कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा ह्यांची 876 पानाची ' तंतू ' ही महाकादंबरी वाचतोय . सौ उमा कुलकर्णी ह्यांनी केलेला मराठी अनुवाद अप्रतिम . मला कन्नड येत नाही . ह्या पूर्वी ' मंद्र ' ही कादंबरी वाचली होती . आवडली होती . दोन्ही कादंबऱ्यांचे अनुवाद अतिशय सुंदर आहेत . आपण एखादा अनुवाद वाचतोय असे वाटतच नाही . ह्या कादंबरीचा अवकाश खूप मोठा आहे . वाचकाला खिळवून ठेवणारी रसाळ कादंबरी . तशी मी उशिराच वाचली .( प्रकाशन 1997 , दुसरी आवृत्ती 2015 ) .कादंबरी 1947 पासून सुरु होते . स्वतंत्र भारतातल्या स्वतंत्र नागरिकांची व्यथा व्यक्त करणाऱ्या तुमच्या - माझ्या जीवनाची ही कादंबरी आहे . आपले सामाजिक - राजकीय चित्र ज्या वेगाने बदलत आहे, ते सारे ह्या कादंबरीत चित्रित झाले आहे . कादंबरी वाचताना आपला समाज किती गुंतागुंतीचा आहे हे तर लक्षात येतेच पण कादंबरीतील पात्रे आपण बघितलेलीच असतात . ती आपल्या जीवनातील असतात. तीन - चार पिढ्यांची, आपल्या आजूबाजूची - शहरातली तशीच खेड्यातली .खऱ्या अर्थाने ही ' हिंदू ' समाजाची वैविध्यपूर्ण कहाणी आहे . भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कादंबरीचे नाव ' हिंदू ' असले तरी त्या कादंबरीला तो प्रचंड आवाका नव्हता . ती कंटाळवाणी वाटली होती. 'तंतू 'ही कादंबरी अधिक सुंदर विणलेली ' हिंदू ' समाजाची कादंबरी आहे . कुठेही कंटाळा येत नाही . रसाळ लेखन . खूप काही लिहिण्यासारखे आहे ह्या कादंबरी बद्दल . नंतर दीर्घ लेख लिहावा असे मनात आहे .
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1454501931231908&id=100000163447478
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1454501931231908&id=100000163447478
No comments:
Post a Comment