Friday, April 10, 2015

धर्म ही अफूची गोळी नाही -२

श्रद्धा  / एक अदृश्य शक्ती  
महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध शस्त्रक्रिया विशारद होते. त्यांनी लाखो यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. प्रत्येक शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ते शस्त्रक्रिया सभागारातील देवाच्या फोटोपुढे नतमस्तक होत आणि मगच शस्त्रक्रिया सुरु करीत असत. एकदा त्यांना ह्यासंबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी असे उत्तर दिले , ' माझ्या हाताच्या पलिकडेही अशी काही शक्ती आहे की तिच्या हातात संपूर्ण यश मिळण्याची किमया आहे म्हणून मी त्या शक्तीला नमन करतो, माझा तसा विश्वास आहे. माझी तशी श्रद्धा आहे.माणसाची अशी श्रद्धा असते. इतरांच्या दृष्टीने ती अंधश्रद्धा असू शकते. ती नास्तिक माणसे आस्तिक माणसाला विनाकारण दोष देत असतात. 
आपण परीक्षेला जात असतो . खूप अभ्यास केलेला असतो. आपल्याला आपले मित्र - हितचिंतक शुभेच्छा देतात . ' बेस्ट ऑफ लक ' असे म्हणतात . हे लक कुठे असतेत्याचा काही उपयोग होतो कांयश तर आपल्या अभ्यासावर अवलंबून असते. मग ह्या शुभेच्छांचा काय उपयोग?
रशियातील चर्च 
पाश्चिमात्य देशातही अशा शुभेच्छा कां देत असतात ?
त्यांच्याकडे बहुतेक सर्वजण बोलताना शेवटी ' God Bless You ' असे कां म्हणतात?
एवढेच कायसकाळी कोणी भेटल्यास ओळख नसली तरी ' Good Morning ' असे कां म्हणतात ? त्यामुळे आपली सकाळ खरोखरच चांगली जाते कां? ह्या शुभेच्छा कोण अंमलात आणतो ? ही अदृश्य शक्ती कुठे असते. त्याचा आपल्याला काय उपयोग होतो?  
आपण आपल्या आई- वडिलांच्या किंवा वडीलधार्या माणसांच्या पाया पडतो किंवा वाकून नमस्कार करतो. त्यांचे हात आपल्या पाठीवर पडतात व ते आपल्याला ' यशस्वी भव ' असा आशीर्वाद देतात. त्या आशीर्वादामुळे आपण यशस्वी होतो कांह्या शुभेच्छा किंवा आशीर्वादामुळे आपणास नकळत एक शक्ती प्राप्त होत असते कां ? एक आत्मिक बळ मिळत असते कां?
Life After Death: पुनर्जन्म
I read biography of Steve Jobs. At the end of the book there are comments on existence of God and Life after death by Steve. 
स्टीव जॉब्स 

He says,
"I am fifty-fifty on believing in God. For most of my life, I have felt that there must be more to our existence than meets the eye. I like to think that something survives after you die. It is strange to think that you accumulate all this experience, and may be a little wisdom, and it just goes away. So I really want to believe that something survives, that may be consciousness endures.
But on the other hand, perhaps it is like an On-Off switch- Click! And you are gone.
May be that is why I never liked to put On-Off switch on Apple devices.
This great man of technology realized the importance of life after death when he suffered from the cancer and embraced the death every day. In his young age , he left everything and gone to Himalayas for becoming a Monk. He did not opt for becoming a Monk. But he returned from Himalayas with different attitude towards life,
When Steve Jobs came to know from medical test report that cancer is detected. First thing he did is asking his friend Larry Brilliant, "Do you still believe in God?" Larry said that he did and they discussed the many paths to God that had been taught by the Hindu Guru Neem Karoli Baba. Larry asked, what was wrong." I have cancer' Jobs replied.
Dalai Lama explains in a very simple words about life after death. According to Buddhism, although the nature of cause and effect may be different, they must have the same essential properties, they must have a definite connection; otherwise same cause cannot result in same effect. For example, the human body can be perceived - it has form and color - and therefore, its immediate source or cause must have these qualities. But mind is formless, and hence its immediate source or cause must also be formless. In analogy, the properties of seeds of medical plants produce medicines, and the seeds of poisonous plants produce poison.
Both mind and body must have immediate sources. Both mind and body begin in this life as soon as conception occurs. The immediate source of body is that of parents. But physical matter cannot produce mind, nor mind matter. The immediate source of a mind must, therefore, be a mind which existed before the conception took place; the mind must have continuity from a previous mind. This we hold to prove the existence of a past life. On this basis, we can conclude that past life existed and thence the future life will exist also. If belief in afterlife accepted, religious practice becomes a necessity, which nothing else can supplant, in the preparation for one's future life. 
 Sir Arthur Conan Doyle, Creator of Sherlock Holmes, turned spiritual & wrote quite a few books. I read this somewhere, probably original thinkers do have this question 'life after death' throughout their lives but the priority to attend to it comes very late in their life.
वैज्ञानिक आणि त्यांची श्रद्धा 
मंगळयान 
मंगलयान मोहीम यशस्वी व्हावी म्हणून ह्या मोहिमेचे प्रमुख डॉ राधाकृष्णन ह्यांनी मोहिमेपुर्वी तिरुपतीच्या बालाजीचे दर्शन घेऊन मंगलयानाची प्रतिकृती देवाला अर्पण केली . ती त्यांची श्रद्धा होती . त्यांचा देवावर विश्वास होता . तो त्यांच्यावर लहानपणापासून झालेला घरातील संस्कार होता. असे केल्याने त्यांना एक आत्मिक बळ मिळाले असणार . हा त्यांचा वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्न होता. त्यांची ही श्रद्धा दुसर्या कोणासाठी हानिकारक नव्हती. काही जणांना ती अंधश्रद्धा वाटते. पण त्यांना ती आत्मबळ देणारी वाटत असावी . 
ज्यांना देव आहे असे वाटते , त्यांच्यासाठी तो आहे व ज्यांना देव नाही असे वाटते त्यांच्यासाठी तो नाही. त्यामुळे स्वतःला आत्मिक बळ मिळण्यासाठी जे लोक देवाचे स्मरण करतात त्यांच्या कृतीवर बोलण्याचा इतरांना काय अधिकार ?
तिरुपती बालाजी 
ज्या दिवशी भारताचे "मंगळ"यान मंगळाकडे यशस्वीपणे झेपावले. त्या दिवशी सकाळपासून ह्यासंबंधीच्या बातम्या ऐकत होतो. एक वाक्य अनेकदा कानावर पडत होते. 'यान सोडण्याची जय्यत  झाली आहे. भारतीय शास्त्रज्ञ तिरुपतीच्या बालाजीला मोहीम यशस्वी होण्यासाठी साकडं घालत आहेत'. हे खरं की बातमी तिखट मीठ लाऊन सांगतात तसे हे वाक्य बातमीत टाकलं आहे. शास्त्रीय संशोधन करतांना किंवा शास्त्रीय मोहीम चालू करताना असं देवाला साकडं कां घालावं लागतं ? मला पडलेला प्रश्न की शास्त्रज्ञांचा देवावर असलेला विश्वास? ती त्यांची श्रद्धा. ती तशी हानिकारक नाही. 
Trip to Moon or Mars is for understanding the Universe. It seems to me that Indian scientists who believe in God think that their success will depend upon the blessings of the God. That is the reason they visit Tirupati Balaji for getting blessings.
दुसर्यांच्या भावनाचा आदर करणे आवश्यक आहे. उगाच 'उचलली जीभ आणि लावली टाळ्याला ' असे होता कामा नये
माझ्या ओळखीचे समाजवादी विचाराचे , देवाधर्मावर विश्वास नसलेले , परखड विचाराचे , वर्तमानपत्राचे ख्यातनाम संपादक होते. त्यांचे सहकारी देवभक्त होते. ते लघुरुद्र / सत्यनारायण पूजा करीत असत. संपादक त्यांच्याघरी तीर्थप्रसादाला व मेहूण म्हणून जेवावयास येत असत. त्यांनी त्यांच्या श्रद्धेची कधीच चेष्टा केली नाही. त्यांच्या श्रद्धेचा आदर केला.
आपल्याला जरी पटत नसले तरी इतरांच्या श्रद्धेचा आदर करावयास शिकले पाहिजे .
जो पर्यंत ही श्रद्धा वैयक्तिक असते व दुसर्यांना हानिकारक नसते तोपर्यंत इतरांनी त्यावर बोलण्याचा अधिकार नाही. ती त्या माणसाची गरज असते व त्याला आत्मिक बळ देते.
देवाचा व्यापार 
शिर्डीचे साईबाबा 
ज्या देवाचा २२४ कोटी रुपयाचा विमा काढावा लागतो तो देव कसला ? ज्या भक्तांना देवाची सेवा करताना विम्याची आवश्यकता भासते ते भक्त कसले ? जो देवच सोन्यासारखा आहे त्या देवाला ७० किलो वजनाचे सोन्याचे दागिने हवेत कशाला ? 'देव नाही मंडपातहे समजणार कधी
न्यायमूर्ती माधव गोविंद रानडे ह्यांना सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा विचार कां आवडला नव्हता? ते आज पटते. त्यांची दूरदृष्टी तर दिसून येतेच. त्यांना आजचे समाजमनही माहित होते. त्यावेळी लोकमान्य टिळकांचा उद्देश जनजागृतीचा होता. पण आज हा सार्वजनिक उत्सव हा व्यापार झाला आहे.
ईश्वर , धर्म आणि निरीश्वरवाद 
व्हॉलटेअर निरीश्वरवाद निश्चितपणे नाकारणारा होता. 
"विचारातील सर्व वस्तूतील आश्चर्याने थक्क करून सोडणारे संबंध पाहिल्यावर मला त्या अनंत सामर्थ्यसंपन्न निर्मात्याच्या अस्तित्वाविषयी तो असला पाहिजे अशी शंका वाटावयास पाहिजे होती.
 
तो काय आहे
, कसा आहे, हे सारे वस्तुजात , हे ब्रम्हांड त्याने कसे निर्मिले याचा विचार करणे जरी धार्ष्ट्याचे असले तरी त्याचे आस्तित्वच अजिबात नाकारणे हे ही धार्ष्ट्याचेच आहे. असे त्याचे म्हणणे होते.
तुम्ही स्वतःला ईश्वराच्या निर्मितीतील एक अंश मानतात
 की शाश्वत व आवश्यक जड प्रकृतीतील केवळ एक कण अनिवार्यपणे अलग होऊन पडला आहात ?" हा विचार पुन्हा तपासून बघावयाचा असतो असे त्याला वाटत होते .
धर्म आणि विज्ञान 
धर्म ही अफूची गोळी आहे : रशियातील चर्च 
Science without religion is lame. Religion without science is blind. "I am convinced that He (God) does not play dice”, " God is subtle but he is not malicious", " I want to know the God's thoughts; the rest are details.’, "God does not care for our mathematical difficulties , He integrates empirically" said ,Einstein
Religion is more than belief in God. It also refers to "A personal or institutionalized system grounded in such belief and worship."
In science, explanations must be based on evidence drawn from examining the natural world. Scientifically based observations or experiments that conflict with an explanation eventually must lead to modification or even abandonment of that explanation. 
Religious faith, in contrast, does not depend only on empirical evidence, is not necessarily modified in the face of conflicting evidence, and typically involves supernatural forces or entities. Because they are not a part of nature, supernatural entities cannot be investigated by science. 
In this sense, science and religion are separate and address aspects of human understanding in different ways. So we can very well conclude that science and religion deal with fundamentally separate aspects of human experience.
Science is trying to understand the Nature. Those who believe in God think that the Nature is a creation of God. Some people believe in God and a few do not believe in existence of God. 
धर्म ही अफूची गोळी आहे 
"धर्म ही अफूची गोळी आहे ", असा विचार घेऊन साम्यवादी आणि पुरोगामी हे सश्रद्ध लोकांना नेहमी डिवचत असतात तेंव्हा त्यांना सश्रद्ध माणसाच्या आत्मिक शक्तीची जाणीव नसते आणि ते टोकाचा विरोध करून आपलेच म्हणणे खरे असा आव आणतात , हे चुकीचे आहे. 
दलाई लामा 
"Religion is poison. It has two great defects: It undermines race, and secondly it retards the progress of the country. Tibet and Mongolia have both poisoned by it.", said Mao to Dalai Lama. All so called socialists talk the same language.
One should note that progress must be balance against their cost. Progress has cost the people all their individuality. In communist countries, people were becoming a mere homogeneous mass of humanity. They are strictly organised, disciplined, and controlled, so that they not only dressed the same but spoke and behaved the same,
The people even seemed to have lost the habit of laughing spontaneously; they only seemed to laugh when they are supposed to laugh, and to sing when they were told to sing. This is what is noticed in communist China and Russia. Eastern Europe had similar situation and as soon as they are liberated from communism, they found the different path of spirituality.
Religion, humour and individuality are breath of life to any human. 
All pleasures and pains have their mental origins; and religions are required because without them, the mind cannot be controlled. Hence, Religion is not poison.
Different doctrines have been introduced by different exponents at different periods and in different ways. But we believe they all fundamentally aim at the same noble goal, in teaching moral precepts to mould the function of mind, body, and speech.
कोणी म्हणतं ' देवाला रिटायर करा ' तर कोणी म्हणतं  'धर्म  ही अफूची गोळी आहे '. हे  नास्तिकही  तसे बोलण्यात हिंसक आहेत. त्यांना त्यांचीच बाजू खरी आहे असा दंभ असतो आणि ते  बिचाऱ्या आस्तिकवादी धर्म भोळ्या माणसाला कायम खिजवत असतात. दलाई लामा म्हणतात त्या प्रमाणे धर्म हा प्रत्येक माणसाच्या वैयक्तिक आयुष्याचा श्वास आहे . तो श्वास कोंडण्याचा तुम्हाला अधिकार नाही. साम्यवादी ,स्वतः ला पुरागामी म्हणणारे आणि नास्तिकवादी  साहिष्णू  नाहीत असेच दिसते. 
देव आहे हे जसे सिद्ध करता येत  नाही  तसेच देव नाही हेही सिद्ध करता येत नाही. म्हणून ज्यांना देव आहे असे वाटते , त्यांच्यासाठी तो आहे. ज्यांना देव नाही असे वाटते , त्यांच्यासाठी तो नाही. निसर्ग हाच देव आहे असे ज्यांना वाटते ते निसर्गाची देव म्हणून पूजा करतात. ती पूजा प्रतीकात्मक असते. वैज्ञानिक त्याच निसर्गाच्या अंतिम शोधात आहेत. त्यांना निसर्गात हे असे कां घडते ? हे गूढ शोधायचे आहे . 
कैलास मानससरोवर 



2 comments:

  1. अधर्म खरं तर अफूची गोळी. धर्म पाळला नाही तर हाहा:कार माजेल. जगरहाटी चाललीय कारण काही जण तरी धर्म मानतायत/ पाळतायत.

    पण 'God loving' and 'God fearing' हे दोन प्रकार 'धर्म' मानणार्‍यांमध्ये पहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात आज दुसर्‍या प्रकारात मोडणारे सापडतात. म्हणूनच देवळासमोरच्या रांगा वाढल्या आहेत. या प्रकारात देवाला पार्टनर करुन घेतलं जातं. मी अमुक एक काम करतोय. मला माहितीये की ते चांगलं नाहीये पण मला ते करावं लागतंय कारण त्यातून माझा फायदा/प्रगती/उन्नती होणार आहे. ते झालं तर मी नक्कीच तुझ्या दर्शनाला येईन. पहिल्या प्रकारातले लोक देवाला म्हणतात, देवा, मला तू नेमून दिलेलं काम करायचंय. मला हे काम मिळालंय ही तुझीच सेवा आहे. ती मी नैवेद्य रुपानं तुला अर्पण करेन आणि त्यातून तू मला जे देशील तो प्रसाद म्हणून मी ग्रहण करेन. मग तो प्रसाद गोड असला तर छानच. पण कडू असला तरी मी तो सेवन करेन (म्हणूनच की काय नववर्ष सुरुवात कडूनिंब पाला खाऊन करतात). पु. पांडुरंगशास्त्री आठवले याचं छान वर्णन करतात. यातून मनासारखं न घडण्यामुळे होणार्‍या त्रासातून मुक्ती मिळते, जगायला बळ मिळतं. तर ज्यांना देवाची भीती वाटते, ते सरळ आत्महत्या करुन मोकळे होतात. कारण त्यांना नेहमीच गोड प्रसाद हवा असतो. वरील लेखात सुरुवातीला ज्या डॉक्टरचं उदाहरण दिलं आहे ते 'God loving' गटातले होते. त्यांचं कौशल्य ते देवाच्या कामासाठी वापरायचे. डॉ. राधाकृष्णन मंगलयानाची सिध्दता झाल्यानंतरच तिरुपतीला गेले. ते सोडून 'देवा हे तू कर' असं सांगण्यासाठी गेले नाहीत.

    शंकराचार्यांनी 'भज गोविंदम्' च्या श्लोकात धर्मार्थ काय करुन उपयोग नाही हे छान सांगितलंयः

    कुरुते गंगासागर गमनं व्रतपरिपालन अथवा दानं

    ज्ञानविहीन: सर्वमतेन भजति न मुक्तिं जन्मशतेन||

    काय करायला हवं तेही पुढे सांगतातः

    गेयं गीतानामसहस्रं ध्येयं श्रीपतिरूपमजस्त्रं

    नेयं सज्जनसंगे चित्तं देयं दीनजनाय च वित्तम्||

    श्रध्दा नास्तिक माणसात ही असतेच. उद्या अमुक एक काम मी करेन असे तो म्हणतो तेव्हा त्याची श्रध्दा असते की तो उद्यापर्यंत (तरी) जगणार आहे. श्रध्दा असणं माणसाला जगायला, कार्यरत व्हायला बळ देतं. पण जर दुसर्‍याला त्या श्रध्देचा त्रास होणार असेल तर ती अंधश्रध्दा असं मला वाटतं. लहानपणीं औरंगाबाद मध्ये पाऊस पडत नाही म्हणून बेडकाला काठीला उलटा टांगून त्यावर पाणी घालण्यासाठी दारोदार भटकणार्‍या मुलांच्या टोळीची आठवण मला येते. ही अंधश्रध्दाच. त्यात त्या बेडकाला त्रास शिवाय पाण्याची नासाडी. ही मुलं आणि चतुर्थीच्या सुमारास मनोरंजनार्थ कर्ण्यावर कर्कश: गाणी लावणारे एकाच माळेतले असं वाटतं. त्यांच्या या हौसेचा आसपासच्या वृध्दांना किती त्रास होतो त्याची कल्पना त्यांना नसते की काय असं वाटतं. आमची श्रध्दा आहे म्हणून नेहमीची कामं सोडून कार्यालयाच्या वेळात 'सत्यनारायण' घालणं ही ही अंधश्रध्दा.
    हे नक्कीच थांबायला हवं.

    ReplyDelete
    Replies
    1. Murari, Thank you for your comments. I fully agree with your views.

      Delete