मी असा घडलो : ३
Willhem Cornelius ह्या जर्मन माणसाची आणि माझी ओळख झाली आणि माझ्या जीवनाला खरी कलाटणी
मिळाली. हा माणूस म्हणजे एस्कीमोला फ्रीज विकणारा विक्रेता. अतिशय गोडबोल्या.
पाहिल्या पांच मिनिटात तुम्ही त्याच्या बोलण्यावर खुश व्हाल. तो जे बोलतोय
त्याच्याकडेच तुमचे लक्ष असेल. जगभर प्रवास केलेला हा माणूस तसा कामानिमित्त फिरत
असतो युरोपभर. आज स्पेन तर उद्या रोम. आठवड्यातून तीन दिवस हा युरोपमधील
कोणत्यातरी देशात गेलेला असतो. त्याचे कार्यालय ड्यूसेडोर्फपासून जवळ असलेल्या Marl
ह्या गावात आहे. घर आणि कार्यालय त्याच्या स्वतःच्याच आलिशान बंगल्यात आहे. हा एका अमेरिकन कंपनीचा युरोपमधील कार्यालयाचा
संचालक आहे . सर्व युरोपमधील सेल्स आणि मार्केटिंग हा बघतो. हा जर्मन असूनही उत्तम
इंग्रजी बोलतो. सहसा जर्मन लोक इतके चांगले इंग्रजी बोलत नाहीत. त्यांच्या बोलण्याला
वेग नसतो. जर्मनमध्ये विचार करून इंग्रजीत बोलणारे असतात तसा हा नाही. म्हणजे
माझासारखा. मी पूर्वी मराठीत विचार करून इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करीत असे.
विलीला युरोपमधील सर्व भाषा येतात त्यामुळे त्याने व्यवसाय वाढविला तो सर्व
युरोपभर.
विली कॉरनेलीयस त्यावेळी दोन वेळा भारतात येऊन गेला. त्याच्या हे लक्षात आले की
भारतात मोठ्या पेंट कंपन्या फक्त ३-४ च आहेत. खरे मार्केट हे कापड उद्योग आणि रंगद्रव्य
उत्पादक ह्यांचे आहे. भारतात १००० हून अधिक मोठ्या कापड गिरण्या होत्या . एका भेटीत तो
मला म्हणाला , ‘ तू ह्या विषयात तज्ञ आहेस. तुला थेअरी माहित आहे आणि हे
तंत्र कसे अंमलात आणावयाचे हे ही माहित आहे.तू तंत्रज्ञ मंडळीना शिकवू शकतोस. ह्या
तंत्रज्ञानाला भारतात खूप वाव आहे. आम्हाला दक्षिण एशियात मार्केट आहे, असे वाटते.
तू ह्या क्षेत्रातील एकमेव तज्ञ आहेस. तू आमच्या कंपनीचा Representative होशील का ? तू होणार असशील तर मी तुझी नेमणूक
करण्यास तयार आहे. तुझी कंपनी आमचे प्रतिनिधित्व तर करेलच पण येथील लोकांचे प्रश्न
सोडविण्यास मार्गदर्शन करेल. तो तुझा स्वतः चा व्यवसाय असेल. बघ विचार कर आणि मला
लवकर सांग’ . असा हा Godfather मला अचानक भेटला. त्यावेळी
अमेरिका आणि युरोपचे मार्केट थंडावले होते. ते नव्या मार्केटच्या शोधात होते .
भारतात मार्केट होते पण उद्योगांच्या अनंत अडचणी होत्या. कस्टम ड्युटी खूपच जास्त होत्या. कोणतेही तंत्रज्ञान भारतात आणणे महाकठीण कर्म होते. हे बदलत होते. मी विचार केला की आपण अशा विविध तंत्रज्ञानाला भारतात आणणे आवश्यक आहे. आपले उद्योग जुनेच तंत्रज्ञान वापरत असतात. मी अनेक आंरराष्ट्रीय परिषदा आणि प्रदर्शने बघितली होती. तेथे तुम्हाला नवे काय येत आहे ह्याची चाहूल लागते. मी निर्णय घेतला आणि नोकरी सोडून स्वतःची कंपनी सुरु केली. विलीच्या कंपनीचा मी एजंट झालो. त्या ८- १० वर्षात तो वर्षातून दोन वेळा तरी भारतात येत असे.
माझे कार्यालय माझ्या वन बेडरूम हॉलच्या घरात हॉल मध्ये होते. जो माणूस ताज - ओबेरॉय मध्ये उतरतो तो माझ्या घरीच असलेल्या कार्यालयात येतो. माझ्याकडे त्याला घेऊन येण्यासाठी साधी कार नसते. मुख्य म्हणजे माझ्याकडे टेलेक्स मशीन नव्हते. मी चर्चगेटच्या एका टेलेक्स मशीन असणाऱ्या गुजराती माणसाकडून टेलेक्स सेवा भाड्याने घेत होतो. गरज ही शोधाची जननी असते. तुटपुंज्या भांडवलावर व्यवसाय करायचा तर असे मार्ग शोधावे लागतात. त्यानंतर आमचे दौरे चालू झाले . अहमदाबाद , कलकत्ता , लुधियाना , तामिळनाडू, तीरुपूर
, मुंबई, राजस्तान मधील भिलवारा अशा उद्योगक्षेत्रात भेटी सुरु झाल्या. विलीच्या भेटी खूप उपयोगी असत.
मी आणि
विली कॉर्नेलीयस मुंबईहून सकाळी दिल्लीला गेलो होतो. संध्याकाळी मुंबईला परत येणार
होतो. एका राजस्थानातील उद्योगपतींना त्यांच्या दिल्लीच्या कार्यलयात भेटायचे
होते. तो अमेरिकन कंपनीचा जर्मन मॅनेजर होता हे त्यांना माहित होते . अमेरिकेतील
एका औद्योगिक प्रदर्शनात त्यांची भेट झाली होती . राजस्थानात अतिशय आधुनिक अशा
सूतगिरण्यांचे ते मालक होते . त्यांची अतिशय साधी राहणी . पूर्णपणे गांधीवादी .
अतिशय बुद्धिमान . त्यांच्या केबिनमध्ये आम्ही प्रवेश केला . पहिला धक्का बसला .
त्यांच्या टेबलावर विनोबा भावे ह्यांचा फोटो होता . त्यांनी आमच्यासाठी चहा मागवला
.स्वतःकरिता गरम पाणी मागविले .आमचा चहा आला . आम्ही दोघे आमचा चहा तयार करीत होतो
. पाहिजे तशी साखर टाकत होतो . त्यांनी त्यांच्या टेबलाच्या खणातून मधाची बाटली
काढली आणि त्यांच्या कपात एक चमचा मध आणि गरम पाणी ओतले. आमचा जर्मन मित्र विली
माझ्याकडे बघत होता . आमची चर्चा सुरु होती . इतक्यात त्यांचा फोन घणघणला . ते
हिंदीतून बोलत होते . फोन त्यावेळचे केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ला ह्यांचा
होता . हेवी वेट. त्यांनी फोन खाली ठेवला .
ते माझ्याशी हिंदीतून बोलले . त्यांनी मला सांगितले की विनोबा भावे गेले आहेत. त्यावेळी इंदिराजी रशियाला गेल्या होत्या आणि त्यांना विनोबांच्या मृत्यूची बातमी मंत्र्यांनी सांगितली होती आणि त्या भारताकडे परतण्यासाठी निघाल्या होत्या. .ह्याचा अर्थ राजकारणी मंडळींना विनोबा असे प्रिय होते .ते उद्योगपती भूदान चळवळीमुळे विनोबांच्या जवळ होते . विचाराने ते सर्वोदयी होते . त्यांना त्या दिवशी आमची मिटिंग चालू ठेवणे शक्य नाही असे त्यांनी मला सांगितले .’आपण उद्या दुपारी भेटू यात’, असे मला सांगितले. ‘तुम्ही आमच्या गेस्ट हाऊस मध्ये रहा . मी व्यवस्था करतो’, असेही ते म्हणाले. माझ्या बरोबरच्या जर्मन मित्राला म्हणजे विलीला हा सगळा प्रकार समजावून सांगताना मला बरेच कष्ट पडले. विलीला मुंबईला जाणे आवश्यक होते . तो ओबेरॉय हॉटेलमध्ये रहात होता. त्याला त्याच्या बायकोचा नेहमीप्रमाणे फोन येणार होता. मुख्य म्हणजे त्यादिवशी तिचा वाढदिवस होता. त्याने आपण कोणत्या दिवशी कुठे आहोत व कोणत्या हॉटेलमध्ये आहोत हे आधीच सांगून ठेवले होते. मिटिंगमधून बाहेर पडल्यावर तो मला म्हणाला,’ मला मुंबईला गेलेच पाहिजे. माझ्या बायकोचा फोन येईल. मी ओबेरॉय हॉटेलमध्ये पाहिजे’. मी म्हणालो ,तू येथून फोन कर . आपले येणे-जाणे वाचेल. त्याची त्यासाठी तयारी नव्हती. आम्ही मुंबईला गेलो आणि पुन्हा दुसरे दिवशी दिल्लीला त्या उद्योजकाला ठरलेल्या वेळी भेटण्याचे ठरविले . आम्ही दुसरे दिवशी संध्याकाळी त्या उद्योजकांना भेटलो आणि आम्हाला ऑर्डर मिळाली. विली खुश झाला. He was a great Marketing person. व्यवसाय कसा करायचा?, बोलायचे कसे? आपले तंत्रज्ञान सोप्या भाषेत कसे समजावून सांगायचे?, हे सर्व मी शिकलो ते त्याच्याकडून. म्हणूनच मी म्हणतो की हा माणूस एस्कीमोला ही फ्रीज विकेल. मोठा मिठास !. अनुभवी. बारा देशांचे पाणी प्यालेला.
असेच एकदा कलकत्त्याला गेलो होतो. मोठी पेंट कंपनी होती. युरोपियन कंपनीचा भाग होती. त्यांच्या युरोपियन कंपनीत असे तंत्रज्ञान वापरीत असत. भारतातही आपण हे तंत्रज्ञान आणावे असे त्यांना वाटत असे. आमची मिटिंग ठरली. त्यांचा कारखाना नदीच्या पलीकडे होता. त्यामुळे हावडा ब्रिज ओलांडून तिकडे जावे लागत असे. तो सर्व भाग स्लम सारखाच होता. रस्ते व्यवस्थित नाहीत. धूळकट . घाणेरडे. ड्रायव्हर गाडीचा भोंगा सारखा वाजवीत होता. कान किटले होते. विली वैतागला. धुळीने त्याची कॉलर मळकट झाली होती. तो जाम वैतागला होता.
विली कॉर्नेलियस: एस्कीमोला फ्रीज विकणारा सेल्समन
Wilhem Cornelius , German Expert in Color Technology |
त्याचे असे झाले की मी रंगविज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या विषयात संशोधन करीत
असताना एका रंगउद्योग कंपनीत संशोधन करीत होतो.त्यावेळी कंपनीने मला अमेरिकेला एका
सेमिनारसाठी पाठविले. मी सेमिनार नंतर दोन तीन विद्यापीठात जेथे हे काम चालते
तेथे ३ आठवडे शिकण्यासाठी गेलो. तेथे विविध उद्योगातील – पेंट , प्लास्टीक्स,
इंक्स आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील मंडळी आली होती. ह्या क्षेत्रात
मुलभूत संशोधन करणारे शास्त्रज्ञ आले होते. त्यांनी उद्योगासाठी नवे तंत्रज्ञान
शोधून काढले होते. त्या जोडगोळीचे नांव होते डेव्हिडसन आणि हेमेनडीनजर.
१९५८ साली डेव्हिडन आणि हेमेनडिंज र ह्यांच्या छोट्या कंपनीने COMIC ( Colorant Mixture Computer) बाजारात आणला होता. त्यामुळेच रंगक्रांतीला सुरुवात झाली होती . कोणताही दिलेला रंग जर तयार करायचा असेल तर त्यात ३ किंवा चार रंगद्रव्ये ( Dyes or Pigments ) असतात. त्याचे अचूक प्रमाण Trial and Error ने नं करता गणकयंत्राने काढण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले होते . त्यावेळी गणकयंत्र डिजिटल नव्हते. ते Analogue गणकयंत्र होते. Give me a Color and I will give you a Instant Formula from hundreds of dyes or pigments with a lowest possible cost and quality match in all lights. ह्या प्रमुख तत्वावर हे तंत्रज्ञान विकसित झाले होते.
माझी त्या दोघा शास्त्रज्ञाची ओळख झाली. हा सेमिनार आयोजित केला होता प्रोफेसर बिलमेयर ह्यांनी. ह्या क्षेत्रातील प्रोफेसर Allen ह्यानी संगणकाची प्रणाली आणि गणितीरचना शोधून काढली होती. त्यांची माझी ओळख झाली आणि मी त्यांच्याकडून ह्या विषयातील अनेक गोष्टी शिकलो . त्यांच्या संशोधनावर आधारित अल्गोरिथमवर मी स्वतः कलर म्याचिंग प्रोग्राम विकसित केला. त्यामुळे मला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ह्या दोन्हींची माहिती झाली. हे प्रोग्राम वस्त्रोद्योग आणि पेंटसाठी वेगवेगळे असतात. ते तंत्र मी भारतात विकसित केले.
त्यावेळी जगात
केवळ तीनच कंपन्या ह्या क्षेत्रात काम करीत होत्या. एक इंग्लंडची , एक अमेरिकेची आणि एक झ्युरिकची. त्या तिन्ही कंपन्या अमेरिकेतील
निरनिराळ्या उद्योगक्षेत्रात आपला व्यवसाय वाढवीत होत्या. ह्या रंग तंत्रज्ञानात
तीन गोष्टी आवश्यक असतात. रंग मोजण्यासाठी लागते ते यंत्र . त्याला
स्पेक्ट्रोफोटोमीटर असे म्हणतात. ते जोडायचे असते संगणकाला. त्यावर लिहायचा असतो
प्रोग्राम म्हणजे सॉफ्टवेअर . प्रत्येक उद्योगासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर लिहावे
लागते. हे सर्व एकत्र करून नवे तंत्रज्ञान तयार होते. त्यासाठी यंत्राची माहिती
आवश्यक तर असते पण ते चालवायचे कसे आणि उद्योगातील तंत्रज्ञाला ते शिकवायचे असते.
यंत्रात बिघाड झाला की दुरुस्त ही करायचे असते. असे हे तंत्रज्ञान जगातील फारच मोजक्या लोकांना माहित असलेले. त्यावेळी आणि आजही खूप महाग असणारे. हे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी
आणि समजून घेण्यासाठी मी १९७८ साली अमेरिकेला गेलो. हे तंत्रज्ञान समजून तर घेतलेच
. त्याशिवाय तेथील उद्योगात ते कसे वापरतात, हे प्रत्यक्ष भेटी देऊन बघून आलो.
माझ्यासाठी हा प्रचंड मोठा अनुभव होता. जे हे तंत्रज्ञान शोधून काढतात ते
शास्त्रज्ञ आणि ज्या तीन कंपन्या ही यंत्रे तयार करतात त्याच्या कार्यालयांना भेटी
देऊन बरीचशी माहिती मिळविली.
COMIC I : Colorant Mixture Computer (1952) |
माझी त्या दोघा शास्त्रज्ञाची ओळख झाली. हा सेमिनार आयोजित केला होता प्रोफेसर बिलमेयर ह्यांनी. ह्या क्षेत्रातील प्रोफेसर Allen ह्यानी संगणकाची प्रणाली आणि गणितीरचना शोधून काढली होती. त्यांची माझी ओळख झाली आणि मी त्यांच्याकडून ह्या विषयातील अनेक गोष्टी शिकलो . त्यांच्या संशोधनावर आधारित अल्गोरिथमवर मी स्वतः कलर म्याचिंग प्रोग्राम विकसित केला. त्यामुळे मला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ह्या दोन्हींची माहिती झाली. हे प्रोग्राम वस्त्रोद्योग आणि पेंटसाठी वेगवेगळे असतात. ते तंत्र मी भारतात विकसित केले.
COMIC II : Second Generation Computer Color System |
मी भारतात परत आलो . आमचे मालक स्वतः तंत्रज्ञ होते. त्यांना हे तंत्रज्ञान
भारतात आणावयाचे होते. त्यासाठी आमच्याकडे जे इडीपी प्रमुख होते त्यांच्याशी चर्चा
करून ते येथेच तयार करावयाचे ठरविले. त्यावेळी आपण दुसर्या जनरेशनचे गणकयंत्र
वापरीत होतो. त्या गणकयंत्रात पंचकार्ड सिस्टीम होती. वैज्ञानिक विषयासाठी फोरट्रान ही भाषा वापरीत असत. आमचे ईडीपी प्रोग्रामर ह्यांना फक्त कोबॉल ही भाषा येत असे. मी फोर्ट्रान शिकलो खरा . पण सोबत एका चांगल्या प्रॉग्रॅमर आणि सिस्टीम डेव्हलपरला घेतले. आमचा गणकयंत्र आय सी एल १९०१ होता . ते खूप जुने तंत्रज्ञान होते. मी इडीपीच्या प्रणाली लिहिणाऱ्या इनजीनिअरच्या सहकार्याने ते Software अवघ्या सहा
महिन्यात तयार केले. तो पर्यंत अमेरिकन कंपनीने बरीच प्रगती केली होती व सर्व
तंत्रज्ञान नव्याने विकसित केले होते.. आमच्या मालकाला वाटले , कशाला
अधिक वेळ वाया घालवायचा? हे तंत्रज्ञान त्यांच्याकडूनच विकत घेऊन त्याचा उपयोग करून घ्यावा. मग माझा
पत्रव्यवहार सुरु झाला. अमेरिकन लोक भारतात तंत्रज्ञान विकण्यासाठी तयार नव्हते.
ह्या मागासलेल्या देशात येण्यासाठी कोणीही तयार नव्हते. त्यांनी युरोपमध्ये आपला
जम बसविला होता आणि विली कॉर्नेलीयस त्यांचे काम पहात होता. त्यांनी मला त्याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. मी त्याला
टेलेक्स केला आणि हा महाशय’ चला भारत तर बघून होईल ‘ ह्या उद्देशाने भारतात आला .
आठ दिवसात तो येथे पोहोचला. मुंबईच्या हॉटेल ताज मध्ये उतरला. आणि भारतावर एकदम
खुश झाला. त्याला नंतर लक्षात आले की हॉटेल ताज म्हणजे भारत नव्हे. आपल्याला
कसलीही ऑर्डर मिळणार नाही . हा मागासलेला देश
आहे. 'ही आपली शेवटची भारत भेट', असे त्याने ठरवून टाकले. पण झाले उलटेच. आमच्या
बरोबर झालेल्या मिटिंगमुळे त्याच्या लक्षात आले की आम्ही software तयार केले आहे तरीही एकत्रित टेकनॉलोजी घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तो
येथे दोन दिवस होता. खूप चर्चा झाल्या. आणि आम्ही हे तंत्रज्ञान त्याच्याकडून
घ्यायचे ठरविले. तो तर खूपच आनंदला. माझी आणि त्याची जी ओळख झाली ती अशी. नंतर मी
त्याच्याबरोबर २० वर्षे काम केले आणि त्याच्याकडून
खूप शिकलो. असा हा विली कॉर्नेलियस . त्याच्या अनेक गंमतीजमती सांगण्यासारख्या आहेत.
माझ्या कंपनीने त्याच्याकडून कॉम्पुटर कलर सिस्टीम विकत घेतली. त्याची किमंत त्यावेळी १००, ००० डॉलर होती. तेंव्हा डॉलरची किंमत ८ रुपये होती. त्यासाठी Department of Electronics कडून NOC मिळवावी लागे .मग Import License मिळवावा लागे . त्यावर १५०% कस्टम ड्युटी होती. त्यात तीन भागावर तीन वेगळ्या कस्टम ड्युटी होत्या. स्पेक्ट्रोवर ३०%, कॉम्पुटर Hardware वर १५०% तर Software वर १०० %.. इम्पोर्ट करणे हे महाकठीण काम होते . हे सर्व करण्यासाठी ६-८ महिने लागत असत. तो पर्यंत आंतरराष्ट्रीय किमंती बदलत असत किंवा तंत्रज्ञानात बदलही होत असे. म्हणजे आपल्या उद्योगांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत असे. हे तंत्रज्ञान का हवे ? त्याचे प्रमुख कारण म्हणजे रंग्द्रव्यावर १२-१५ % बचत होत असे. पेंटमध्ये रंगद्रव्य खर्च हा एकूण खर्चाच्या ५० ते ६०० % असतो. त्यामुळे सरळ सरळ बचत तर होत असे पण इतर आठ दहा फायदे होते. असे हे तंत्रज्ञान आम्ही विकत घेतले , अंमलात आणले आणि रंगद्रव्यावर जवळजवळ २०% बचत केली. एक दीड वर्षात आमची खूपच प्रगती झाली.

Myself and Willi Cornelius in Guest House of ATIC Industries , Valsad . |
My job was to popularize Color science and Color Technology and help Color industry to use modern technology. I have conducted Color Courses all over India. |
भारतात मार्केट होते पण उद्योगांच्या अनंत अडचणी होत्या. कस्टम ड्युटी खूपच जास्त होत्या. कोणतेही तंत्रज्ञान भारतात आणणे महाकठीण कर्म होते. हे बदलत होते. मी विचार केला की आपण अशा विविध तंत्रज्ञानाला भारतात आणणे आवश्यक आहे. आपले उद्योग जुनेच तंत्रज्ञान वापरत असतात. मी अनेक आंरराष्ट्रीय परिषदा आणि प्रदर्शने बघितली होती. तेथे तुम्हाला नवे काय येत आहे ह्याची चाहूल लागते. मी निर्णय घेतला आणि नोकरी सोडून स्वतःची कंपनी सुरु केली. विलीच्या कंपनीचा मी एजंट झालो. त्या ८- १० वर्षात तो वर्षातून दोन वेळा तरी भारतात येत असे.
My Office in One BHK .Outside Hall is my office |
Willi Cornelius had a Great Meeting with Chairman of RSWM and he Sold First PC Based Color System to Bilwara Processors , Bhilwara. |
ते माझ्याशी हिंदीतून बोलले . त्यांनी मला सांगितले की विनोबा भावे गेले आहेत. त्यावेळी इंदिराजी रशियाला गेल्या होत्या आणि त्यांना विनोबांच्या मृत्यूची बातमी मंत्र्यांनी सांगितली होती आणि त्या भारताकडे परतण्यासाठी निघाल्या होत्या. .ह्याचा अर्थ राजकारणी मंडळींना विनोबा असे प्रिय होते .ते उद्योगपती भूदान चळवळीमुळे विनोबांच्या जवळ होते . विचाराने ते सर्वोदयी होते . त्यांना त्या दिवशी आमची मिटिंग चालू ठेवणे शक्य नाही असे त्यांनी मला सांगितले .’आपण उद्या दुपारी भेटू यात’, असे मला सांगितले. ‘तुम्ही आमच्या गेस्ट हाऊस मध्ये रहा . मी व्यवस्था करतो’, असेही ते म्हणाले. माझ्या बरोबरच्या जर्मन मित्राला म्हणजे विलीला हा सगळा प्रकार समजावून सांगताना मला बरेच कष्ट पडले. विलीला मुंबईला जाणे आवश्यक होते . तो ओबेरॉय हॉटेलमध्ये रहात होता. त्याला त्याच्या बायकोचा नेहमीप्रमाणे फोन येणार होता. मुख्य म्हणजे त्यादिवशी तिचा वाढदिवस होता. त्याने आपण कोणत्या दिवशी कुठे आहोत व कोणत्या हॉटेलमध्ये आहोत हे आधीच सांगून ठेवले होते. मिटिंगमधून बाहेर पडल्यावर तो मला म्हणाला,’ मला मुंबईला गेलेच पाहिजे. माझ्या बायकोचा फोन येईल. मी ओबेरॉय हॉटेलमध्ये पाहिजे’. मी म्हणालो ,तू येथून फोन कर . आपले येणे-जाणे वाचेल. त्याची त्यासाठी तयारी नव्हती. आम्ही मुंबईला गेलो आणि पुन्हा दुसरे दिवशी दिल्लीला त्या उद्योजकाला ठरलेल्या वेळी भेटण्याचे ठरविले . आम्ही दुसरे दिवशी संध्याकाळी त्या उद्योजकांना भेटलो आणि आम्हाला ऑर्डर मिळाली. विली खुश झाला. He was a great Marketing person. व्यवसाय कसा करायचा?, बोलायचे कसे? आपले तंत्रज्ञान सोप्या भाषेत कसे समजावून सांगायचे?, हे सर्व मी शिकलो ते त्याच्याकडून. म्हणूनच मी म्हणतो की हा माणूस एस्कीमोला ही फ्रीज विकेल. मोठा मिठास !. अनुभवी. बारा देशांचे पाणी प्यालेला.
असेच एकदा कलकत्त्याला गेलो होतो. मोठी पेंट कंपनी होती. युरोपियन कंपनीचा भाग होती. त्यांच्या युरोपियन कंपनीत असे तंत्रज्ञान वापरीत असत. भारतातही आपण हे तंत्रज्ञान आणावे असे त्यांना वाटत असे. आमची मिटिंग ठरली. त्यांचा कारखाना नदीच्या पलीकडे होता. त्यामुळे हावडा ब्रिज ओलांडून तिकडे जावे लागत असे. तो सर्व भाग स्लम सारखाच होता. रस्ते व्यवस्थित नाहीत. धूळकट . घाणेरडे. ड्रायव्हर गाडीचा भोंगा सारखा वाजवीत होता. कान किटले होते. विली वैतागला. धुळीने त्याची कॉलर मळकट झाली होती. तो जाम वैतागला होता.
मला म्हणाला ,
‘ This is my last time to come to Calcutta. I will
not come again. My wife will not put this new shirt in Washing Machine. She
will throw it’. मी काय बोलणार ?
आपली शहरे आणि औद्योगिक वसाहती अशाच घाणेरड्या असतात. त्या Industrial
Slums असतात. कसेतरी आम्ही कारखान्यात पोहोचलो. त्याने जोरदार Presentation
केले. टेक्निकल टीम खुश झाली. संचालकाबरोबर किमतीसंबंधी चर्चा झाली
आणि आम्हाला ऑर्डर मिळाली. विली खुश. एक गोष्ट लक्षात घ्या . गोरे कातडेही फार महत्वाचे
असते. मालक मंडळी ह्या गोर्या कातड्यावर प्रथम खुश होतात. काही वर्षांनी मला
म्हणजे माझ्या काळ्यासावळ्या कातड्याला बराच मान मिळाला.
पण हे ही महत्वाचे की आपण आपले तंत्रज्ञान व्यवस्थित विकले पाहिजे . नुसते
तंत्रज्ञ असून उपयोगी नाही.
विलीला कॅन्सर झाला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या बायकोने त्याच्या निधनाची बातमी मला फॅक्सवर कळविली. एक दोन आठवडे सुन्न गेले. तंत्रज्ञानात विषय माहीती असावाच लागतो. पण सेल्स आणि मार्केटिंग चांगले माहित असावे लागते. काही व्यक्तींना ते उपजत माहित असते. अशी माणसे आपल्या सहवासात आली की आपण बदलतो. असा हा माझा मित्र आणि सहकारी.

We conducted many Seminars on Computer Applications in textiles . |
सर, आपल्या या लेखातील ‘हा माणूस म्हणजे एस्कीमोला फ्रीज विकणारा विक्रेता’ हे वाक्य वाचूनच उत्सुकता निर्माण झाली आणि पुढे वाचत गेलो. मोजक्या शब्दांत एखाद्याचं व्यक्तिचित्र वाचकाच्या डोळ्यांसमोर उभं करण्याची जबरदस्त ताकद आपल्या लेखणीत आहे, याचा या लेखात पुन:प्रत्यय आला.
ReplyDeleteजर्मनमध्ये विचार करून इंग्रजीत बोलणारे असतात तसा हा नाही. म्हणजे माझासारखा. मी पूर्वी मराठीत विचार करून इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करीत असे. - ही वाक्यं मला अन्तर्मुख करणारी ठरली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुम्ही या लेखात उल्लेखिलेल्या सर्व व्यक्तींकडून शिकत राहिलात, प्रत्येक संधीचं सोनं केलंत.
कलर मॅचिंग प्रोग्राम विकसित करणे, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ह्या दोन्हींची माहिती असणे, तसेच हे प्रोग्राम वस्त्रोद्योग आणि पेंटसाठी वेगवेगळे असतात हे जाणून ते तंत्र भारतात विकसित करणे हे सर्व करताना आपण केलेल्या अफाट मेहनतीची जाणीव होते.
वन बेडरूम हॉलच्या घरात हॉल मध्ये कार्यालय सुरू करणे, टेलेक्स सेवा भाड्याने घ्यावी लागणे अशा अनेक अडचणींचा सामना करत तुम्ही तुटपुंज्या भांडवलावर व्यवसाय सुरू केलात आणि पुढे यशस्वी झालात. आपला हा प्रवास आणि आपले हे प्रयास नवीन पिढीसाठी नक्कीच मार्गदर्शक आहेत.