चांदोरे - एक अनोखे गाव |
चांदोरेला जाण्याचे मुख्य कारण म्हणजे तेथे चालू असलेले उत्खनन आणि संशोधन .
माझा एक कामधंद्यात रमलेला मित्र अरुण भार्गव हा मुंबई विद्यापीठात पुराणवस्तू शास्त्रात अंशकालीन अभ्यासक्रम करीत असतो. डॉ कुरुष दलाल आणि त्यांचे ८-१० विद्यार्थी तेथे उत्खनन आणि संशोधन करीत असतात.
डॉ दलाल ह्यांचा ९३ वर्षाचा एक विद्यार्थी आमच्याबरोबर होता. त्यांचे नाव केशव खामबडकोणे. .त्यांचा उत्साह पाहून आपण थक्क होतो. सध्या त्यांचा तेथेच मुक्काम असतो. हे काम प्रत्यक्ष पाहण्याची अपूर्व संधी आम्हाला मिळाली. दिवसभर त्यांच्याबरोबर तो परिसर पहात होतो. तो एक वेगळा अनुभव होता.
ह्या उत्खननामुळे चांदोरे गावाचा १००० वर्षापूर्वीचा इतिहास पुढे येत आहे. शिलाहारा राजवटीच्या काळातील काही अवशेष उत्खननात सापडले आहेत. मराठा साम्राज्यापुर्वीचा हा काळ आहे. तीन देवालये सापडली आहेत. एका झाडाजवळ एक नंदी दिसून आला. त्यामुळे तेथे एखादे देवालय असण्याची शक्यता असल्यामुळे उत्खनन सुरु केले आणि एक शिवाचे मंदिर सापडले. त्याच्या बाजूला एक पायर्या असलेली विहीर सापडली व त्या विहरीत एक विहीर सापडली. काही हिरो स्टोन्स आणि सती स्टोन्स सापडले आहेत.
Excavation Site |
डॉ दलाल ह्यांचा ९३ वर्षाचा एक विद्यार्थी आमच्याबरोबर होता. त्यांचे नाव केशव खामबडकोणे. .त्यांचा उत्साह पाहून आपण थक्क होतो. सध्या त्यांचा तेथेच मुक्काम असतो. हे काम प्रत्यक्ष पाहण्याची अपूर्व संधी आम्हाला मिळाली. दिवसभर त्यांच्याबरोबर तो परिसर पहात होतो. तो एक वेगळा अनुभव होता.
मुंबई विद्यापीठाचे इतिहास संशोधन विभागाचे प्रा. डॉ. कुरुष दलाल आणि त्यांचे विद्यार्थी गेल्या तीन वर्षापासून तेथे उत्खनन करीत आहेत. अशा संशोधनाला निधी उपलब्ध नसतो. काही सामाजिक संस्था आणि महाड येथील उद्योग संस्था सढळ हाताने मदत करताना दिसतात. एका झाडाजवळ नंदीची
मूर्ती सापडली आणि देवालयाचा शोध सुरु झाला.सध्या उत्खननाचे काम चालू आहे.
आम्ही काढलेले फोटो टाकतां येत नाहीत. खूप समजून घेण्यासारखे आहे.
आम्ही काढलेले फोटो टाकतां येत नाहीत. खूप समजून घेण्यासारखे आहे.
सध्या तीन देवालये, हारागौरी मूर्ती , नंदी, सती मूर्ती, अनेक नाणी , विष्णू , हनुमान ह्यांच्या मूर्ती, देवालयाच्या आजूबाजूचा परिसर, अनेक स्तंभ सापडले आहेत. हे सर्व वेगवेगळ्या परिसरात सापडले आहेत.
म्हळसा हे नैसर्गिक बंदर जवळच आहे. ह्या बंदरातूनच आंतरराष्ट्रीय व्यापार होत असावा. अशाच ऐका बोटीतून काही ज्यू येथे येऊन पोहोचले. ते व्यापारी होते . त्यांच्या बोटीला काहीतरी झाले आणि ती बिघडली त्यामुळे ते आपल्या मायदेशी परतू शकले नाही. त्यांनी येथेच वस्ती केली . ते कोकणी झाले. त्यांनी चांदोरकर हे आडनाव लावले. त्यांचा तेली हा व्यवसाय होता. ते येथील संस्कृतीत मिसळले . १९९० मध्ये सर्वजण इस्त्रायलला
निघून गेले. तेथे त्यांची
सेमिटरी- स्मशानभूमी - आहे.
NANDI - Excavation started after finding out Nandi |
ह्या भागाला ' कलावंतीनीचे घरटे ' असे म्हणतात, व्यापारी आणि खलाशी ह्या भागात येतजात असत. त्या गरजेतून असे नाव पडले असावे.
No comments:
Post a Comment