tag:blogger.com,1999:blog-5501679654400620882.post6262806627269754519..comments2023-11-27T08:05:36.788-08:00Comments on तरंग : एस्कीमोला फ्रीज विकणारा सेल्समन: विली कॉर्नेलियसDr Narendra Gangakhedkarhttp://www.blogger.com/profile/18063577169444093481noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-5501679654400620882.post-72798080522508897742020-09-03T11:17:58.319-07:002020-09-03T11:17:58.319-07:00सर, आपल्या या लेखातील ‘हा माणूस म्हणजे एस्कीमोला फ...सर, आपल्या या लेखातील ‘हा माणूस म्हणजे एस्कीमोला फ्रीज विकणारा विक्रेता’ हे वाक्य वाचूनच उत्सुकता निर्माण झाली आणि पुढे वाचत गेलो. मोजक्या शब्दांत एखाद्याचं व्यक्तिचित्र वाचकाच्या डोळ्यांसमोर उभं करण्याची जबरदस्त ताकद आपल्या लेखणीत आहे, याचा या लेखात पुन:प्रत्यय आला. <br />जर्मनमध्ये विचार करून इंग्रजीत बोलणारे असतात तसा हा नाही. म्हणजे माझासारखा. मी पूर्वी मराठीत विचार करून इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करीत असे. - ही वाक्यं मला अन्तर्मुख करणारी ठरली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुम्ही या लेखात उल्लेखिलेल्या सर्व व्यक्तींकडून शिकत राहिलात, प्रत्येक संधीचं सोनं केलंत. <br />कलर मॅचिंग प्रोग्राम विकसित करणे, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ह्या दोन्हींची माहिती असणे, तसेच हे प्रोग्राम वस्त्रोद्योग आणि पेंटसाठी वेगवेगळे असतात हे जाणून ते तंत्र भारतात विकसित करणे हे सर्व करताना आपण केलेल्या अफाट मेहनतीची जाणीव होते. <br />वन बेडरूम हॉलच्या घरात हॉल मध्ये कार्यालय सुरू करणे, टेलेक्स सेवा भाड्याने घ्यावी लागणे अशा अनेक अडचणींचा सामना करत तुम्ही तुटपुंज्या भांडवलावर व्यवसाय सुरू केलात आणि पुढे यशस्वी झालात. आपला हा प्रवास आणि आपले हे प्रयास नवीन पिढीसाठी नक्कीच मार्गदर्शक आहेत.<br /> Dr. Yogindra Joshihttps://www.blogger.com/profile/02811783679846977170noreply@blogger.com