Sunday, June 28, 2020

The Great Indian Novel ( महा भारत कादंबरी ) - शशी थरूर : प्रिया दुर्योधनी आणि जयप्रकाश द्रोण :४

प्रिया दुर्योधनी आणि जयप्रकाश द्रोण 

The GREAT  INDIAN  Novel (महा भारत कादंबरी  ) 
धृतराष्ट्रानंतर पंतप्रधानपदाची धुरा शिशुपालानी सांभाळली . शेजारच्या राष्ट्रांबरोबर त्यांना युद्ध करायची वेळ आली . 'Peace Demands Compromise', असे जे म्हणतात तेच झाले. शिशुपालाने युद्ध जिंकले पण ते तहात हरले. काय झाले, हे आजही निश्चिपणे माहित नाही. ज्या ठिकाणी तहाची बोलणी झाली त्याच शहरात त्यांचा मृत्यू ते ज्या हॉटेलात रहात होते तेथेच  झाला. देश पुन्हा संकटात सापडला. कौरवा पार्टी संकटात सापडली. नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिला . पंतप्रधानपद कोणाला द्यावयाचे ?,ह्यासाठी पक्षात वादंग माजले.त्यांच्यात रस्सीखेच सुरु झाली. काही जणांना आंतरराष्ट्रीय समुदायासमोर चमकणारा स्त्री चेहरा हवा होता . शिशुपालाला हे काम  जमले नाही असे काहींचे मत होते . Father's Daughter म्हणून काहीजण धृतराष्ट्राच्या 'गुंगी गुडिया' कडे बघत होते .शेवटी प्रधानमंत्रीपदाची माळ धृतराष्ट्राची कन्या प्रिया दुर्योधनी हिच्याच गळ्यात पडली.
त्याचवेळी अर्जुन दक्षिण भारताच्या दौऱ्यावर गेला . त्याचा  मुक्काम गोकर्णनला होता. त्याची आणि श्रीकृष्णाची भेट होत नव्हती. श्रीकृष्ण म्हणजे D Krishna Parthsarthi.तो दक्षिणेचा कौरव पार्टीचा प्रमुख नेता  होता . अर्जुन श्रीकृष्णाची भेट घेण्यासाठी तेथे मुक्काम करून होता .श्रीकृष्णाची  बहीण  सुभद्रा . अर्जुन तिला कसे  पळवितो . हे सर्व थरूरांनी एका प्रकरणात खूप रंगवून सांगितले आहे . ही अर्जुन -सुभद्रा ह्यांची भन्नाट कथा आहे.

दुर्योधनीने  हस्तिनापुरचा कारभार तर जोरात  सुरु केला .प्रथम तिची पार्टीवर  पकड नव्हती. हळूहळू कौरवा पार्टीत भांडणे सुरु झाली. युधिष्टिर  दुर्योधनीच्या मंत्रिमंडळात होता पण ती त्याला काहीच न विचारता निर्णय घेत होती. त्यांच्यांत सत्तेसाठी  भांडणे सुरु झाली.  युधिष्ठिराला उपपंतप्रधानपद मिळाले. वेद व्यासानी युधिष्ठिर - दुर्योधनी ह्यांच्यात  मध्यस्थी घडवून आणली . तरीही युधिष्ठिराला पाहिजे तो मान मंत्रिमंडळाच्या बैठकीत  मिळत नव्हता . तो त्यामुळे नाराज होता. दुर्योधनीला लोकांनी जोरदार पाठिंबा दिला. त्यामुळे ती अधिकच उन्मत्त झाली. तिचा अरोगन्स वाढू लागला . युधिष्ठिराची नाराजी  दिवसेंदिवस वाढूच लागली आणि त्याने काहीदिवसांनी पक्ष सोडला. त्यावेळी कौरवा पार्टीत  मोठी फूट पडली . दुर्योधनाने त्याच्या  पार्टीला कौरवा  पार्टी ( डी ) असे नवे नांव दिले तर युधिष्ठिराने इतर सहकार्यांना घेऊन कौरवा ( ओ ) असे नांव देऊन वेगळा पक्ष स्थापन केला . त्याचवेळी दुर्योधनीला अश्वत्थामा येऊन मिळाला .तो तिचा चाहता होता . तो सहकार्यांना सांगत असे ,'दुर्योधनीने आजपर्यंत खूप सहन केले आहे . तिने खूप त्याग केला आहे. धृतराष्ट्राची  ती कन्या आहे. तिच्यात वडिलांसारखेच सर्वगुण  आहेत . ती समाजवादी विचारसरणाची आहे . गरिबांचा विचार करूनच ती राज्यकारभार करते'. असे तिचे इतर सहकारीही  लोकांना सांगत  असत . तिची स्तुती करणारा एक मोठा गट तिच्यामागे उभा होता.  युधिष्ठिराचे असे मत होते की  दुर्योधनी  राज्यघटना नीट पाळत नाही. ती हुकूमशाही वृत्तीची आहे .
दुर्योधनीने धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली. बँक राष्ट्रीयीकरण करुन  समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्षांचा पाठिंबा मिळविला. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत कम्युनिस्ट आणि समाजवादी लोकांची मदत घेऊन आपल्याच पार्टीचा उमेदवार पाडला. रबरी शिक्का असलेला राष्ट्रपती निवडून आणला व घेतलेले निर्णय कायद्यात बदलून स्वतःची हुकूमशाही निर्माण केली. एकलव्याला  भारताचे नवे अध्यक्ष केले. कारण द्रोण तिच्या विरोधात वातावरण निर्मिती करीत होता .'गरिबी हटाव ',अशी घोषणा देऊन तिने लोकांना मूर्ख बनविले . स्वतःची प्रतिमा मात्र उजळून घेतली. दुर्योधनीने पार्लमेंटला सुप्रीम केले. कारण ती पार्लमेंट पूर्णपणे  कंट्रोल करीत होती. एकीकडे बेरोजगारी वाढत होती. भूकबळींची संख्या वाढत होती. आणि तिने एकेदिवशी देशात अचानक आणीबाणी जाहीर केली. त्यापूर्वी दुर्योधनी विरोधकांनी बेजार केल्यामुळे राजीनामाच  देणार होती. पण शकुनी मामांनी तिला राजीनामा द्यायची काही गरज नाही असा सल्ला दिला.  हा शकुनी शंकर डे  नावाजलेला कायदातज्ज्ञ  होता . तो तिचा घटनातज्ज्ञ होता  वनंतर  तिचा कायदामंत्री झाला . त्यानेच  ती राजीनामा देते असे म्हंटल्यावर तिला आणीबाणी जाहीर करण्याचा  सल्ला दिला . तो तिचा शकुनी मामा होता. त्याने तिला अनेक कारस्थाने करावयास लावली. लोक हे समजल्यावर त्याच्यावर खूप वैतागले . शकुनी मामानी दुर्योधनीला असा सल्ला दिला होता  की सद्य परिस्थितीत तिने राजीनामा देण्याची काहीही गरज नाही. राज्य करायची मिळालेली संधी मुळीच सोडायची नसते. हे तिने प्रथम लक्षात घ्यावे. त्याने असे ही  सांगितले की आणीबाणी आणायची आणि कायदेच बदलून टाकायचे. आज देशाला बाहेरचा धोका नाही तरीही आणीबाणी जाहीर करून विरोधकांना पूर्णपणे अडचणीत आणणे अधिक सोयीचे आहे. असे सल्ला देणारे होते शकुनी मामा.
जयप्रकाश द्रोणांनी ह्याचवेळी भारतभर प्रवास करून विरोधी एकजूट घडवून आणली  व नवीन आंदोलन उभे केले होते .कौरवा ( O ) पार्टी  , विविध समाजवादी पक्ष , राष्ट्रवादी पक्ष  , जनसंघी , प्रसिद्ध मुखपत्राचे पत्रकार आणि प्रतिष्ठित नागरिक ह्यांनी एकत्र येऊन आणिबाणीविरुद्ध  नवा लढा उभा केला पाहिजे असे त्यांनी  ठरविले . त्यासाठी  त्यांनी देशभर चळवळ सुरु केली. युधिष्ठिराने  द्रोणाच्या अध्यक्षतेखाली बोटक्लबची सभा खूप गाजवली. शकुनीने  दुर्योधनीला अटकसत्र सुरु करण्याचा सल्ला दिला आणि  भारतभर अटकसत्र सुरु झाले.  द्रोण , पांडव आणि इतर नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा सल्ला दिला गेला . देशभर विरोधकांची पकड सुरु  झाली. सगळ्यांना निरनिराळ्या तुरुंगात डांबले गेले . युधिष्ठिर आणि जयप्रकाश द्रोण ह्यांना दक्षिणेतील  तुरुंगात डांबण्यात आले.  भारतातील सर्व तुरुंग भरले. Whom the gods wish to destroy , they first make them mad. दुर्योधनीचे तसेच झाले . सत्ता माणसाला असेच बनविते , असे म्हणतात. 'भारत राजकारणाशिवाय म्हणजे अटलांटिक ( हिंदी महासागर ) पाण्याशिवाय', असे एका पत्रकाराने लिहिले.अर्जुन हा त्यावेळचा हस्तिनापुरचा  प्रभावी पत्रकार होता. पहिला पंतप्रधान असलेल्या धृतराष्ट्राच्या  काही चुका झाल्या होत्या. पण त्याने लोकांचा घात  केला नव्हता. त्याने घटनेचे राज्य मान्य केले होते. शकुनी मामाच्या सल्ल्याने दुर्योधनीने  घटनाच गुंडाळून टाकली . संसदीय लोकशाहीला काळिमा फासला . अशा एका एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीचा प्रयोग प्रिया दुर्योधनीने रेटून पुढे नेला. तो जयप्रकाश द्रोणाने मोडून काढला आणि एक नवा इतिहास निर्माण केला.  पार्लमेंट मोठे का लोक मोठे?, असा प्रश्न द्रोणाने उभा केला . कृष्ण दुर्योधनीच्या विरुद्ध उभा राहिला. त्यापूर्वी झालेल्या निवडणूका म्हणजे एक फार्स होता. त्या योग्यवेळी होत नसत. निवडणुकीचा कागद खराब असे.  निवडणूक अधिकारी जंगलात /बर्फात पायी जात असत. निवडणूक पेट्या लंपास होत असत. शाईचा घोटाळा होत असे. निवडणूक एजंटचे खून होत असत. पेट्या पळवून नेत  असत. पैसे चारले जात असत . मतदारांचे नांव यादीतून गायब होत असे . भरपूर पैसा  खर्च केला जात असे. निवडणुकीत भ्रष्टाचार खूपच वाढला होता. भारतातील निवडणूक म्हणजे महाभारतातील युद्धच होते. हा धर्म आणि अधर्म ह्यांच्यातील लढा होता. तसे कुरुक्षेत्रावर कोणीच युद्ध जिंकले नव्हते. भारतातील लोकशाही Arrogant Form of Democracy होती. कारण राज्य चालविणारे लोक भ्रष्ट होते. त्यावेळी पत्रकार  लोकांची बाजू घेत नव्हते .ते खूप घाबरून गेले होते.  लोक  भारतीय वर्तमानपत्रावर विश्वास नं  ठेवता बीबीसीवर  अधिक विश्वास ठेवत असत.  दुर्योधनीचे भ्रष्ट्र सरकार द्रोणाने खूप मोठी चळवळ उभारून पाडले आणि नवे जनता राज्य आले.  युधिष्ठिर पंतप्रधान झाला . पांडवांचे राज्य सुरु झाले असे लोकांना वाटले .ते फार काळ टिकले नाही, हे लोकांचे दुर्दैव. पांडव आणि  द्रोण एकत्र होते आणि इतर विरोधी पक्षही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन लढत होते. ही  विरोधकांची एकजूट फारकाळ टिकली नाही. युधिष्टिराला राज्यकारभार करणे विरोधी पक्षाच्या लोकांनी असह्य केले . त्यात समाजवादी आणि प्रादेशिक पक्षांचा समावेश होता.  वयोवृध्द द्रोण खूप आजारी पडले .  त्यावेळच्या समाजवादी गटांनी जनता पार्टी फोडली . द्रोण दुःखी कष्टी झाले  आणि प्रिया दूर्योधनी पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून आली. ७० कोटी लोकांना आपला नेता निवडून आणता येत नाही . हे जगाला कळून  चुकले .Immorality बद्दल लोकांना काही वाटत नाही असे जनतेच्या लक्षात आले .प्रिया दुर्योधनी पुन्हा सम्राज्ञी झाली. दुर्दैव असे की काही दिवसातच तिचा खून झाला  आणि एक पर्व संपले . कौरवा पार्टी पुन्हा संकटात आली.
अशी ही नव्या ' महा भारताची ' कादंबरी लिहिली आहे शशी थरूरांनी.  तशी ती आहे बरीचशी  खरी . पण त्यांनी खूपच अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरून गंगाजी, धृतराष्ट्र , जयप्रकाश द्रोण , प्रिया दुर्योधनी आणि युधीष्ठीर ह्यांच्यावर जे काही लिहिले आहे ते काहीसे  खरे लिहिले आहे पण अनेक वेळा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून कल्पनाविलास केल्यामुळे ह्या पात्रावर  अन्याय झाला  आहे असे मला तरी वाटते. आपले मनोरंजन मात्र  होते. तशी ही कादंबरी फारच  मोठी आहे. कंटाळवाणी वाटत नाही. ज्यांनी हा काळ पाहिला आहे त्यांना आपण एक राजकीय  चित्रपट पाहतो आहोत असे वाटते.  

Thursday, June 25, 2020

The Great Indian Novel ( महा भारत कादंबरी ) शशी थरूर : धृतराष्ट्र: ३

धृतराष्ट्र आणि कौरवा पार्टी 

कौरवा पार्टी आणि महंमद अली कर्णाची मुस्लिम लीग ह्यांच्यात तीव्र मतभेद होते. इंग्रजांनी आपल्याशी बोलणी केल्याशिवाय आपण स्वातंत्र्याच्या वाटाघाटी करणार नाही असा स्पष्ट संदेश कर्णाने व्हाइसरॉयला दिला होता. कौरवा पार्टी मोठी असली तरी अनेक प्रांतात मुस्लिग लीगचे बळ लक्षणीय होते. करणीस्तानची मागणी जोरात होती. व्हाइसरॉय व्हिसकाऊन्ट Drewpad ह्यांची नव्याने भारतात नेमणूक झाली. त्याच्याबरोबर लेडी Georgina Drewpad ह्याही भारतात  आल्या. त्यांचे हस्तिनापुरात जंगी स्वागत झाले. भारताला  स्वातंत्र्य कधी द्यायचे हाच अजेंडा घेऊन व्हाइसरॉय भारतात आला होता. मुस्लिम लीगचे महंमद अली कर्ण आणि कौरवा पार्टीचे गंगाजी ह्यांची व्हाइसरॉय बरोबर बोलणी सुरु झाली होती. धृतराष्ट्र कौरवा पार्टीचा प्रतिनिधी म्हणून व्हाइसरॉयला अनेक वेळा भेटत असे . गंगाजीचा फाळणीला विरोध होता तर कर्ण स्वतंत्र देश हवाच अशा विचारांनी पेटलेला होता. गंगाजी कर्णाला नव्या अखंड देशाचे पंतप्रधानपद देण्यास तयार होते. विदुर आणि धृतराष्ट्र ह्यांना गंगाजींचे हे  विचार मान्य नव्हते. त्यांना करणिस्तानची मागणी मान्य करावी व उर्वरीत भारताचे वेगळे राष्ट्र  म्हणून मान्य करावे, असेच वाटत होते. महंमद अली कर्णाला अखंड भारताचे पंतप्रधानपद देण्यास दोघेही तयार नव्हते. गंगाजी त्यामुळे  एकटे पडले. गंगाजींच्या आश्रमात कौरवा पार्टीची  एक उच्चस्तरीय बैठक झाली. रफी ह्या मुस्लिम नेत्याला कौरवा पार्टीचे अध्यक्षपद देण्यात आले. ते महंमद अली कर्णाच्या विरोधातच होते . गंगाजींना देशाचे पंतप्रधानपद  हे धृतराष्ट्रालाच द्यायचे होते. कौरवा पार्टीतील बहुसंख्य प्रतिनिधींना  ते विदुरासारख्या शासकीय कामात  तज्ज्ञ असलेल्या व अनुभवी असलेल्या व्यक्तीस द्यावे असेच वाटत होते.. गंगाजीच्या पुढे कोणाचे काही चालणार नव्हतेच. तरीही फाळणीचा ठराव बहुसंख्य मताने कौरवा पार्टीने मान्य केला. तुम्ही माझे हृदय कापीत आहात असे गंगाजी बैठकीत म्हणाले व तेथून  रागारागाने निघून गेले. If you agree to break the country , you will break my heart असे हे शेवटचे वाक्य उच्चारून गंगाजी सभा सोडून निघून गेले. त्यानंतर  व्हाइसरॉयने देशाची फाळणी केली व स्वतंत्र करणीस्तानची निर्मिती  झाली. धृतराष्ट्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले तर महंमद अली कर्ण  करणिस्तानचे पहिले प्रमुख झाले.  धृतराष्ट्राने भारताच्या स्वातंत्र्यदिनी हस्तिनापुरातील किल्ल्यावर  जे भाषण दिले ते खूपच गाजले. देशभर लोकांनी आनंद व्यक्त केला. त्यावेळी गंगाजी मात्र दुखी होते व त्यांच्या आश्रमात  ते  सुन्नपणे बसून राहिले. फाळणीचे परिणाम दोन्ही देशांना अनेक दिवस भोगावे लागले. निर्वासितांचे लोंढे दोन्ही देशात आश्रयासाठी जात होते.  खूपच मोठ्या प्रमाणावर मनुष्यहाणी  झाली . नवनिर्मित देशासाठी तो अतिशय कठीण असा काळ होता. गंगाजींना फाळणीचे दुःख असह्य झाले. त्यांच्या  शांततेसाठी पदयात्रा चालू झाल्या .  एका बाजूला हिंदू मुस्लिम दंगली पेटत होत्या. तर दुसऱ्या बाजूला गंगाजी पदयात्रा आणि उपोषण करून लोकांना शांत करीत होते. त्यांच्या प्रार्थनासभा चालूच होत्या. रोज फाळणीची नवी दुःखे घेऊन लोक त्यांच्याकडे येत होते . सर्वत्र  तीव्र असंतोष होता. ह्याच काळात म्हातारपण आणि स्वभावातील विक्षिप्तपणा ( Eccentricity ) ह्यामुळे गंगाजी अधिक त्रस्त  झाले आणि त्यांनी त्यांचे  सत्याचे नवे प्रयोग त्यांच्या आश्रमात सुरु केले.
इकडे धृतराष्ट्र देशाचा पंतप्रधान झाला आणि त्याने जोमाने राज्यकारभार सुरु केला. व्हाइसरॉयशी बोलणी करतानाच धृतराष्टाचे  व्हाइसरीन जीऑग्रिना हिच्याबरोबर मैत्रीचे  संबंध वाढले. लोकांना ते लक्षात येऊ लागले . त्यावर बरीच  कुजबुज  होऊ लागली. स्वातंत्र्यानंतर व्हाइसरॉय आणि त्याची पत्नी इंग्लंडला परत गेले. पण काही महिन्यानंतर जिऑग्रिना एकटीच भारतात परत आली . तिला भारताची  सफर करावयाची होती. ती पंतप्रधानांची पाहुणी म्हणून त्यांच्याकडेच रहात  होती. त्यावेळी त्यांनी भारतातील  अनेक प्रसिद्ध ठिकाणांना भेटी  दिल्या. ती धृतराष्ट्राबरोबर सामाजिक कामात लक्ष घालू  लागली. त्यांच्याबरोबर कार्यक्रमाला जाऊ लागली. लोक धृतराष्ट्र आणि जिऑग्रिनाच्या  प्रेमसंबंधावर बोलू लागले.  शशी थरूर ह्यांनी हे प्रेमप्रकरण  खूपच  रंगवून सांगितले आहेत  व  त्यावर पानेच्या पाने खर्च केली आहेत. त्या प्रेमसंबंधातूनच  द्रौपदी ही कन्या जन्माला आली . जिऑग्रिना इंग्लंडला गेल्यानंतर तिचे पालनपोषण एका ओळखीच्या भारतीय कुटुंबाने केले . नंतर हीच द्रौपदी मॉक्रॅसी  पाच पांडवांची पत्नी झाली. त्यावर थरूरांनी बरिच पाने लिहिली  आहेत . तसा  ह्या सर्व प्रकरणांचा मूळ महाभारताशी कसलाही संबंध नाही. हे  थरूरांचे अफाट कल्पनाविश्व असलेले महा भारत आहे. आणि ते एके ठिकाणी म्हणतात की 'मी महाभारताशी प्रामाणिक राहून ही कादंबरी लिहिली आहे'.
ह्याच काळात गंगाजींवर प्राणघातक हल्ला झाला. त्यांचा खून करण्यात आला. मुसलमानांना ते हिंदूंचे नेते वाटत असत तर काही हिंदूंना ते मुसलमानांची बाजू घेतात असेच नेहमी वाटत असे . महंमद अली कर्णाला त्यांना  पंतप्रधान करावयाचे आहे , म्हणजे ते  हिंदूंवर मोठा अन्याय करतात असे हिंदूंना वाटत असे. त्यांचा खून एका हिंदूनेच केला. धृतराष्ट्राला  आपल्यावर  आभाळ कोसळले असे वाटले.
' एक दिवा मावळला . अंधार झाला " असे उद्गार त्यांच्या तोंडून निघाले. 'आपण पोरके झालो. आपला महागुरू गेला ', असे त्यांना वाटले . त्याचवेळी महंमद अली कर्णाने शोक व्यक्त करताना म्हंटले , 'भारतातील हिंदूंच्याकरीता  हा मोठा धक्का आहे'. कर्णाने गंगाजींना कायमचे हिंदूंचाच नेता मानले होते. आपणच मुस्लिमांचे हित जपतो असे कर्णाला वाटत असे. ह्या संकटातून सावरण्यासाठी धृतराष्ट्राचा  थोडा वेळ गेला. कौरवा पार्टीत धृतराष्ट्रशिवाय इतर ही  मोठे नेते होते. त्यापैकी काहीजणांना धृतराष्ट्राने आपल्या मंत्रिमंडळात सामील करून घेतले होते. जयप्रकाश द्रोण , विदुर , रफी आदी मंडळी त्याच्या मंत्रिमंडळात होती. त्याचवेळी निवृत्त होऊन लंडनला परत जाणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना आपण   भारतातून जाण्यापूर्वी आपल्याला  मोठा मेहनताना मिळावा  असे वाटत होते व त्यासाठी त्यांचे  जोराचे  प्रयत्न चालू होते. ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने जयप्रकाश द्रोणाची त्यांच्या राजवटीत  खूप निर्भत्सना केली होती , त्यांचा अपमान केला होता.  त्याच अधिकाऱ्याला कसलाही विशेष बोनस न देता द्रोणाने इंग्लंडला रिकाम्या हाताने रवाना केले. हे प्रकरण मोठे मजेशीर आहे. थरूरांनी ते खूप रंगवून सांगितले आहे. त्याचवेळी भारताला नवा राष्ट्रपती मिळाला. त्याचे आणि धृतराष्ट्राचे तसे फारसे संख्य नव्हते. त्याच्यांत बरेच मतभेद होते.
धृतराष्ट्रासमोर मनिमीरचा मोठा प्रश्न उभा राहिला होता .  विदुराला ह्या प्रश्नात लक्ष न घालण्याचा सल्ला धृतराष्ट्राने दिला होता व तो प्रश्न स्वतःच हाताळायचे त्यांने  ठरविले होते . शेख अझरुद्दीन ह्या मनिमिरच्या मुस्लिम नेत्याशी त्यांचे चांगले संबंध होते .मणिमीरचा राजा व्यभिचारसिंग हा हिंदू राजा होता तर तेथील मुस्लिम लोकांवर शेख अझरुद्दीनचा अधिक प्रभाव होता. मुस्लिम बहुसंख्य असलेला प्रदेश भारतात सामील होणे म्हणजे भारत हा हिंदूंचाच देश नसून तो एक सेक्युलर देश आहे असे धृतराष्ट्राला  जगाला दाखवून द्यावे असे वाटत असे. असे केले की  भारत हा खरा सेक्युलर देश आहे हे जगाला आपल्याला सांगता येईल असे धृतराष्ट्राला वाटत असे. विदुराला मात्र तसे वाटत नसे. ते बरोबर नाही असेच त्यांना  वाटत असे. पण पंतप्रधानांशी खटका उडवणे बरे नाही म्हणून ते शांतपणे बसले. शेखला कौरवा पार्टीने अनेकवर्षे पाठिंबा दिला होता. त्यामुळे शेखच्या मदतीने मनिमीरला भारतात सामील करून घेणे सहज शक्य होईल असे धृतराष्ट्राला वाटत असे. मनिमीरच्या व्यभिचारसिंग ह्या राजाने भारताच्या अटी मान्य नाहीत  असेच धृतराष्ट्राला ठासून  सांगितले होते . तिकडे महंमद अली कर्णाने मणिमीरवर आपले सैन्य पाठविले होते  व मणिमीरचा बराचसा भाग ताब्यातही  घेतला होता . विदुराने धृतराष्ट्राला कर्णाची धूर्तचाल काय आहे?  ह्याची पूर्ण कल्पना दिली होती . धृतराष्ट्र हा शेखवर अधिक विसंबून  होता .  त्याचवेळी धृतराष्ट्राच्या संरक्षण मंत्र्यांनी करणिस्तानचे सैनिक मणिमीरमध्ये आंतपर्यंत घुसले आहेत ही  ताजी बातमी दिली. धृतराष्ट्राने आपला माणूस व्यभिचारसिंगाकडे बोलणी करण्यासाठी पाठविला. तो भारताच्या राजदूताशी बोलण्यासाठी तयार नव्हता. तो त्याच्या रंगमहालात त्याच्या रंभाउर्वशी बरोबर रंगून गेला होता. हे पाहून  विदुर स्वतः व्यभिचारसिंग ह्याच्या रंगमहालात घुसला व त्या रंभा ऊर्वशीत  रंगलेल्या राजाशी त्याच्या शयनगृहातच वाटाघाटी करू लागला. व्यभिचारसिंगचा तो रंगमहाल आणि त्याच्या अनेक रमणींचे  वर्णन  थरूरांनी इतके बेफाम केले आहे की आपण एका रंगील राजाची कामसूत्राची टेप पाहतो आहोत की  काय  असे आपल्याला वाटते व आपण  रंगून जातो.अर्धनग्न अवस्थेतील मणिमीरचे महाराज आणि त्याच्या रंगमहालात अनेक ललना समोर असताना विदुर राजाला करारावर कशा सह्या करावयास लावतो हे वाचताना आपण  एकीकडे हसत असतो आणि मणिमीरचा प्रश्न हा व्यभिचारसिंगामुळे निर्माण झाला आहे की  शेखमुळे  निर्माण झाला आहे असा  विचार करायला लागतो.  धृतराष्ट्राची ही  मोठी चूक असते  व त्या चुकीचेच  परिणाम आजचा  भारत भोगतो आहे ह्याची आपल्याला जाणीव होते. जेंव्हा विदूर व्यभिचारसिंगाला ठणकावून सांगतो की भारताचे सैन्य मणिमीरला पाठवीत आहोत ते भारताची भूमी भारतात रहावी ह्यासाठीच . तुझे राज्य खालसा होणार  हे नक्की. तेंव्हा व्यभिचारसिंग शांतपणे   मणिमीर भारतात विलीनीकरण करण्याच्या करारावर सही करतो. विदुर तो करार घेऊन हस्तिनापूरला पोहोचतो . त्याचवेळी करणिस्तानचे सैन्य मणिमीरचा बराचसा प्रदेश काबीज करून पुढे सरकलेले असते. भारतीय सैन्य आणि ते सैन्य समोरासमोर आलेले असते.
धृतराष्ट्र  ह्याचवेळी अजून एक मोठी चूक करतो. मणिमीरच्या राजाचा हा करार घेऊन हा प्रदेश भारताचाच आहे असे सांगण्यासाठी युनोकडे धांव घेतो. युनो हा भूभाग डिस्प्युटेडआहे म्हणून जाहीर  करते आणि करणिस्तानने गिळंकृत केलेला प्रदेश त्यांच्याच ताब्यात राहतो .धृतराष्ट्राची ही  खेळी चुकते व हा प्रदेश वादग्रस्त होऊन बसतो. हे जे घडते त्यावर कौरवा पार्टीच्या बैठकीत खूप चर्चा होते. धृतराष्ट्र विरोध करणाऱ्या नेत्यांना सांगतो की, 'ज्यांना माझा हा निर्णय मान्य नाही त्यांनी कौरवा  पार्टी सोडून जावे'. काही दिवसातच अनेक जण कौरव  पार्टी सोडून जातात . थरूरांनी धृतराष्ट्राचा युनोत जाण्याचा निर्णय हा एक स्टुपिड निर्णय होता असे स्पष्टपणे  लिहिले आहे. धर्मावर आधारित देशाची विभागणी होते , हा  गंगाजींच्या स्वप्नांला चक्काचूर करण्याचा प्रयत्न होता. ते स्वप्न धृतराष्ट्राला पूर्ण करता आले नाही. ही  ह्या नव्या महा भारताची शोकांतिका आहे .
ह्याचवेळी  जयप्रकाश द्रोणाने आणि  पांच पांडवानी  कौरावा पार्टी सोडन दिलेली असते.व त्यांनी   इतर सामाजिक कार्य करायचे ठरविलेले असते. जयप्रकाश  द्रोणांनी  सर्वोदयाचा नवा मार्ग स्वीकारलेला असतो. भूदान चळवळीत त्यांचा सहभाग असतो.  युधिष्ठिर ह्याने भारतभ्रमण सुरु केलेले असते  . Travel  broadens  the horrizon  असे त्याला वाटत असते .अर्जुन दक्षिणेत जातो . त्याची  व श्रीकृष्णाची  भेट होते . श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिच्याबरोबर त्याचे लग्न जुळते.   ही  अर्जुनाची कहाणी थरूरांनी रंगवून सांगण्यात अनेक पाने खर्च केली आहेत .  थरूरांचे अर्जुन - सुभद्रा प्रकरण मोठे मजेशीर आहे .  ह्याच वेळी धृतराष्ट्राला परराष्ट्रसेवेतील एक अधिकारी व्ही कणिका मेनन  भेटते.  ती त्याची सहकारी होते . काही दिवसांनी  तो कणिकेला  मंत्रिमंडळात अतिशय महत्वाचे स्थान देतो  . कणिका मेनन ही जयप्रकाश द्रोणाची लंडनमध्ये चांगली मैत्रीण होती व तेथील सोशालिस्ट ग्रुपचे ते  दोघे प्रमुख कार्यकर्ते होते. अशी ही कणिका मेनन धृतराष्ट्राचा खरी सल्लागार होते व अनेक प्रश्नावर तो  तिचा सल्ला घेत असतो .
धृतराष्ट्राने विकासाची अनेक कामे धडाक्याने सुरु केलेली असतात . भाक्रा नानगल  सारखे सर्वात मोठे धरण बांधून  आपण आधुनिक  देवळे बांधतो आहोत असे तो लोकांना सांगून हिंदूच्या देऊळ ह्या धर्म कल्पनेला नवा धक्का देतो . त्याने आपण अशीच आधुनिक देवळे उभारणार आहोत  अशी घोषणा केलेली असते . ह्याच काळात प्रिया दुर्योधनी  धृतराष्ट्राची खरी मदतनीस होते . तिने कारभारात लुडबुड करण्यास सुरवात केलेली असते . तिने  भारतभ्रमण करणाऱ्या पांडवांचा नाश करण्याचा डाव रचलेला असतो . तो यशस्वी होत  नाही. ह्याच काळात करणिस्तानचा निर्माता महंमद अली कर्ण अल्लाघरी जातो .
मणिका मेनन शिवाय धृतराष्ट्राला राज्यकारभार करणे कठीण होत जाते . प्रमुख निर्णयात तिचाच सल्ला मानायचा असे त्याने ठरविलेले असते . मणिमीरच्या शेखने नव्याने उपद्रव करणे  सुरु केलेले असते  व स्वतंत्र  राज्याचा दर्जा देण्याची  मागणी पुढे केलेली असते . म्हणून धृतराष्ट्राने त्याला तुरुंगात पाठविले असते . कणिकाने युनोमध्ये मनिमीर प्रश्नावर सर्वात लांबलचक  भाषण देऊन नवा विक्रम केलेला असतो . धृतराष्ट्र आणि प्रिया दुर्योधनी ह्यांची राज्यकारभारावर घट्ट पकड बसते . आय आय टी , सी एस आय आर , आय आय एम , आय सी एस -आय एफ एस शिक्षण संस्था  , अणुशक्ती विभाग , ए आय एम, एस ह्या संस्था धृतराष्ट्राने  त्याच काळात उभारल्या व नवा भारत उभा केला  . आपण अलिप्त राष्ट्र आहोत अशी भूमिका धृतराष्ट्राने घेतली व नव्याने स्वतंत्र झालेल्या  अलिप्त देशांचा  एक गट निर्माण केला. त्यामुळे  त्याचे नेतेपद धृतराष्ट्राकडेच आले. त्याच  वेळी कणिका  मेनन  ही संरक्षण मंत्री होती. आणि चीनने भारतावर हल्ला केला आणि तिबिया  आणि भारताचा लगतचा भाग गिळंकृत केला. त्यापूर्वी धृतराष्ट्र चक्र ( चीन )च्या  दौऱ्यावर गेलेला होता . 'हिंदी चिनी भाई भाई ',अशी घोषणा त्यांनीच  दिली होती. आणि चीनने हा असा धक्का  दिला. चक्रचे युद्ध हिमालयात लढले जात होते . जवानांना थंडीचे कपडे नव्हते . रेशन मिळत नव्हते. बूट नव्हते .टेनिस शूज घालून ते हिमालयात लढाई लढत होते. लोकांना धृतराष्ट्राचे हे युद्ध हरण्याचे प्रकरण आवडले नाही. त्यामुळे देशभर असंतोष व्यक्त झाला आणि  ह्या प्रकरणात संरक्षण मंत्री कणिका  मेननचा बळी गेला व तिला राजीनामा देणे भाग पडले.
धृतराष्ट्र ह्या  चक्र युद्धामुळे गांगरून गेले . हताश झाले . हा घाव त्यांना जिव्हारी बसला . त्यांचे वय झाले होते. लोकप्रिय असूनही त्यांना आपले अपयश सहन होत नव्हते. असा हा पहिला  महा भारताचा पंतप्रधान . तो लोकप्रिय तर होताच . तसाच दूर दृष्टीचा होता.  तरीही चक्र युद्धाचे अपयश  तो पचवू शकला नाही आणि लवकरच  देवाघरी गेला . त्याची रक्षा भारतातील सर्व नद्यांत विसर्जित करण्याचे आली. गंगाजींच्या मृत्यूनंतर देशाला बसलेला हा दुसरा मोठा  धक्का होता.  कौरवा  पार्टीने विचारविनिमयानंतर शिशुपालाची नवे पंतप्रधान म्हणून नेमणूक केली .  

Sunday, June 21, 2020

The Great Indian Novel ( महा भारत कादंबरी) , शशी थरूर : गंगाजी -२

गंगाजी 

आपण महाभारताशी प्रामाणिक  राहून ही  आधुनिक ' महा भारताची कादंबरी 'लिहिली आहे असे थरूर  एका ठिकाणी नमूद करतात. त्यांची कादंबरी सुरु होते ती सत्यवती आणि पाराशर ह्या साधूच्या प्रेमकथेपासून. ही प्रेम कथा लिहिताना थरूर कामसूत्रातील प्रेम ह्या कल्पनेचा आधार घेऊन अनैतिक असलेली  प्रेमकथा रंगवीत जातात. महाभारतात किंवा त्याकाळच्या समाजव्यवस्थेत रामायणासारखी  एकपत्नी कुटुंब व्यवस्था नव्हती.  शशी थरूर ह्यांना कामसूत्र हे महाभारताचा एक भाग आहे, असे वाटते.  . कामसूत्र हा  एक वेदाचाच  भाग आहे असे त्यांना वाटते. The way to man 's soul is through his bowels असे त्यांचे मत आहे. अनेकदा ही प्रेमकथा अश्लीलतेकडे केंव्हा सरकते ते आपल्याला समजत नाही. आता कादंबरी म्हंटलं की असे प्रसंग रंगविण्याची नामी संधी. पाराशर हा ब्राम्हण साधू. सत्यवती एका कोळी राजाची मुलगी. ती नदी किनारी स्नानासाठी जाते आणि  पाराशर ह्या ब्राम्हणाला ती ओलेती स्त्री दिसते आणि तो तो तिच्यावर भाळतो आणि ते दोघे प्रेमात रंगून जातात व सत्यवती त्याला आपले सर्वस्व देते. हा प्रेमप्रसंग थरूर खूप  रंगवून सांगतात. मला तर ना सी फडक्यांची कादंबरी वाचतो आहोत असाच भास झाला.  हा साधू मग कोळी राजाकडे जातो व त्याला एक वर्षासाठी तुझ्या मुलीला घरकामासाठी घेऊन जातो व नंतर येथे पाठवून  देतो असे सांगतो. ब्राम्हणाने केलेली ही मागणी कोळी कशी नाकारणार? सत्यवती त्याच्याबरोबर खुशीने निघून जाते . त्यावेळी पाराशरपासून तिला एक पुत्र रत्न होते . ते पुत्ररत्न म्हणजे वेदव्यास. पाराशर तिचा उपभोग घेतल्यानंतर एक वर्षाने कोळ्याकडे सत्यवतीला  परत पाठवितो. वेदव्यास हा तिचा मुलगा मात्र पाराशर ह्याच्याकडेच सोडून ती आपल्या वडिलांकडे निघून जाते. ह्याच वेद व्यासांनी नंतर  चार वेद आणि महाभारत लिहिले.आहे   सत्यवतीला नंतर शंतनू.राजा मागणी घालतो. त्याची पहिली बायको देवाघरी गेलेली असते .शंतनूला पहिल्या बायकोपासून एक मुलगा झालेला असतो. त्यांचे नांव असते गंगाद्त्त . त्यालाच  पुढे गंगाजी म्हणतात. सत्यवती  शंतनुशी लग्न करण्यास एका अटीवर तयार होते . तीची अट अशी   असते की राजाने पहिल्या बायकोपासून  झालेल्या गंगादत्तला आपला वारस म्हणून राजसिंहासनावर बसू द्यायचे नाही . तिच्यापासून होणाऱ्या मुलालाच गादीवर बसवायचे. शंतनू अडचणीत सापडतो. त्याचवेळी गंगाद्त्त आपल्या वडिलांना असे आश्वासन  देतो की  तो गादीवर कधीच हक्क सांगणार नाही. हीच ती  गंगाद्त्त म्हणजे भीष्माची भीष्मप्रतिज्ञा.  आपल्या वडिलांसाठी केलेला हा त्याचा त्याग .सत्यवतीला चित्रगंधा आणि  विचित्रवीर्य  ही दोन मुले होतात. चित्रगंधा  लहानपणीच जातो.  विचित्रवीर्य हाच  पुढे राजा होतो. . गंगाद्त्त मात्र राजा होऊ शकत  नाही. हे सारे प्रकरण थरूर ह्यांनी खूप रंगवून सांगितले आहे. विचित्रवीर्याला अंबिका आणि अंबालिका ह्या दोन राण्या असतात व त्याची एक दासी असते. लग्नानंतर त्याला क्षय रोग होतो व तो लवकर जातो. त्यावेळी  सत्यवती तिच्या पाराशर  ह्या साधूपासून झालेल्या मुलाला म्हणजे वेद  व्यासांना  बोलावून घेते आणि  त्याला  अंबिका , अंबालिका   आणि दासी परिशमी ह्यांचा सांभाळ कर असे सांगते.  त्या तिघींना  वेदव्यासांपासून एक एक मूलगा होतो.  धृतराष्ट्र हा अंबिके चा तर  पंडू  हा अंबालिकेचे पुत्र असतात.    दासी परिशमीला   विदुर हा पुत्र होतो.   हे सारे थरूरांनी खुप  रंगवून सांगितले आहे . विचित्रवीर्यानंतर  वेदव्यास हस्तिनापूरची  गादी  चालवितात तर गंगाजीं हस्तिनापूरच्या राजाचे सल्लागार होतात.
ह्यानंतरची कथा तर अधिक भन्नाट आहे . धृतराष्ट्राचे लग्न होते गांधारीशी . पंडूचे लग्न होते कुंतीशी. विदुराचे लग्न होते देवकीशी.  पंगू असलेल्या पंडुला पुत्रप्राप्ती होणे शक्य नसते. तेंव्हा तो कुंतीला पुत्र प्राप्त करून घेण्यासाठी १२ वेगवेगळे प्रकार सांगतो.. संतती ह्या १२ पैकी कोणत्याही प्रकाराने झाली तरी त्या राजपुत्राला  राजसिंहासनावर आपला  हक्क सांगता येतो. ही असते त्यावेळची कुटुंब व्यवस्था. रामायणकालीन समाजव्यवस्थेपेक्षा खूप वेगळी.  पंडू  कुंतीला असा सल्ला देतो की तीने योग्य  तो  माणूस शोधावा आणि पुत्रप्राप्ती करून घ्यावी. असा हा सल्ला  त्या काळात एक पती आपल्या पत्नीला देतो. Find a man who is my equal or my superor as I can't give you a Son. तेंव्हा कुंती पण्डूला आपल्यालाही  अशी एक पुत्रप्राप्ती झाली होती. तो पुत्र आहे पणआतां  तो शोधून काढावा लागेलं असे ती पण्डूला सांगते.  त्यावेळी पंडू तो पुत्र शोधायची आता गरज नाही . मला पुत्र प्राप्ती हवी आहे त्यासाठी तू मी सांगितलेला मार्ग अवलंब असे तो सांगतो. कुंती त्याचा सल्ला पतीची इच्छा म्हणून नाईलाजाने मान्य करते . तिला  धर्मापासून युधिष्ठिर  , वायूपासून भीम आणि  इंद्रापासून अर्जुन असे ३ पुत्र होतात . माद्री ही पंडूची  दासी असते आणि  पंडू तीला ही कुंतीला दिला आहे तसाच  सल्ला देतो.  तिला  नकुल आणि सहदेव ही दोन मुले  होतात. हे पंडूचेच पांच पुत्र म्हणजे  पांडव   कुंतीचा सूर्यपुत्र म्हणजे कर्ण . तो लग्नापूर्वीच झालेला पण नदीत एका टोपलीत घालून सोडून दिलेला .कुंतीचा हा मुलगा  एका सारथीला नदीपात्रात सापडतो तो   . त्याला स्वतःचे पुत्ररत्न नसते. तो एका मुस्लिम राजाचा सारथी  असतो. त्याला आणि त्याच्या पत्नीला ही  एक अल्लाने  आपल्यासाठी पाठविलेली भेट आहे असे वाटते.  त्यांच्याकडेच  हा  कुंतीपुत्र कर्ण वाढतो व मोठा होतो.  तोच कर्ण म्हणजे थरूरांचा  कादंबरीतील महंमद अली कर्ण . म्हणजे थरूरांनी ह्यालाच त्यांच्या ह्या नव्या महाभारतात केलं आहे महंमद अली जीना.
गंगाद्त्त - गंगाजी म्हणजे भीष्म ( थरूरांचे गांधीजी )
थरूरांनी त्यांच्या भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील प्रमुख पात्र असलेल्या गांधीजींना केलं आहे भीष्मपितामह म्हणजे  गंगाजी . ह्या कादंबरीत गंगाजी ह्या पात्राला खूप चांगला न्याय दिला असून हे पात्र त्यांनी  चांगले रेखाटले आहे असे मला वाटते. तरीही काही ठिकाणी  त्यांनी गंगाजींवर थोडा अन्याय केला असे वाटते. कादंबरी म्हणजे वास्तव नसते . म्हणून त्यांनी बरेचसे स्वातंत्र्य घेतले आहे. कारण तो काही खरा इतिहास नाही. ती तर ललित साहित्याची गंमत. आपल्याला खऱ्या महाभारताची आणि स्वातंत्र्याच्या इतिहासाची माहिती असते म्हणून काही गोष्टी खटकतात. पण हे असते कादंबरीकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
कौरवा  पार्टीचे पितामह असतात  गंगाजी. इंग्रजांशी लढताना अहिंसा तत्वावर आधारित चळवळी त्यांनी उभ्या केल्या. त्यापूर्वी  रेल्वेच्या तृतीय श्रेणी डब्यातून केलेला त्यांचा भारत दौरा  थरूर रंगवून सांगतात.  हिंदू मुसलमानांना त्यावेळी रेल्वे स्टेशनवर  मुस्लिम पाणी - हिंदू पाणी असे वेगळे पाणी मिळत होते हे गंगाजींना खटकत होते.   त्यावेळची  भारतीय समाजाची धर्मामुळे झालेली विभागणी  कादंबरीकाराने  वर्णन  केली आहे ती अशी.  रेल्वेतून गंगाजींना  भारतीय समाजाची पराकोटीची गरिबी  दिसून येते .त्यामुळेच गंगाजी पंचा हे आपले नेहमी घालायचे वस्त्र असे ठरवून टाकतात.  गंगाजींनी  ह्या भारत दौऱ्यानंतर ३-४ मोठे लढे ब्रिटिश राजवटीबरोबर केले आणि कौरवा पार्टीवर आपले वर्चस्व स्थापन केले  ते  थरूरांनी व्यवस्थित वर्णन केले आहे.
१) मोतीहारीचा इंडिगो - नील शेतीचा लढा २) बिबिगढच्या बागेतील ब्रिटिशांचा बेछूट गोळीबार ३) कलकत्त्यातील ज्यूट कामगारांचा संप ४) इंग्रजांनी आंब्यावर लावलेला कर. अशा  लढ्यातून गंगाजी शिकत गेले . त्यांनी आपले ब्रिटिशांबरोबर लढण्याचे मार्ग शोधले व त्यात ते बदल करीत गेले  . देशातील खेड्यापाड्यातील  लोकांचे दारिद्र्य बघून आणि स्त्रियांचे हाल बघून त्यांचे हृदय विदीर्ण झाले आणि त्यांनी ह्या लोकांनाच आपल्या चळवळीचे खरे सैनिक बनविले. नील शेतीचीलढाई त्यांनी गरीब शेतकऱ्यांच्याकरीत  लढली . पण त्यात फायदा  झाला तो इंग्रजांचाच . हे त्यांना बऱ्याच उशिराच कळले . त्याचे कारण असे होते की  औद्योगिक क्रांतीमुळे इंडिगोची गरजच ब्रिटिशाना नव्हती. ब्रिटनमधील कारखाने बंद पडले होते. नीळ  विकत घेणारे इंग्रज कारखानदार आणि विक्री करणारे मध्यस्थच अडचणीत आले होते . त्यामुळे इंग्रज गंगाजींच्या ह्या चळवळीमुळे एका संकटातून सुटले. हे गंगाजींना उशिरा समजले व ते दुसऱ्या चळवळीकडे वळले.
बिबिगढच्या गोळीबारामुळे शेकडो भारतीय माणसे इंग्रज अधिकाऱ्यांनी मारली. ती इंग्रजांची विनाश काले  विपरीत बुद्धी होती. असे त्यांना वाटले.  Whom the God wish to destroy , they first make them  mad असे गंगाजींना त्यावेळच्या ब्रिटिशांबद्दल  वाटले. हा इंग्रजांचा बेछूट गोळीबार बघितल्यानंतर गंगाजींना असं वाटू लागलं की सशस्त्र इंग्रजांबरोबर लढायचे असेल तर अहिंसेवर आधारित स्वातंत्र्य चळवळ फारशी उपयोगी नाही. तरीही त्यांनी तो मार्ग चालूच ठेवला . त्याच काळात क्रांतिकारकांनी आपल्या चळवळीला जोर आणला. कौरवा पार्टीत मतभेद उफाळून आले . शांततामय चळवळ फारशी उपयोगी नाही असे पण्डूला वाटू लागले तर धृतराष्ट्र हा  गंगाजींचे बोट धरून पार्टीवर आपली हुकमत चालवू लागला. इंग्रजांनी अतिशय श्रीमंत देश असलेल्या भारताला लुटून टाकले आहे व ब्रिटनला बरे दिवस येऊ लागले आहेत हे भारतीयांना समजू लागले.. भारतीय संपत्ती लुटून नेली जात असताना आपण लढा दिला पाहिजे असा विचार कौरवा पार्टीतील नेते करू लागले. अशा राजकीय परिस्थितीत काही इंग्रज गंगाजींचे चाहते होते. त्यांच्या अहिंसेच्या चळवळीकडे काहीजण आकर्षित झालेले होते.  काही इंग्रज गंगाजींचे शिष्य झाले व अगदी साधेपणाने ते गंगाजींचे शिष्य म्हणून त्यांच्या आश्रमात राहू लागले. त्यांत गंगाजींची  एक ब्रिटिश शिष्या होती. तिचे नांव  होते  सराह बेन. सुरुवातीला ती गंगाजींवर खूप खुश होती. गंगाजी तिच्या आलेशान  गेस्ट हाऊसवर रहात असत . तिच्या आरामशीर गाडीतून प्रवास करीत असत.  त्यावेळी कलकत्याच्या ज्यूट मिल कामगाराचा संप गंगाजी चालवीत होते. तो  यशस्वी होण्याची चिन्हे नव्हती. कामगारांना गंगाजींचे मोठ्या गाडीतून फिरणे व आलिशान गेस्ट हाऊस वर राहणे व सोबत ब्रिटिश महिला असणे हे फार खटकले व गंगाजी हे इंग्रजांचे एजंट आहेत असे त्यांना वाटू लागले . गंगाजींना कामगार आपल्याविरोधी का जात आहेत?, हे लक्षात आल्यावर त्यांनी पदयात्रा आणि उपोषण हे दोन नवे  मार्ग स्वीकारले. ते कामगारांच्या वस्तीतच राहू लागले . त्यांची ब्रिटिश शिष्या त्यांच्यासारखीच  साधी राहू लागली आणि तिने त्यांच्या आश्रमात राहणे सुरु केले. पदयात्रा,  सत्याग्रह आणि उपोषण ही तीन नवी शस्त्रे  गंगाजीनी  प्रभावीपणे वापरण्यास सुरु केली . त्यामुळे कलकत्याच्या  ज्यूट कामगारांचा संप काहीसा यशस्वी झाला व  चांगली तडजोड झाली. इथे त्यांच्या चळवळीला मर्यादित यश मिळाले.
गंगाजी , धृतराष्ट्र आणि पंडू : कौरवा पार्टीच्या नेतेपदासाठी 
Fasting is my business. असे गंगाजींनी  आपल्या शिष्याना पटवून देण्याचा प्रयत्न केला. कौरवा पार्टीतील पण्डूला मात्र हे मान्य नव्हते.  'रणाविन  स्वातंत्र्य कोणा  मिळाले?'  , असे पण्डूला वाटत होते. त्यामुळे  गंगाजींचा विरोध असूनही त्याने कौरवा पार्टीचे अध्यक्षपद  मिळवण्यासाठी  निवडणूक लढवली . त्या निवडणुकीत  पंडुने  यशही  मिळवून दाखविले.  गंगाजींना हा आपला पराभव वाटला . त्यांचे महत्व कमी होणार हे त्यांना दिसू लागले . त्याच वेळी ब्रिटिश व्हाईस रॉय बदलून आला . त्याने लोकांवर नवे कर लादण्यास सुरुवात केली. शेती उत्पन्नावर कर , संपत्तीवर कर असे अनेक कर लावले गेले. त्याच वेळी कौरव पार्टीत भांडणे सुरु झाली. मतभेद वाढू लागले . गंगाजी आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी धृतराष्ट्राची अधिक मदत घेऊ लागले.  सराह  बेन  ही  इंग्रज महिला गंगाजींची सचिव होती. तिचे परदेशी पत्रकारांशी चांगले संबंध होते. त्यामुळे गंगाजींना अमेरिकन आणि ब्रिटिश वर्तमानपत्रातून खूप प्रसिद्धी मिळू लागली.गंगाजींची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उजळून निघाली. पदयात्रा , उपोषणाला खूप प्रसिद्धी मिळू लागली. गंगाजींचे अंतर्गत राजकारण कधीच सरळ नव्हते. त्यांचे धृतराष्ट्राला झुकते माप  होते. त्यांचा पण्डूला  अंतर्गत विरोध होता. पण्डू पुढे न येण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. पार्टीमध्ये  पण्डूला सळो  का पळो  करून सोडले. पण्डुने पार्टी सोडावी म्हणून त्यांनी अनेक कारस्थाने केली. शेवटी पंडू ने कौरवा पार्टी चा अध्यक्ष असूनही पार्टी सोडली . त्याचे मुख्य कारण म्हणजे  त्याला असे वाटत असे की गंगाजींच्या अहिंसेच्या चळवळीवर आधारित सत्याग्रह केल्यामुळे इंग्रज हा देश सोडून जाणार नाहीत.  सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच आपला  देश स्वतंत्र होईल. ह्या विचाराने त्यांनी  पार्टी सोडली आणि सशस्त्र हिंद सेना उभारली.
थरूरांनी हे  प्रकरण एका  दीर्घ काव्यात लिहिलं आहे. ते छान जमले आहे.
गंगाजी आणि महंमद अली कर्ण 
देशव्यापी चळवळ आणि कौरवा पार्टीची प्रतिमा जर कोणी उजळ केली असेल तर गंगाजींनीच . त्यामुळे त्यांचा पार्टीत  अधिक प्रभाव होता. हा One Man Show आहे असे महंमद अली कर्णाला वाटू लागले. त्याचे कारण म्हणजे व्हाईसरॉय बरोबर गंगाजींची  बोलणी सुरु झाली. महंमद अली कर्णाला हे मान्य नव्हते. मुसलमानात खूप जातीपंथ होते. शिया , सुन्नी, मोपला , बोहरा , खोजा , इस्माईलस , अहमदिया , कच्छी मेनन आणि अल्ला. भिन्न राहणी, भिन्न भाषा , भिन्न चालीरीती , वेगळे खाणेपिणे , सर्वच वेगळे .कारण ही  मंडळी वेगवेगळ्या प्रांतात विखुरलेली होती. हिंदू समाज तर त्याहून अधिक विखुरलेला होता . प्रत्येक प्रांताचे सुलतान आणि महाराज इंग्रजांचे मंडलिक होते. ते आपले ऐषआरामी जीवन जगत होते. ब्रिटिशांचे Divide and Rule असेच धोरण होते. कौरवा पार्टी ही मध्यममार्गी राष्ट्रवादी पार्टी होती तर मुस्लिम लीग ही  मुसलमानांचे प्रतिनिधित्व करीत होती. मुसलमानांना प्रभावी असा  नेता नव्हता. गंगाजींच्या सहवासात काही सौम्य विचारसरणीचे मुसलमान होते. त्यावेळच्या मुसलमानांचा नेता गागा शाह  ह्याला महंमद अली कर्णाला मुस्लिम लीग मध्ये आणायचे होते. महंमद अली कर्ण कौरव पार्टीपासून दूर जात होते .कारण त्यांना गंगाजी हे हिंदूंचे नेते आहेत . ते सनातनी आहेत . पुरोगामी नाहीत. कौरवा पार्टीच्या सभा ह्या प्रार्थना सभेने सुरु होतात हे त्यांना अधिक खटकत होते. उपोषण , पदयात्रा हे मार्ग त्यांना मान्य नव्हते. मुख्य म्हणजे गंगाजींचे नेतृत्वच  कर्णाला मान्य नव्हते. कर्णाला गंगाजींचे अंतर्गत राजकारण  मान्य नव्हतेच.  महंमद अली कर्ण मुल्ला मौलवींना न मानणारा होता. तो अधिक आधुनिक विचारसरणीचा होता. इस्लामिक वृत्ती नसलेला हा कर्ण  . त्यांची मुस्लिम लीग आणि हिंदुत्वादी विचारांशी अधिक जवळीक असलेली गंगाजींची कौरवा पार्टी ह्यांच्यात तणाव निर्माण होत गेले. गंगाजी  हिंदू होते. अध्यात्मिक वृत्तीचे होते. जुन्या हिंदू धर्मग्रंथावर त्यांचा गाढ विश्वास होता. त्यांचे आश्रमात राहणे , प्रार्थना करणे, उपास करणे हे मुस्लिम नेत्यांना खटकत असे. गंगाजी लोकांचा अनुनय करताना दिसत. गंगाजी वयाने वृद्ध होते. त्यांच्या वाणीमध्ये चमक नव्हती.  पदयात्रेत त्यांचा एक हात इंग्रज बहिणीच्या खांद्यावर असे. आश्रमातील त्यांचे हिंदू संस्कारित जगणे सहज लक्षात येई  . परदेशी पत्रकार आणि फोटोग्राफर ह्यांचा  त्यांच्या आजूबाजूला असलेला घोळका  त्यांना खूप प्रसिद्धी देत असे.. त्यामुळे आपण जागतिक नेते आहोत असा त्यांचा आविर्भाव असे . नेहमी स्पिरिच्युअल आणि मॉरल बोलणे हे गंगाजींचे खास  वैशिष्ट्य.  हे सारे महंमद अली कर्णाला मान्य नव्हते. गंगाजी तसे सेक्युलर नाहीत असेच त्यांना वाटत असे. त्यामुळे मुस्लिम समाजाचे भले त्यांच्याकडून होईल अशी आशा कर्णाला नव्हती.  I am a Hindu, a christian, a Zorostrian, a jew असे फक्त हिंदूच म्हणू शकतात ,असे महंमद अली कर्णाला  वाटत असे. कौरवा पार्टी सेक्युलर नाही आणि मुस्लिमाना तेथे न्याय मिळणार नाही असे त्यांना वाटू लागले. महंमद अली कर्णाचे दिसणे  इंग्रज व्हाइसरॉय सारखे रुबाबदार. तो बुद्धिमान तर होता पण वक्ता होता. इंग्रजीवर प्रभुत्व होते . लोकांवर छाप पाडण्याची वक्तृत्व कला त्यांना अवगत होती.  त्यांचे शैलीदार  वक्तव्य लोकांच्यावर छाप पाडे . आवश्यक असलेली आक्रमकता त्यांच्यात होती.. तसे त्यांच्ये वागणे इंग्रजी वळणाचे व अतिशय रुबाबदार. ब्रिटिश आचारविचारांचा खूपच  प्रभाव. त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यावर त्यांची सहज छाप पडे . मुस्लिम लोकांनाही ते व्हाइसरॉयसारखेच व्यक्तिमत्व आहे असे वाटे. गागा शाह ह्या मुस्लिम नेत्याने नेतृत्वाची धुरा महंमद अली कर्णाकडे  दिली आणि मुस्लिम लीगचे स्वरूच त्यांनी  बदलले.  कर्णाने मुस्लिम लीगवर घट्ट  पकड बसविली.  गंगाजी विरुद्ध कर्ण असा नवा झगडा सुरु झाला , गंगाजी म्हणजे 'हिंदू मोबोक्रसी' आणि कर्णाची मुस्लिम लीग म्हणजे 'मोरीबंद' असे समीकरण झाले.इंग्रज अधिकाऱ्यांनी गंगाजी आणि महंमद अली कर्ण ह्यांच्यात वाटाघाटी सुरु करण्याचे नाटक सुरु केले. इंग्रज अधिकाऱ्यांनी कौरवा पार्टीला कमी महत्व देऊन मुस्लिम लीगचा आवाज वाढविण्यास मुद्दाम  मदत केली. गंगाजींच्या भारतात आपल्याला स्थान  नसेल म्हणून कर्णाने करणीस्तानची मागणी पुढे रेटली. मला स्वातंत्र्य हवे पण हिंदूंचे वर्चस्व नसलेला भारत हवा असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. . त्याला त्यांनी करणीस्तान असे नांव दिले. कौरवा पार्टी आणि मुस्लिम लीग ह्यांच्यात तीव्र झगडा सुरु झाला आणि इंग्रजांनी त्याचा पुरता फायदा घेतला व  भारताचे स्वातंत्र्य पुढे गेले.
महंमद अली कर्णाच्या मुस्लिम ग्रुपमध्ये आणि  कौरवा पार्टीतील मुस्लिम ग्रुप मधील मतभेदामुळे प्रांतिक निवडणुकात गंगाजीला  थोडे यश मिळाले. पण नंतर महंमद अली कर्णाचा मुस्लिम प्रभाव वाढत गेला त्यांना अधिक यश  मिळत गेले. आणि इंग्रजांनी महंमद अली कर्णाच्या मुस्लिम लीगच्या पारड्यात अधिक वजन टाकले व त्यांना  स्वतंत्र राष्ट्र देण्याचे ठरविले. त्याचवेळी गंगाजींची छोडो भारत चळवळ झाली तरी करणीस्तानचे महंमद अली कर्णाचे स्वप्न साकार होणार हे अधिक स्पष्ट  होत गेले. गंगाजी आणि महंमद अली कर्ण  हे कौरवा पार्टीत एकत्र राहिले असते व धृतराष्ट्राला अधिक स्थान मिळाले नसते तर कदाचित वेगळा  भारत झाला  असता. पण इंग्रजांचे राजकारण वेगळेच होते व त्यांनी हुशारीने भारताची फाळणी केली . ह्याचे सर्वात अधिक दुःख गंगाजींना झाले.

Tuesday, June 16, 2020

The Great Indian Novel : महा भारत कादंबरी -१ - शशी थरूर

The Great  ( महा )  Indian ( भारत )  Novel ( कादंबरी )

हे शशी थरूर  ह्यांचे खूप गाजलेलं पुस्तक हाताशी आलं . त्याच्या २५ आवृत्या निघाल्या आहेत . थरूर ह्यांनी ही  कादंबरी लिहिली तेंव्हा ते भारतीय राजकारणात नव्हते . वयाने फार तरुण होते . इंटुक होते . म्हणजे आजही आहेतच. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय ? , हे त्यांना चांगले माहित असल्यामुळे इतिहास लेखन नं  करता त्यांनी कादंबरी लेखन केलं . त्यांना स्फूर्ती मिळाली ती महाभारताकडून . रामायण आणि महाभारत हे असे दोन ग्रंथ आहेत की जे  आपल्या जगण्याचे विश्व व्यापून टाकतात. इतके सुंदर ग्रंथ दुसऱ्या भाषेत सापडणे कठीण. त्यातही महाभारताचे वैशिष्ट्य वेगळे . ह्या ग्रंथात आपल्याला जी माणसे दिसून येतात ती आपल्या आजूबाजूला आपण रोजच बघत असतो. आणि नकळत आपण बोलताना म्हणतो , ' तो बघ शकुनी मामा चालला आहे '. अशी ही  विविधरंगी,  विविध स्वभावाची माणसं आपल्याला महाभारतात सापडतात. कादंबरीकार शशी थरूर ह्यांना   गेल्या २०० वर्षाच्या भारतीय इतिहासावर कादंबरी लिहावी असे वाटले. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास  म्हणजे एक आधुनिक महाभारत आहे ,असे त्यांना वाटलं असावं . महा भारत कादंबरी  असेच नांव त्यांना सुचलेलं दिसतं . मग ह्या आधुनिक  महाभारतात तीच जुनी गाजलेली पात्रे त्यांनी शोधली. पण ह्या त्यांच्या  महा भारतातील पात्रे म्हणजे भीष्म , धृतराष्ट्र ,पडूं  ह्या व्यक्ती  कोण आहेत हे मात्र आपणच शोधायचे आहे. लेखकाने हे लेखन   कादंबरीच्या स्वरूपात  केलेले असल्यामुळे त्याने सम्पूर्ण अभिव्यक्ती  स्वातंत्र्य  घेतले आहे . त्यामुळे त्याची इंटरप्रिटेशनची म्हणजे अर्थ लावण्याची जबादारी संपते. ते काम वाचकाचे आहे . त्यामुळे  आपल्यालाच त्या व्यक्ती कोण आहेत हे मात्र शोधावे लागते. कारण लेखक असे सांगतो की  ही कादंबरी ही भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाची म्हणजे गेल्या २०० वर्षाच्या भारताच्या इतिहासाची ही कथा  आहे. महाभारतात जी  पात्रे आहेत तीच पात्रे ह्या कादंबरीत दिसून येतात. वेद व्यास म्हणजे स्वतः शशी थरूर असावेत . तेच हे नवे महाभारत आपणास सांगत आहेत. महाभारतात धृतराष्ट्र , पंडू , विदुर , दुर्योधन ,शकुनी ही जी पात्रे आहेत तीच आपल्याला ह्या कादंबरीत भेटतात. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील गांधीजी , पंडित नेहरु  आणि नेताजी सुभाष ह्यांना आपण ओळखतो . नेहरुनंतरचे लाल बहाद्दुर शास्त्री , इंदिरा गांधी , जयप्रकाश नारायण आणि मोरारजी देसाई ह्यांनाही  आपण चांगलेच ओळखतो. ह्या मंडळीत महाभारतातील कोणते पात्र शशी थरूर ह्यांना अभिप्रेत आहे हे कादंबरी वाचताना आपणच शोधून काढायचे आहे. स्वातंत्र्यलढ्यात  ज्या पक्षाने भाग घेतला तो पक्ष काँग्रेस म्हणून आपण ओळखतो. महाभारतात  कौरव - पांडव आहेत. कुंतीचा कर्ण आहे. आधुनिक भारताच्या इतिहासात मुस्लिम लीग आणि फाळणीला जबादार असलेले पाकिस्तानचे महंमद अली जीना  आपणास माहित आहेत. शशी थरूर ह्यांच्या ह्या महाभारतात  कर्ण  आणि कर्णीस्तान   म्हणजे कोण?, हे आपल्याला शोधायचे आहे. इंग्रजांशी स्वातंत्र्य लढा देणारी पार्टी काँग्रेस होती तर थरूर ह्यांच्या ह्या महाभारतात म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारी पार्टी आहे कौरवा पार्टी. कुंतीचा सूर्यपूत्र म्हणून आपण कर्णाला ओळखतो. थरूरांच्या महाभारतातील कर्ण  म्हणजे महंमद अली कर्ण . महमंद अली कर्ण हे कर्णीस्तानचे भाग्यविधाते.  म्हणजेच  पाकिस्तानचे निर्माते.  ही  कादंबरी असल्यामुळे कर्ण म्हणजे जीना हे समजल्यानंतर आपल्याला  थोडा शॉक बसतो.   महाभारतात आपण ओळखतो भीष्मपितामह ह्यांना. ह्या महाभारतात आपण भेटतो गंगाजी म्हणजे गंगाद्त्त ह्यांना .  हे गंगाजी म्हणजे गांधीजींचं असे आपणास वाटू लागते  कारण तशाच चळवळी त्यांनी उभ्या केल्या होत्या  आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले . भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु हे आपण ओळखतो . काँग्रेस पार्टीचे गांधीजींनंतरचे  ते प्रमुख नेते. महाभारतातील भीष्म हे कौरव पार्टीचे असले तरी हस्तिनापूरचे सम्राट झाले नाही. तसे गांधीजीही काँगेसचे पितामह असले तरी भारताचे पंतप्रधान झाले नाहीत . हा खरा मान धृतराष्ट्राचा. कौरवाचा तो प्रमुख. पंडित नेहरु  म्हणजे थरूरांच्या महाभारतातील धृतराष्ट्र. तेच हस्तिनापूरचे म्हणजे  दिल्लीचे राजे झाले. धृतराष्ट्र हा अंध. पंडितजी तर दुरदृष्टीचे नेते . ते अंध कसे असतील.  Nehru was Blind Idealist असे थरूरांना  अभिप्रेत असावे. धृतराष्ट्राचे भाऊ पंडू आणि विदुर. थरूरांच्या महाभारतातील पंडू म्हणजे नेताजी सुभाष आणि विदुर म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. पडूंचे गंगाजींशी जमले   नाही आणि त्यांनी कौरवा पार्टी सोडून एक सेना उभी केली. नेताजींची आझाद हिंद सेना आपण ओळखतो कारण नेताजींना अहिंसेवर आधारित चळवळीमुळे स्वातंत्र्य मिळेल ह्यावर विश्वास नव्हता  म्हणून ते काँग्रेसचा राजीनामा देऊन  त्यांनी आझाद हिंद  सेनेसारखी   सशस्र  सेना  उभारली .
धृतराष्ट्राचा मोठा मुलगा म्हणजे दुर्योधन. थरूरांच्या महाभारतात धृतराष्ट्राला आहे मुलगी. तिचे नांव आहे प्रिया दुर्योधनी . आधुनिक महाभारतात पंडित नेहरु  नंतर त्यांची मुलगी इंदिरा गांधी ह्यांनी त्यांची गादी  मिळविली ती लाल बहाद्दूर शास्त्री ह्यांच्या मृत्यूनंतर.  ह्या महाभारतात धृतराष्ट्राला मुलगी आहे म्हणून थरूरांनी ते पात्र उभे केलं आहे ते प्रिया दुर्योधनी . ते ह्यामुळेच. लाल बहाद्दूर शास्त्री ह्यांना त्यांनी केलं आहे माद्रीचा भाऊ शिशुपाल . ह्या  कादंबरीत प्रिया दुर्योधनीला कायदेशीर मदत करणारा सल्लागार आहे शकुनी शंकर डे . म्हणजे इंदिरा गांधी ह्यांचे आणीबाणीच्या काळातील सल्लागार  सिद्धार्थ शंकर रे . अशी ही  सगळी गंमत . कधी काही विनोद निर्माण करणारी . आपल्याला मनसोक्त हसविणारी. आपण एखादा वग पाहताना जसे हसत असतो तसे हसत राहतो.
थरूरांच्या महाभारतात द्रोणाचार्य आहेत जयप्रकाश द्रोण . म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासातील काँग्रेसची सत्ता उलथून टाकून इंदिरा गांधींचा पराभव करणारे नेते  जयप्रकाश नारायण. प्रिया दुर्योधनीचा पराभव करून हस्तिनापूरची गादी मिळवतो तो युधिष्ठिर. हा युधिष्ठिर म्हणजे मोरारजी देसाई .दुर्योधन आणि युधिष्ठिर ह्यांच्यात जसा सत्तेसाठी झगडा होतो तसाच झगडा आपण राजकारणात पाहिला आहे तो  मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी ह्यांच्यात. द्रोणाचार्य आणि युधीष्ठीर दुर्योधनाला सत्तेपासून दूर करतात तसेच जयप्रकाश आणि मोरारजी देसाई हे जनता राज्य आणून  काँग्रेसला पराभूत करतात.
महाभारतातील अनेक पात्रे ह्या आधुनिक महाभारतात आहेत. थरूरांनी कादंबरी खूपच मनोरंजक केली आहे . आपण राजकारणातील ही पात्रे ओळखतो.  कादंबरीत कणिका  हे पात्र आहे, ते म्हणजे  व्ही के कृष्णमेनन . लेडी माउंटबॅटन ह्यांना आपण ओळखतो. कादंबरीत ते पात्र आहे लेडी जिऑग्रिना . भारतीय लोकशाही म्हणजे द्रौपदी .काँग्रेस ( आय ) म्हणजे कादंबरीतील  कौरवा ( आर ) तर खरी काँग्रेस म्हणजे कौरव ( ओ ). जनता दल म्हणजे  पीपल्स पार्टी .अशी सर्व पात्रे  आपल्या ओळखीची  आहेत .आपण त्यांना  कादंबरी वाचताना ओळखत जातो आणि काही वेळा खूप  हसतो.अलीकडीला स्वातंत्र्यानंतरचा राजकीय इतिहास तर आपल्याला माहीतच आहे  त्यामुळे आपण रमतो.. थरूर ह्यांनी आजच्या स्वतः च्या पार्टीला कौरवा पार्टी केले आहे . त्यावेळी ते पक्षीय राजकारणात नव्हते. आज ते काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत . धृतराष्ट्र आणि प्रिया दुर्योधनी ही दोन पात्रे त्यांनी अशी कशी रंगवली  असे आपल्याला वाटते आणि तरीही ते आज काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते कसे आहेत ?,असा प्रश्न माझ्यासारख्या अराजकीय व्यक्तीला पडतो.  This great Indian Novel might upset a few people असे आपल्याला वाटते पण तसे तर काहीच दिसून येत नाही . उलट This novel entertains and amuses us. शशी थरूर ह्यांचा कल्पनाविलास भन्नाट आहे. धन्य आहे हा आधुनिक महाभारत सांगणारा वेद व्यास !महाभारताचा आधार घेऊन म्हणजे मायथॉलॉजीच्या पदराखाली  लपून त्यांनी  हे महाभारत मनोरंजक केले आहे ,हे खरे असले तरी काही मोठ्या व्यक्तींचे मूर्तिभंजन केले आहे . ही कादंबरी आहे हे खरे . असे असले तरी हे भारतीय नेते  The  Great Indian Heros आहेत हे दुर्लक्षून चालणार नाही. आजही ह्या कादंबरीच्या नव्या आवृत्या निघत असतात आणि खूप खपत असतात.
पुढील ब्लॉगमध्ये मी  थरूर ह्यांच्या गंगाजी, धृतराष्ट्र , पंडू , प्रिया दुर्योधनी, युधिष्ठिर आणि  जयप्रकाश द्रोण ह्यांच्यावर लिहिणार आहे .इंग्रजीत हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. मराठी वाचकांना ते फारसे माहित नसल्यामुळे  माझा हा खटाटोप. 

Sunday, June 14, 2020

My Reflections on Uday’s Poems




I received a book of poems “A Window for a Home without Walls “from Uday Dandavate. It is a quite different experience of reading his poems. Uday likes poems because he believes that poem is an art of touching from the distance. That is true. Any sensitive person has to be a poet. His sensitive human mind has delivered many messages through his beautiful poems and I am touched by his thoughts.
Uday is an atheist. Yet, he believes in God in a different way. He says in his poem:
there is a god inside us
who we crucify everyday
we have an opportunity
to resurrect the god
inside us
An Unstuck feather talks to poet Uday and says,
do not try catching me
do not try holding on to me
do not putting me back……….
the true joy
is in letting me fly 
Poet is a professional Designer and in his book named “window of a home without walls “, he says,
i design a window
in my imagination
as I stand in a home
without walls
He being designer also designs an ideal journey ….
in an ideal journey
the end does not matter
the purpose
the experience
the meaning
rise to the top
no matter what the end …
Poet believes that nature gave us the creative capacity so that we can keep living purposefully.
He talks about perspectives which lead to harmonious outcomes because of critical thinking that leads to innovation. First he is a designer and next he is poet. No. he is a poet first and then designer.
He talked about Covid 19 which will pass in near future but as a poet he believes that a new future will arrive not from factories, not from reserves but from shared values, shared cultures and shared dreams of people. Poet does not bother about pandemic. Because he believes that it is time to reflect, reboot and reinvent. He wants us to invest in the new future.  
Only Rock can talk to the poet and it says to him
you scratch my back
but I won’t scratch yours
i am not needy
my purpose is just
to be
i am a rock
i will be there
just incase
our path cross again
my purpose is
just to be
Poet says that in absence of intentions and expectations, we can rediscover ourselves. According to poet, human aspirations are strange and we just do not look at ourselves. The poet would like to be a river and he expresses his thoughts in his beautiful poem on river. He wants to irrigate minds and generate positivity hope. He would like to bring back the spring of life. Poet looks at the Universe and feels that he is a part of Universe because he is free to wander just like universe. Poet is different person. When the sound of the ocean resonates with him, he hears the sound OM and he looks for the unknown. The Nature is God to him. Poet is just like a child. He can fly without wings and run with tired legs, his imagination is free from doubt, fear or judgment.
Uday is a son of Madhu Dandavate. He was Professor of Physics. He was a socialist and minister in Janata Government. I liked his poem “ an insight at haji ali “. Uday was a seven year old boy. He was holding his father’s hand and walking in the evening at haji ali to see the beautiful Sea Shore of Mumbai. The Sun was setting and his father was pointing at the moon and saying to him:
whether it is a day
or night
you can always find
a source of light 

His father who was a physicist told him " You can always find a source of light whether it is a day or night". This poetic answer is based on physics and philosophy.  Reading his poems is a dose for us to get activated and look for a new future. I am sure, you will like his poems and they will always remind you the search for god within you.



Wednesday, June 10, 2020

उद्योजक आणि सत्ताधारी


उद्योगपतींना कोणताही पक्ष नसतो .त्यांना सर्व पक्ष सारखेच असतात . ते सत्तेवर असलेल्या  सर्व पक्षांना मदत करीत  असतात .
प्रत्येक उद्योगपतीकडे दोन तीन माणसे असतात  ज्यांची निरनिराळ्या पक्षातील प्रमुख  व्यक्तींशी चांगली ओळख असते . ते सत्तेत असलेल्या पक्षाकडे संपर्क साधतात आणि आपली कामे करून घेतात .
कॉंग्रेस सत्तेवर असली की एक अधिकारी संपर्क साधतो . जनता पक्ष सत्तेवर असला की एक अधिकारी संपर्क साधतो . भाजप सत्तेवर असला की एक अधिकारी संपर्क साधतो . सगळी कामे अगदी सहज होतात . असेच  एक  उद्योगपती . केंद्रात सरकार  बदलले की त्यांचा सीइओ  बदलत  असे.  कॉंग्रेसचा अर्थमंत्री  आला की  एक अधिकारी.  जनता  राजवटीत  एक अधिकारी.  मी  ह्या  अधिकार्यांना भेटलो आहे . राजवट बदलली  की  त्यांची इतरत्र बदली होत असे किंवा  काहीच  काम  नसे . उद्योगपतींना असे करावेच लागते . नाहीतर उद्योग बंद पडतील . त्यांना जात नसते ,धर्म नसतो .पक्ष नसतो . ते सर्व पक्षांचे मित्र असतात . ते साम्यवादी आणि समाजवादी पक्षाचे सुद्धा जवळचे मित्र असतात .
तसे उद्योजकांना कोणताही पक्ष नसतो . तो अदानी असो का अंबानी, बजाज असो का डीएचलवाला, टाटा असो का बिर्ला. त्यांना त्याचे काही देणे- घेणे नसते. राजकीय नेत्यांना फक्त घेणे असते. उद्योजकांचा नाईलाज असतो. त्यांचे देणार्यांचे हात असतात. भिकारी असतात ते राजकीय नेते आणि चिरीमिरी घेणारे शासकीय कर्मचारी.

सिंपल सरल टॅक्स .
नो' गब्बर सिंग टॅक्स' .
राहुल गांधी ह्यांची ही कल्पना एकदम भन्नाट !
 सर्व वस्तूवर एकच टॅक्स .
अन्नपदार्थ असो का मर्सिडीझ गाडी .
काहीही विकत घ्या . एकच कर भरा .
सिंगापूरला गेल्यासारखे वाटेल .
राहुलजी एक मात्र करा .
त्या चिदंबरमला अर्थमंत्री करू नका .
 ते अर्थमंत्री होते तेंव्हा
त्यांनी करव्यवस्था इतकी किचकट केली होती की
काही विचारू नका .
त्यांना तुमचा 'सिंपल सरल टॅक्स'
एकदा समजावून सांगा.
आणि हो ते सॅम पित्रोडा .
ते म्हणाले की
मध्यमवर्गीय लोकांनी थोडा जास्त कर भरावा
 म्हणजे अतिगरिबांच्या खात्यात ६००० रुपये टाकता येतील . अहो , त्या अल्पमध्यमवर्गीय मंडळींना गरिबीरेषेच्या खाली  ढकलू  नका हो !
 ६० वर्षे लागली त्यांना गरिबीतून वर यायला .
पुन्हा गरिबीत ढकलू नका .
 त्यांच्या मुलांना मध्यमवर्गीय व्हायचंय
आणि नातवंडांना निओरिच व्हायचंय .
मग त्यांची फॅमिली श्रीमंत होईल.
 खूप मालमत्ता  जमेल .
नुसत्या भाड्यावर
करोडो रुपये मिळतील .
मग राजकारणात जाता येईल .
अशी पॉलिसी आणा की
 देशात मध्यमवर्गीय वाढत जातील .
अंबानींचे ठीक आहे हो !
धीरूभाई गब्बर झाले ते तुमच्या पक्षाच्या  राज्यात.
 तुमच्यामुळेच  .
आता सगळे  अंबानी  'ग्लोबल 'श्रीमंत झाले आहेत .

 त्यांचा धंदा भारतात नाही जमला तरी  वाढेल सगळ्या जगांत .
ते जातील जिथे कर काहीच नसतो त्या  देशात .
मग  त्यांच्या पैशावर तुम्ही कर लावून  गरिबांच्या खात्यात ६००० रुपये कसे भरणार ?
 ते भारतातील धंदा बंद करून' ग्लोबल 'कारखानदारी करतील .
गरीब बिचारे रोज बँकेत जातील.
 आणि आपल्या  खात्यात ६०००  रु . जमा झाले  आहेत का  ते पाहतील  .
 झाले असतील तर मोबाईलवर सिनेमा पहात बसतील . चायपर चर्चा करतील .
 राजकारणाच्या .

Monday, June 8, 2020

पंडित नेहरू


पंडित नेहरू
शाळकरी जीवनातील माझा आवडता नेता. एक आयडॉल. ते रुबाबदार दिसणारे व्यक्तीमत्व. नेहरू जाकीट असो का शेरवानी परिधान करणारे नेहरू. ते नेहमीच माझ्या डोळ्यासमोर येतात. शेरवानीवर लावलेले ते दिमाखदार गुलाबी फुल आजही आठवत राहते.  पांढऱ्या कबुतरांना उंच हवेत सोडून देणारी त्यांची छबी डोळ्यासमोर असते.  'आनंदभूवन' ह्या गोपीनाथ तळवलकरांच्या पुस्तकातून पहिल्यांदाच समजलेले नेहरू नेहमीच आठवतात. आजही ते  तसेच आठवतात. ' ए मेरे वतन के लोगो...' हे लता मंगेशकर ह्यांनी गायलेले गीत ऐकतांनाचे त्यांच्या डोळयातील अश्रू आजही दिसतात.

माझ्या शालेय जीवनात नॅशनल हिरो हेे पंतप्रधान पंडित नेहरूच होते. आजही मी त्यांना त्यांच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक दृष्टिकोनामुळे मानतो. महात्मा गांधीजींनी सरदार पटेल ह्यांना डावलून नेहरूंना पंतप्रधान केले ते एका दृष्टीने बरेच झाले. तसे पाहिले तर सरदार पटेल आजारी असत व त्यांचे वय ही जास्त होते. फारतर सरदार पटेलांच्या नंतर नेहरूच पंतप्रधान झाले असते.
नेहरू पंतप्रधान झाल्यावर त्यांनी गांधीजींचे सर्व काही ऐकले नाही. त्यांनी विज्ञान आणि उदयोगाला विशेष महत्व दिले. रशियन दौऱ्यानंतर त्यांनी समाजवादी विचारधारेला अधिक महत्व देऊन सरकारी सार्वजनिक उद्योगाची उभारणी केली. पोलाद कारखाने उभे केले. भाक्रा नानगल धरणाची उभारणी करून पंजाबला अधिक सुजलाम सुफलाम बनविले. त्यावेळी सरदार सरोवरसारखा ह्या धरणाला कोणीही विरोध केला नव्हता. भाक्रानानगल धरण आणि पोलाद कारखाना यांना त्यांनी आधुनिक तीर्थस्थळांचा दर्जा दिला. हे सर्व गांधी विचारांशी जुळणारे नव्हते. सोव्हिएत रशियातील विकास पद्धती म्हणजे पंचवार्षिक योजना त्यांनी भारतात अंमलात आणली. ते विकासाचे मॉडेल त्यांनी स्विकारले. ते रशियाकडे झुकलेले असले तरी तसे अमेरिकावादी होते. त्यामुळे त्यांनी अलिप्ततावादी चळवळ उभी करून १०० देशांचे नेतृत्व केले. अलिप्त देशांचा वेगळा गट निर्माण करणारे व त्याचे नेतृत्व करणारे नेहरू आठवतात व आजची  बदललेली जागतिक स्थिती आठवत राहते.
डॉ होमी भाभा ह्यांची मदत घेवून भारतात अणूशक्ती विकासाचा पाया रचणारे नेहरू नेहमीच आठवतात.
अणूसंशोधन आणि अणूऊर्जा ह्यांचे महत्व त्यांना माहित होते म्हणून त्यांनी अणूऊर्जा विभाग निर्माण केला. डॉ होमी भाभा ह्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले. हे गांधीवादी विचाराच्या विरोधी होतं.
आय.आय. टी., भारतीय कृषी संशोधन संस्था, एनसीएल, एनपीएल अशा संस्था उभ्या करून आधुनिक भारताची उभारणी केली. आय.आय.टी.तील हीच मंडळी पुढे एन.आर.आय. झाली. त्यांच्याकरिता येथे कमी वाव होता.
डॉ होमी भाभा ह्यांनी मात्र अणुऊर्जा संस्था उभी करताना कोणत्याही विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक अशा मंडळींना न घेता तरुण पदवीधर - पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आकर्षित करून घेऊन त्यांना विशेष शिक्षण देऊन समाविष्ट करून घेऊन एक वैज्ञानिक संस्था उभी केली. नेहरूंनी भाभांना पूर्ण स्वातंत्र्य दिले. आज मुंबईचे भाभा अणू संशोधन केंद्र  हे मातृसंस्थेचे काम करते. तसे पाहिले तर खरी सुरुवात झाली ती बंगलोरच्या इन्स्टिट्युट ऑफ सायन्स आणि मुंबईच्या टी.आय.एफ.आर. मुळेे. त्यामुळेच भारतातील विज्ञान युगाला येथून कलाटणी मिळाली आहे.
नेहरूंची ही दृष्टी आणि डॉ होमी भाभा ह्यांचे नेतृत्व ह्यामुळे भारताने विज्ञानयुगात प्रवेश केला. गांधीजींच्या विचारापासून हे सर्व दूर होते. म्हणून मला नेहरूंचा हा पैलू वेगळा वाटतो.
मी नेहरूंचा चाहता होतो आणि आहे,  हे  त्यांच्या  वैज्ञानिक पैलूमुळे.

अशा ह्या उत्तुंग नेत्याला अभिवादन करण्याचा आजचा दिवस. त्रिवार अभिवादन !

डॉक्टर्स


सध्या चर्चेत आहेत डॉक्टर्स . अलीकडेच  आपण टाळ्या देवून त्यांना त्यांच्या कामाची पावती दिली. आपल्यासमोर नेहमी असतात ते अपार प्रसिद्धी मिळालेले डॉ  आमटे आणि डॉ बंग . मी तर असे अनेक डॉ आमटे आणि डॉ बंग हे के इ एम , नायर आणि सायन हॉस्पिटलमध्ये पाहिले आहेत .जिल्हा आणि तालुका रुग्णालयात पाहिले आहेत .नुकतेच डॉक्टर झालेले आणि प्रचंड अनुभव असलेले डॉक्टर्स पाहिले आहेत .मोठ्या खाजगी रुग्णालयातील अथक परिश्रम करणारे डॉक्टर्स पाहीले आहेत .८ / १० तास शस्त्रक्रिया  झाल्यानंतर  पुन्हा पुन्हा पेशंटला तपासायला येणारे डॉक्टर्स पाहीले आहेत . डॉक्टरांना देव समजणारे पेशंट आणि नातेवाईक पाहिले आहेत . एकदा त्यांची दिनचर्या बघा . अहोरात्र काम करणारा हा माणूस आहे .शेवटी तो ' देव' असला तरी 'माणूस'च आहे . त्याला फुले वाहू नका पण मारू तरी नका . तो देव तुम्हाला आवडत नसेल तर इतर ३३ कोटी देव तुमच्यासाठी आहेत . तो पावेल . उगाच ह्या देवाला मारू नका .तुम्हालाच पाप लागेल . इतर 'देव 'तुमच्याकडे पहाणार सुद्धा नाहीत . 
सरकारनी नुसती देवळे ( इस्पितळे ) बांधली आहेत . त्यातील देवाला पंढरपूरच्या विठोबासारखा नुसता उभा करून ठेवलाय . तो काही गेस्ट हाऊस मध्ये विश्रांती घेत नाही . त्याच्याकडे बघा . उगाच मारू नका . तो नुसता उभा नाही तर तुम्हाला सतत सेवा देतोय .

मी पाहिलेले बाबासाहेब पुरंदरे

महाराष्ट्रभूषण ब मो पुरंदरे .....

१९६३-६६ च्या काळात द मा मिरासदार औरंगाबादेत होते. ते अभाविपचे अध्यक्ष होते. त्यांच्यामुळे ब मो पुरंदरे शिवाजीवर व्याख्यान देण्यासाठी दरवर्षी औरंगाबादला येऊ लागले. त्यांच्या मंत्रमुग्ध  व्याख्यांनाने सर्वच जण प्रभावित होत असत. एरव्ही कंटाळवाणा वाटणारा इतिहास ऐकणार कोण ?
शिवरायाचे आयुष्यच  नाट्यमय की   तो इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा करणारा आणि आपले मनोरंजन करणारा शिवशाहीर अधिक नाट्यमय ?,असा भास व्हावा. वसंत कानेटकरांनी शिवरायावर एका मागून एक नाटके लिहिली तर रणजीत देसाई ह्यांनी त्यांच्या जीवनावर कादंबरी लिहिली. परंतु बाबासाहेब पुरंदरे ह्या व्यक्तीने साऱ्या महाराष्ट्राला शिवरायाचा इतिहास आपल्या भाषणातून शाहिरी पद्धतीने सांगून मंत्रमुग्ध केले. पु ल देशपांडे ह्यांचा 'हसविण्याचा धंदा' होता पण बाबासाहेब  पुरंदरे आपल्या भाषणातून शिवसृष्टीच निर्माण करीत असत.
अभाविपचे एक शिबीर वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिराच्या परिसरात होते. मी त्या शिबिराला गेलो होतो. प्रमुख आकर्षण होते ब मो पुरंदरे + सुधीर फडके + द मा मिरासदार. त्यांच्या शिबिरार्थीबरोबरच्या रात्रीच्या रंगलेल्या गप्पा आजही अंधुकशा आठवतात.
पुरंदरे आणि गो नि दांडेकर ह्यांच्या बरोबर महाराष्ट्रातील किल्ले बघणे हा एक वेगळाच अनुभव होता. माझे काही मित्र नित्यनेमाने हे करीत असत. त्या सहलीवरून परत आल्यावर ते काही दिवस त्यातच रमलेले असत आणि वर्तमानकाळ विसरून जात असत.
हा माणूस सतत शिवकाळात राहतो. त्यांचा  तोच एक ध्यास. त्यांचे सगळे जीवन शिवमय.
काही वर्षापूर्वी विलेपार्ल्यात लोकमान्य सेवा संघात  सावरकरांच्यासंबंधी एक कार्यक्रम होता म्हणून खूप वर्षांनी त्यांना प्रत्यक्ष ऐकण्यासाठी गेलो होतो. बाबासाहेब प्रमुख वक्ते होते.ते बोलण्यासाठी उठले. बोलू लागले आणि एकही शब्द सावरकरांच्या बद्दल न बोलता ते शिवकालात गेले आणि तेथेच रमले. हा बहुधा वयाचा प्रश्न असावा.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासकार कमी आणि शाहीर जास्त ,असे काहीजण म्हणतात. ते तितकेसे बरोबर नसले तरी त्यांचा ध्यास हा शिवाजी आणि शिवकाल हाच आहे , हे मान्य केले पाहिजे.
मी इतिहासकार सेतू माधवराव पगडी ह्यांना प्रत्यक्ष भेटलो आहे . त्यांची व्याख्याने ऐकली आहेत. त्यांची एका दिवाळी अंकासाठी प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. ४-५ तास गप्पा मारल्या आहेत. त्यांचे बोलणेही रसाळ. पण इतिहासकार म्हणून पुरावे असल्याशिवाय काहीही मत व्यक्त करीत नसत. त्यामुळे बोलण्यात काटेकोरपणा असे. ते वेगळे व्यक्तिमत्व होते.
पु ल नी जसं महाराष्ट्राला वेड लावलं तसच शिवशाहीर  पुरंदरे ह्यांनी महाराष्ट्राला शिवकालीन इतिहास  ऐकण्याचे वेड लावले ह्यात वाद नाही. त्यांचा प्रचंड उत्साह आणि त्यांची उर्जा खूपच वाखाणण्यासारखी आहे व माणसाने आपल्या ध्यासासाठी कसं वेडं व्हावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. 


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक
दामोदर सावरकर
सुनील नभ हे सुंदर नभ हे नभ हे अतलची हा
सुनील सागर सुंदर सागर सागर अतलची हा 

ह्या ओळी शाळेतील पुस्तकात वाचल्या तेव्हाच पाठ झाल्या होत्या . शिक्षकांनी ही कविता खूप छान शिकवली होती . त्यानंतर ' सागरा प्राण तळमळला ...' हे गीत जेव्हा जेव्हा ऐकलं तेव्हा तेव्हा सावरकरांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली . ' १८५७ चे बंड की स्वातंत्र्य युद्ध ' ह्या वादविवाद स्पर्धेत भाग घेतला होता त्यापूर्वी सावरकरांची  पुस्तके  वाचली होती  . सावरकर गेले तेव्हा शाळकरी मुलगाच होतो .औरंगाबादच्या बळवंत मोफत वाचनालयात वर्तमानपत्र वाचायला जात असे . तेथे ' मराठा ' तील आचार्य अत्रे ह्यांचा सावरकरावरील लेख  वाचला  तो आजही आठवतो . त्यांचे मराठी साहित्य संमेलनातील भाषण सर्वात वेगळं होतं, ते ही वाचलेलं आठवतं .त्यांचा  गायीवरचा लेख आणि  इतर विज्ञानवादी निबंध वेगळी दृष्टी देऊन गेले . मणीशंकर अय्यर ह्या केंद्रीय मंत्र्यांनी जेव्हा त्यांच्या विरुद्ध मोहीम सुरु केली तेव्हा सावरकर विरोधकांची दुसरी बाजू समोर आली . तो पर्यंत सावरकर द्वेष प्रखरपणे जाणवला नव्हता . पु ल नी अटलजींच्या बरोबर ठाण्यातील एका सभेत सावरकरांच्यावर केलेलं भाषण आजही आठवतं . अलीकडे फेसबुकवर सावरकरविरोधी जे लिहिलं जातंय ते पाहिलं म्हणजे ह्या लोकांना हा क्रांतिकारक , मराठी कवी , वैज्ञानिक दृष्टी असलेला राजकारणी समजलाच नाही . भले त्यांचा हिंदुत्ववाद लोकांना मान्य नसेल पण ह्या सो कॉल्ड सेक्युलरवादी लोकांनी ७० वर्षात देश कुठे नेऊन ठेवलाय ? तो मणीशंकर अय्यर काश्मीरमध्ये जाऊन त्या गिलानीबरोबर कसली खलबतं करीत असतो आणि दुसर्यांना राष्ट्रद्रोही म्हणतो . त्या अरुंधती रॉयची बाजू घेणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारताना तिच्या फुटीरतावादी मंडळीबरोबरच्या गाठीभेटीबद्दल एक  चकार शब्द बोलत नाहीत . तो कन्हय्या काहीही बोलला तरी चालतं . विक्रम गोखले/  परेश रावळ बोलले की किरट्या समजेचे वाचाळपंथी  अशी संभावना करणारे हे डावे , पुरोगामी , समाजवादी आणि निधर्मी विचारवंत . गांधीजींचा पराभव करणारे हे गांधीवादी . ह्यांना गांधीही समजले नाहीत  , नेहरूही समजले नाहीत . सावरकर असो का नेताजी सुभाष , त्यांना समजून घेता येतील असे वाटत नाही . गांधी , नेहरू , नेताजी आणि सावरकर ह्यांचे जे योगदान आहे ते आहेच . त्यांच्या काही चुका झाल्या असतील . पण त्यांनी जेवढं दिलंय तेच अधिक महत्वाचं आहे .मला हे सारेच वंदनीय. 

.पु ल ना समजलेले सावरकर 

सध्या वि दा सावरकर ह्यांच्यावर खूप उलट सुलट चर्चा चालू आहे . पुरोगामी समजणारे रोज नवे विषय शोधून सावरकर आणि त्यांचे हिंदुत्व ह्यावर अनेक प्रश्न विचारीत असतात . महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले पु ल देशपांडे ह्यांचे सावरकर ह्यांच्यावर केलेले भाषण यु ट्यूबवर दोन भागात उपलब्ध आहे . मी फार पूर्वी ते ऐकले होते .आज ते पुन्हा ऐकले . पु ल ह्या भाषणात सावरकर ह्याचा विज्ञानवादी मानवतावाद , सावरकर आणि त्यांचा खरा सेक्युलरवाद , सावरकर आणि अंधश्रद्धा निर्मुलन , मदर तेरेसा ह्यांचा कुटुंब नियोजनाला असलेला विरोध म्हणजे राजद्रोह , सावरकर आणि त्यांचे हिंदुत्व इत्यादी अनेक विषयावर ते गंभीरपणे बोलले . महाकवी सावरकर ह्यावर ही  ते बोलले . नास्तिकतेवर बोलले . हे भाषण ह्या सावरकरद्वेष्ट्यानी अवश्य ऐकावे . सावरकरांना पुन्हा एकदा नीट समजून घ्यावे . त्या नंतर अटल बिहारी ह्यांचे भाषण झाले होते . ते नाही ऐकले तरी चालेल .पण पु ल ह्यांना समजलेले आणि भावलेले सावरकर अधिक समजून घ्या . उगाच फालतू चर्चा थांबवा . मणीशंकर अय्यर ह्यांना हा माणूस समजणे कठीण आहे . हे त्यांच्या वक्तव्यावरून समजतेच . १९६३ - ६६ मध्ये सावरकर द्वेष नव्हता . पाठ्यपुस्तकातून सावरकर दिसत होते . आम्ही त्यांच्या कविता वाचल्या .पाठ केल्या .निबंध वाचले . १९७५ नंतर सावरकरद्वेषाचे वारे सुटले . सध्या तर हिंदुत्व ह्या विषयावर डावे  ,पुरोगामी ,समाजवादी आणि कॉंग्रेसवाले तुटून पडताना दिसतात . त्यांना उठताबसता सावरकर दिसत असतात आणि त्यांच्यात मणी शंकर अय्यर संचारतो . एकदा पु ल काय म्हणतात ते समजून घ्या . मुद्दाम पु ल ह्यांचा उल्लेख करीत आहे . पु ल हे नास्तिक , समाजवादी ,पुरोगामी विचारांचे , राष्ट्र सेवादल आणि 'साधने 'शी जवळचे , विनोदी लेखक असले तरी गंभीर विचार मांडणारे लेखक होते . त्यांनी सावरकरांना समजून घेतले .नव्हे त्यांना सावरकर हे व्यक्तिमत्व समजले .
माझ्या शालेय जीवनात नेहरू - गांधी , नेताजी - सावरकर ह्यांच्यासंबंधीचे धडे अभ्यासक्रमात होते . ' गाऊ त्यांना आरती ' असा आमच्या मनांत भाव असायचा . आज सामाजिक - राजकीय वातावरण गढूळ झाले असून एक विद्वेषाचे वातावरण सर्वत्र दिसते  आहे .
गोपीनाथ तळवलकर ह्यांचे ' आनंदभुवन ' हे नेहरूंचे पुस्तक आम्हाला नॉनडिटेल म्हणून अभ्यासक्रमात होते . त्याचे जवळजवळ पाठांतर केले होते . नेहरू औरंगाबादला आले तेव्हा त्यांना पहाण्यासाठी आम्ही मुलं  किती उत्सुक होतो . त्यांच्या शेरवाणीवर असलेल्या गुलाबाच्या फुलाचे आम्हाला खूप कौतुक होते . अलाहाबादला जाऊन 'आनंदभुवन 'पहायचे राहून गेले पण दिल्लीला पहिल्यांदा गेलो तेव्हा 'त्रिमूर्ती'ला आवर्जून भेट दिली . आम्ही नेहरूभक्त लहानपणापासूनच होतो .
त्याच वेळी शाळेत वादविवाद स्पर्धा असत . एके वर्षी विषय होता ' १८५७ चे बंड की स्वातंत्र्य युद्ध ' . आणि सावरकरांचे पुस्तक हातात पडले  आणि भारावून गेलो . तात्या टोपे , महाराणी लक्ष्मीबाई आणि बहादुरशहा जफार खान ह्यांच्या इंग्रजांविरुद्धच्या लढ्याची ओळख झाली . झांशीला अलीकडे गेलो तेव्हा सावरकर आठवले . योगायोगाने जो गाईड होता तो त्या भागातील मुस्लिम होता . त्याच्या अंगात जणूकाही वीरश्रीच संचारली होती . त्याने आपल्या आवाजात त्यावेळचे चित्र उभे केले . मला सावरकरांच्या लिखाणाचीच आठवण झाली . तसेच शब्द . तशीच भाषा .
ग्वाल्हेरला  झांशीची राणी जिथे मारली गेली त्या जागेवर जेव्हा गेलो तेव्हा ग्वाल्हेरच्या शिंद्यानी सहकार्य न दिल्यामुळे राणी कशी दुःखी कष्टी झाली असेल ते आठवले . त्या ग्वाल्हेरच्या फंदफितुरी करणाऱ्या घराण्याबद्दल आजही  मनात राग आहे .
सावरकरांचे ' माझी जन्मठेप ' दोनदा वाचले . अंदमानला गेलो तेव्हा त्यांच्या खोलीच्या बाहेरील निळा समुद्र पाहिला तेव्हा ' सागरा प्राण तळमळला ' ही  त्यांची कविता आठवली .
मणीशंकर अय्यर सारखा माणूस इतका सावरकर द्वेषाने बोलतो तेव्हा ह्या पाकिस्तानप्रेमी माणसाविषयी संताप येतो . त्याला सावरकर समजलेच नाहीत म्हणून कींव करावीशी वाटते .
अलीकडेच मुक्ता बर्वे ह्यांनी' चॅलेंज ' हे सावरकर ह्यांच्या जीवनावरचे सुरेख नाटक रंगभूमीवर आणले आहे . ज्यांना सावरकर थोडे समजून घ्यावयाचे आहेत त्यांनी ते अवश्य बघावे .
समाजवादी  नेते एस एम जोशी ह्यांना  १९२३ पूर्वीचे सावरकर मान्य आहेत ,असे ते म्हणाले होते . नंतरचे 'हिंदुत्ववादी 'सावरकर त्यांना आणि इतर समाजवाद्यांना मान्य नाहीत . नसतील मान्य .
मला सावरकरांचे  एक वाक्य नेहमी आठवते ...
' तुम्ही तुमचे अमेरिकत्व विसरणार असाल , तुम्ही तुमचे इंग्रज असणे विसरणार असाल , तुम्ही तुमचे जर्मन असणे विसरणार असाल तर मी माझे भारतीयत्व विसरायला तयार असेल .' त्यांच्या प्रखर राष्ट्रवादाची ही व्याख्या .
असा प्रखर राष्ट्रवाद मला व्हिएतनामी लोकात दिसून आला .
शालेय जीवनात सावरकरांचा प्रभाव पडला तो त्यांच्या साहित्यामुळे . विशेषतः कवितेमुळे . साहित्यिक सावरकर नेहमीच मनाच्या कोपऱ्यात वस्तीला असतात . आचार्य अत्रे ह्यांचा सावरकरांच्या वरचा मृत्यू लेख आजही आठवतो .  मुंबईला १९६८ साली प्रथम आलो तेव्हा शिवाजी पार्कला भेट दिली तेव्हा सावरकर सदनाच्या जवळ जाऊन थोडा वेळ उभा राहिलो तेव्हा मला दारात सावरकर उभे आहेत असाच भास झाला होता .
सावरकरांच्याविषयी जो विद्वेष पसरविला जातो त्यामुळे मन उदास होते . पटत नसतील त्यांचे विचार .पण द्वेष का ? तसे पाहिले तर नेहरू - गांधींचे सर्व विचार सर्वांना पटतातच असे नाही . त्यांचे मोठेपण त्यामुळे कमी होत नाही .
मार्ग भिन्न . विचार भिन्न . वाटा निराळ्या . मला तरी नेहरू - गांधींसारखे सावरकर - नेताजी सुभाष तेवढेच वंदनीय आहेत . I salute Vinayak Damodar Savarkar .
त्याच वेळी शाळेत वादविवाद स्पर्धा असत . एके वर्षी विषय होता ' १८५७ चे बंड की स्वातंत्र्य युद्ध ' . आणि सावरकरांचे पुस्तक हातात पडले  आणि भारावून गेलो . तात्या टोपे , महाराणी लक्ष्मीबाई आणि बहादुरशहा जफार खान ह्यांच्या इंग्रजांविरुद्धच्या लढ्याची ओळख झाली . झांशीला अलीकडे गेलो तेव्हा सावरकर आठवले . योगायोगाने जो गाईड होता तो त्या भागातील मुस्लिम होता . त्याच्या अंगात जणूकाही वीरश्रीच संचारली होती . त्याने आपल्या आवाजात त्यावेळचे चित्र उभे केले . मला सावरकरांच्या लिखाणाचीच आठवण झाली . तसेच शब्द . तशीच भाषा .
ग्वाल्हेरला  झांशीची राणी जिथे मारली गेली त्या जागेवर जेव्हा गेलो तेव्हा ग्वाल्हेरच्या शिंद्यानी सहकार्य न दिल्यामुळे राणी कशी दुःखी कष्टी झाली असेल ते आठवले . त्या ग्वाल्हेरच्या फंदफितुरी करणाऱ्या घराण्याबद्दल आजही  मनात राग आहे .
सावरकरांचे ' माझी जन्मठेप ' दोनदा वाचले . अंदमानला गेलो तेव्हा त्यांच्या खोलीच्या बाहेरील निळा समुद्र पाहिला तेव्हा ' सागरा प्राण तळमळला ' ही  त्यांची कविता आठवली .
मणीशंकर अय्यर सारखा माणूस इतका सावरकर द्वेषाने बोलतो तेव्हा ह्या पाकिस्तानप्रेमी माणसाविषयी संताप येतो . त्याला सावरकर समजलेच नाहीत म्हणून कींव करावीशी वाटते .
अलीकडेच मुक्ता बर्वे ह्यांनी' चॅलेंज ' हे सावरकर ह्यांच्या जीवनावरचे सुरेख नाटक रंगभूमीवर आणले आहे . ज्यांना सावरकर थोडे समजून घ्यावयाचे आहेत त्यांनी ते अवश्य बघावे .
समाजवादी  नेते एस एम जोशी ह्यांना  १९२३ पूर्वीचे सावरकर मान्य आहेत असे ते म्हणाले होते . नंतरचे 'हिंदुत्ववादी 'सावरकर त्यांना आणि इतर समाजवाद्यांना मान्य नाहीत . नसतील मान्य .
मला सावरकरांचे  एक वाक्य नेहमी आठवते ...
' तुम्ही तुमचे अमेरिकत्व विसरणार असाल , तुम्ही तुमचे इंग्रज असणे विसरणार असाल , तुम्ही तुमचे जर्मन असणे विसरणार असाल तर मी माझे भारतीयत्व विसरायला तयार असेल .' त्यांच्या प्रखर राष्ट्रवादाची ही व्याख्या .
असा प्रखर राष्ट्रवाद मला व्हिएतनामी लोकात दिसून आला .
शालेय जीवनात सावरकरांचा प्रभाव पडला तो त्यांच्या साहित्यामुळे . विशेषतः कवितेमुळे . साहित्यिक सावरकर नेहमीच मनाच्या कोपऱ्यात वस्तीला असतात . 
सावरकरांच्याविषयी जो विद्वेष पसरविला जातो त्यामुळे मन उदास होते . पटत नसतील त्यांचे विचार .पण द्वेष का ? तसे पाहिले तर नेहरू - गांधींचे सर्व विचार सर्वांना पटतातच असे नाही . त्यांचे मोठेपण त्यामुळे कमी होत नाही .
मार्ग भिन्न . विचार भिन्न . वाटा निराळ्या . मला तरी नेहरू - गांधींसारखे सावरकर - नेताजी सुभाष तेवढेच वंदनीय आहेत . I salute Swantantryaveer Vinayak Damodar Savarkar .