तुझा मुख ज्वाळ आणि जिव्हा चळण I
तेणे करूनी होतसे सर्व लोक ग्रासन II
त्या ज्वाळा भितरी त्रिभुवन I
ऐसे उग्र रूप विष्णू तुझे II
विनोबाची गीताई (अध्याय ११, श्लोक ३०-३२)
६ ऑगस्ट, १९४५ला सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी पहिला अणुबॉम्ब स्फोट झाला तो जपानच्या
हिरोशिमावर. त्यात एक लाख लोक मृत्युमुखी झाले. केवळ सहा लोकच जिवंत होते आणि
त्यांना असे वाटत होते की आपणच कसे जिवंत राहिलो. ७ ऑगस्टला जपानच्या लक्षात आलं
की एक नव्या प्रकारचा अणुस्फोट घडवून आणण्यात आला आहे व त्याची निर्मिती अमेरिकेने
केली आहे. सूर्यामध्ये रोज असंख्य अणुस्फोट होत असतात. त्याला अग्निसूर्य असे
म्हणतात. सूर्य म्हणजे अग्निसूर्य. ती एक अग्निदेवता. गीतेमध्ये त्या
अग्निसूर्याचे जे वर्णन केले आहे ते वर दिलेले आहे.
अमेरिकेने केलेल्या अणुस्फोटाचे जनक होते जॉर्ज रॉबर्ट ओपनहायमर. ते अणुबॉम्ब स्फोटाचे निर्माताप्रमुख होते. ते एक नावाजलेले पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ होते. त्या अग्निसूर्याची निर्मिती त्यांनी केली. त्यांच्यावर काढलेला “ओपनहायमर” हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. American Prometheus ह्या ओपनहायमर यांच्या चरित्रावर आधारित हा चित्रपट काढला आहे Christopher Nolan यांनी. चरित्र लेखक आहेत Kai Bird आणि Martin j. Smith. हे चारित्रात्मक पुस्तक म्हणजे, “It is triumph and tragedy of J Robert Oppenheimer”. हा एका वैज्ञानिकावर केलेला चित्रपट आहे. त्यामुळे काही लोकाना तो समजण्यास थोडासा कठीण आहे.
Prometheus म्हणजे God of Fire) - अग्निदेवता. अग्निसूर्याला आपण अग्निदेवता म्हणतो कारण त्यात सतत
अग्निस्फोट होतच असतात म्हणूनच ‘तेज’ निर्माण होते. परमेश्वराची रुपे म्हणजेच पंचमहाभूते असे आपण मानतो (पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश.) American Prometheus
म्हणजे अमेरिकन अग्निसूर्य. अमेरिकन अणुस्फोटाचा निर्माता
ओपनहायमर. त्यामुळेच Prometheus ह्या शब्दाचा उपयोग लेखकांनी केला असावा. त्यांना हेच
अभिप्रेत असावे, असे दिसते.
हिरोशिमावर हा अणुस्फोट झाल्यानंतर आणि तेथील
जीवितहानी बघितल्यानंतर ओपनहायमर म्हणाला, “I am become death, the
destroyer of the world’s”? श्रीकृष्णाचा अर्जुनाशी झालेला संवाद
त्यांना आठवला. ह्या अग्निसूर्याच्या स्फोटातील मनुष्यहानी बघून त्यांना गीतेची
आठवण झाली. त्यांनी गीतेचा अभ्यास केला होता. त्यांना गीतेतील खालील श्लोकांची
आठवण झाली.
मी काळ लोकांतक वाढलेला I
भक्षावया सिद्ध इथे जनांस II
नष्ट होतील तुझ्या विना हि I
झाले उभे जे उभयत्र वीर II
तो अणुस्फोट व त्याचे परिणाम बघून ओपनहायमरला वाटले
..
जसे नद्यांचे सगळे प्रवाह I
वेगे समुद्रांत चि धावं घेती II
तसे तुझ्या हे जळत्या मुखांत I
धावूनी जाती नरवीर सारे II
(संदर्भ: विनोबांची “गीताई” किंवा सोपनदेवाची “सोपानदेवी”)
ओपनहायमर यांना त्या अणुस्फोटाची भयानकता लक्षात आली.
ते विषण्ण झाले. म्हणूनच त्यांना गीतेतील वरील तत्वज्ञानाची प्रकर्षाने आठवण झाली
असावी.
ओपन हायमर एक ज्यू. त्यांचे आई-वडील अमेरिकेत स्थाईक
झालेले. त्यांनी व्यवसायात बऱ्यापैकी धनसंपत्ती जमा केली होती. ओपनहायमर
शिक्षणासाठी इंग्लंडच्या Cavendish प्रयोगशाळेत काम करीत होते. त्यांचे मन प्रयोगशाळेत फारसे रमत नसे. Patrick Blackett हा त्यांचा
प्रयोगशाळेतील शिक्षक. काही कारणामुळे ते त्याच्यावर रागावलेले असावेत. त्यांनी
रागाच्या भरात त्यांच्या शिक्षकांच्या सफरचंदला एक विषारी Injection दिले. शिक्षकांनी ते सफरचंद खाण्यापूर्वीच
ओपनहायमरला त्यांची चूक लक्षात आली व त्यांनी ते सफरचंद शिक्षकाच्या हाती पडू दिले नाही. असे होते विद्यार्थीदशेतील ओपनहायमर!
त्यांचे मन इंग्लंडच्या शिक्षणात रमले नाही. Niels Bohr, Enrico
Fermi, Einstein, Heisenberg या शास्त्रज्ञांनी
गाजविलेला तो काळ होता. ओपनहायमर त्यानंतर जर्मनीला पदार्थविज्ञान शास्त्रात Ph.D. करण्यासाठी गेले. ते University of Gottingen मध्ये Max Born यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करीत होते. त्यांना २२ व्या वर्षीच
पदार्थविज्ञान शास्त्रात डॉक्टरेट मिळाली. अमेरिकेत परतले ते एक नावाजलेले
शास्त्रज्ञ म्हणूनच. १९२०च्या आसपास पदार्थविज्ञान शास्त्रात Quantum Mechanics हे नवे संशोधन
क्षेत्र सुरू झाले. जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे अमेरिकेने अणुबॉम्ब निर्मिती
करण्याचे ठरविले होते. न्यू मेक्सिको येथिल Los Alamos येथे अणुबॉम्ब निर्मितीसाठी मोठी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली होती. त्या
प्रयोगशाळेचे मुख्यप्रमुख म्हणून ओपनहायमर यांची नेमणूक करण्यात आली. त्या संशोधन
केंद्रात ४००० वैज्ञानिक/तंत्रज्ञ काम करीत असत. त्यावेळी अमेरिकेने
शास्त्रज्ञांची एक मोठी साखळी निर्माण केली. Hans Bethe, Philip
Morison, Herbert York, George KristiyaKowaski यासारख्या
शास्त्रज्ञानी ओपनहायमरच्या नेतृत्वाला तेव्हा सलाम केला होता. Niels Bohr हा ओपनहायमरचा शिक्षक आणि मार्गदर्शक. त्यांची खास मैत्री होती. त्याने
अनेक वेळा अणूसंशोधन केंद्राला भेट दिली होती व संशोधनात मार्गदर्शन केले होते.
प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइनचा अणूविज्ञान क्षेत्राशी तसा फारसा
संबंध नव्हता. पण त्यांनी अमेरिकन अध्यक्षाना पत्र लिहून अमेरिकेने अणुबॉम्ब
निर्मिती करावी असा सल्ला दिला होता. कारण त्यावेळी जर्मनी हा एक युद्धखोर देश
होता व या क्षेत्रात खूप पुढे होता. आइनस्टाइन हा तसा ओपनहायमरचा मित्र होता व
त्यांची विविध विषयावर चर्चा होत असे. या सिनेमात ते दोन तीन शॉटमध्ये दाखविले
आहे.
ओपनहायमरच्या सहवासात दोन स्त्रिया आल्या होत्या.
त्याची पहिली प्रेयसी Jean Tatlock आणि दुसरी Kitty. किटी बरोबर त्याचे लग्न झाले होते. Jean Tatlok वर त्याचे प्रेम
होते पण तिने विवाह करण्यास नकार दिला होता. या दोन्ही स्त्रिया चित्रपटात दिसतात.
The Trouble with Oppenheimer is that he loves a woman who does not love
him or marry him. या दोन्ही स्त्रिया कम्यूनिस्ट कार्यकर्त्या होत्या. त्याच कारणामुळे नंतर
सरकारने त्याच्यावर देशद्रोहाचा खटला भरला होता. ओपनहायमर यांचे रशिया किंवा
जर्मनी बरोबर लागेबांधे असावेत असा एक संशय पसरला होता
ओपनहायमरचे आयुष्य, त्याच्या जीवनातील
अनेक चढउतार, त्याने मिळविलेले यश, अणुस्फोट
झाल्यानंतर लाखो लोकांच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत, असे सतत वाटत असल्यामुळे त्याच्या मनात निर्माण झालेली विषण्णता, - म्हणजे हा चित्रपट. Oppenheimer’s creation of atom bomb
was a Faustian bargain. It was based on his knowledge of physics and not for
power or riches. It was for his own country. Oppenheimer stood for “Nuclear
Ethics” after explosion of Atom Bomb.
मी या लेखाच्या दुसऱ्या भागात Manhattan projectवर आणि तिसऱ्या भागात त्याच्यावर
चाललेल्या देशद्रोही खटल्यावर लिहिणार आहे.
(फोटो: गुगल वरुन घेतले आहेत)
*****
No comments:
Post a Comment