Friday, April 3, 2015

धर्म ही अफूची गोळी नाही-१

बुद्धा, तवांग
When I was young, I was dazzled by all things life could offer me.I thought I was capable of achieving all of them.When I got married , I had to choose just one path, because I needed to support the woman I love and my children.When I was 55 and a highly successful executive, I saw my children grown-up and leave home and I thought that from then on , every thing would be a mere repetition of what I already experienced.That was when my spiritual search began. - PAULO COELHO
WHAT A TRUE PICTURE ! 

हे जवळ जवळ प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतं. ६० वर्षानंतर लोक गीता , ज्ञानेश्वरी , दासबोध आणि तुकारामाची गाथा वाचण्यास घेतात. त्यांना बायबल आणि कुराण समजून घ्यावेसे वाटते. पाश्चिमात्य तत्वज्ञान समजून घ्यावे असे वाटू लागते. दलाई लामा, श्री श्री रवी शंकर ह्यांना  ऐकावेसे वाटतात. अध्यात्माकडे पाऊले वळू लागतात. आस्तिक - नास्तिक वाद आकर्षित करू लागतो. जे कृष्णमूर्तीपासून पाश्चिमात्य तत्ववेत्त्यापर्यंत सारेच खुणावू  लागतात.  हे खरे की ते खरे असा प्रश्न पडू लागतो. घरातील संस्कार असतातच.  
निसर्ग हाच देव 
हे सर्व कुठून येते ? हे सर्व कोण घडविते ?
तुम्हाला काय वाटते ? तुम्ही कोणीही असा ; या महान संपूर्णाचे  तुम्ही एक पात्र असे अवयव आहात,मोलाचे भाग आहात. जे महान पूर्णतत्व काय आहे ते मला समजत नाही. मी विज्ञानाचा संशोधक विद्यार्थी आहे तरीही सश्रद्ध आहे . ह्या विश्वाच्या निर्मितीच्या मागे कोणती अदृष्य शक्ती कार्यरत आहे ह्याचाही शोध चालू आहे. निसर्ग हाच देव असे मानले तरी हे सर्व कोठून येते , कोण घडविते ? ह्याचा शोध सुरूच आहे. आजतरी विज्ञानाजवळ सर्व प्रश्नाची उत्तरे नाहीत. 
विज्ञान आणि वेदांत
विज्ञान आणि वेदांत ह्यांचा एकत्रित विचार केला तर काहीं प्रश्नाची उत्तरे सापडतात. मी परमेश्वराचे अस्तित्व मानतो. रोज देवपूजा करीत नाही. कर्मकांडावर माझा विश्वास नाही. लालबागच्या किंवा जीएसबीच्या गणपतीला जात नाही. सिद्धिविनायकाला गर्दी नसेल त्या दिवशी गेलो आहे. चाळीस वर्षात दोन चार वेळा. रोज देवळात जात नाही. तशी आवश्यकताच वाटत नाही. आई - वडिलांना जसे वंदन करतो तसेच देवाला म्हणजे प्रतीकात्मक मूर्तीला नमन करतो. देवाला काहीही मागत नाही. नवस करीत नाही. जुन्या रूढी पाळत नाही. माझ्या बुद्धीला जे पटते तेच करतो.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे आजचे स्वरूप मला मान्य नाही. इतरांना त्रास होईल असे काहीही करू नये असे मला वाटते.
परमेश्वराचा शोध चालू ठेवण्यासाठी वेदांतातील संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. आजच्या धर्मगुरूंना आधुनिक विज्ञान माहित नसते किंवा समजत नाही पण वैज्ञानिकाला वेदांत समजू शकते. असे मला वाटते. सश्रद्ध माणसाना अश्रद्ध माणसांनी स्वतः ज्ञानी नसताना उगाच डिवचू नये असे मला वाटते.
मला गजानन कशात दिसतो ?


गणराया 

त्वं ब्रम्हा त्वं विष्णुस्त्वं रुद्र्स्त्वंभिन्द्रस्त्वमअग्निस्त्वम

 वायुस्तवं,सुर्यस्त्वम,चन्द्रमास्तवं ब्रम्ह भुर्भव: स्वरोम ....


 त्वं वांग्मयस्त्व्म चिन्मय: .... त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोsसि ……

 त्वं कालत्रयातीत: त्वं देहत्रयातीत: …. त्वं शक्तीत्रयातीत: …

ह्या ओळीतून परमेश्वराचे स्वरूप स्पष्ट होते. सूर्य , चंद्र , अग्नी , वायू आणि पाणी हीच परमेश्वराची रूपे आहेत. पृथ्वी , आप , तेज वायू आणि आकाश ह्या पंचमहाभूतात देव आहे , ही संकल्पना वेदात आहे तशीच विज्ञानात आहे. विज्ञान त्याचाच शोध घेत असते. 
ज्ञान आणि विज्ञानात परमेश्वर आहे म्हणूनच आपण विद्येची - सरस्वतीची आराधना करीत असतो. 

 गकार: पूर्वरुपं, अकारो मध्यमरूपंअनुस्वारश्चांतरूपंबिन्दुरुत्तररुपं....
 नाद: संधानं , संहिता संधि: …….


परमेश्वराचे रूप कसे आहे ? तो कशात आहे ? हे पुढील ओळीतून जाणवते 
  त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि.... त्वमेव केवलं कर्तासि , त्वमेव केवलं धर्तासि ……

  
अव दातारं , अव धातारं अव वक्तारं , अव श्रोतारं …….

  सर्वतो मां पाहि पाहि संमतात …।

ह्याचा अर्थ समजून घेतला तर गणेशाचे म्हणजेच परमेश्वराचे खरे दर्शन होते ……
आपण फक्त प्रतीकात्मक असलेल्या त्याच्या मूर्तीची पूजा करतो … .हे समजून घेतले पाहिजे



विठ्ठल -रखुमाई

माझ्या एका जवळच्या मित्रांनी विठोबावर असलेली कविता मला पाठविली. फार सुंदर आहे. ' देव नाही देव्हाऱ्यात', असं आपण म्हणतो.  प्रतीकात्मक असलेल्या त्या देवळातल्या देवासाठी रांगा लावतो. तेथे तो असतो कां?  तेच ह्या कवितेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. देव कुठे आहे ?
विठ्ठला दमला असशील बाबा 
बारा लाख लोक . भेटलास का सगळ्यांना 
का कमरेवर हात ठेऊन बघत बसलास नेहमी सारखा 
किती करावे तू तरी 
कमी का आहेत कामं तुला.
पाऊस पाडायचा 
थोरा मोठ्यांना निवडून आणायचं 
त्या सगळ्यांच्या पोराबाळाना 
मंत्रिपद मिळवून द्यायची 
जन्मांतरीचं कल्याण करायचं 
सोपं आहे का रे बाबा 
जरा दम खा .
बघ कधी वेळ झाला तर 
कमरेवरचे काढ हात, उतर ते जड जवाहीर अंगावरचं 
घे हातात पुन्हा काठी 
आणि खांद्यावर घोंगडी 
हो मोकळा पूर्वीसारखा 
आणि जा धावत कधीपासून तुझी वाट बघत बसलेल्या  
बारा लाखातील त्या शेवटच्या माणसाला 
भेटायला 
रघुनाथ बोराडकर 

विठोबाची जी परिस्थिती तीच तिरुपतीच्या बालाजीची. आपण देवळात गाभार्याजवळ जातो आणि जी धक्काबुक्की सुरु होते. कसले दर्शन? एक निराशाजनक अनुभव. असा गर्दी-गोंधळात देव असेल कां? ह्याउलट कैलासाच्या अगदी पायथ्याशी जेंव्हा जावून पोहोचलो आणि ते अभूतपूर्व दर्शन झाले ते पाहून असे वाटले की जणू काही देवानेच आपल्याला स्पर्श केला. भगवान शंकर त्या उंच पर्वतावर राहतात की नाही हे मला माहित नाही, पण त्या परिसरातील निसर्ग हा देवच आहे असे मला वाटले. तेथे एकही देऊळ नाही. तरीही देव आहे.


कैलास

भगवान बुध्द आणि जैन धर्मातील आठ तिर्थंकर तेथे कशासाठी गेले असतील ? Valley of Flowers ला गेलो होतो तेव्हा १४००० फुटावर गुरु गोविंद सिंग ज्या ठिकाणी मन:शांतीसाठी गेले होते त्या ठिकाणी गेलो तेव्हाही असाच वेगळा अनुभव आला. त्यांना तेथे कसली अनुभूती झाली? ऋषीमुनी हिमालयात ध्यानधारणेसाठी कां जात असत? आद्य शंकराचार्य केदारनाथच्या परिसरात कां जाऊन राहिले? देव देव्हार्यात नसतो. हे त्यानाही माहित होते. त्यांना तेथे देव कोणत्या स्वरुपात दिसला? 

' I do not know whether Lord Shiva lives here at Kailas. I do not know whether 8 Tirthankars of Jain climbed this mountain . I do not know whether Lord Buddha was here. It is sure that I touched the God when I was here. I believe that 'NATURE IS GOD'. You see his presence here. You have different feeling'. This is what is I realized when I was standing in front of Kailas mountain. असा अनुभव अनेकांना आला . Monk होण्यासाठी अनेक पाश्चिमात्य मंडळी  हिमालयात गेली आणि त्यांना असाच अनोखा अनुभव आला.  
भूतान मध्ये 'पारो'ला  टायग्रेस नेस्ट बघितले  तेंव्हाही कैलास पर्वताच्या जवळ उभा राहिलो होतो तसाच अनुभव आला.
टायग्रेस नेस्ट 
Paro Taksang ( Tigress Nest ) - A prominent Himalayan Buddhist sacred site and temple complex (1692)- Guru Padamsambhava ( Guru Rinpoche ) is said to have meditated for 3 years, 3 months , 3 weeks , 3 hours in 8 th century . He introduced Buddhism to Bhutan. He flew to this location from Tibet on the back of tigress from Khenpajong. Trekking to this place is a memorable event. it is a very difficult  place to reach but worth visiting . It was a great spiritual experience. One cannot describe it in words, One feels about it. There are some vibrations in such places. Your mind cools down. You realize importance of life and meaning of spirituality. You realize the importance of super power. That unseen super power is GOD. 
                          .............. पहा भाग २ 

No comments:

Post a Comment