Friday, August 18, 2023

ओपनहायमर - ३


हिरोशिमा आणि नागासकी येथे टाकलेल्या अणुबॉम्बमुळे जी प्रचंड हानी झाली व त्यामुळे लाखों लोकांच्या मृत्यूला आपणच कारणीभूत आहोत हे ओपमहायमरच्या लक्षात आल्यामुळे तो मानसिक विषण्णतेमुळे विलक्षण दु:खी झाला. तो पूर्णपणे बदलला. त्यानंतर अमेरिकेने हायड्रोजन बॉम्ब निर्मिती करण्याचे ठरविले व तसे शासकीय निर्णय झाले. त्यावेळी ओपनहायमरने कोणत्याही अण्वस्त्र निर्मितीला आपला विरोध आहे अशीच भूमिका घेण्यास सुरुवात केली. मानवजातीच्या कल्याणासाठी अण्वस्त्र निर्मितीचा हा विचार योग्य नाही, असे विचार त्याने त्यावेळी मांडावयास सुरुवात केली. ‘न्यूक्लियर पाथ’ आणि ‘लष्करी सामर्थ्य’ यामुळे मानव हानी होणारच हे त्याला पटले असल्यामुळे तो विरोध करू लागला. आपण ‘Destroyer’ आहोत, हे शल्य त्याला विषण्ण करीत असे. त्याच्या या विरोधामुळे हा आपल्या देशाचा विचार न करिता सोव्हिएत रशियासाठी काम करणारा हेर तर नसावा, अशी शंका काही लष्करी अधिकारी घेऊ लागले. त्याच्यावर देशद्रोह्याचा आरोप होऊ लागला. त्यामुळे १९५४साली त्या संशयामुळे सरकारने एक चौकशी समिती गठित केली व त्याच्यावर ‘देशद्रोही’ म्हणून गंभीर आरोप केले. अणुबॉम्बमुळे झालेली मनुष्य हानी त्याला मान्य नव्हती, हे जसे खरे असले तरी त्याच्या आयुष्यातील दोन स्त्रिया ही तशाच जबाबदार असाव्यात, असे सरकारी अधिकाऱ्याना वाटत होते. त्या दोन्ही स्त्रिया ह्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. एक पूर्वीची प्रेयसी होती आणि दुसरीने तर ओपनहायमर बरोबर लग्न केले होते व त्यांना दोन मुले होती. लष्करी अधिकाऱ्याना या स्त्रिया हेरगिरी करणाऱ्याच असाव्यात, असा दाट संशय होता. त्यामुळेच ओपनहायमरचे सोव्हिएत रशियाशी संबंध असावेत, असे सरकारला वाटू लागले. त्याच्या देशप्रेमाबद्दल शंका निर्माण झाली व देशाच्या सुरक्षेसाठी त्याच्यापासून धोका आहे असे त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले.
"The Bomb for Bohr and Oppenheimer was a weapon of death that might also end war and redeem mankind", असेच त्या दोघांना आणि अनेक शास्त्रज्ञांना वाटू लागले होते. अणूशक्तीचा उपयोग संहारा करिता न करिता शांततेकरिता करणे अधिक महत्वाचे आहे, असे मानणारा मोठा वर्ग शास्त्रज्ञात तयार होऊ लागला होता.
Max Born हा शास्त्रज्ञ ओपनहायमरला म्हणाला, “See, Blood on my hands, I have made this tragic mistake”. त्यावेळी ओपनहायमर लगेच उत्तरला, “Yes, my disapproval for much I have done”.
एक प्रसिद्ध कवियत्री Ai लिहिते ..
“My soul, a wound that will not heal ……./
We strip away the tattered fabric…. /
Of the Universe ………
We become our own transcendent annihilation”
ओपनहायमर आणि अनेक शास्त्रज्ञांनी “Nuclear Ethics” चे महत्व अमेरिकन जनतेला समजावून सांगण्याचे प्रयत्न नेटाने सुरू केले.
Emily Strasser ही ओपनहायमरची नात. आपल्या आजोबावरील चित्रपट पाहिल्यानंतर
“Bulletin of Atomic Scientists” च्या ऑगस्ट ९, २०२३ च्या अंकात त्यांनी एक लेख लिहिला आहे. त्याचा मथळा आहे, “My grandfather helped build the bomb. “Oppenheimer” sanitized its impact”. जेव्हा अणुस्फोट झाला होता त्यावेळी त्या जन्मल्याही नव्हत्या. त्यांनी आपल्या आजोबाला बघितलेही नव्हते. आज जग खूपच बदललेले आहे. त्या म्हणतात, “The nine nuclear armed states collectively possess more than 12,500 warheads; the more than 9500 nuclear weapons available for use in military stockpiles have the combined power of more than 1,35,000 Hiroshima sized bombs”.
अण्वस्त्र निर्मिती करणारी ही राष्ट्रे “Destroyer of the Worlds” आहेत, हे लक्षात असू देणे महत्वाचे आहे.
ओपनहायमर हा चित्रपट बघितल्यानंतर सर्व जगातील प्रेक्षक हीच चर्चा करीत आहेत. ते सर्व अण्वस्त्र निर्मिती विरोधी आवाज उठवीत असतील तर ह्या चित्रपटामुळे जागृती झाली असे आपण म्हणू शकू. त्यातच मानवी कल्याण आहे.
Ethical Cultural Society साठी ह्या चित्रपटाचा संदेश महत्वाचा आहे.
ओपनहायमरने अणुबॉम्ब स्फोटाचे परिणाम बघितल्यानंतर भगवतगीतेतील खालील ओळी आपल्या समोरच्या वाळूवर हाताने लिहिल्या होत्या, त्याची आठवण त्यांच्या नातीला झाली. त्या ओळी होत्या ..
“Now, I am become Death, the destroyer of worlds”
असा वाळूवर लिहिलेला एक फोटो त्या लेखात छापला आहे. This was seen written in the dust on a deactivated nuclear missile.
*****


No comments:

Post a Comment