सकाळी आठ वाजतां साल्झबर्ग सोडले. पश्चिम ऑस्ट्रियाकडून पूर्व ऑस्ट्रियाकडे व नंतर उत्तरेकडे प्रवास सुरु झाला. पूर्व युरोपातील प्राग ह्या प्रसिद्ध शहराकडे जात होतो. युरोपातील रस्ते सुंदर आहेत. कारने प्रवास सुखकारक आहे. आल्प्सच्या रांगा दूर दूर जात होत्या. मैदानी प्रदेश सुरु झाला. परंतु सर्वत्र हिरवेगार.निसर्गाचे वरदान लाभलेला ऑस्ट्रिया सुंदर आहेच. प्रागकडे जातानां १४७.५ कि मी. अंतरावर सिस्की कृमलोव्ह ( Cisky Krumlov ) हे झेक शहर लागते. तेथे थोडे थांबून पुढे जायचे ठरले होते. एका देशातून दुसर्या देशात प्रवेश करतांना काय बदल होतात हे पहावयाचे होते. तसे ड्रायव्हरला सांगून ठेवले होते. फरक फारसा दिसून येत नव्हता. सर्व युरोप जवळपास सारखाच. भाषा मात्र बदलते. भारतात प्रांत बदलला की प्रादेशिक संस्कृती बदलते तसेच युरोपात भाषा बदलते आणि तेथील संस्कृतीतील छोटे छोटे बदल दिसू लागतात. सिस्की कृमलोव्ह हे बोहेमिअन संस्कृतीची छाप असलेल्या खेड्यांची वसाहत. युनेस्कोने वर्ल्ड हेरीटेज लिस्ट मध्ये समाविष्ट केलेले जुने शहर. युरोपिअन संस्कृती जपून ठेवण्यासाठी किती व्यवस्थित प्रयत्न केले जातात ह्याचे उत्तम उदाहरण. आपण हम्पीचे विजयनगरचे साम्राज्य एवढे चांगले जपून ठेवले नाही. ह्याची जाणीव झाली. निश्चित नियोजनाच्या अभावी आपण आपली प्राचीन स्थळे चांगली जपून ठेवली नाहीत ह्याचे वाईट वाटले. सिस्की कृमलोव्ह मध्ये शेकडो जुनी घरे जतन करून ठेवली आहेत ,हे वैशिष्ट्य.
येथील राष्ट्रीय राजप्रासाद ( National Castle ) हा प्राग येथील राष्ट्रीय प्रासादानंतरचा मोठा प्रासाद आहे असे म्हणतात. लाखो पर्यटक तो पहाण्यासाठी येथे येतात. ह्या शहराला Pearl of Reniassance असे म्हणतात. १३ व्या शतकात Valtva नदीच्या काठावर हे शहर वसवण्यात आले. बोहेमिया साम्राज्याच्या खुणा आज ही जशाच्या तशा दिसतात. १४ व्या ते १७व्या शतकात ह्या शहराची निर्मिती झाली. बरोक वास्तुकलेच्या ह्या इमारती देखण्या आहेत. नदीचा आकार घोड्याच्या नालीसारखा आहे आणि शहर दोन्ही बाजूला वसलेले आहे. नदीच्या पलीकडे उंचावर प्रसिद्ध राजप्रासाद आहे. इतिहास खूपच मोठा आहे . डच कृमलोव्ह ह्या शहराचा मालक होता. जर्मन आणि झेक लोकांची वस्ती असलेला हा पूर्वीच्या झेकोस्लाव्हाकियाचा हा भाग. नाझी जर्मनीने ह्या शहराचा ताबा घेतला. नाझींचा पराभव झाल्यानंतर अमेरिकन सैन्याने ह्या शहराचा ताबा घेतला आणि जर्मन लोकांना हाकलून देण्यात आले.
कम्युनिस्ट राजवटीत झेकोस्लाव्हाकीयाची वाताहत झाली. तेंव्हा ह्या शहराची दुर्दशाच झाली. १९८९ नंतच्या वेलवेट क्रांतीनंतर ह्या शहराकडे विशेष लक्ष देण्यात आले आणि पूर्वीचे सौंदर्य आणि वैभव मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले.आज लाखो पर्यटक येथे येतात. हे पर्यटकांचेच गांव. २००२ मध्ये हे गांव नदीच्या पुरात वाहून गेले. चिकाटीने पुन्हा हे शहर जसेच्या तसेच उभारण्यात आले. हे वैशिष्ट वाखाणण्यासारखे.
नदीच्या काठावरील उंचावर असलेला कृमलोव्हचा राजप्रसाद खूप भव्य आणि देखणा. सुंदर बागा. देखणे सभागृह. बरोक वास्तुकलेच्या भव्य इमारती. World Monument Fund च्या मदतीने हे शहर पुन्हा जसेच्या तसे उभे केले आहे. १५ व्या शतकातील गथिक वास्तुकलेची चर्चची इमारत डोळे दिपवून टाकते. ह्या शहरात पायी पायीच फिरावे लागते. २ - ३ तास कमीच पडतात.
येथून प्राग १४२ कि. मी . २ -३ तासाचा प्रवास. मध्ये पोट -पूजा. प्रागला जाण्यास उशीरच झाला.
प्राग म्हणजे City of Unusual Beauty असे म्हंटले जाते. पूर्व युरोपातील सर्वात महत्वाचे ऐतिहासिक शहर . कम्युनिस्ट राजवटीत बरीच दुर्दशा झालेली ही झेकोस्लाव्हाकीयाची राजधानी. त्याला प्रहा असेही म्हणतात.
हे शहर पाहून कोणीही ह्या शहराच्या प्रेमात पडावे . त्याला पूर्व युरोपचे Paris असेही म्हणतात. खरं म्हणजे हे लंडन - Paris पेक्षा ही सुरेख आहे. Vltawa नदीच्या काठावर वसलेले हे २३ लाख लोकसंख्या असलेले शहर.प्रहा म्हणजे नदीच्या पाण्यावर येणाऱ्या उंच उंच लाटा( Rapids) किंवा नदीतील भोवरा. ल्याटीनमध्ये प्राग म्हणजे "Mother of cities". युरोपची राजकीय , सामाजिक ,आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघडण ह्या शहराने अगदी जवळून बघितली आहे. तसे हे युरोपच्या मध्यावर आहे. ११०० वर्षाचा इतिहास असलेले हे शहर. युरोपची मध्ययुगीन क्रांती ह्या शहराने पहिली आहे.अनेक चळवळीचे हे केंद्रस्थान. प्रागमध्ये दोन रोमन सम्राट वसतीला होते. ऑस्ट्रो - हंगेरीअन साम्राज्याने ह्या शहरावर ताबा मिळविला. पहिल्या महायुद्धानंतर हे राजधानीचे शहर झाले.
विशेष म्हणजे प्रोटेस्टंट धर्म पंथामध्ये अनेक सुधारणावाडी चळवळीयेथे झाल्या. अनेक सांस्कृतिक चळवळीचा जन्म ह्या शहरात झाला. अल्बर्ट आईन्स्टाईन प्राग विद्यापीठात प्राध्यापक होता .दोन महायुद्धे , सतत ३० वर्षे युद्ध परिस्थिती , त्या नंतरची कम्युनिस्ट राजवटीत झालेली वाताहत हे सर्व सोसूनही आजही हे शहर दिमाखात उभे आहे.युनेस्कोने वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणून ह्या शहराला मान्यता दिलेली आहे. अतिशय चांगला भूतकाळ , गाथिक आणि बरोक वास्तुकलेच्या भव्य इमारती , देखणा राजप्रासाद , भव्य चर्चेस हे सर्व असलेले जुने प्राग खूप बघण्यासारखे आहे. दिवसभर पायीच फिरले की सर्व इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. बरोबर चांगला गाईड मात्र हवा. प्रसिद्ध प्राग क्यासल, चार्ल्स ब्रिज , शहरातील जुना भव्य चौक , ज्यू लोकांची वस्ती , दहा पेक्षा अधिक म्युझियम , अनेक नाट्यगृहे ,चार्ल्स युनिव्हार्सिटी इत्यादी. दरवर्षी ४१ लाख लोक ह्या शहराला भेट देत असतात त्यामुळे पर्यटकाचे आवडते शहर असा नावलौकिक झालेला आहे.आतां तर व्यापारामुळे जागतिक शहर झाले आहे. पूर्वीही हे युरोपचे व्यापारी केंद्र होते त्याचे कारण ज्यू व्यापारी येथे स्थाईक झाले. इ,स. ९६५ मध्ये ज्युनी येथे वसती केली. नदीच्या किनार्यावर उंचावर एक किल्ला आहे. ११७० मध्ये नदीवर पहिला ज्युडिथ पूल बांधला. १३४२ मध्ये हा पूल वाहून गेला. आजही ते अवशेष पहावयास मिळतात.त्याच नदीवर चार्ल्स ब्रिज बांधण्यात आला. त्या पुलावर उभे राहिले की एका बाजूला भव्य असा राजप्रसाद तर दुसर्या बाजूला सुंदर शहर दिसते. त्या पुलावर असंख्य पुतळे दिसतात. शिल्पकलेचा सुंदर मिलाप.
१३४४ मध्ये बांधलेली Gothic Saint Whitas Cathedral ची अतिभव्य - प्रचंड इमारत आवाक करते. त्या चर्चच्या भोवती रोमन स्क़्वेअर आहे. त्याकाळी धर्मसत्ता किती प्रभावी होती हे सहज लक्षात येते. आपल्याकडील देवळे एवढी प्रचंड नाहीत. चर्च जवळची संपती अफाट असणार आणि आहे. १४०२ मध्ये चार्ल्स विद्यापीठ स्थापन झाले आणि धर्म शिक्षणाचे संशोधन केंद्र बनले. ह्याच विद्यापीठातील तत्ववेत्यानी चर्चच्या भ्रष्टाचारावर घणाघाती हल्ला केला आणि धर्म सुधारणेचे रणशिंग फुंकले. १९०६ मध्ये ज्युनी प्रसिद्ध धर्मस्थळ येथेच बांधले. झेक पार्लमेंट , राष्ट्राध्यक्ष निवासस्थान , पोप च्या करिता बांधलेले निवासस्थान आणि कार्यालय , अमेरिकन आणि जर्मन वाकाल्तीच्या सुंदर इमारती , गाथिक बांधणीची चर्च हे सारे एकाच भागात आहेत.पार्लमेंटच्या बाहेरच्या चौकात THOMAS MASARRYK ह्या राष्ट्राध्यक्षाचा अति प्रचंड पुतळा म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे . तेथून प्राग शहर फार सुंदर दिसते .उंच असलेल्या प्रासादातून पायर्या उतरून आपण नदीकडे चालू लागतो आणि जुने शहर दिसू लागते .मध्यवर्ती चौकात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. आजूबाजूला असंख्य दुकाने , रेस्तोरंट,आणि ज्यू व्यापार्यांच्या इमारती. सर्वात आकर्षित करते ती The Astronomical Clock. एक वेगळे घड्याळ.तास आणि सेकंद तर मोजतेच परंतु ३६५ दिवसातील प्रत्येक दिवसाचे एक विशेष नांव दाखविते. त्या नावाला विशेष महत्व. मूल ज्या दिवशी जन्माला येते , त्या दिवशीचे नांव मुलाला देण्यात येते असे म्हणतात दर एक तासाने एक व्यक्ती वरच्या खिडकीतून बाहेर येते व बिगुल वाजवून निघून जाते. सर्व पर्यटक ते बघण्यासाठी खुप गर्दी करतात. मोठी गंमत असते. त्या इमारती समोरच आईन्स्टाइन तेथे ५ वर्षे रहात होता. आजही त्याच्या नावाची पाटी तेथे आहे.त्यानंतर नाझीच्या काळात तो अमेरिकेला निघून गेला.
दुसर्या महायुद्धात हिटलरनी प्रागचा राजप्रासाद ताब्यात घेतला. ज्युची खूप संख्या येथे होती. त्यांना छळ छावण्यात पाठविले गेले. काही ज्यू पळून गेले. १९४२ मध्ये नाझी सैन्य प्रमुख Reinhard Heydrich ह्याचा खून झाला. हिटलर संतापला. तुंबळ युद्ध झाले. त्याच वेळी अमेरिकन सैन्याने बॉम्ब हल्ले केले अनेक जण मृत्युमुखी पडले . सर्व जुन्या इमारती उध्वस्त झाल्या कारखाणे जळून गेले. १९४५ मध्ये मित्र राष्ट्रांनी ताबा घेतला. जर्मन आणि नाझी प्राग मधून पसार झाले. आज येथे जर्मन अत्यल्प आहेत.
१९४८ ते १९८९ ह्या काळात येथे लष्करी सत्ता होती. सोव्हियत युनिंअनच्या वर्चस्वाखाली कम्युनिस्ट प्रणाली सत्तेवर होती. झेकोस्लाव्हाकीयातील बुद्धजीवी वर्ग जागा झाला . लेखक - नाटककार एकत्र आले. १९६७ साली आंतर राष्ट्रीय लेखकांची एक परिषद झाली. त्यांनी कम्युनिस्ट राजवटी विरुद्ध बुलंद आवाज उठविला. १९६८ मध्ये सोव्हियत युनिंयनने हल्ला केला. चळवळ करणाऱ्या लोकांची मुस्कटदाबी केली. १९८९ मध्ये वेलवेट क्रांती झाली आणि विद्यार्थ्यांनी बंद केले. प्राग मधील सर्व रस्त्यावर मोठ्या संखेने तरुण विद्यार्थी जमा झाले नवी हवा निर्माण झाली चळवळीने जोर धरला आणि १९९३ मध्ये झेक आणि स्लोव्हाकिया हे दोन देश निर्माण झाले. झेकचा पहिला राष्ट्रपती Havel हा नाटककार होता. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. नव्या झेकचे स्वप्न पहाणारा हा राष्ट्रपती नाटककार होता. विजय तेंडुलकरानी " रामप्रहर " हे त्यांचे पुस्तक ह्या नाटककाराला अर्पित केले होते. मी त्या पुस्तकाचा प्रकाशक होतो त्यामुळे ती अर्पण पत्रिका मी प्रथम वाचली होती.त्यावेळेपासून माझ्या मनात झेक , प्राग आणि हा नाटककार अध्यक्ष ह्यांच्याविषयी औत्सुक्य होते . ते पुस्तक जेंव्हा प्रकाशित झाले होते त्याच्या काही दिवस आधी हा नाटककार राष्ट्राध्यक्ष दिल्लीत राष्ट्रापतिचे पाहुणे म्हणून आले होते हे बातमीवरून नंतर समजले . झेक पार्लमेंटच्या जवळ फिरत असताना मी गाईड ला सहज प्रश्न केला आणि पहिल्या राष्ट्राध्यक्षाबद्दल सहज विचारले आणि तो तितक्याच सहजतेने मला म्हणाला , " तो एक भूतकाळ आहे . आतां भविष्याचा विचार करायचा ."
१९९० पासून प्राग पुन्हा युरोपचे प्रमुख आर्थिक चळवळीचे केंद्र बनले आहे. इ.स. २००० मध्ये जागतीकरणाच्या विरुद्ध १५००० निदर्शकांनी IMF आणि World Bank ह्यांच्या विरुद्ध निदर्शने केली व मोठा मोर्चा काढला. आज नव्या अर्थ व्यवस्थेत प्राग शहर महत्वाची भूमिका बजावत असून युरोपचे प्रमुख शहर झाले आहे. २००२ मध्ये मोठा पूर आला. खूप नुकसान झाले ,भूमिगत दळणवळणाची साधने बंद पडली. त्याही संकटातून प्राग पुन्हा उभे राहिले .
आमचा मार्गदर्शक टर्कीचा होता. सर्व रंजक इतिहास त्याला चांगलाच माहित होता. प्राग म्हणजे म्युझियमचे शहर. राष्ट्रीय म्युझियमची इमारत आकर्षक आहे. रात्रीच्या वेळी प्राग वेगळेच दिसते. मन वेधून घेणारे ते क्षण. रुडोलफिनम हा प्रागचा क्न्सरट हॉल अतिशय सुंदर आहे. सांस्कृतिक चळवळीचे प्रमुख केंद्र.त्यामुळेच प्रागला युरोपची सांस्कृतिक राजधानी असेही म्हणतात .थियेटरस, ऑपेराज, म्युझियम्स, ग्यालरीज,भव्य वाचनालये सर्व एकाच ठिकाणी. त्यामुळे प्राग हे बुद्धीमंताचे,कलावंताचे , चित्रकारांचे , शिल्पकारांचे , संगीतकरांचे , नाटकंकारांचे आणि शास्त्रज्ञाचे शहर आहे तसेच धर्ममार्तंड लोकांचेही गांव आहे. ह्या ठिकाणी संगीत ,कला , साहित्य , ह्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदा सारख्या चालू असतात. दर वर्षी शेक्सपिअर च्या नाटकांचा महोत्सव होतो तसेच फ्याशन शो होतात. बाजूला वैद्यकीय परिषद चालू असते. संरक्षण( Defence) विषयक परिषद ही चालू होती. DRDO चे शास्त्रज्ञ भेटले . फिरतांना आम्हाला भारतीय डोकटर्स, आणि लष्करी अधिकारी परिषदेला आलेले दिसले. हॉलीवूड आणि बॉलीवूड चे लोक येथे हमखास येतात.प्रागचे टेलिव्हिजन Tower वरखुच उंच असून त्यावर रांगत रांगत काणारी दोन बाळे ( Crawling Babies ) लक्ष वेधून घेतात. प्रागचे ट्राम नेटवर्क मोठे असून ९०० ट्राम्स रोज ये -जा करतात. प्रागचा मुक्काम अवर्णनीय आणि संस्मरणीय होता. मला प्रागला पुन्हा जाण्यास आवडेल.
हा मुक्काम संपला आणि आम्ही निघालो पूर्वीच्या पूर्व बर्लिन मध्ये असलेल्या ड्रेस्डेनकडे. हे शहर दुसर्या महायुद्धात ८० टक्के नष्ट झाले होते.