Thursday, December 26, 2019

माझे शिक्षक

तुम्ही खरे विद्यार्थी असाल तर शिक्षक तुमच्या आजूबाजूलाच असतात हे लक्षात असू द्यावे.
काही शिक्षक तुमच्या आयुष्यात येतात . त्यांनी तुम्हाला प्रत्यक्ष शिकविलेले नसते . तुम्ही त्यांच्या  वर्गात शिकणारे विद्यार्थी नसतात .त्यांचे तुमच्यावर त्यांच्या  विद्यार्थ्यांसारखे प्रेम असते . आपुलकी असते . असा एक शिक्षक मला मिळाला . त्यांचे नांव प्रोफेसर जे जी काणे . ते युडीसीटीचे डायरेक्टर होते . त्यांचा विषय होता ऑइल टेक्नॉलॉजी . मी युडीसीटी मध्ये पदार्थविज्ञान विभागात पी. एचडी .करीत होतो . यूजीसीची ३ वर्षाची शिष्यवृत्ती संपली होती .थिसीस लिहिण्याचे काम  सुरु होते . म्हणून मी औरंगाबादच्या ज्ञान -विज्ञान महाविद्यालयात लेक्चरर झालो . माझे मुंबई - औरंगाबाद येणे - जाणे सुरु झाले . त्यामुळे थिसिसचे काम मागे पडले . काही प्रयोग करणे राहिले होते . असेच एके दिवशी काणे सर मी प्रयोग करीत असताना आमच्या प्रयोगशाळेत आले . त्यांनी माझी विचारपूस केली .माझी युजीसी शिष्यवृत्ती संपली आहे हे त्यांना माहित होते . मी मुंबई - औरंगाबाद येणे - जाणे करतो हे त्यांना समजले होते . माझे काम मागे पडते आहे हे त्यांना समजले . त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात भेटीसाठी बोलविले . मी भीतभीत त्यांना भेटायला गेलो . त्यांनी मला कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅब , माटुंगा - युडीसीटीच्या जवळच असलेली - ह्या संस्थेत सायंटिफिक असिस्टंटची जागा आहे . तेथे प्रयत्न कर असा सल्ला दिला . 'तेथे नोकरी मिळाली तर तुला सोयीचे होईल . तुला युडीसीटी जवळ असेल . तुझ्या कामाला गती येईल .लवकर थिसीस पूर्ण करता येईल .तुझी आर्थिक विवंचना संपेल ' . मी अर्ज केला आणि  निवडला गेलो. मी त्या संस्थेतील संचालकांचा सायंटिफिक इन्फर्मेशन सहाय्य्क झालो . युडीसीटी जवळ होती . संध्याकाळी प्रयोगशाळेत हजर असे . लायब्ररी उघडी असे . माझे काम वेगाने झाले . मी सहा महिन्यात थिसीस सबमिट केला . काणे सरांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले . विद्यार्थ्यांबद्दल एवढी आपुलकी असलेला , त्यांच्या समस्यांची जाण असणारा देवमाणूस  असलेला शिक्षक म्हणजे काणे सर . आजही त्यांची मूर्ती मला माझ्या डोळ्यासमोर दिसते आहे . माझ्या पाठीवर हात ठेऊन ते मला हाक मारीत आहेत ...' नरेंद्र .... ' .
मी त्या देवमाणसाला नमस्कार करतो . असे माझे शिक्षक नसलेले शिक्षक . खरे मार्गदर्शक . माझे आयुष्य बदलून टाकणारे  शिक्षक !

Dr N K Choudhuri , D.Sc.
माझे पीएच.डी. चे मार्गदर्शक

 I pay my respect to my two great teachers who have made a great impact on my life . 1) Dr N K Choudhury, D.Sc. , my Ph.D research guide who guided me for achieving excellence in physics research  and 2) Dr Billmeyer F W Jr of Rensselaer Polytechnic Institute , Troy , N Y who taught me Color  science and technology which helped me to use it in industrial Color applications . Indian Color industry saved millions of Rupees by using industrial Color control.

Today is a Teacher's Day. I cannot forget my teacher  Dr N K Choudhuri , D.Sc. He was my Ph.D guide in physics  at the  University Department of Chemical Technology , University of Bombay . He taught me the  importance of perfection in science research . He told me that in science research  , you have to have " non-compromising  attitude". A great personality. Thank you Dr Choudhuri.

Friday, December 13, 2019

भैरप्पा

कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा ह्यांची 876 पानाची ' तंतू ' ही महाकादंबरी वाचतोय . सौ उमा कुलकर्णी ह्यांनी केलेला  मराठी अनुवाद अप्रतिम . मला कन्नड येत नाही . ह्या पूर्वी ' मंद्र ' ही कादंबरी वाचली होती . आवडली होती . दोन्ही कादंबऱ्यांचे अनुवाद  अतिशय सुंदर आहेत . आपण एखादा अनुवाद वाचतोय असे वाटतच नाही . ह्या कादंबरीचा अवकाश खूप मोठा आहे . वाचकाला खिळवून ठेवणारी रसाळ कादंबरी . तशी मी उशिराच वाचली .( प्रकाशन 1997 , दुसरी आवृत्ती 2015 ) .कादंबरी 1947 पासून सुरु होते . स्वतंत्र भारतातल्या स्वतंत्र नागरिकांची व्यथा व्यक्त करणाऱ्या तुमच्या - माझ्या जीवनाची ही कादंबरी आहे . आपले सामाजिक - राजकीय चित्र ज्या वेगाने बदलत  आहे, ते सारे ह्या  कादंबरीत चित्रित झाले आहे . कादंबरी वाचताना आपला समाज किती गुंतागुंतीचा आहे हे तर लक्षात येतेच पण कादंबरीतील पात्रे आपण बघितलेलीच असतात . ती आपल्या  जीवनातील असतात.  तीन - चार पिढ्यांची, आपल्या  आजूबाजूची - शहरातली  तशीच  खेड्यातली .खऱ्या अर्थाने ही ' हिंदू ' समाजाची वैविध्यपूर्ण कहाणी आहे . भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कादंबरीचे  नाव ' हिंदू ' असले तरी त्या  कादंबरीला  तो प्रचंड आवाका नव्हता . ती कंटाळवाणी वाटली होती. 'तंतू 'ही कादंबरी अधिक सुंदर विणलेली ' हिंदू ' समाजाची कादंबरी आहे . कुठेही कंटाळा येत नाही . रसाळ लेखन . खूप काही लिहिण्यासारखे आहे ह्या कादंबरी बद्दल . नंतर दीर्घ लेख लिहावा असे मनात आहे .
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1454501931231908&id=100000163447478

एपिक गडबड/ हैदर ते Hamlet






काल मकरंद देशपांडे ह्यांचा ' हसविण्याचा धंदा ' पहायला गेलो . 'एपिक गडबड'  हा त्यांचा फार्स आहे . त्याला नाटक म्हणायचं का ? असा मला पडलेला प्रश्न . हा माणूस पागलपणासाठी प्रसिद्ध आहे असे म्हणतात . त्यांचे हे ५० वे नाटक . ननाट्य असलेली बरीच नाटकं . 'त्यांची नाटकं समजत नाहीत पण बघतांना खूप मजा येते ',असे नासिरुद्दीन शहा म्हणाला होता . काल हा फार्स बघतांना मलाही तसेच वाटलं . ह्या नाटककाराला काय शोधायचे आहे , कोण जाणे ? तो आपल्याला थोडा वेळ पागल करतो ,हे खरे . हा माणूस क्रेझी आहे तशीच त्याची नाटकं ही भन्नाट आहेत . ह्याला काय सांगायचं ते कळत नाही .आपल्याला जे कळलं तेच खरं .
एका मुलीचे मामा आणि आई तिच्या लग्नासाठी स्थळ शोधत असतात . पुण्याच्या पेशव्यांच्या १२ व्या पिढीचा एक मुलगा दाखविण्याचे ठरते . तो मुलीला  पहाण्यासाठी घरी येणार  असतो आणि अचानक ४०० वर्षांपूर्वीचा शेक्सपिअर पुण्यात येऊन त्यांच्याच घरात दाखल होतो आणि तोच मुलगा आपल्याला पहायला आला म्हणून ती मुलगी नुसती  आनंदी होत नाही तर त्याच्या  विषयी  प्रेम असल्यामुळे फिदा होते व  लग्नवेडी होते . मग काय काय होते?  . सगळेच क्रेझी ! नुसते भन्नाट . हसून हसून पोट दुखते . ह्या ननाट्यात काय नाही ? हसणे आहे म्हणजे विनोद आहे . गाणे आहे .नृत्य आहे . बडबड आहे . चर्चा आहे . मोनोलॉग आहे . पंचेस - कोपरखळ्या आहेत . शेक्सपिअर आहे . त्याचे चिंतन आहे . त्याची लांब पल्ल्याची वाक्ये असलेली स्वगतं आहेत . त्याचे कवितावाचन आहे . पुण्याचे पेशवे आहेत म्हणजे कोपरखळ्या ठोकायला खूप वाव आहे . मुंबई का  पुणे?, वाद आहे . नाटकातील  संवाद म्हणजे नुसते फटाके. कोपरखळ्या.   त्यात दगडूशेटचा  पुण्याचा गणपती आहे तर मुंबईचा लालबागचा राजा आहे .सामाजिक भाष्य करताना  नुसते  लोकरंजन आहे .
संपूर्ण नाटकांत  नुसती धमाल . बडबड असलेली गडबड  आहे . कल्पनाविलास नाटककाराचा . तसा तो पागलपणा . मॅडनेस .Crazy themes and ideas असलेले हे धमाल नाटक .म्हंटलं तर करमणूक .
सर्व कलाकार आपल्याला सतत हसत ठेवतात ते त्यांच्या अभिनयातून .
प्रयोग रंगत जातो . कालच्या  प्रयोगाला पहिल्या दोन रांगात अनेक नावाजलेले  रंगभूमीवरील नटनट्या उपस्थित होत्या .
निखळ करमणूक असलेला हा फार्स अनेक दिवस लक्षांत राहील .

हैदर ते Hamlet
विशाल भारद्वाज ( विभा ) हा डाव्या विचारसरणीचा लेखक. “मी डाव्या विचारसरणीचा आहे म्हणूनच कलावंत / कलाकार/ लेखक आहे” असे ज्यांना वाटते त्यांचा हा नवा चित्रपट “ हैदर “ . सध्या खूप चर्चेत असलेला. शेक्सपियरच्या Hamlet ह्या नाटकावर आधारलेला किंवा बेतलेला. “शेक्सपियर /Hamlet” ही नावे घेतलीकी प्रेक्षक थोडे आकर्षित होतात. मी ही त्यापैकी एक. काही परीक्षणे वाचली. विभाच्या मुलाखती वाचल्या.  म्हणून सिनेमा पहावयास गेलो. शेवटी शेवटी कंटाळलो. सिनेमा पूर्ण पाहिला. ह्या शेक्सपियरला ( विभा ) नेमके काय म्हणायचे आहे ह्याचा शोध घेऊ लागलो. कलाकृतीची एक मोठी गंमत असते. प्रेक्षक आपला आपला अर्थ लावतो. त्याच्यासाठी दोन शब्द पुरे असतात . १) आवडले २) नाही आवडले. पण समीक्षक खूप लिहून जातात. मग माझ्यासारखा गोंधळून जातो. समीक्षकाला आवडलेले आपल्याला आवडत नाही तेंव्हा मन जास्त विचार करू लागते. कलाकृतीचा असा आस्वाद घेण्याची मला सवय झाली आहे.
हैदरची गोष्ट अशी. हैदरचा काका त्याच्या डॉक्टर असलेल्या वडिलांना मारतो आणि त्याच्या आईशी लग्न करतो. आपल्या वडिलांना कोणी मारले हे त्याला समजते आणि आपली आई त्याच्याशी लग्न करणार आहे हे त्याला जेंव्हा समजते तेंव्हा ह्या हैदरचा शेक्सपियरचा Hamlet होतो. “ सूड घ्यायचा की घ्यायचा नाही “ अशा द्विधा मनस्थितीत तो असतो.
अशी ही विभाच्या  शेक्सपियरच्या Hamlet वर बेतलेली कलाकृती. काहीजणांना ती खूप लक्षवेधी वाटली. ह्या कलाकृतीत काश्मीर हे एक नवीन पात्र. विभाच्या ह्या काश्मीरमध्ये शिकारा आणि शम्मीकपूरची प्रेमाची गाणी नाहीत. तेथे आहे भारतीय सैन्य. सैन्य आणि तेथील नागरिक ह्यांच्यातील तणाव. डाव्या विचारसरणीचा लेखक असल्यामुळे मानवी अधिकाराची गळचेपी करणारे सैनिक अधिकारी तेथे नकोसे वाटतात. 
हैदरचे डॉक्टर वडील हिलाल मीर एका आतंकवादी काश्मिरीला आपल्या घरी आणतात आणि त्याच्यावर घरातच शस्त्रक्रिया करतात . हे त्याच्या बायकोला धोक्याचे वाटते. डॉक्टर म्हणून मानवतावादी प्रवृतीचा असलेला हा डॉक्टर हा धोका पत्करतो. मिलिटरीच्या लोकांना ह्या आतंकवादीचा सुगावा लागतो. ते डॉक्टरला पकडतात . त्याला बंदिस्त करतात. त्याचे घर उध्वस्त करतात कारण त्यात आतंकवादी असतात व ते सैनिकावर उलट गोळीबार करीत असतात. ह्या डॉक्टरला  छावणीत ठेवतात व  माहिती काढून घेण्यासाठी त्याचा छळ करतात. हा डॉक्टर तेथून सुटतो खरा पण त्याचाच भाऊ त्याला झेलम नदीत बुडवून मारण्याचे षड्यंत्र रचतो कारण त्याला आपल्या वहिनीबरोबर लग्न करावयाचे असते. आणि अलीगढला शिकण्यासाठी गेलेला हैदर परत येतो. आपले उधवस्त घर पाहतो. वडिलांचा शोध घेतो. आई काकाबरोबर रमलेली पाहून दु:खी कष्टी होतो. आणि ह्या सर्वांचा बदला कसा घ्यावयाचा ह्याचाच विचार करीत तो आतंकवादी होतो.
असा हा हैदर. माणसे आतंकवादी कां होतात ? ह्याचा शोध घेण्यासाठी विभाने घेतलेला शेक्सपियरचा आधार.
मुख्य भाष्य आहे ते AFSPA ह्या आर्मीला दिलेल्या विशेष अधिकारावर. स्वतंत्र काश्मीर कां हवे ? भारतापासून आणि पाकिस्तानपासून स्वातंत्र्य कां हवे हे मांडण्याचा केलेला प्रयत्न. सार्वमतावर मांडलेले हैदारचे विचार. हे लेखकाचे भाष्य की तेथील सध्याच्या परिस्थितीचे वर्णन. सैनीक अधिकारी कसे छळ करतात व त्यांना मिळालेल्या अमर्याद अधिकाराचा दुरुपयोग करतात असे सांगण्याचा प्रयत्न ह्या कलाकृतीतून करण्याचा प्रयत्न दिसून येतो. हे सर्व हैदरच्या तोंडून व्यक्त होते. सिनेमाला प्रेमाची  गोष्ट असावी लागते म्हणून ती सारी पात्रे आहेतच. कुटुंबातील गुंतागुंतीचे संबंध असावे लागतात म्हणून हैदर , त्याचे काका व त्याची आई ह्यांच्यातील संबंध , हैदरची प्रेयसी , प्रेयसीचे वडील आणि त्यांचा काकाला असलेला छुपा पाठींबा . अशा अनेक कौटुंबिक व राजकीय गुंतागुंती. त्याचा काका म्हणजे तेथील राजकारणातील एक कारस्थान करणारे पात्र.
ह्या सिनेमातील काश्मीरमधील अलगतावादी म्हणजे शेक्सपियरच्या नाटकातील राजे , हैदरचा काका खुर्रम म्हणजे क्लाऊडीयस हे पात्र,
विभा एका बाजूला म्हणतात की मी राजकीय भाष्य करीत नाही. मी फक्त माणूस म्हणून राजकीय प्रश्नाकडे बघतो आहे. काश्मीरमधील विचित्र परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबातील निरनिराळ्या व्यक्तींच्या दृष्टीकोनातून बघतो आहे. AFSPA ह्या राजकीय समस्येकडे मी लक्ष वेधून घेतो आहे. त्या पैलूचा काय परिणाम होतो आहे ते शोधतो आहे. त्याचप्रमाणे असंख्य विधवा बायकांच्या प्रश्नाकडे पाहतो आहे.
हाच तर ह्या फिल्मचा उद्देश होता. पण भाष्य करताना विभांचा कल कोणत्या बाजूला आहे हे सतत जाणवते आणि त्यांच्या डाव्या विचारसरणीमुळे ह्या संपूर्ण प्रश्नाकडे कसे बघतात हे प्रकर्षाने जाणवते. आणि तेथेच ह्या कलाकृतीचे कलामूल्य नाहीसे होते व शेक्सपियरच्या पात्राशी  ह्याचा काहीच संबंध नाही असे वाटू लागते.
आतंकवादी का होतात ? हे शोधताना एका बाजूला आतंकवादी समर्थन, सार्वमताचा मुद्दा ठासून मांडणे , मानव हक्क चळवळीचे आपण विचारवंत असल्यामुळे भारतीय सैनिकांनी केलेला अत्याचार योग्य नाही अशी भूमिका घेणे हाच तर ह्या कलाकृतीचा उद्देश असावा हे चित्रपट पाहून जाणवते. काश्मीर मधील अलगतावादी मंडळीना हा सिनेमा अधिक आवडण्याची जास्त शक्यता आहे. ते अंतर्मुख होऊन विचार करणारे असतील असे वाटत नाही. आपल्यासारख्या प्रेक्षकांना हा विचार मुळीच योग्य वाटणार नाही म्हणून हा चित्रपट कितीही कलात्मक करण्याचा प्रयत्न केला असला तरी आवडत नाही. काश्मीरचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. तेथील राजकर्ते , केंद्रात राज्य करणारे आपले सरकार , तेथील अलगतावादी  गट आणि भारतीय सेनेला देण्यात आलेले विशेष अधिकार ह्या सर्वांचा विचार सर्वांनी करावा म्हणून मी हा चित्रपट काढला असे विभांचे म्हणणे आहे. पण त्यांचे भाष्य हे संतुलित नसल्यामुळे पटणारे नाही असे चित्रपट पाहिल्यानंतर वाटते. 
विभा म्हणतात मी हे सारे मला मांडायचे म्हणून मांडतो.  मी अंतर्मुख होऊन विचार केला आहे. तुम्हीही विचार करा असे ते एका बाजूला सांगतात तर मला प्रेक्षकाशी काही देणं घेणं नाही. त्यांना पाहिजे तो अर्थ त्यांनी लावावा. मी लोकप्रियतेच्या मागे लागून काहीही लिहित नाही, असेही ते म्हणतात.
शेक्सपियरकडे लोक पुन्हा पुन्हा जातात. त्याच्या Hamlet चा आधार घेऊन काश्मीर प्रश्नाकडे तेथील आतंकवादी चळवळीकडे एक छोटीशी गोष्ट घेऊन जाणारा हा कलावंत उगाचच साम्य शोधतो आहे असे मला तरी सिनेमा बघितल्यावर वाटले. शेक्सपियरच्या नाटकात मानवी संबंधाचे गुंतागुंतीचे संबंध दिसून येतात. अनेक भावभावनांना वाट करून दिलेली असते. प्रेम , राग , द्वेष , मत्सर , कुटुंब व त्यातील विविध प्रकारची माणसे आणि देश आणि प्रांत ह्या सर्वांचे विलक्षण मिश्रण त्याच्या नाटकात होते. तसे काही ह्या चित्रपटात दिसून आले नाही. तेंव्हा शेक्सपियरचा आधार घेऊन असा चित्रपट काढला असे म्हणणे योग्य नाही.

लंबक कुठे झुकतोय ?



मकरंद जोशी ह्या सयोंजकानी दीपावली अंकात घडवून आणलेली चर्चा.  भारतीय आणि जागतिक - राजकारणाचा एकूण लंबक डावीकडून उजवीकडे झुकतोय असे जाणवल्यामुळे घडवून आणलेली चर्चा. सर्व लेखक डाव्या किंवा समाजवादी विचारसरणीकडे झुकलेले .उत्तम कांबळे ह्यांना समाज धर्माच्या नावाने हळवा बनत चालला आहे असे वाटते .त्यांनी आरक्षणावर खूप सडेतोड विचार मांडले आहेत . बाकीचे विचार फारसे पटणारे नाहीत . मी त्यांचे मार्क केलेले लिखाण अवश्य वाचा.
जयदेव डोळे ह्यांना मी ते तरुण असताना केलेल्या युक्रांद चळवळीपासून ते जर्न्यालिझमच्या प्राध्यापकी पर्यंत ओळखतो . डावे- समाजवादी कल असलेले. त्यांनी मोदींचा उदय कसा झाला ?,आणि आजचा मध्यमवर्ग त्यास कसा जबाबदार आहे? समाजवाद्यांची - डाव्या विचारसरणीची पीछेहाट होण्यास सुखवस्तू मध्यमवर्ग जबाबदार कसा जबाबदार आहे? ,  असा विचार मांडताना समाजवादी लोकांचे काय चुकत गेलं ह्याचा आढावा घेतला असता तर अधिक चांगलं झालं असतं . त्यामुळे त्यांचे मुद्दे पटत नाहीत.
हेमंत देसाई , पूर्वी मटाचे लेखक-पत्रकार . डाव्या विचारसरणीचे . जगभराच्या राजकारणाचा धांडोळा घेतलाय .अति डावे - अति उजवे ह्याबद्दल लिहिलंय . कम्युनिस्ट राजवटीत हुकूमशहा कसे झालेत आणि त्यांनी मार्क्सला कसं मागे टाकलं , ह्या बद्दल लिहिलं असतं तर...!  कम्युनिझम जगातून कसा नाहीसा झाला ?,हे न सांगता उजव्यांना ठोकून काढण्यात लेखाची लांबी वाढवली . डावे किंवा समाजवादी कुठे चुकतात हे न सांगता उजव्यांना ठोकण्यात अर्थ तो काय?  कंबोडियाची कम्युनिस्ट हुकूमशाही राजवट , सोव्हिएत युनियनचे विघटन , चीनच्या  माओनंतर आजचा नवा भांडवली माओ , व्हिएतनाम मध्ये होत असलेले बदल आणि भारतात निष्प्रभ झालेली कम्युनिस्ट चळवळ ह्याचा कुठेच उल्लेख नाही . त्यामुळे लेख प्रभावी झाला नाही.
अच्युत गोडबोले तरुणपणी कम्युनिस्ट होते . नंतर आयटीत सीईओ होते. मोदी सरकारच्या तीन वर्षाचा आढावा घेताना त्यांच्यातील डावी विचारसरणी जागी झाली आणि त्यांनी मोदींच्या अर्थकारणावर टीकात्मक लिहिलं. राजकारणावर त्यांनी खूप दिवसांनी लिहिलं असावं.
विश्वास पाठक हेच एक उजव्या राजकारणाचे प्रतिनिधी . त्यांनी भाजपचा बाजूने लिहिणे स्वाभाविकच आहे. काही ठोस मुद्दे मांडायला ते विसरले नाहीत. रवी आमले उदारमतवादी शहाणीव ह्याबद्दल लिहिताना उजव्यांना ठोकत होते.
पाठक सोडले तर सगळे डाव्या- समाजवादी वृत्तीचे . ह्या पुरोगामी - समाजवादी लेखकांना - डाव्या विचारसरणीचे लोक आणि पक्ष का मागे पडत आहेत? ,  त्यांचे कुठे चुकत आहे?, उजवे का सबल होत आहेत ?, व काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस का येत नाहीत ?, किंवा चांगला पर्याय का उभा राहात नाही?, ह्या विषयाचे चिंतन कोणीही केलेले नाही. ह्यावर चर्चा व्हावी हे नक्की. झापड लावून लिहिल्यामुळे मुद्दे पटत नाहीत.
काही लेखांचे मुद्दे सोबत जोडतो आहे.

Saturday, October 19, 2019

तिरू कोनेश्वरम


तिरू कोनेश्वरम , श्रीलंका 

श्रीलंकेच्या दौर्यावर होतो . कोलंबोला उतरलो .तेथून  १६२ मैलावर असलेल्या त्रिंकोमाली  ( गोकर्ण ) ह्या शहराकडे निघालो . रस्ता सुंदर होता . हिरवागार निसर्ग होता . पहिल्याच प्रवासात श्रीलंका खूप आवडले.

कोलोंबोचा समुद्र किनारा  

श्रीलंका म्हणजे लंकाधिपती रावणाचे एकेकाळचे राज्य . मुख्य रामायण  येथेच घडले . रावण हा श्रीलंकेत व्यापारी  म्हणून आला .म तो सुरवातीला चांचेगिरी करीत असे . नंतर आयात-निर्यात  व्यापार करू लागला आणि एक दिवस येथील राजा झाला. व्यापार करण्यासाठी येथे आला आणि प्रथम स्थाईक  झाला ते गोकर्ण ह्या नैसर्गिक बंदर असलेल्या शहरात. गोकर्णचा समुद्र किनारा अतिशय सुंदर आहे . सोनेरी वाळूचा हा निसर्गरम्य किनारा. सुनील नभ हे , सुंदर नभ हे ...., सुनील सागर , सुंदर सागर.... असेच ह्वया किनार्याचे वर्णन करता येईल . संध्याकाळी ह्या शहरात पोहोचलो . अतिशय सुंदर अशा रिसोर्टमध्ये मुक्काम केला. संध्याकाळ फार  मजेत गेली . दुसरेदिवशी पासून भ्रमंती सुरु होणार होती, रामायण जेथे  जेथे घडले त्या त्या ठिकाणी भटकून येण्याचे ठरविले होते. गोकर्ण हे पहिले ठिकाण.
सुनील नभ हे , सुंदर नभ हे , नभ हे अतलची अहा
सुनील सागर , सुंदर सागर , सागर अतलची अहा 
दुसरे दिवशी सकाळी निघालो . आम्ही प्रथम निघालो सिगीरीयाकडे ( सिंहगिरी ).  कुबेराची  ही राजधानी . तो येथील मोठा आयात - निर्यात करणारा मोठा  व्यापारी . तो नंतर येथील राजा झाला . सिगीरीयात  एका उंच डोंगरावर त्याने स्वतः चा महाल उभा केला होता  . तेथे त्या  उंच पाषाणावरील महालात जाणे तसे फारच कठीण .

सिगीरीया 
 रावण सुरवातीला येथे कधीच आला नव्हता. त्याचा व्यापार गोकर्णहून चालत असे . मग  तो कुबेराचा  उजवा हात झाला आणि एक दिवस तो त्याचा सैन्यप्रमुख  झाला . त्याच्या मेघदूत ह्या  पंतप्रधानाला कटकारस्थान करून मारल्यानंतर कुबेराचाच पंतप्रधान झाला आणि काही वर्षांनी  त्याचेच  राज्य ताब्यात घेतले . आमच्या गाईडने आमची गाडी मध्येच एका ठिकाणी थांबवली . ते होते तिरू कोनेश्वरम देऊळ  . ऋषी  विश्वामित्रांचा आश्रम येथेच होता . अगस्ती ऋषींनी हे देऊळ बांधले होते . प्रभू रामचंद्राने येथेच  भगवान शंकराची पूजा केली होती आणि  रावणवध करण्याची  शपथ घेतली होती ,असे म्हणतात.
सिगीरीया महालाकडे जाणारा रस्ता 
विश्वामित्राचे वास्तव्य कोनेश्वर मंदिरातच असे . ते भगवान रुद्राचे पूजक होते . हे मंदिर अतिशय भव्य आणि सुंदर आहे . हे पुराणकालीन मंदिर खूपच  देखणे आहे. समुद्रकिनारीच असलेले हे मंदिर म्हणजे एक  पुराणकालीन ठेवा आहे . बंगालच्या  उपसागराच्या नयनमनोहर लाटा वेगाने येऊन त्या मंदिराच्या भिंतीवर आदळत असतात . आजूबाजूला दाट जंगल आहे .येथे  वन्यपशू मुक्तपणे फिरतात . हरिणे खूप दिसतात.
पुराणकालीन कोनेश्वर मंदिर 
ह्या मंदिराबद्दल तशा  खूप कथा प्रचलित  आहेत . अशीच एक कथा ...आपल्याला  खूप काही सांगून जाणारी .. मला आवडलेली ... रामायण घडविणाऱ्या विश्वामित्रांची .....
कोनेश्वर मंदिर
कैकेसी ही रावणाची आई .ती रुद्रभक्त .ती गोकर्णला मुलाकडे रहात होती.  तिला विश्वामित्रांना भेटायचे होते .अशीच एका दिवशी कुंभकर्ण ह्या आपल्या धाकट्या मुलाला घेऊन ती कोनेश्वरला आली. त्या मंदिरातील धर्मशाळेत ती उतरली . तिचे पती ऋषी  विश्रवा ह्यांच्या आश्रमात ती विश्वामित्रांना २ वर्षापूर्वी  भेटली होती . अरीष्ट्नेमी हा त्यांचा उजवा हात होता .तिची आणि अरीष्ट्नेमीची चांगलीच ओळख होती. ती त्याला भाऊच मानीत असे . तिने अरीष्ट्नेमिला विश्वामित्रांची  भेट घडवून आण अशी कळकळीची विनंती केली. अरीष्ट्नेमीने तिला थोडे  बसण्यास सांगितले आणि तो  ऋषी विश्वामित्रांच्या कुटीत  गेला . त्यां दोघांचे बोलणे चालू होते . ते बोलणे  कैकेसिला  बाहेर ऐकू येत होते .विश्वामित्र कोणालाही भेटण्याच्या मन:स्थितीत नव्हते . त्यांना कोणालाही भेटण्याची इच्छा नव्हती . कैकेसीला थोडा अंदाज आला . ती कुंभकर्णाला घेऊन सरळ  त्यांच्या कुटीत  गेली आणि विश्वामित्रांच्या पुढे उभी राहिली.
नंदीची भव्य मूर्ती 

विशावामित्रांचे लक्ष तिच्याकडे गेले . त्यांच्या लगेच लक्षात आले की ही तर विश्रवा ऋषींची पत्नी . त्यांच्या हे ही लक्षात आले की त्यांच्या आजोबाच्या  एका शिष्याची ती  नात आहे . तिला पाहून त्यांची थोडी चिडचिड झाली . त्यांच्या  काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या . ते लगेच म्हणाले , ' हे बघ कैकेसी , तुझ्या आजोबांनी माझ्या वडिलांच्या मृत्युनंतर आम्हाला खूप त्रास दिला आहे . मला त्या जुन्या गोष्टी आठवून खूप त्रास होतो आहे . तुला भेटावे असे मला वाटत नाही.'.
हिंदी महासागर- बंगालचा उप्म्हसागर  

कैकेसी थोडी हिरमुसली . त्याच वेळी छोटा कुंभकर्ण चुळबुळ करीत होता . तो ६ वर्षांचा होता पण दिसायला  मोठा वाटत होता . थोडा कुरूप होता . त्याचे  केस लांब वाढलेले व अस्ताव्यस्त  . त्याच्या खांद्यावर अजून दोन हात आलेले . काही  जखमांचे व्रण दिसत होते . त्याचे  कान ही आकाराने  खूपच मोठे आणि विचित्र आकाराचे होते  . तो नागा आहे असे लोक म्हणत होते . तो  आर्य वाटत नव्हता . दिसायला अगदी वेगळा आणि कुरूप . त्याचे ते वेगळे दिसणे विश्वामित्रांच्या लक्षात आले . विश्वामित्र हे तसे  सुऱ्हदयी होते . ज्यांना काही व्यंग असते त्यांच्याबद्दल त्यांना विशेष  सहानुभूती असे. ते कैकेसीकडे पाहून उद्गारले ,' किती गोड आहे हा मुलगा !'  माता  कैकेसी थोडीशी आनंदली आणि म्हणाली , ' हो ! माझा कुंभ गोडच आहे !' . विश्वामित्रांनी कुंभकर्णाला जवळ घेतलं , कुंभकर्ण थोडासा  ओशाळला. कैकेसीला थोडा आनंद झाला, विश्वामित्रांनी कुंभकर्णाच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याला  प्रेमाने जवळ घेतलं  आणि ते त्याच्याकडे बघून  थोडेसे हसले . त्यांच्यासमोर लाडवाचे ताट होते . त्यातील एक लाडू त्यांनी कुंभकर्णाला दिला . त्याला लाडू आवडतच होता , त्याने एका दमात अधाशासारखा तो लाडू खाऊन टाकला . विश्वामित्रांना त्याने  दुसरा लाडू मागून घेतला आणि तोही  एका दमात  फस्त केला  . कैकेसीला  आपल्या मुलाचा हा  हावरटपणा आवडला नाही .
मंदिराच्या आजुबाहुला दाट जंगल - हरणाचा कळप 
कैकेसी उभी राहिली आणि विश्वामित्रांच्या पाया पडू लागली . ती  ऋषींना म्हणाली , ' हे ऋषी , माझ्या ह्या मुलाकडे बघा . त्याचे हे जास्तीचे आलेले दोन हात  , हे     मोठे आणि विचित्र आकाराचे  कान आणि ह्या त्याच्या  चिघळलेल्या जखमा.  ही कसली व्याधी झाली आहे ह्याला . हे कशामुळे होते  ? त्याच्यावर एखादा उपाय सांगा ना ! मी त्यासाठीच तुमच्याकडे आले आहे .' 
विश्वामित्र कैकेसीकडे पाहून म्हणाले ,' हे असेच असतं . हे एक  व्यंग आहे . काही लोकांना अशी अनैसर्गिक वाढ होत असते . त्यावर उपाय असा काहीच  नाही. तो  नागा आहे . जर त्याला रक्तस्त्राव झाला आणि वेदना झाल्या तर त्याचा मृत्यू जवळ येईल .'

कैकेसी घाबरून गेली . ती म्हणाली ,' तुम्ही तर आयुर्वेद तज्ञ आहात , काहीतरी उपाय सांगा '. विश्वामित्र तिला म्हणाले ,' ह्यावर काहीही  उपाय नाही . तरीही मी एक औषधी देतो . त्यामुळे त्याच्या वेदना थांबतील . रक्तस्त्राव थांबेल आणि त्याचे आयुष्य वाढेल . त्या औषधाचे नांव आहे   अगस्त्यकुटम . विश्वामित्रांनी अरीष्ट्नेमिला हांक मारली आणि ती औषधी  कैकेसिला देण्यास सांगितली. कैकेसी खूप आनंदली. तिच्या डोळ्यात पाणी आलं . ती नमस्कार करताना त्यांना म्हणाली , ' माझा मोठा मुलगाही असाच  नागा आहे . तो ही असाच दुर्दैवी आहे . त्यालाही  अशाच वेदना होत असतात . त्यालाही असेच वाढलेले अवयव आहेत '. विश्वामित्रांना त्यात  फारसे आश्चर्य वाटले नाही . त्यांना खरं म्हणजे हे आधीच  माहित होते . ते तिला म्हणाले , ' त्याचे नांव रावण आहे ना !  . तो मोठा चाचेगिरी करणारा खलाशी आहे  ना ! तो आयात - निर्यात व्यापार करतो . कुबेराचा तो उजवा हात आहे .  '
ती त्यांना म्हणाली , ' हो , ते खरे आहे , माझ्या पतीने तर मला सोडून दिले आहे .  तो तर परदेशी गेला आहे .मला सोडून दिले आहे . परदेशी  जाऊन त्यांनी तिकडे दुसरे लग्न केले आहे . मी ही अशी अभागी . आम्हो सध्या  वाईट परिस्थितीत दिवस काढतो आहोत . रावण खलाशी  आहे . त्याच्या २०० बोटी आहेत . तो आयात -निर्यात  करून पैसे मिळवतो. तो  दुसरे काय करणार ?  आम्हाला भरतवर्ष सोडून येथे  यावे लागले .तो स्वत:च्या हिंमतीवर व्यापार करतो'. विश्वामित्र तिला म्हणाले , ' काहीही काळजी करू नकोस . रावण खूप  हुशार आहे , मेहनती आहे , कार्यक्षम आहे , डोकेबाज आहे , बुध्दिमान आहे , योद्धा आहे .त्याचे स्वतः: चे असे  ध्येय आहे . तो त्याच्या  ध्येयासाठी लढतो आहे . तो ह्या भरतवर्षाचे  एक स्वप्न पूर्ण करणार आहे . ही माझी भविष्यवाणी आहे . तू काळजी करु नकोस . मी त्याच्यासाठीसुद्धा औषधी देतो '. कैकेसीच्या डोळ्यात पाणी आले . ती उठली . त्यांना नमस्कार करताना विश्वामित्रांनी तिच्या मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवला . ते तिला म्हणाले , ' हे सर्व कठीण आहे .तू  धीर धर . सर्व व्यवस्थित होईल . माझी औषधी लागू पडेल . त्या दोघांना  लवकर मरण येणार नाही '. 
कैकेसी कुंभकर्णाला घेऊन बाहेर पडली . अरीष्ट्नेमी विश्वमित्रांच्याकडे बघून म्हणाला ,'
गुरुवर्य , तुम्ही असे का केले ? रावणाला अशी औषधी  का दिली ? तो तर राक्षसी आहे ? तो क्रूर आहे . तो  आता अधिक क्रूर होणार !' 
विश्वामित्र त्याला म्हणाले  , ' हे वत्सा , तू  काही काळजी करू नकोस . प्रत्येकाचे एक आयुष्य असते . त्याचे एक जीवितकार्य असते . त्यासाठी परमेश्वराने त्याला येथे पाठविलेले असते . रावण हा एक शिवभक्त आहे . तो त्याचे परमेश्वराने दिलेले कार्य  पूर्ण करणार . तो आपल्या कामाला येणार आहे .  मला त्याचा उपयोग होणार आहे . काही  वर्षांनी एका नव्या विष्णूचा अवतार येणार आहे . त्याला दोन कार्ये   पूर्ण करावयाची आहेत . 
पहिले कार्य म्हणजे महादेवाला म्हणजे रुद्राला एक  मदतनीस हवा आहे . रावण हा रुद्राचा भक्त असेल . तो नष्ट करेल ह्या  जगातील दुष्टपणा .
दुसरे कार्य म्हणजे ह्या पृथ्वीवर एक  नवा विष्णू  अवतार जन्माला येणार आहे आणि त्यामुळे एक आदर्श राज्य निर्माण  होणार आहे . सूर - असुरांच्या युद्धात रावण उपयोगी पडणार आहे . तेच त्याचे जीवित कार्य आहे . तुला हे येत्या काळात दिसून येईल आणि मग मी हे का करीत आहे , हे समजेल . हा नियतीचा खेळ खेळण्यासाठीच मला ह्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे . मी माझे काम करीत आहे .रावणाचा जन्म हा शिवाच्या  मदतीसाठी आहे तर  सीता ही नवी विष्णू अवतार असेल  . ती एक भूमिकन्या असेल . ती  रावण जेंव्हा क्रूर होईल तेंव्हा त्याचा नाश करील आणि आपल्या पतीच्या मदतीने येथे रामराज्य निर्माण करीन. 
अरीष्ट्नेमी अचंबित झाला . त्याला विश्वामित्रांचे मन समजले . त्यांची चाल ही समजली . त्यांचे जीवित कार्य समजले . विश्वामित्र  म्हणूनच आर्यावर्त सोडून श्रीलंकेत  कोनेश्वरला  आले होते . नियतीनेच हे सर्व रचले होते.  असे हे तिरू  कोनेश्वर मंदिर  . विश्वामित्रांच्या पदकमलाने पवित्र झालेला हा परिसर . ते जणूकाही नवे विश्व निर्माते होते  .ते  रामराज्य निर्माते होते . ह्या  विश्वाचे ते खरे सूत्रधार . असे हे विश्वामित्र . रामायण घडले ते त्यांच्यामुळेच . ह्या नियतीचा  निर्माता म्हणजे विश्वामित्र . 

गोकर्ण 















Wednesday, September 4, 2019

I SALUTE MY TEACHERS

तुम्ही खरे विद्यार्थी असाल तर शिक्षक तुमच्या आजूबाजूलाच असतात हे लक्षात असू द्यावे.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.

आज शिक्षक दिन . काही शिक्षक तुमच्या आयुष्यात येतात . त्यांनी तुम्हाला प्रत्यक्ष शिकविलेले नसते . तुम्ही त्यांच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी नसतात .त्यांचे तुमच्यावर त्यांच्या विद्यार्थ्यांसारखे प्रेम असते . आपुलकी असते . असा एक शिक्षक मला मिळाला . त्यांचे नांव प्रोफेसर जे जी काणे . ते युडीसीटीचे डायरेक्टर होते . त्यांचा विषय होता ऑइल टेक्नॉलॉजी . मी युडीसीटी मध्ये पदार्थविज्ञान विभागात पी. एचडी .करीत होतो . यूजीसीची ३ वर्षाची शिष्यवृत्ती संपली होती .थिसीस लिहिण्याचे काम सुरु होते . म्हणून मी औरंगाबादच्या ज्ञान -विज्ञान महाविद्यालयात लेक्चरर झालो . माझे मुंबई - औरंगाबाद येणे - जाणे सुरु झाले . त्यामुळे थिसिसचे काम मागे पडले . काही प्रयोग करणे राहिले होते . असेच एके दिवशी काणे सर मी प्रयोग करीत असताना आमच्या प्रयोगशाळेत आले . त्यांनी माझी विचारपूस केली .माझी युजीसी शिष्यवृत्ती संपली आहे हे त्यांना माहित होते . मी मुंबई - औरंगाबाद येणे - जाणे करतो हे त्यांना समजले होते . माझे काम मागे पडते आहे हे त्यांना समजले . त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात भेटीसाठी बोलविले . मी भीतभीत त्यांना भेटायला गेलो . त्यांनी मला कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅब , माटुंगा - युडीसीटीच्या जवळच असलेली - ह्या संस्थेत सायंटिफिक असिस्टंटची जागा आहे . तेथे प्रयत्न कर असा सल्ला दिला . 'तेथे नोकरी मिळाली तर तुला सोयीचे होईल . तुला युडीसीटी जवळ असेल . तुझ्या कामाला गती येईल .लवकर थिसीस पूर्ण करता येईल .तुझी आर्थिक विवंचना संपेल ' . मी अर्ज केला आणि निवडला गेलो. मी त्या संस्थेतील संचालकांचा सायंटिफिक इन्फर्मेशन सहाय्य्क झालो . युडीसीटी जवळ होती . संध्याकाळी प्रयोगशाळेत हजर असे . लायब्ररी उघडी असे . माझे काम वेगाने झाले . मी सहा महिन्यात थिसीस सबमिट केला . काणे सरांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले . विद्यार्थ्यांबद्दल एवढी आपुलकी असलेला , त्यांच्या समस्यांची जाण असणारा देवमाणूस असलेला शिक्षक म्हणजे काणे सर . आजही त्यांची मूर्ती मला माझ्या डोळ्यासमोर दिसते आहे . माझ्या पाठीवर हात ठेऊन ते मला हाक मारीत आहेत ...' नरेंद्र .... ' .
मी त्या देवमाणसाला नमस्कार करतो . असे माझे शिक्षक नसलेले शिक्षक . खरे मार्गदर्शक . माझे आयुष्य बदलून टाकणारे शिक्षक !

Today is a Teacher's Day in India . I pay my respect to my two great teachers who have made a great impact on my life . 1) Dr N K Choudhury, D.Sc. , my Ph.D research guide who guided me for achieving excellence in physics research and 2) Dr Billmeyer F W Jr of Rensselaer Polytechnic Institute , Troy , N Y who taught me Color science and technology which helped me to use it in industrial Color applications . Indian Color industry saved millions of Rupees by using industrial Color control.

Dr N K Choudhuri, D.Sc.
My Research Guide 
 I cannot forget my teacher Dr N K Choudhuri . He was my Ph.D guide in physics at the University Department of Chemical Technology , University of Bombay . He taught me the importance of perfection in science research . He told me that in science research , you have to have " non-compromising attitude". A great personality. Thank you Dr Choudhuri.

Tuesday, September 3, 2019

शिकणे आनंदाचे


Image may contain: one or more people and people sitting

संगणकीय प्रौढ शिक्षण वर्ग 

चाळीस तासांचा वर्ग !
भारतात ३५ कोटी लोक निरक्षर आहेत. त्यात स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. आपल्या देशाच्या विकासाच्या वाटचालीत निरक्षर प्रौढांना साक्षर करणे अत्यंत आवश्यक आहे. विकासाची गती खुंटण्याचं, गरिबीबरोबरच निरक्षरता हेही एक कारण आहे. १५ ते ३० वयोगटातील निरक्षर लोक शाळेत जाण्यासाठी तयार नसतात. वृद्धांना त्यांच्या मुला-मुलींकडून शिकायचे नसते. पोटापाण्यासाठी त्यांना छोटीमोठी कामे करावी लागतात. त्यातून त्यांना वेळ मिळू शकत नाही. आता ह्या वयात शिकून काय करायचे? - असा त्यांचा मूळ प्रश्न. एकदा वय वाढल्यानंतर साक्षर करणे फार कठीण असते. त्यांना विकासात सहभागी करून घ्यायचे असेल तर त्यांना किमान लिहिणे-वाचणे आले पाहिजे. त्यांना सही करता आली पाहिजे. निरनिराळे फॉर्म भरता आले पाहिजेत. हिशोब समजला पाहिजे आणि किमान दोन अंकी आकडेमोड आली पाहिजे.
Image may contain: 2 people, people sitting
साक्षरतेसाठी नवे तंत्रज्ञान 
निरक्षरांना साक्षर करण्यासाठी नवे डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. आता प्रौढ शिक्षण सहज शक्य आहे. या नव्या डिजिटल क्रांतीमुळे ४० तासात निरक्षर लोकांना साक्षर करणे सहज शक्य आहे. या,वर्गात बसा,टीव्ही पाहिल्यासारखे स्क्रीनवर बघा आणि हसत-खेळत शिका. टीव्हीवर जशी सिरीयल नेमाने बघतात, तसे हे ४०- ५० धडे नुसते मन लावून ऐका. ३०० ते ५०० शब्दांची ओळख होईल आणि हे निरक्षर लोक वर्तमानपत्र वाचू लागतील. हे शक्य झाले आहे. ह्या योजनेत २ लाख निरक्षर लोक साक्षर झाले आहेत.
Image may contain: 1 person, smiling, standing and indoor
डॉ नरेंद्र गंगाखेडकर  ह्या प्रकल्पाची माहिती देत आहेत . शेजारी आहेत  जॅकोब कोशी  रोटरी क्लब ऑफ मुंबई अंधेरीचे अध्यक्ष . ह्यांनी रोटरीच्या माध्यमातून साक्षरतेसाठी अशी ८ केंद्रे सुरु केली होती.
या साक्षरता अभियानासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसिएस)चे माजी संचालक फकीरचंद कोहली ह्यांनी संगणकीय तंत्रज्ञानाच्या आधारे एक योजना राबवली. प्रौढ शिक्षणतज्ञांचा सल्ला घेऊन एक अतिशय सोपी संगणकीय प्रणाली तयार केली. दृक्‍-श्राव्य तंत्र असल्यामुळे प्रौढ निरक्षर लोक ऐकत–पहात शिकतात. कोणत्याही शिक्षकाची गरज नसते. क्लिक करा आणि कार्यक्रम बघा. ऍनिमेशन तंत्र वापरून वर्गपाठ आखलेला असतो.
या प्रणालीमुळे रोज नवे शिकता येते. रोज थोडी-थोडी शब्दांची ओळख होत जाते. शिकण्याचा उत्साह वाढत जातो. रोज वर्गावर यावेसे वाटते. आधी शब्द समजू लागतात आणि मग अक्षरओळख होते. निरक्षर व्यक्तीला शब्द माहीत असतातच. त्यांना अक्षरओळख नसते. शब्दातून अक्षराकडे असा हा प्रवास आहे. शब्द ओळखू लागले की अक्षरांची ओळख होत जाते. रोज ३० शब्द समजतात. पाच शब्द एका मिनिटात लिहिता येतात. १ ते १०० आकडे मोजता-लिहिता येतात. तीन आकडी बेरीज–वजाबाकी करता येते. दोन आकडी गुणाकार-भागाकार करता येतो. असे हे सोपे तंत्रज्ञान आहे.
महाकालीच्या वृद्ध आजी आता नातवाबरोबर अभ्यास करू लागल्यात. बसचा नंबर, स्टेशन कोणते आले हे वाचून समजते, बँकेत सही करता येते आणि वर्तमानपत्रातील ठळक बातम्या सहज वाचता येतात याचा त्यांना अधिक आनंद आहे.
-डॉ नरेंद्र गंगाखेडकर , मुंबई
संपर्क: TCS Corporate Adult Literacy Program (ALP) Group Tata Consultancy Services Ltd. (022) 6778 9393, (022) 6778 9378 (Direct) Email: Corporate.CBFL@tcs.com Website: www.tcs.com/cs
पुर्व प्रसिद्धी 

SuperSchool :स. भू. शिक्षणसंस्थेचा नवा शैक्षणिक उपक्रम


SuperSchool - आहे काय ?
काल औरंगाबादेत सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या एका आगळ्यावेगळ्या शिक्षणउपक्रमाच्या समारंभाला गेलो होतो . उपक्रम होता' सुपर स्कूल ' च्या उदघाटनाचा . माझा मेव्हणा केदार देशपांडे ह्याने त्याच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'सुपर स्कूल 'साठी ६ पैकी एक अत्याधुनिक वर्ग उभारण्यासाठी देणगी दिली होती . त्यामुळे त्या कार्यक्रमाला आम्हांला आमंत्रित केले होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्या अत्याधुनिक वर्गखोलीचे उदघाटन झाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष वर्गात जाऊन बसलो आणि ह्या नव्या शैक्षणिक पद्धतीची थोडी ओळख झाली . नंतरच्या दिमाखदार समारंभात संस्थेचे अध्यक्ष राम भोगले ह्यांचे ह्याच उपक्रमाबद्दल खूप विस्ताराने सुरेख भाषण झाले .सध्या ६ वर्गखोल्यासाठी ६ देणगीदार संस्थेस मिळाले आहेत. पालक - शिक्षक खूप उत्साही आहेत . त्या समारंभाची काही क्षणचित्रे खाली देत आहे . 

केदार देशपांडे ह्यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ सरस्वती भुवन प्रशाळेतील एक वर्गखोली देणगी देऊन अत्याधुनिक केली . 

SuperSchool  मधील हा अत्याधुनिक वर्ग 
Superschool 
महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड ह्या सरकारी संस्थेने विद्यार्थ्यांना सुपर परफॉर्मर होण्यासाठी आखलेला हा नवा शिक्षण उपक्रम .
हसत खेळत शिका . 
कंटाळा आलेल्या मुलांना अभ्यासात रस निर्माण करणारा हा शिक्षण प्रयोग . 
शिक्षकांना शिकविण्यासाठी उपलब्ध असलेले डिजिटल तंत्रज्ञान . डिजिटल नेटिंग असलेला विद्यार्थी अवघड संकल्पना सहज आत्मसात करू शकेल असा हा एक शिक्षण प्रयोग .
E-Learning शिक्षण प्रणाली .
भाषा - गणित - विज्ञान - समाजशास्त्र ह्या सर्वच विषयातील अवघड संकल्पना सोप्या करून सांगतणारा व रुची निर्माण करणारा संगणक असलेला सहशिक्षक .
शिक्षक - विद्यार्थी संवाद ,
विद्यार्थी - विद्यार्थी चर्चा घडवून आणणारा संवादक , 
प्रतिक्रिया देऊन मनोगत व्यक्त करण्याची सोय ,
विद्यार्थ्यांची आकलनक्षमता किती आहे ह्याचे शिक्षकांना सहज लक्षात आणून देण्याची सोय असलेले संगणकीय संख्याशास्त्र . शिक्षक - विद्यार्थी ह्यांचा आनंदी सहभाग .
दर १० मिनिटांनी शिक्षकाला सहज उपलब्ध होणारा वर्गखोलीचा रिपोर्ट - 
आपण शिकविलेले किती विद्यार्थ्यांना नीट कळले आहे ते समजणारे नवे तंत्र .
गृहपाठ - वर्गपाठ - मूल्यमापन ह्याची उत्तम सोय असलेला हा एकत्रित डिजिटल पाठ्यक्रम .
सध्यां ५ वी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध.

MKCL प्रशिक्षित शिक्षिका , लॅपटॉप . MKCL शेक्षणिक सॉफ्टवेअर , प्रोजेक्टर , वायफाय ,
प्रत्येक विद्यार्थ्याकडे एक सिमकार्ड नसलेले आयपॅड ( कॅमेरा , ब्लु टूथ ,अँड्रॉइड ,माईक उपलब्ध ), शिक्षक-विद्यार्थी संवाद उपलब्ध  

MKCL Superschool
काय हवे ह्या वर्गात :
शिक्षक - प्रशिक्षित
लॅपटॉप
वायफाय
प्रत्येक विद्यार्थ्याला हवा एक मोबाईल किंवा आयपॅड - त्यात कॅमेरा ,माईक ,ब्लूटूथ ,स्पिकर ,अँड्रॉइड असणे
आवश्यक. सिम कार्ड - Deactivated - नो फेसबुक , कोणतेही इतर अँप्लिकेशन नाही . ते नाहीतच . त्यामुळे कोणताही गैरवापर होणार नाही.
MKCL Superschool software
शिक्षकाला विद्यार्थी काय करतो ,कसा वापरतो हे सहज समजते .
( See MKCL Website for Demo - Video )
हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. MKCL च्या शास्त्रज्ञ - तंत्रज्ञ मंडळीचे मनापासून अभिनंदन.

लोकसहभाग हवा असा हा एक शैक्षणिक उपक्रम आहे.

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष SuperSchool ची संकल्पना मांडताना 
राम भोगले ह्यांनी त्यांच्या सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेसाठी हा शिक्षणउपक्रम अतिशय जोमाने सुरु केला असून त्याला उत्तम प्रतिसाद दिसून येतो आहे . ही नवी शिक्षणक्रांती असेल .

केदार देशपांडे ह्यांना ह्या  शिक्षणक्रमाला  देणगी देऊन जी अत्याधुनिक वर्ग खोली उभी राहिली त्याबद्दल झालेला आनंद .     

Saturday, August 10, 2019

प्रणव मुखर्जी ह्यांच्या आत्मचरित्रातून...

प्रणव मुखर्जी ह्यांच्या आत्मचरित्रातील पुस्तकात ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्या आहे त्या प्रांतात राजकारणाची वळणं वेगळी असतात ह्याचा परामर्श त्यांनी घेतला . बंगाल , आसाम आणि पंजाब ह्या तीन प्रांताचा विशेष उल्लेख त्यांनी केला  आहे . इंग्रजी राजवटीत प्रांतिक निवडणुका घेतल्या त्यावेळपासून त्यांनी आढावा घेतला . त्यावेळी मुस्लिम लिगचे  जे राजकारण चालले होते त्या  पुढे काँग्रेस back  फुटवरच होती . काँग्रेसला हिंदूंचा पक्षच मानले जात असे .
काँग्रेस मुस्लिम नेत्यांना पुढे करून इंग्रजांना आपण खरे प्रतिनिधी असे दाखविते म्हणून जिना त्यांच्या मुस्लिम लीगच्या प्रतिनिधी मंडळात एक दलित वर्गाचा प्रतिनिधी घेत असत .
त्या वेळच्या बंगालमध्ये मुस्लिम बहुसंख्य असल्यामुळेच पु .पाकिस्तानची निर्मिती झाली . एव्हढेच नव्हे तर कलकत्ता हे शहर पु .पाकिस्तानची राजधानी व्हावी ह्यासाठी मुस्लिम नेते प्रयत्नशील होते . सरतचंद्र बोस सारखे काँग्रेस नेते फझहूल गटाच्या जवळचे होते. सरदार पटेल ह्यांनी त्यांना चांगलेच फटकारले .नाहीतर कलकत्ता पु .पाकिस्तानची राजधानी झाली असती .
बंगालची फाळणी व्हावी ह्यासाठी डॉ शामा प्रसाद मुखर्जी अनुकूल होते .कारण मुस्लिम बहुसंखेमुळे हिंदूंना सुरक्षीत वाटत नव्हते .
आजही मुस्लिम लोकसंखेमुळेच काँग्रेस किंवा ममताची टीएमसी ह्यांना मुस्लिम अनुनयामुळेच निवडणूक जिंकणे शक्य झाले आहे .सीपीएमची भूमिका तशीच आहे .
मुस्लिम अनुनय ह्यावरच तेथील राजकारण चालते .
शेख मुजिबर रहमान आणि बंगला देश निर्मिती ह्याचा आढावा घेताना बंगाली भाषिकांचा सबनॅशनलइझम कसा जन्माला आला ह्याचा इतिहास खूप काही सांगून जातो .
काश्मीरचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा आहे , ते तेथील ९८ टक्के मुस्लिम संखेमुळेच .
बंगला देशाची निर्मिती हा बंगला भाषा हीच आमची मातृभाषा ह्या चळवळीतून झाली आणि त्यांना उर्दू भाषेसारखाच दर्जा हवा होता .
अवामी लीगला १९७१ साली पाकिस्तान नॅशनल असेम्ब्लीत सर्वात अधिक जागा मिळाल्या होत्या आणि पश्चिम पाकिस्तानवर त्यांनी राज्य केले असते .
जीनांनी बंगाली भाषेला उर्दूसारखा दर्जा कधीच देणार नाही म्हणून स्पष्टपणे सांगितले होते त्यामुळेच पूर्व बंगालचे मुसलमान विरुद्ध गेले .
पूर्व बंगालच्या मुसलमानांना कलकत्ता शहर त्यांच्याकडेच हवे होते .
अनेक हिंदू आणि बौद्ध लोकांची शहरे पूर्व बंगालमध्ये गेली होती .
इंग्रजांनी बंगाल आणि पंजाब ह्या प्रदेशांची फाळणी करण्यासाठीच कमिशन नेमले होते .
फोडा आणि झोडा हीच इंग्रजांची नीती होती .
कलकत्ता आणि नौखालीच्या दंगली त्यामुळेच झाल्या . गांधीजी ही फाळणी थांबवू शकले नाहीत .
पश्चिम पाकिस्तान विरुद्धचा लढा जेव्हा शेख मुजाबर  रहमान ह्यांनी सुरु केला त्यावेळी १ कोटी बंगला देशी भारतात आले . त्यावेळी ते प बंगाल , आसाम आणि त्रिपुरात ते आले . ते परत गेलेच नाहीत . आणि त्यामुळेच इंदिरा गांधी ह्यांनी बंगला देशाला पाठिंबा दिला . तो दिला नसता तर अधिकांश बंगला देशी भारतातच घुसले असते .
All these points are mentioned in Autobiography of Pranav Mukherjee .

Friday, August 2, 2019

A SHORT WALK IN HINDUKUSH


गिर्यारोहक मंडळी भन्नाट जीवन जगत असतात . त्यांच्या  जगण्यात  एक थ्रिल असतं . किती विविधता अनुभवतात ! निसर्गाशी नातं जुळलेलं असतंच . निसर्ग साथ देतो असं नाहीच . किती तयारी करावी लागते ? प्रवास , व्हिसा , प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम , इतर देशातील वकिलातीतील  माणसं , वाटाडे , कुक , बांधून घ्यायचं सामान , होणारी चिडचिड , बरोबर घ्यावी लागणारी औषधं , सहप्रवासी असलेल्या लोकांचे स्वभाव , निराश होणारं मन , अत्युच्च आनंदाचे क्षण , निसर्गाची विविध रूपं . एक ना अनेक .
एरीक न्युबीचं हिंदुकुश पर्वतावरील शिखरं गाठण्याचं प्रवास वर्णन वाचत असताना मीच त्या गिर्यारोहणाचा अनुभव घेत होतो .
विशेष म्हणजे भौगोलिक परिसराचे वर्णन करताना जुना  इतिहासही तितकाच महत्वाचा . ग्रेट अलेक्सझांडर ह्याने हिंदुकुश पर्वताच्या बाजूने प्रवास करीत हिंदुस्थान कसा गाठला ?न्यूरिस्तान / काफिरीस्तान ओलांडून बाबर भारतात कसा आला ? लॉर्ड कर्झन ह्यांनी ह्या भागाला भेट कशी दिली ? युरोपियन लोकांनी अनेकदा स्वाऱ्या करून ह्या भागातील सुंदर स्त्रियांशी संग साधून युरोपियन रंगाची संतती कशी निर्माण झाली ? अशी आणि विविध माहिती ह्या पुस्तकातून मिळते . बाबरनामा इंग्रजीतून अनुवादित झाला आहे . इंग्रजांनी त्याचा अभ्यास करून हा भाग पादांक्रत केला आहे . तो जणू रोड मॅप टू इंडिया .

इतिहास आणि भूगोल एकत्रच वाचले पाहिजेत . हा ऐतिहासिक भाग वाचायचा नसेल तर सरळ पुढच्या प्रकरणाकडे जा , अशी नोट दिली आहे .
ह्या भागातून निघालेल्या नद्या पुढे सिंधू नदीला कशा मिळतात ह्या संबंधीचे वर्णन सुंदर आहे . आपण लेहला सिंधू नदी पहातो . त्यानंतर ती पाकिस्तानात जाते . नुब्रा व्हॅलीला आपण काराकोरम पर्वतांच्या रांगा पहातो . सियाचेनचा पुढील भाग लष्करी परवानगीशिवाय आपण पाहू शकत नाही . हिंदुकुश पर्वतांच्या रांगा विलोभनीय आहेत . हे लक्षात येते . बाबर किंवा अलेक्झांडर त्या मार्गाने भारतात कसे आले असतील  ?, आणि इंग्रजांनी हा भाग कसा पालथा घातला असेल, ह्याचे चित्र ह्या पुस्तकातून समोर उभे राहते . हे नुसते गिर्यारोहणाचे प्रवास वर्णन नाही . ह्यातून ह्या भागाचा इतिहास - भूगोल डोळ्यासमोर उभा राहतो . एक अप्रतिम प्रवासवर्णन .


Friday, July 12, 2019

पांडुरंग पांडुरंग




अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यावे असे मला कधीच वाटले नाही . ते मी सहसा टाळतो. एकदा मला पांडुरंगाचे बोलावणे आले . माझा पुण्याचा मित्र मधुकर दंडारे आणि माझे व्याही रंगनाथ कुलकर्णी ह्यांनी पंढरीला जाऊ असे फर्मान काढले आणि आम्ही निघालो. मधुकरचा चुलत भाऊ तेथील बडव्यांपैकी एक . त्यामुळे सर्व व्यवस्था ठीकठाक. आम्ही संध्याकाळी पंढरपुरात पोहोचलो . त्यांच्या घरी गेलो . त्यांनी सांगितलं , ‘रात्रीचे जेवण करून घ्या . मग १०:३० / ११ वाजतां दर्शनाला घेऊन जाईन. गर्दी कमी असते’. आमचं जेवण ८ वाजतां झालं . मग आम्ही इंद्रायणीकाठी असलेल्या एका हॉटेलमध्ये मुक्कामाला गेलो. चांगल्या रूम मिळाल्या . थोडी विश्रांती घेत होतो . माझा मोबाईल वाजला. फ्लोरीडाहून माझी मुलगी ऋतू बोलत होती . फ्लोरिडा हरिकेनसाठी प्रसिद्ध . ह्यापूर्वी तिला थोडा अनुभव होता. सध्या ती एकटीच नोकरीसाठी वेस्ट पाम बीच ला रहात होती. हरिकेन त्यांच्या शहराजवळ आला होता. नंतर सर्व व्यवहार बंद होणार होता .वीज / फोन बंद होणार होते . त्यामुळे तिने फोनकरून आम्हाला कळविले . काळजी करू नका असे आम्हाला सांगितले आणि फोन बंद झाला. आम्ही मात्र काळजीत. मी मोबाईल इंटरनेटवर हरिकेनची माहिती मिळवणे चालू केले . कशातच लक्ष लागत नव्हते. ११ला सगळे तयार झाले. विठ्ठलाच्या दर्शनाला निघालो खरे . पण कशातच लक्ष नव्हते . हरिकेन ! हरिकेन! त्याचा धुमाकूळ . त्याची वाचलेली वर्णने . कीवेस्ला त्याने केलेली हानी . मंदिरात प्रवेश केला . गर्दी फारशी नव्हती. नंबर लागला. यथासांग पूजा झाली. विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवले . कोणत्याही देवळात असा देवाचा पदस्पर्श होत नाही. अनेक संतांची आठवण झाली. त्यांनी ह्या विठुरायाच्या पायावर भक्तिभावाने डोके ठेवले होते. आमचे छान दर्शन झाले. देवळातून निघालो. रूमवर आलो . १ वाजला. फ्लोरीडाला फोन लावला . फोन बंद. इंटरनेटवर हरिकेनने घातलेला धुमाकूळ आणि त्याची वर्णने. लक्ष कशातच नव्हते. रात्र जागण्यातच गेली . सकाळी सर्व आटोपून मुंबईकडे निघालो. मध्ये संपर्क होतच नव्हता. पुढे एका पेट्रोल पंपावर ऋतूच्या मित्राचा फोन आला. त्याने सांगितले हरिकेनने फार धुमाकूळ घातला आहे . ऋतू कपड्याच्या कपाटात बसून होती. दारे - खिडक्या फुटल्या होत्या . आता वादळ शांत झालंय. ती सुखरूप आहे. मुंबईला पोहोचलो. २ दिवसांनी ऋतूने फोन केला.तिने केलेले ते वर्णन ऐकून आम्ही घाबरलो . एक संकट टळले. जेंव्हा आमचे पांडुरंग दर्शन झाले तेंव्हाच हरिकेन तो भाग सोडून वेगाने पुढे गेला . आम्हाला आजही वाटते ती पांडुरंगाची कृपा . श्रद्धा असो का नसो . अशा विलक्षण शक्ती आपल्याला आशीर्वाद देत असाव्यात . 
त्यानंतर आम्ही एकदा पंढरपुला गेलो. पांडुरंगाचे दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न होते. त्याचा तो आशीर्वाद नवी ऊर्जा निर्माण करते . माऊलीच ती.

Thursday, July 4, 2019

हिंदुत्व .....

भारतातील मुस्लिमांनी एकदा अंतर्मुख होऊन नव्याने विचार करावयास हवा. आझमखान किंवा ओवैसी ह्यांच्या मागे राहून जीनांचा 'मुस्लिम भारत 'हा विचार सोडून द्यावा .मुस्लिमांनी एकदा झडझडून द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला विरोध करण्याची आवश्यकता आहे . आरिफ मोहमद खान ह्यांनी हाच मुद्दा अनेकदा स्पष्टपणे मांडला.
मुलायम , मायावती , ममता , डावे- उजवे कम्युनिस्ट , समाजवादी आणि काँग्रेस ह्यांनी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अल्पसंख्य असलेल्या मुस्लिम जनतेची कायम मनधरणी केली आणि त्यांच्यासाठी फक्त तोंडपाटीलकी केली. त्यांच्या विकासासाठी काहीच केले नाही. हे भारतीय मुस्लिमांच्या लक्षात आले नाही.
नेहमी गोध्रा - बाबरी कांडचा उल्लेख होतो. दोन्ही बाजूच्या तरुणांच्या उकळत्या रक्तात आततायी विचार प्रकट झाल्यामुळे अशा घटना घडल्या . त्या जखमा तशाच राहाव्यात म्हणून राजकीय पक्षांनी प्रयत्न केलेत हे ह्या देशाचे दुर्दैव .गांधीजींचे नाव उठताबसता घेणार्यांनी त्यासाठी काहीच प्रयत्न न करता बहुसंख्य हिंदूंना जबादार धरून अल्पसंख्य मुस्लिमांचा स्वतःच्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला आणि हिंदूंमध्ये जातीयवादाची पेरणी करून फूट पाडली व सत्तेचे राजकारण केले. मायावती मुसलमानांना १०० तिकिटे देतात तर मुलायम सिंग ही तशीच खेळी  करीत आले आहेत.
भारतातील मुस्लिमांची सद्यस्थिती काय आहे? भारतातले बहुतेक पक्ष मुसलमानांच्या अपेक्षांना अनुसरून एकजात कुचकामी आहेत . ह्या सर्वांनी निवडणुकीत मुसलमानांचा एक गठ्ठा मते मिळवण्यासाठीच उपयोग करून घेतला व हिंदूत जातीय विद्वेष निर्माण केला .
भारतातील मुसलमानांना सर्व पक्षांनी असे सतत बजावले की बहुसंख्य असलेल्या हिंदूंचा धर्मवाद फार भयंकर असू शकतो. मुसलमानांना ह्या देशात चांगले दिवस बघावयाचे असतील तर त्यांनी हिंदू जातीयवादी शक्ती वाढणार नाहीत म्हणून आमच्याकडेच बघावे , आम्हालाच निवडणून द्यावे ,  असे राजकारण ज्यांनी केले त्यामुळेच हिंदू एकजुटीचे प्रयत्न झाले , ही वस्तुस्थिती आहे. हिंदुत्वाची पताका त्यामुळे फडकू लागली .
आझमखान ह्यांचा मुस्लिम धर्मवाद मुलायमसिंग ह्यांनी पोसला . दिल्लीचे जामे मशिदीचे इमाम बुखारी आणि एमआयएमचे ओवैसी ह्यांच्या 'मुस्लिम इंडिया' ला प्रत्युत्तर म्हणून 'हिंदू इंडिया' विचारधारा वाढते आहे. पडद्यामागे जातीयवाद पोसणारी ही मंडळी धोकादायक आहेत. हेच लक्षात येऊ नये , हे दुर्दैव.
भारतात मुसलमान मोकळेपणाने मागण्या तरी करू शकतात . त्यांचे प्रतिनिधित्व संसदेत आणि राज्यांच्या विधानसभेत दिसून येते.
काही लोकांना देशाच्या अखंडतेपेक्षा बाबरी मशिदीचा बचाव अधिक महत्वाचा का वाटतो ? बाबरी- गोध्रा ही जखम त्यांना बरी व्हावी असे वाटत नाही.
हा देश सर्वधर्मसमभाव  मानणारा देश आहे हे येथील मुसलमानांना मान्य असेल तर त्यांनी त्यांच्या धर्माच्या प्रभावाच्या मर्यादा ठरवून घेतल्या पाहिजेत .
धर्माचा आधार पोकळ आणि चुकीचा असेल तर काश्मीरला वेगळा दर्जा मागून चालणार नाही व समान नागरी कायदा अंमलात आणण्यास विरोध करता कामा नये.
समान नागरी कायदा, मुस्लिम स्त्रियांना तलाख मुक्ती, काश्मीरचे ३७० कलम रद्द करणे , राम मंदिराचा वाद  सामोपचाराने मिटवणे ह्यातच सर्वांचे हित आहे.
अल्पसंख्य मुस्लिम नकळत जीनांच्या 'मुस्लिम इंडियाची 'ची भाषा बोलत असतात त्यामुळेच 'हिंदु राष्ट्रा'च्या गोष्टी येथे बोलल्या जातात . पाकिस्तान हे 'मुस्लिम राष्ट्र ' जिनांच्यामुळे उदयास आले आहे . भारत हे बहुसंख्य हिंदूंचे राष्ट्र असले तरी ते येथील 'भारतीय मुसलमानां'चेही राष्ट्र आहे. पाकिस्तानात 'हिंदू पाकिस्तान' कुठे आहे? हा फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.
आझमखान असो का ओवैसी , ह्यांच्यासारख्या मुसलमानात जिना सारखा ' मुस्लिम भारत ' डोक्यात असतो. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून योगी आदित्यनाथ सारखे ' हिंदू भारत ' ह्या संकल्पनेसाठी प्रयत्नशील असतात.
स्वतःला सेक्युलर समजणारे समाजवादी मुस्लिम लोकांना ठणकावून सांगत असतात की बहुसंख्य हिंदूंचा धर्मवाद हा भयंकर आहे व तुम्हाला आम्हीच खरे संरक्षण देत असतो. हा गेम प्लॅन माहित असल्यामुळे हिंदुत्ववादी संपूर्ण हिंदू राष्ट्राचे स्वप्न पहात आहेत .
धर्मनिरपेक्षतेचा अर्थ तथाकथित पुरोगाम्यांनी फ़ारच सवंग करून टाकला आहे. मुस्लिम जातीयवाद नको तसा आक्रमक राष्ट्रवाद नको.

भागवतांनी जी भाषणे दिली ती ३ - ४ वर्षांपूर्वी दिली असती तर अधिक उपयोगी ठरली असती . काही अतिरेकी हिंदुत्ववादी संघटनांच्याबरोबर आरएसएस  नाही  हे लोकांना कळले असते .
आज तर काँग्रेसनेच  राजकीय  खेळी म्हणून' सॉफ्ट हिंदुत्वाचा' पुरस्कार केला आहे .त्यांचे  नेते टेम्पल टूर - कैलास यात्रा  करण्यात मग्न आहेत .
काही भाजप नेते मात्र 'हार्ड हिंदुत्वाच्या ' गोष्टी करताना दिसतात . त्यामुळे भागवतांची भूमिका संयमी वाटते हे त्यांना समजेल तर बरे होईल . अर्थात अशी स्पष्ट भूमिका आधी न घेतल्यामुळे जे नुकसान झाले ते झाले . लोकांना हे किती पटेल हे वेगळे .

 गेल्या ४-५ वर्षापासून ह्यावर चर्चा होत आहे . ह्या काळात भागवतांनी अनेक भाषणे दिली . अशी शब्दरचना आणि मांडणी सर्व लोकाकरिता ह्यापूर्वी का केली नाही ? गोरक्षणाचा मुद्दा आणि त्यावर झालेले हिंसाचारी वर्तन ह्याचा निषेध आधीच करायला पाहिजे होता . जे अतिरेकी हिंदुत्ववादी आहेत त्यांना जसा संदेश दिला तसा तो आधीच देणे आवश्यक होते आणि आहे . ज्या हिंदुत्ववादी संघटना आर एस एसशी संबंधित नाहीत त्यांचा कधीच उल्लेख केला नाही . ते करणे आवश्यक होते आणि आहे .


गोहत्या बंदी ह्या विषयात मला फारसा रस नव्हता . हा विषय गेल्या ५ वर्षांपासून अधिक चर्चेला येतो आहे . उत्तरप्रदेशचे राजकारण त्याभोवतीच फिरते आहे . ह्या विषयाची माहिती खणून काढतांना मला खूप माहिती मिळत गेली . अकबराच्या काळात गोहत्या बंदी होती असेही वाचण्यात आले . महात्मा गांधी आणि विनोबा भावे ह्यांचे ह्यासंबंधीचे विचार ऐकून / वाचून माहित होते . स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर काँग्रेसने ह्यावर अनेकदा चर्चा केली आणि धोरणे ठरविली . हा प्रश्न केंद्र सरकारच्या कक्षेत नसून राज्य सरकारांनी  त्यावर निर्णय घ्यायचा हे ठरल्यामुळे बहुसंख्य राज्यात गोहत्या बंदीचा कायदा आहे . तरीही कायदा मोडून गोहत्या होत असते व तणावाचे वातावरण निर्माण झालेले दिसते .
गांधींचे सर्व अनुयायी गांधीजी ह्या प्रश्नावर काय बोलत असत ,लिहीत असत हे समजून कसे घेत नाहीत ?,हा मला पडलेला प्रश्न .
गांधीजी ह्या प्रश्नावर काय लिहीत होते / बोलत होते हे एकदा अवश्य वाचा . सोबत लिंक देत आहे . मला हे विचार फार महत्वाचे वाटतात .अशावेळी मात्र ह्या प्रश्नात सर्वाना सावरकर आठवतात. असे का ? सावरकरांची भूमिका बरोबरच आहे . पण गांधीजी / विनोबाजी ह्यांचे म्हणणे समाजमन ओळखणारे नाही का ? 
This is what Gandhiji said on COW :
https://www.mkgandhi.org/momgandhi/chap81.htm
Please read this and you will realize about this old issue discussed from 1921 .
हिंदुत्वाचा विचार करताना वरील मुद्दे लक्षात घ्यावे. 

Friday, June 28, 2019

सावरकर


सध्या वि दा सावरकर ह्यांच्यावर खूप उलट सुलट चर्चा चालू आहे . पुरोगामी समजणारे रोज नवे विषय शोधून सावरकर आणि त्यांचे हिंदुत्व ह्यावर अनेक प्रश्न विचारीत असतात . महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले पु ल देशपांडे ह्यांचे सावरकर ह्यांच्यावर केलेले भाषण यु ट्यूबवर दोन भागात उपलब्ध आहे . मी फार पूर्वी ते ऐकले होते .आज ते पुन्हा ऐकले . पु ल ह्या भाषणात सावरकर ह्याचा विज्ञानवादी मानवतावाद , सावरकर आणि त्यांचा खरा सेक्युलरवाद , सावरकर आणि अंधश्रद्धा निर्मुलन , मदर तेरेसा ह्यांचा कुटुंब नियोजनाला असलेला विरोध म्हणजे राजद्रोह , सावरकर आणि त्यांचे हिंदुत्व इत्यादी अनेक विषयावर ते गंभीरपणे बोलले . महाकवी सावरकर ह्यावर ही  ते बोलले . नास्तिकतेवर बोलले . हे भाषण ह्या सावरकरद्वेष्ट्यानी अवश्य ऐकावे . सावरकरांना पुन्हा एकदा नीट समजून घ्यावे . त्या नंतर अटल बिहारी ह्यांचे भाषण झाले होते . ते नाही ऐकले तरी चालेल .पण पु ल ह्यांना समजलेले आणि भावलेले सावरकर अधिक समजून घ्या . उगाच फालतू चर्चा थांबवा . मणीशंकर अय्यर ह्यांना हा माणूस समजणे कठीण आहे . हे त्यांच्या वक्तव्यावरून समजतेच . १९६३ - ६६ मध्ये सावरकर द्वेष नव्हता . पाठ्यपुस्तकातून सावरकर दिसत होते . आम्ही त्यांच्या कविता वाचल्या .पाठ केल्या .निबंध वाचले . १९७५ नंतर सावरकरद्वेषाचे वारे सुटले . सध्या तर हिंदुत्व ह्या विषयावर डावे  ,पुरोगामी ,समाजवादी आणि कॉंग्रेसवाले तुटून पडताना दिसतात . त्यांना उठताबसता सावरकर दिसत असतात आणि त्यांच्यात मणी शंकर अय्यर संचारतो . एकदा पु ल काय म्हणतात ते समजून घ्या . मुद्दाम पु ल ह्यांचा उल्लेख करीत आहे . पु ल हे नास्तिक , समाजवादी ,पुरोगामी विचारांचे , राष्ट्र सेवादल आणि 'साधने 'शी जवळचे , विनोदी लेखक असले तरी गंभीर विचार मांडणारे लेखक होते . त्यांनी सावरकरांना समजून घेतले .नव्हे त्यांना सावरकर हे व्यक्तिमत्व समजले .

स्वातंत्र्यवीर आणि क्रांतिकारक असलेल्या सावरकरांचा असा अपमान करणाऱ्या Congrss च्या नेत्याला  थोडी शिक्षणाची गरज आहे.
मणीशंकर अय्यर नंतर असे वक्तव्य करणारा हा दूसरा नेता.
'सामना ' च्या संपादकांनी ह्या नेत्याला त्यांच्या  दिल्ली भेटीत थोडे  समजावून सांगावे.
हिंदूह्रदयसम्राट' बाळासाहेब ठाकरे ह्यांना सावरकरांची  अशी नक्कल बघून किती वेदना झाल्या असतील ह्याची कल्पना करवत नाही.
संजय राऊत  अलिकडेच कलर टीव्ही channel वर सावरकरांवर भरभरून बोलले होते  त्याचीच आठवण झाली.

कोहिमा आणि मणिपूरला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर मला जे जाणवले ते असे ...........
कोहिमाच्या युद्धामुळे ब्रिटिश बिथरले होते . जपानी सैन्य खूप पुढे आले होते .आझाद हिंद सेना होती म्हणूनच ते इतके आंत घुसू शकले . ब्रम्हदेश ते सिंगापूर पर्यंत आझाद हिंद सेनेचे जाळे होते . कोहिमाला ब्रिटिश सैन्याची सर्वात मोठी हानी झाली . आपल्या वडिलांना / आजोबाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आजही ब्रिटिश लोक कोहिमाला भेट देत असतात . 'रणाविण स्वातंत्र्य कोणा  मिळाले' ,हे  अर्धसत्य  आहे .कोहिमा युद्धामुळेच  ब्रिटिशांनी गाशा गुंडाळण्याचे  ठरविले असे जे म्हणतात त्यात थोडे तथ्य आहे .
नेताजींनी आझाद हिंद सेना उभी केली . त्याला  मर्यादित यश मिळाले.
सावरकरांनी  'लेखण्या तोडा आणि बंदुकी हातात घ्या' ,असे म्हंटले खरे पण ते सेना उभी करू शकले नाहीत . ब्रिटिशांनी त्यांची हालचालच बंद केली होती .त्यांना मुस्लिम  लीगच्या  राजकारणाविरुद्ध पर्यायी पक्ष सुद्धा उभा करता आला नाही .'एकला चलो रे  ' ही क्रांतिकारकांची वृत्ती त्यांना आडवी आली असावी.
शेवटी स्वातंत्र्याचे श्रेय दोघांनाही मिळाले नाही . गांधीजींची यशस्वी राजनीती जगापुढे आली व त्यांनाच  सारे श्रेय मिळाले .

Wednesday, June 26, 2019

पुरोगामी - समाजवादी- हिंदुत्ववादी

समाजवादी मंडळींची शोकांतिका कशामुळे झाली?, हे आजचे समाजवादी तपासून बघत नाहीत, हेच लक्षांत घेणे आवश्यक आहे. त्यांना पक्ष बांधणी जमली नाही. सगळेच नेते. कार्यकर्ते नाहीतच. पक्षफुटीचा रोग लागलेला. आतां तर घराणेशाही चालू आहे. कुठे डॉ लोहिया ? कुठे जयप्रकाशजी ? ह्या समाजवादी मंडळीनी Congress  सोडली नसती तर चित्र बदलले असते.
ह्या मंडळींनी आधी वेगळा गट केला. मग Congress सोडली. पक्ष बांधनी केलीच नाही. सगळेच बुध्दीवादी. स्वयंभू नेते. एकत्र राहिले नाहीत. लोहिया- जयप्रकाश, एस एम - गोरे  वगैरे...

पुरोगामी कोणाला म्हणायचं? सेक्युलर म्हणजेच पुरोगामी का?
 राज्यघटनेत सेक्युलर शब्द नंतर घातला. तो घातला तसा काढूनही टाकता येतो. समाजवादी हा शब्द असाच घातला. जगातूनच समाजवाद नाहीसा होत आहे. माओचा किंवा कार्ल मार्क्सचा साम्यवाद आहे कुठे? एकपक्षीय लोकशाही मान्य आहे काय?
भारतात समाजवाद्यांच्या बारा पार्ट्या. कोणता समाजवाद खरा? ते सर्व समाजवादी सेक्युलर आहेत काय? सेक्युलरमध्ये जातीयवाद येत नाही का?
गांधीजी समाजवादी होते का? नेहरू रशियन दौऱ्यावरून आल्यावर समाजवादी समाजरचनेच्या गोष्टी बोलू लागले. त्यापूर्वीच जयप्रकाश - लोहिया वगैरे समाजवादी गट काँग्रेसमधून बाहेर पडला. इंदिरा गांधींनी बँकांचे राष्टियीकरण करून समाजवादी पाऊल उचलले तेव्हा धारिया - चंद्रशेखर समाजवादी तरुण तुर्क बाहेर पडले. काँग्रेस खरीच समाजवादी आहे का? राहुल गांधी ह्यांची विचारसरणी कोणती?
गांधीजींनी समाजवादी समाजरचनेचा कधी उल्लेख केला नाही. डॉ आंबेडकरांनी कम्युनिझमचा विरोधच केला. त्यांनी समाजवादी आणि सेक्युलर शब्द राज्यघटनेमध्ये समाविष्ट का केले नसावेत?

एक  वर्षापुर्वीचा 'प्रतिगामी पुरोगामित्व' हा गिरीश कुबेर ह्यांचा झणझणीत अंजन घालणारा अग्रलेख अप्रतिम आहे. ह्यातील महत्वाचे मुद्दे :
* काँग्रेसचा मुस्लिम अनुनय
* सनातनी मुस्लिम धर्ममार्तंड आणि त्यांच्या आवाजात  आवाज मिसळणाऱ्या अन्य तथाकथित पुरोगामी मंडळींचा बोटचेपेपणा
* पुरोगामित्वाचे ध्वजधारक म्हणविणारे डावे आणि समाजवादी
* पुरोगाम्यांची तोंडपाटीलकी आणि डाव्यांचे खेळ
* पुरोगाम्यांची भंपक बोटचेपी बौद्धिके आणि बेगडी पुरोगामित्व
ह्यावर टाकलेला प्रकाश खूप काही सांगून जातो .
ह्यामुळेच पुरोगामी,  समाजवादी  आणि निधर्मी ह्या शब्दांचा अर्थ हरवून बसला आहे. 
* नेहरू असो का गांधी, लोहिया असो का जयप्रकाश, सावरकर असो का हेडगेवार प्रत्येकाने काहीतरी चांगले दिलेच आहे. ते घेतलेच पाहिजे.
भारतातील मुस्लिमांनी एकदा अंतर्मुख होऊन नव्याने विचार करावयास हवा. आझमखान किंवा ओवैसी ह्यांच्या मागे राहून जीनांचा 'मुस्लिम भारत' हा विचार सोडून द्यावा. मुस्लिमांनी एकदा झडझडून द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला विरोध करण्याची आवश्यकता आहे. आरिफ मोहमद खान ह्यांनी हाच मुद्दा अनेकदा स्पष्टपणे मांडला.
मुलायम, मायावती, ममता, डावे- उजवे कम्युनिस्ट, समाजवादी आणि काँग्रेस ह्यांनी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अल्पसंख्य असलेल्या मुस्लिम जनतेची कायम मनधरणी केली आणि त्यांच्यासाठी फक्त तोंडपाटीलकी केली. त्यांच्या विकासासाठी काहीच केले नाही. हे भारतीय मुस्लिमांच्या लक्षात आले नाही.
नेहमी गोध्रा - बाबरी कांडचा उल्लेख होतो. दोन्ही बाजूच्या तरुणांच्या उकळत्या रक्तात आततायी विचार प्रकट झाल्यामुळे अशा घटना घडल्या. त्या जखमा तशाच राहाव्यात म्हणून राजकीय पक्षांनी प्रयत्न केलेत हे ह्या देशाचे दुर्दैव. गांधीजींचे नाव उठताबसता घेणार्यांनी त्यासाठी काहीच प्रयत्न न करता बहुसंख्य हिंदूंना जबादार धरून अल्पसंख्य मुस्लिमांचा स्वतःच्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला आणि हिंदूंमध्ये जातीयवादाची पेरणी करून फूट पाडली व सत्तेचे राजकारण केले. मायावती मुसलमानांना १०० तिकिटे देतात तर मुलायम सिंग ही तशीच खेळी करीत आले आहेत.
भारतातील मुस्लिमांची सद्यस्थिती काय आहे? भारतातले बहुतेक पक्ष मुसलमानांच्या अपेक्षांना अनुसरून एकजात कुचकामी आहेत. ह्या सर्वांनी निवडणुकीत मुसलमानांचा एक गठ्ठा मते मिळवण्यासाठीच उपयोग करून घेतला व हिंदूत जातीय विद्वेष निर्माण केला.
भारतातील मुसलमानांना सर्व पक्षांनी असे सतत बजावले की बहुसंख्य असलेल्या हिंदूंचा धर्मवाद फार भयंकर असू शकतो. मुसलमानांना ह्या देशात चांगले दिवस बघावयाचे असतील तर त्यांनी हिंदू जातीयवादी शक्ती वाढणार नाहीत म्हणून आमच्याकडेच बघावे, आम्हालाच निवडणून द्यावे,  असे राजकारण ज्यांनी केले त्यामुळेच हिंदू एकजुटीचे प्रयत्न झाले, ही वस्तुस्थिती आहे. हिंदुत्वाची पताका त्यामुळे फडकू लागली.
आझमखान ह्यांचा मुस्लिम धर्मवाद मुलायमसिंग ह्यांनी पोसला. दिल्लीचे जामे मशिदीचे इमाम बुखारी आणि एमआयएमचे ओवैसी ह्यांच्या 'मुस्लिम इंडिया' ला प्रत्युत्तर म्हणून 'हिंदू इंडिया' विचारधारा वाढते आहे. पडद्यामागे जातीयवाद पोसणारी ही मंडळी धोकादायक आहेत. हेच लक्षात येऊ नये, हे दुर्दैव.
भारतात मुसलमान मोकळेपणाने मागण्या तरी करू शकतात. त्यांचे प्रतिनिधित्व संसदेत आणि राज्यांच्या विधानसभेत दिसून येते.
काही लोकांना देशाच्या अखंडतेपेक्षा बाबरी मशिदीचा बचाव अधिक महत्वाचा का वाटतो? बाबरी- गोध्रा ही जखम त्यांना बरी व्हावी असे वाटत नाही.
हा देश सर्वधर्मसमभाव  मानणारा देश आहे हे येथील मुसलमानांना मान्य असेल तर त्यांनी त्यांच्या धर्माच्या प्रभावाच्या मर्यादा ठरवून घेतल्या पाहिजेत.
धर्माचा आधार पोकळ आणि चुकीचा असेल तर काश्मीरला वेगळा दर्जा मागून चालणार नाही व समान नागरी कायदा अंमलात आणण्यास विरोध करता कामा नये.
समान नागरी कायदा, मुस्लिम स्त्रियांना तलाख मुक्ती, काश्मीरचे ३७० कलम रद्द करणे, राम मंदिराचा वाद  सामोपचाराने मिटवणे ह्यातच सर्वांचे हित आहे.
अल्पसंख्य मुस्लिम नकळत जीनांच्या 'मुस्लिम इंडियाची'ची भाषा बोलत असतात त्यामुळेच 'हिंदु राष्ट्रा'च्या गोष्टी येथे बोलल्या जातात. पाकिस्तान हे 'मुस्लिम राष्ट्र ' जिनांच्यामुळे उदयास आले आहे. भारत हे बहुसंख्य हिंदूंचे राष्ट्र असले तरी ते येथील 'भारतीय मुसलमानां'चेही राष्ट्र आहे. पाकिस्तानात 'हिंदू पाकिस्तान' कुठे आहे? हा फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.
आझमखान असो का ओवैसी, ह्यांच्यासारख्या मुसलमानात जिना सारखा 'मुस्लिम भारत' डोक्यात असतो. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून योगी आदित्यनाथ सारखे 'हिंदू भारत' ह्या संकल्पनेसाठी प्रयत्नशील असतात.
स्वतःला सेक्युलर समजणारे समाजवादी मुस्लिम लोकांना ठणकावून सांगत असतात की बहुसंख्य हिंदूंचा धर्मवाद हा भयंकर आहे व तुम्हाला आम्हीच खरे संरक्षण देत असतो. हा गेम प्लॅन माहित असल्यामुळे हिंदुत्ववादी संपूर्ण हिंदू राष्ट्राचे स्वप्न पहात आहेत .
धर्मनिरपेक्षतेचा अर्थ तथाकथित पुरोगाम्यांनी फ़ारच सवंग करून टाकला आहे. मुस्लिम जातीयवाद नको तसा आक्रमक राष्ट्रवाद नको.
अहो! प्रंचड बहुमताने अनंत कोटी ब्रम्हांड नायक निवडून आलेत, तुमच्या मागण्यांची पूर्तता करायचा त्यांना आग्रह का करत नाही? फुकट जुनी घिसीपिटी तुणतुणं वाजवताय!..
आपला इतिहास आणि राजकारणी फार गुंतागुंतीचे आहे. डॉ हेडगेवार  हे काँग्रेसमध्ये होते. डॉ शामा प्रसाद मुखर्जी हे सुद्धा काँग्रेसमध्ये होते. ते हिंदू महासभेत होते. ते पंडित नेहरूंच्या सर्वपक्षीय मंत्रिमंडळात मंत्री होते. डॉ शामा प्रसाद मुखर्जी बंगालमध्ये हिंदू महासभा - मुस्लिम लीग ह्या संयुक्त मंत्रिमंडळात होते. मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा ह्यांची संयुक्त सरकारे अनेक राज्यात होती .
सुरुवातीला एका हिंदू महासभेच्या अधिवेशनाला महात्मा गांधी उपस्थित होते.
मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय हिंदुमहासभेचे नेते होते. डॉ हेडगेवारांनी हिंदुमहासभा सोडून रा.स्व. सं स्थापन केला व सक्रिय राजकारण सोडलेल्या. डॉ शामा प्रसाद मुखर्जी ह्यांनी हिंदू महासभा सोडून जनसंघ स्थापन केला. बंगालच्या राजकारणात ते मुस्लिम लीग बरोबर सत्तेत होते. काश्मीर प्रश्नावर त्यांची मते सर्वांना माहीतच आहेत. आज त्याच काश्मीरमध्ये त्यांचा पक्ष पीडीपी बरोबर सत्तेत आहे. हिंदू महासभा आणि भाजप एकमेकांजवळ नाहीत . रा स्व सं हा हिंदू महासभेला जवळचा नाही. अलीकडे सत्तेच्या राजकारणामुळे अनेक दुसऱ्या विचाराचे लोक भाजपत आहेत त्यांचा रास्वसंशी कसलाही संबंध नाही. काँग्रेसमध्ये अनेक नेते हिंदूमहासभा विचारसरणीचे होते. त्यांना नेहरूंचे सेक्युलर विचार मान्य नव्हते.
जीना आणि मुस्लिम लीग काँग्रेसला हिंदूंचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष असे समजत होती. त्यांनी महात्मा गांधींना हिंदूंचाच नेता मानले होते. 
मोदीना गांधी जवळचे तर नेहरू दूरचे
मोदी पंतप्रधान झाल्यापासून गांधीजींचे नाव सतत घेत असतात. कॉंग्रसचे लोक गांधीजींना केव्हाच विसरून गेले आहेत. त्यांच्या तोंडात नेहरू, इंदिरा, राजीव आणि राहुल ह्यांचेच नाव असते.
गांधीजी आणि नेहरू ह्यांच्यात वैचारिक मतभेद होते. त्यांच्या दोघांमध्ये झालेला पत्र व्यवहार खूप काही सांगून जातो. एम जे अकबर (अलीकडे भाजपकडे वळलेले) ह्यांनी नेहरूवर एक पुस्तक लिहिले आहे. त्यात गांधी- नेहरू ह्यांच्यातील मतभेदावर चांगला प्रकाश पडतो.
नेहरू १९२७ साली रशियाला जाऊन आले आणि समाजवादी / साम्यवादी विचारसरणीमुळे खूप प्रभावित झाले. ते भारतात परतले ते क्रांतिकारी बदलाच्या स्फूर्तीने फुद्फुदतच. ते इतके उत्तेजित झाले की गांधीजींना त्यांच्या पोरकटपणाकडे दुर्लक्ष करावे लागले असे म्हणतात .
त्याचवेळी राष्ट्रीय नियोजन समिती स्थापित झाली. नेहरू त्याचे अध्यक्ष होते. गांधीजींना ते फारसे आवडले नसावे. 'नेहरुंना आकाशात उंच भरार्या घ्यायला आवडते. मला नाही. ' अशी त्यांची धारणा होती.
मोदीनी नियोजन आयोग रद्द केला त्यावर किती टीका होते आहे. गांधीजींना नियोजन आयोगाची साम्यवादी विचारांनी प्रेरित झालेली संकल्पना आवडली नव्हती. मोदीनी गांधीजींच्या विचारांनाच पुढे नेले , असे म्हंटले तर चुकीचे नाही.
मोदींना नेहरूसारखे उंच भरार्या मारणे आवडते हे ही लक्षात घेण्यासारखे आहे. नेहरू रशियाला गेले आणि समाजवादी विचारांनी प्रभावित झाले तर मोदी गेल्या अनेक वर्षात माओनंतरच्या चीनला अनेकदा भेटी देऊन प्रभावित झाले आणि ' मेक इन इंडिया ' चे स्वप्न घेऊन आले .
गांधीजी म्हणत , 'मला जो भारत अभिप्रेत आहे , त्यात मी राजे महाराजे , संस्थानिक आणि जमीनदार या सर्वाना जागा ठेवली आहे '
मोदींना अदानी- अंबानी हवे आहेत असा आरोप केला जातो. कारण ते समाजवादी विचारसरणीचे नाहीत म्हणून ते गांधीजीच्या विचारांशी जवळचे आहेत. म्हणूनच ते बोलताना गांधी - लोहिया - दिनदयाळ उपाध्याय ह्यांचा उल्लेख करतात. ते गांधीजींच्या विचारांशी जवळचे पण कृती करताना त्यांची बाह्य वागणूक ही नेहरू सारखी दिसते. नेहरूंचे शेरवानीवरचे गुलाब पुष्प जसे प्रसिद्ध तसे मोदींचे सेल्फी फोटो घेणे लोकांना माहित झाले आहे. नेहरूंचे कपडे इंग्लंडला धुण्यासाठी जात असत असे म्हणतात तर मोदींचा डिझायनर त्यांच्यासाठी खास खास कपडे शिवत असतो. त्यामुळे मोदी सरकार म्हणजे सूटबूट सरकार असे त्यांचे विरोधक म्हणतात. तरी बरं , मणीशंकर अय्यर त्यांना कॉंग्रेस अधिवेशनात 'चाय की दुकान' साठी stall देण्यास तयार झाला.
गांधी 'खेड्यात चला ' म्हणत असत तर नेहरू शहरी विकासाकडे लक्ष केंद्रीय करीत. मोदी स्मार्ट सिटीचा विचार करतात. त्यांना खेड्यात किंवा शहरात न जाता मध्यम असलेल्या छोट्या शहरांचा विकास करावयाचा आहे . खेड्यांना शहरी सोयी सुविधा मिळवून द्यावयाच्या आहेत.
गांधी खेड्यात वास्तव्य करा असे म्हणत तर मोदी मोठ्या खेड्यांना स्मार्ट शहर बनवा असे म्हणतात.
गांधीजी म्हणत , ' मला आधुनिक विज्ञानाविषयी आदर असला तरी जुनेच आधुनिक विज्ञानाच्या उजेडात तपासून योग्य पद्धतीने पुनरुज्जीवित करायला हवे ' . मोदी एका बाजूने ' डिजिटल इंडिया ' हा विज्ञानवादी दृष्टीकोन मांडतात तर जुन्या संस्कृतीला चिकटून राहतात.
नेहरुंना वाटते खेडे हे वैचारिक व सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेले असते व मागासलेल्या भोवताल मधून प्रगती साधने अशक्य असते . कारण संकुचित वृत्तीचे लोकच खोटारडे असण्याची शक्यता असते. ह्याउलट मोदींना दिनदयाळ उपाध्याय व नानाजी देशमुख ह्यांची ग्रामविकास योजना अधिक आवडते म्हणून ते प्रत्येक खासदाराला एक गाव विकसित करण्यासाठी पैसे देण्याची योजना आखतात . ही योजना गांधीजींच्या खेड्याकडे चला ह्या विचारांशी जुळती आहे. विकसित खेडे असेल तर शहरात कोण येईल ?
गांधीजींची ' हिंद स्वराज ' ही संकल्पनाच नेहरुंना ६०-७० वर्षापूर्वी जुनाट वाटली होती.
आतातर जग खूप बदलले आहे. मोदींना त्याची जाणीव आहे. ह्या बदललेल्या जगात भारताला टिकायचे असेल तर ' मेक इन इंडिया  , डिजिटल इंडिया , स्मार्ट सिटी , स्किल इंडिया , बुलेट ट्रेन,  स्वच्छ भारत  ' ह्या नव्या योजना त्यांनी पुढे आणल्या आहेत.
नेहरू - गांधी ह्यांच्यात भारत विकासाच्या कल्पना फार भिन्न होत्या . गेल्या अनेक वर्षात नेहरू नंतर नरसिंह राव आणि अटलजी ह्यांनीच विकासाच्या दिशा बदलून वेगळा मार्ग निवडला. आता मोदीनी नेहरूंच्या विचारापासून दूर जावून गांधी विचारातील काही संकल्पना समोर ठेऊन नव्या भारताची नवी स्वप्ने दाखविली आहेत.
( Based on  my  observations -  political essay )