नर्मदा - भेडाघाट |
'नर्मदेच्या तटाकीं ' (१) हे शब्दप्रभू गो.नी.दांडेकर ह्यांचे पुस्तक वाचलं होतं. त्यांनी ७० वर्षांपूर्वी लिहिलेलं हे पुस्तक.
६० वर्षापूर्वी १०वी/११वीत असतांना 'कुणा एकाची भ्रमणगाथा' (२) हे गो. नी. दांडेकरांचं पुस्तक वाचलं होतं. त्यांची ती नर्मदा परिक्रमा ह्या विषयावरील कादंबरी खूप आवडली होती. खूप वर्षे झाली. आज कादंबरीतील तपशील फारसे आठवत नाहीत. पण साधू बैराग्यासारखा त्यांचा तो प्रवास आठवत होता. एक भन्नाट माणूस.
आम्ही मध्यप्रदेशचा दौरा केला आणि नर्मदेच्याकाठाने खूप फिरलो. सध्यां डोक्यांत नर्मदा परिक्रमा पुन्हां करावयाचा विचार आहे. पण हे जमेल का नाही?, ह्याबद्दल शंका आहे. आज नर्मदेचे रूप खूप बदलले आहे. गुजरात मधील सरदार सरोवरामुळे कच्छच्या भागांत पाणी पोहोचल्यामुळे कच्छचा दौरा केल्यानंतर बदललेले चित्र जवळून पाहिले आहे. भाकरा नानगलचे निर्माते पं.नेहरु १९६३ पासून नर्मदेवरील धरण बांधण्याचे स्वप्न पहात होते. ते ५०/६० वर्षांनी पुर्ण झाले. ही नर्मदा भेडाघाटला पाहिली आणि त्या निसर्गसौंदर्याने वेड लावले. अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला घाट बघून तर थक्क झालो. पुन्हां गो नी दांडेकरांचे 'नर्मदेच्या तटाकीं' हे पुस्तक वाचायलं घेतलं. आमची प्रवासचित्रे संगणकावर होतीच. दांडेकरांनी त्यांच्या शब्दफुलांतून वर्णन केलेले नर्मदेचे वर्णन वाचत होतो आणि प्रवासचित्रांच्या खाली नकळत दांडेकरांची वाक्यें कुठे चपखल बसतात का?, ह्याचा शोध घेत होतो आणि हा ब्लॉगसाठी हा लेख तयार झाला.
निसर्गसौन्दर्याचे गो नी दांडेकरांनी केलेलं ते वर्णन. आम्ही नर्मदेच्या काठाने बराच प्रवास केला. काही प्रवासचित्रे काढली. दांडेकरांनी जे शब्दात वर्णन केले आहे ते ह्या प्रवासचित्रातून स्पष्टपणे जाणवते आहे; म्हणून त्यांचेच शब्द वापरून ह्या चित्रांना त्यावर आधारित मथळे दिले आहेत. त्या शब्दांत व्यक्त झालेले हे सौन्दर्य ह्या प्रवासचित्रांत दिसून येते म्हणून केलेला हा प्रयत्न. नर्मदा परिक्रमा करणे आतां तसे कठीण आहे. ही आम्ही टिपलेली प्रवासचित्रे आणि दांडेकरांच्या शब्दांतून व्यक्त झालेले निसर्गसोंदर्य ह्यांना एकत्र गुंफून हे लिहिलं आहे.
पाण्यांच्या प्रवाहांत त्या रंगाच्या छटा ज्या कांहीं अवर्णनीय दिसतात |
अन् त्या टेकड्यांचे रंगही किती मजेदार म्हणू सांगू? कोठे काळाकभिन्न तर कोठे हिरवागार, कोठे पांढरा शुभ्र तर कोठे लालभडक, कोठे निळसर तर कोठे जांभळट |
अनेक टेकड्यांशी गप्पगोष्टी करीत द्रुतगतीने नर्मदा वहाते आहे. |
नर्मदेच्या मूळ प्रवाहाला असंख्य जलप्रवाह येवून मिळतात
तेंव्हा ' मय्या रो रही है! ', असेच वाटू लागते.
प्रतिक्षणी नवीनता! प्रतिक्षणी नवा साज! प्रतिक्षणी नवा वेश! |
नर्मदेचे स्वरुपवैचित्र्य तसे संपतच नाही. |
सौंदर्याची जी नवीनता, ती ही नर्मदातटाकीच्या प्रत्येक कणाकणांत मुसमुसलेली आहे! |
'प्रतिक्षणं नवताम्' म्हणून सुंदर. |
नर्मदेजवळ निसर्गरम्य कल्याणकारकता आहे! |
नर्मदा तरुण झाली आहे. बाल्याचा अवखळपणा संपला आहे. तारुण्यातील ते विलोभनीय सौंदर्य. शरिराचा नीटनेटकेपणा, चापल्य आणि बल. असे हे ओजस्वी रुप. रेखीव पात्र. ठसठशीत, नीटनेटके. |
नर्मदेकडे शिशूचे सारल्य आहे, अवखळपणा आहे, रुसणे आहे, फुगणे आहे, नर्मदा रुसली म्हणजे उन्हाळ्यात दिसेनाशी होते. |
भेडाघाटला नर्मदेत संगमरवर सांपडतो, पण त्यांना ही अंदरकी बात काय माहीत? |
नर्मदेच्या ह्या काठावर बसून राहावे असेच वाटत रहाते. |
आता पसरली आहेत ही आजूबाजूची शहरे, |
नर्मदा तरुण झाली आहे. बाल्याचा अवखळपणा संपला आहे. तारुण्यातील ते विलोभनीय सौंदर्य. शरिराचा नीटनेटकेपणा,चापल्य आणि बल. असे हे ओजस्वी रुप. रेखीव पात्र. ठसठशीत, नीटनेटके
चापल्य आणि बल!
जबलपुराजवळ भेडाघाटी नर्मदा दर्शन विलोभनीय आहे.
एक मोठा खडक आडवा आला वाटेत.त्याला वाटले, सासरी जाणार्या या देवकन्येशीं दोन गोष्टी बोलता आल्या, तर पहाव्या.
पण तेजस्विनी नर्मदा! ती त्या खडक्याचे ते औध्दत्य सहन करते काय? छे! एका धडकेसरशी त्या खडकाचे भव्य शरीर विदीर्ण करून चपलतेने स्वता:ची वाट काढीत आणि त्याच्यावर गुरगुरत नर्मदा जी निघाली, ती कसची येते त्याच्या हातीं? त्या नर्मदेने दिलेल्या धडकेने तो खडक पांढरा फिटुक पडला आहे! जा अजून जा पहा तिथे. तो पांढरा पडलेला खडक , आणि नर्मदेचे गुरगुरणें, दोन्ही पाह्यला सापडतील तुम्हांला.
लोक म्हणतात, भेडाघाटला नर्मदेत संगमरवर सांपडतो, पण त्यांना ही अंदरकी बात काय माहीत?
नर्मदेजवळ निसर्गरम्य कल्याणकारकता आहे!
सौंदर्याची जी नवीनता, ती ही नर्मदातटाकीच्या प्रत्येक कणाकणांत मुसमुसलेली आहे!
प्रतिक्षणी नवीनता! प्रतिक्षणी नवा साज! प्रतिक्षणी नवा वेश!
नर्मदेत अमरकंटकाजवळ शिशूचे सारल्य आहे, अवखळपणा आहे, रुसणे आहे, फुगणे आहे, नर्मदा रुसली म्हणजे उन्हाळ्यात दिसेनाशी होते.
नर्मदा इतस्तत: वाहिली आहे अमरकंटकाजवळ.
नर्मदेच्या मूळ प्रवाहाला असंख्य जलप्रवाह येवून मिळतात तेंव्हा ' मय्या रो रही है! ',असेच वाटू लागते.
भगवान शंकर नर्मदेला तिच्या पतिगृही पाठवीत आहेत म्हणून ती रडते आहे! निसर्गसुंदरता ही त्यामुळे.
भरुचला जसजसा समुद्र जवळ येत जातो, तसतशी नर्मदेच्या गतीत पतिगृही जाणार्या युवतीची मंथरता ,मंदत्व आलेले आढळेल.
अमरकंटकाजवळील नर्मदेचा तो अवखळपणा, भेडाघाटजवळील तिची चपळता आणि भरुचजवळील गुर्जर युवतीसारखी गजगती आणि उदारता मोहमयी आहे.
नर्मदेचे स्वरुपवैचित्र्य तसे संपतच नाही.
प्रतीवर्षी नवी लेणी लेत असलेली नर्मदा! गतवर्षी एका ठिकाणी पर्वतप्राय वाळूचा ढिगारा दिसेल ,तर या वर्षी त्याच ठिकाणी महामूर खोल पाणी असलेला डोह दिसेल.
स्रुजन आणि संहार! उभविध सामर्थ्य असलेली ही नर्मदा!
विविध रूपे असलेली ही नर्मदा!
'असें सुंदर पाणी कधीच पाहिले नव्हते', असे तुम्ही सहज म्हणून जाल. 'प्रतिक्षणं नवताम्' म्हणून सुंदर.
खरोखरच सुंदर आहे नर्मदा!

________________
संदर्भ :
१) नर्मदेच्या तटाकीं आणि दक्षिणवारा , गोपाळ नीलकंठ दांडेकर,मृण्मयी प्रकाशन १९४९/ २००९
२) कुणा एकाची भ्रमणगाथा . गो. नी. दांडेकर
No comments:
Post a Comment