . साहित्यिक सावरकर नेहमीच मनाच्या कोपऱ्यात वस्तीला असतात .
सावरकरांच्याविषयी जो विद्वेष पसरविला जातो त्यामुळे मन उदास होते . पटत नसतील त्यांचे विचार .पण द्वेष का ? तसे पाहिले तर नेहरू - गांधींचे सर्व विचार सर्वांना पटतातच असे नाही . त्यांचे मोठेपण त्यामुळे कमी होत नाही .
मार्ग भिन्न . विचार भिन्न . वाटा निराळ्या . मला तरी नेहरू - गांधींसारखे सावरकर - नेताजी सुभाष तेवढेच वंदनीय आहेत . I salute Swantantryaveer Vinayak Damodar Savarkar .
No comments:
Post a Comment