नर्मदा - भेडाघाट |
पाण्यांच्या प्रवाहांत त्या रंगाच्या छटा ज्या कांहीं अवर्णनीय दिसतात |
अन् त्या टेकड्यांचे रंगही किती मजेदार म्हणू सांगू? कोठे काळाकभिन्न तर कोठे हिरवागार, कोठे पांढरा शुभ्र तर कोठे लालभडक, कोठे निळसर तर कोठे जांभळट |
अनेक टेकड्यांशी गप्पगोष्टी करीत द्रुतगतीने नर्मदा वहाते आहे. |
प्रतिक्षणी नवीनता! प्रतिक्षणी नवा साज! प्रतिक्षणी नवा वेश! |
नर्मदेचे स्वरुपवैचित्र्य तसे संपतच नाही. |
सौंदर्याची जी नवीनता, ती ही नर्मदातटाकीच्या प्रत्येक कणाकणांत मुसमुसलेली आहे! |
'प्रतिक्षणं नवताम्' म्हणून सुंदर. |
नर्मदेजवळ निसर्गरम्य कल्याणकारकता आहे! |
नर्मदा तरुण झाली आहे. बाल्याचा अवखळपणा संपला आहे. तारुण्यातील ते विलोभनीय सौंदर्य. शरिराचा नीटनेटकेपणा, चापल्य आणि बल. असे हे ओजस्वी रुप. रेखीव पात्र. ठसठशीत, नीटनेटके. |
नर्मदेकडे शिशूचे सारल्य आहे, अवखळपणा आहे, रुसणे आहे, फुगणे आहे, नर्मदा रुसली म्हणजे उन्हाळ्यात दिसेनाशी होते. |
भेडाघाटला नर्मदेत संगमरवर सांपडतो, पण त्यांना ही अंदरकी बात काय माहीत? |
नर्मदेच्या ह्या काठावर बसून राहावे असेच वाटत रहाते. |
आता पसरली आहेत ही आजूबाजूची शहरे, |
चापल्य आणि बल!
जबलपुराजवळ भेडाघाटी नर्मदा दर्शन विलोभनीय आहे.
एक मोठा खडक आडवा आला वाटेत.त्याला वाटले, सासरी जाणार्या या देवकन्येशीं दोन गोष्टी बोलता आल्या, तर पहाव्या.
पण तेजस्विनी नर्मदा! ती त्या खडक्याचे ते औध्दत्य सहन करते काय? छे! एका धडकेसरशी त्या खडकाचे भव्य शरीर विदीर्ण करून चपलतेने स्वता:ची वाट काढीत आणि त्याच्यावर गुरगुरत नर्मदा जी निघाली, ती कसची येते त्याच्या हातीं? त्या नर्मदेने दिलेल्या धडकेने तो खडक पांढरा फिटुक पडला आहे! जा अजून जा पहा तिथे. तो पांढरा पडलेला खडक , आणि नर्मदेचे गुरगुरणें, दोन्ही पाह्यला सापडतील तुम्हांला.
लोक म्हणतात, भेडाघाटला नर्मदेत संगमरवर सांपडतो, पण त्यांना ही अंदरकी बात काय माहीत?
नर्मदेजवळ निसर्गरम्य कल्याणकारकता आहे!
सौंदर्याची जी नवीनता, ती ही नर्मदातटाकीच्या प्रत्येक कणाकणांत मुसमुसलेली आहे!
प्रतिक्षणी नवीनता! प्रतिक्षणी नवा साज! प्रतिक्षणी नवा वेश!
नर्मदेत अमरकंटकाजवळ शिशूचे सारल्य आहे, अवखळपणा आहे, रुसणे आहे, फुगणे आहे, नर्मदा रुसली म्हणजे उन्हाळ्यात दिसेनाशी होते.
नर्मदा इतस्तत: वाहिली आहे अमरकंटकाजवळ.
नर्मदेच्या मूळ प्रवाहाला असंख्य जलप्रवाह येवून मिळतात तेंव्हा ' मय्या रो रही है! ',असेच वाटू लागते.
भगवान शंकर नर्मदेला तिच्या पतिगृही पाठवीत आहेत म्हणून ती रडते आहे! निसर्गसुंदरता ही त्यामुळे.
भरुचला जसजसा समुद्र जवळ येत जातो, तसतशी नर्मदेच्या गतीत पतिगृही जाणार्या युवतीची मंथरता ,मंदत्व आलेले आढळेल.
अमरकंटकाजवळील नर्मदेचा तो अवखळपणा, भेडाघाटजवळील तिची चपळता आणि भरुचजवळील गुर्जर युवतीसारखी गजगती आणि उदारता मोहमयी आहे.
नर्मदेचे स्वरुपवैचित्र्य तसे संपतच नाही.
प्रतीवर्षी नवी लेणी लेत असलेली नर्मदा! गतवर्षी एका ठिकाणी पर्वतप्राय वाळूचा ढिगारा दिसेल ,तर या वर्षी त्याच ठिकाणी महामूर खोल पाणी असलेला डोह दिसेल.
स्रुजन आणि संहार! उभविध सामर्थ्य असलेली ही नर्मदा!
विविध रूपे असलेली ही नर्मदा!
'असें सुंदर पाणी कधीच पाहिले नव्हते', असे तुम्ही सहज म्हणून जाल. 'प्रतिक्षणं नवताम्' म्हणून सुंदर.
खरोखरच सुंदर आहे नर्मदा!