Tuesday, September 3, 2019

SuperSchool :स. भू. शिक्षणसंस्थेचा नवा शैक्षणिक उपक्रम


SuperSchool - आहे काय ?
काल औरंगाबादेत सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या एका आगळ्यावेगळ्या शिक्षणउपक्रमाच्या समारंभाला गेलो होतो . उपक्रम होता' सुपर स्कूल ' च्या उदघाटनाचा . माझा मेव्हणा केदार देशपांडे ह्याने त्याच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'सुपर स्कूल 'साठी ६ पैकी एक अत्याधुनिक वर्ग उभारण्यासाठी देणगी दिली होती . त्यामुळे त्या कार्यक्रमाला आम्हांला आमंत्रित केले होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्या अत्याधुनिक वर्गखोलीचे उदघाटन झाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष वर्गात जाऊन बसलो आणि ह्या नव्या शैक्षणिक पद्धतीची थोडी ओळख झाली . नंतरच्या दिमाखदार समारंभात संस्थेचे अध्यक्ष राम भोगले ह्यांचे ह्याच उपक्रमाबद्दल खूप विस्ताराने सुरेख भाषण झाले .सध्या ६ वर्गखोल्यासाठी ६ देणगीदार संस्थेस मिळाले आहेत. पालक - शिक्षक खूप उत्साही आहेत . त्या समारंभाची काही क्षणचित्रे खाली देत आहे . 

केदार देशपांडे ह्यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ सरस्वती भुवन प्रशाळेतील एक वर्गखोली देणगी देऊन अत्याधुनिक केली . 

SuperSchool  मधील हा अत्याधुनिक वर्ग 
Superschool 
महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड ह्या सरकारी संस्थेने विद्यार्थ्यांना सुपर परफॉर्मर होण्यासाठी आखलेला हा नवा शिक्षण उपक्रम .
हसत खेळत शिका . 
कंटाळा आलेल्या मुलांना अभ्यासात रस निर्माण करणारा हा शिक्षण प्रयोग . 
शिक्षकांना शिकविण्यासाठी उपलब्ध असलेले डिजिटल तंत्रज्ञान . डिजिटल नेटिंग असलेला विद्यार्थी अवघड संकल्पना सहज आत्मसात करू शकेल असा हा एक शिक्षण प्रयोग .
E-Learning शिक्षण प्रणाली .
भाषा - गणित - विज्ञान - समाजशास्त्र ह्या सर्वच विषयातील अवघड संकल्पना सोप्या करून सांगतणारा व रुची निर्माण करणारा संगणक असलेला सहशिक्षक .
शिक्षक - विद्यार्थी संवाद ,
विद्यार्थी - विद्यार्थी चर्चा घडवून आणणारा संवादक , 
प्रतिक्रिया देऊन मनोगत व्यक्त करण्याची सोय ,
विद्यार्थ्यांची आकलनक्षमता किती आहे ह्याचे शिक्षकांना सहज लक्षात आणून देण्याची सोय असलेले संगणकीय संख्याशास्त्र . शिक्षक - विद्यार्थी ह्यांचा आनंदी सहभाग .
दर १० मिनिटांनी शिक्षकाला सहज उपलब्ध होणारा वर्गखोलीचा रिपोर्ट - 
आपण शिकविलेले किती विद्यार्थ्यांना नीट कळले आहे ते समजणारे नवे तंत्र .
गृहपाठ - वर्गपाठ - मूल्यमापन ह्याची उत्तम सोय असलेला हा एकत्रित डिजिटल पाठ्यक्रम .
सध्यां ५ वी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध.

MKCL प्रशिक्षित शिक्षिका , लॅपटॉप . MKCL शेक्षणिक सॉफ्टवेअर , प्रोजेक्टर , वायफाय ,
प्रत्येक विद्यार्थ्याकडे एक सिमकार्ड नसलेले आयपॅड ( कॅमेरा , ब्लु टूथ ,अँड्रॉइड ,माईक उपलब्ध ), शिक्षक-विद्यार्थी संवाद उपलब्ध  

MKCL Superschool
काय हवे ह्या वर्गात :
शिक्षक - प्रशिक्षित
लॅपटॉप
वायफाय
प्रत्येक विद्यार्थ्याला हवा एक मोबाईल किंवा आयपॅड - त्यात कॅमेरा ,माईक ,ब्लूटूथ ,स्पिकर ,अँड्रॉइड असणे
आवश्यक. सिम कार्ड - Deactivated - नो फेसबुक , कोणतेही इतर अँप्लिकेशन नाही . ते नाहीतच . त्यामुळे कोणताही गैरवापर होणार नाही.
MKCL Superschool software
शिक्षकाला विद्यार्थी काय करतो ,कसा वापरतो हे सहज समजते .
( See MKCL Website for Demo - Video )
हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. MKCL च्या शास्त्रज्ञ - तंत्रज्ञ मंडळीचे मनापासून अभिनंदन.

लोकसहभाग हवा असा हा एक शैक्षणिक उपक्रम आहे.

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष SuperSchool ची संकल्पना मांडताना 
राम भोगले ह्यांनी त्यांच्या सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेसाठी हा शिक्षणउपक्रम अतिशय जोमाने सुरु केला असून त्याला उत्तम प्रतिसाद दिसून येतो आहे . ही नवी शिक्षणक्रांती असेल .

केदार देशपांडे ह्यांना ह्या  शिक्षणक्रमाला  देणगी देऊन जी अत्याधुनिक वर्ग खोली उभी राहिली त्याबद्दल झालेला आनंद .     

No comments:

Post a Comment