I am from Himachal |
सकाळी 11 वाजता विमान तळावर उतरलो आणि आमच्या गाड्या तयारच होत्या. हिमालयन एक्सप्रेसवेवर पुढचा प्रवास सुरू झाला. कसौलीला जेवणासाठी थांबलो आणि हिरव्यागार पर्वत रांगा बघत निघालो. 6250 फूट उंचीवरील Thanedhar ह्या मुककामाकडे. तेथे मुक्काम होता एका सफरचंदाच्या बागेत (Apple Orchard). सतलज नदीच्या काठावरील हा HOME STAY म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव. नारकांडा ह्या सिमलापासून 50 किलोमीटर अंतरावर असताना हायवे सोडला आणि किन्नौरकडे प्रवास सुरू झाला. उंचच उंच देवदार वृक्षाच्या जंगलातून सुरू झालेला हा प्रवास अवर्णनीय तर होताच पण हिमालयातील विविधता वेड लावणारी होती. पक्षी दिसत नव्हते पण त्यांचे मधुर कुंजन कानावर पडत होते. बरोबर पक्षी मित्र असला असता तर आमच्या ज्ञानात खूप भर पडली असती. Thanedhar ला मुक्कामाला पोहोचलो आणि त्या सफरचंदाची शेती करणार्या विनय स्टोक्स ( Vinay Stokes ) ह्या शेतकर्याला भेटलो आणि त्याच्या सतलज नदीच्या काठावर असलेल्या घरावर खुश झालो. ते एक स्वप्नील घर होते. त्या तिथे , पलीकडे , सतलज नदीच्या काठी ..... ऊसाची शेती करणारे आणि साखर कारखानदार मंडळी माहीत होती: पण सफरचंद शेती करणारे शेतकरी कसे असतात , हे अगदी जवळून पाहण्याची संधी चालून आली. पूर्वी लेहमध्ये सिंधू नदीच्या तीरी असेच एका Apple Orchad मध्ये मुक्काम केला होता त्याची आठवण झाली.
VINAY STOKES WITH HIS WIFE - |
सतलज नदीच्या काठावर ..... त्या तिथे .... आम्ही दोघे ..... गेले ते दिवस |
Samuel Evans Stokes Jr. (सत्यानंद स्टोक्स) हा 21 वर्षाचा फिलाडेलफियातील अमेरिकन तरुण 1904 मध्ये भारतात येतो ते एक मिशनरी म्हणून. महारोग्याची सेवा करण्यासाठी आलेला हा अमेरिकन असलेला बाबा आमटे. त्याच्याबरोबर असलेल्या इतर मिशनरी लोकांच्या बरोबर त्याचे फारसे जमत नसावे. तो काहीसा निराश होतो आणि स्वता:चा मार्ग शोधत असतो. त्याने अमेरिकेतून येतांना बरोबर सफरचंदाची निरनिराळी बी-बियाणे आणलेली असतात. हिमाचलचा हा परिसर सफरचंदासाठी योग्य आहे, असं त्याला वाटते आणि स्थानिक लोकांच्या मदतीने तो सफरचंद शेती करण्यासाठी सुरुवात करतो. हे करीत असताना तो भारतीय संस्कृतीने प्रभावीत होतो. येथील हिन्दी भाषा शिकतो. वेदान्त पंडित होतो.
ह्याच भागातील एका राजपूत पण ख्रिश्चन असलेल्या एका मुलीवर त्याचे प्रेम जडते. तो तिच्याशी विवाह करतो. विनय स्टोक्सची ती आजी. सत्यानंद हा महात्मा गांधीजींचा शिष्य होतो आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात एक सैनिक म्हणून सत्याग्रही म्हणून सामील होतो आणि ब्रिटिश राजवटीत तुरुंगवास भोगतो. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा हा पहिला अमेरिकन सदस्य होतो. आशा शर्मा ह्यांनी 'An American in Gandhi's India' हे त्यांचे आत्मचरित्र लिहिले आहे. विनयने ते पुस्तक आम्हाला दाखविले आणि आम्हाला ह्या त्याच्या ऐतिहासिक घराण्याचे खूप कौतुक वाटले.
सत्यानंद ह्यांच्याच घरात आणि सफरचंदाच्या शेतात आम्ही राहिलो आणि फिरलो॰ हा एक अलभ्य लाभ आम्हाला झाला. आज सत्यानंद ह्यांची मुले - नातवंडे उच्यविद्याविभूषित आहेत. त्यांची शेती खूपच विकसित झाली असून त्यांनी ह्या भागातील विकास घडवून आणला आहे. विनयबरोबर आम्ही खूप भटकलो. सफरचंद शेती कशी करतात? , त्यांच्या विविध जाती किती आहेत?, त्या भागात कोणती पिके अधिक चांगली येऊ शकतात?, कशा प्रकारची काळजी घ्यावी लागते? कीड लागू नये म्हणून काय करावे लागते?, हवामानातील बदलामुळे काय उपाय करावे लागतात?, शेतमजुरांचे प्रश्न हयावरही चर्चा झाली. येथे फक्त नेपाळी मजूर कामासाठी उपलब्ध होतात, हे समजले. फूड प्रॉसेसिंग उद्योग जोरात आहे. सहकारी तत्वावर उद्योग उभे आहेत. काही छोटे उद्योग आम्ही बघितले. तेथील शेतकर्याला एका किलोला 50 ते 60 रुपये मिळतात. तेच सफरचंद आपण 150 ते 200 रुपये किलोने विकत घेत असतो. म्हणजे 'हमी भाव' हा प्रश्न तितकाच गुंतागुंतीचा आहे. हवामानातील बदल हा मुख्य प्रश्न आहेच. विनयची सात शेतं आहेत. सात ठिकाणी त्याला मुक्कामाला जावे लागते. त्याच्या 'होमस्टे'मध्ये सर्व सोई - सुविधा आहेत. घरगुती जेवायला मिळतं. स्वादीष्ट भोजन.
आशा शर्मा ह्यांनी आजोबाचे लिहिलं पुस्तक |
Know About An American in Gandhi's India |
सर नमस्ते आपण दिलेली माहिती खूपच छान आहे पूर्वी एकदा सत्यानंद स्टोक्स यांच्या बद्दल वाचले होते पण आपल्या लेखामुळे माहितीमध्ये चांगली भर पडली मीसुद्धा हिमालय चल प्रदेश भेट दिली आहे पण ती पूर्ण कमर्शियल टुरिझम ग्रुप तर्फे आपण ज्या अँगलने अभिजीत केली ती खूपच छान आहे
ReplyDelete