Hire , Fire and Resignation for better prospects
Once, I was traveling to USA with the Director of my company which is one of the leading companies of India. We were visiting a American technology company in which he had interest of collaboration or representation in India. During the conference meeting , he introduced me in a American way. He said," We have recently hired Dr Gangakhedkar for this project". I was young and surprised with the word "HIRE". I did not like the word as we generally use it for hiring taxi. Later on ,I realized that it is a common word used in USA.
After a few days , one of my co-worker left the company and I was with the same boss and he reacted, " Doctor, I have fired him as he was not giving required results". I understood the meaning of "Hire and Fire" policy. After a few days, another co-worker left for the better prospects. The same boss gave me a reaction on my co-worker's leaving the company. He said," Dr. I do not care for anyone who leaves the company for better prospects .If some one gets the Moon, he should go. I will not stop him. I have no problem. I cannot offer him the Moon". I understood the meaning of " Hire, Fire and Resignation for better prospects". That day , I decided that after gaining sufficient experience in industry , I will stop working for someone and will work for myself. I will be my Boss. There is nothing like working for yourself. It is a hard learning.
उद्योजक आणि सत्ताधारी
उद्योगपतींना कोणताही पक्ष नसतो .त्यांना सर्व पक्ष सारखेच असतात . ते सत्तेवर असलेल्या सर्व पक्षांना मदत करीत असतात .
प्रत्येक उद्योगपतीकडे दोन तीन माणसे असतात ज्यांची निरनिराळ्या पक्षातील प्रमुख व्यक्तींशी चांगली ओळख असते . ते सत्तेत असलेल्या पक्षाकडे संपर्क साधतात आणि आपली कामे करून घेतात .
कॉंग्रेस सत्तेवर असली की एक अधिकारी संपर्क साधतो . जनता पक्ष सत्तेवर असला की एक अधिकारी संपर्क साधतो . भाजप सत्तेवर असला की एक अधिकारी संपर्क साधतो . सगळी कामे अगदी सहज होतात . असेच एक उद्योगपती . केंद्रात सरकार बदलले की त्यांचा सीइओ बदलत असे. कॉंग्रेसचा अर्थमंत्री आला की एक अधिकारी. जनता राजवटीत एक अधिकारी. मी ह्या अधिकार्यांना भेटलो आहे . राजवट बदलली की त्यांची इतरत्र बदली होत असे किंवा काहीच काम नसे . उद्योगपतींना असे करावेच लागते . नाहीतर उद्योग बंद पडतील . त्यांना जात नसते ,धर्म नसतो .पक्ष नसतो . ते सर्व पक्षांचे मित्र असतात . ते साम्यवादी आणि समाजवादी पक्षाचे सुद्धा जवळचे मित्र असतात .
उद्योग आणि कामगार
काल चेन्नईला व्यावसायिक कामासाठी गेलो होतो .एका कारखान्याला भेट दिली .दुपारी लंच मीटिंगमध्ये काही अधिकाऱ्यांशी इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या . विषय कामगारासंबंधी निघाला . तामिळनाडूत तामिळ कामगार किंवा स्थानिक कामगार मिळत नाहीत, अशी माहिती मिळाली . मला थोडे आश्चर्य वाटले .असे कसे ? कामगारांमध्ये ओरिसा आणि प .बंगालच्या लोकांचे प्रमाण वाढत आहे .लक्षणीय आहे.तामिळ कामगार मिळत नाहीत . ते आळसी झाले आहेत .त्यांना काम करायचे नाही . २ रु किलो तांदूळ मिळतो .१० रुपयात अम्मा किचनमध्ये इडली - वडा खायला मिळतो . केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध सामाजिक योजना, मनरेगा वगैरे योजनात पैसे मिळतात . ते पुरतात . त्यांना कामगार म्हणून काम करायचेच नसते . नवीन शिकायचे नसते . यंत्र चालवायची नसतात . रात्रपाळी करायची नसते . सरकारने दिलेल्या २ रु किलो तांदळावर त्यांचे भागते .असे हे स्थानिक कामगार . त्यांना गरिबीतून बाहेर काढण्याच्या ऐवजी गरिबीतच ठेवणाऱ्या सरकारच्या सामाजिक कल्याण योजना .शेतकऱ्यांच्या ७० / ४० हजार कोटीच्या कर्जमाफी योजना अशाच गरिबाला गरिबीत ठेवणाऱ्या . लोकांना काम नको आणि फुकटचे स्वस्त धान्य हवे . जी राज्ये अविकसित आहेत त्या राज्यातील लोक मात्र दुसऱ्या राज्यात जाऊन काम मिळवताना दिसतात . ज्या राज्यात विकासाची कामे चालू असतात तेथील स्थानिक लोक मात्र आळसी .काम मिळत असूनही काम न करणारे . महाराष्ट्रातही वेगळे चित्र नाही . अम्माच्या कृपेने येथे दहा रुपयात जेवण मात्र मिळत नाही .२ रु किलो तांदूळही मिळत नाही . असे राजकीय नेते .गरिबीचे राजकारण करून स्वतः ची सत्ता टिकविणारे . लोकांना भिकेला लावणारे .लाचार बनविणारे .गुंड बनविणारे व त्यांचा उपयोग करून घेणारे .
सौदी अरेबियातील भारतीय
हैद्राबादच्या हुसैन मध्ये दिसला जावेद अख्तर .
मी व्यवसायानिमित्त जगभर फिरलो . सर्वत्र तेथे स्थाईक झालेले किंवा पैसा मिळवण्यासाठी नोकरी करणारे भारतीय भेटले . २५- ३० वर्षापूर्वी गल्फ मधील देशाचे एव्हढे आकर्षण नव्हते . खनिज तेलामुळे समृद्धी आलेले हे इस्लामिक देश . ड्रायव्हर पासून कंपनी सी इ ओ पर्यंत माणसांची गरज . ज्यांना इंग्लंड - अमेरिका जमले नाही ते तेथे गेले . भरपूर पैसा कमवतात . अधून मधून भारतात कुटुंबाला भेटायला येतात . पैसा पाठवीत असतातच .गल्फ मध्ये फार उशिरा गेलो .
ह्या भारतीयामध्ये मुस्लिम तरुण खूप असतात . हैद्राबाद ,अलिगढ ,झारखंड ,केरळ ,तामिळनाडू ,प बंगाल आणि कश्मीर . सर्व प्रांताचे .
असाच एक तेथे १५ वर्षे वास्तव्य असणारा हैदराबादचा मुस्लिम भारतीय भेटला . त्याची बायको - मुले हैदराबादेत . मुलीला चांगले शिक्षण त्या देशात मिळणे शक्य नाही म्हणून बायको तेथे त्याच्याबरोबर राहू शकत नाही असा त्याचा प्रश्न . बोलता बोलता तो म्हणाला ,' सारे जहांसे अच्छा ,हिंदोस्ता हमारा .मी म्हातारपणी इथे राहणार नाही . थोडे दिवस नोकरी करून पैसे मिळवणार आहे . मला मरण भारतात हवे .माझी कबर भारतात हवी. त्या जमिनीत मला शांत व्हायचंय '. मला त्याचे देशप्रेम त्याच्या शब्दात नव्हे तर त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते . तो देशप्रेमी चेहरा मी कधीच विसरणार नाही .
इतरही तरुण मला भेटले . त्यांची घालमेल दिसून आली . इतर देशात गेलं की आपण अधिकच देशप्रेमी होतो . मनात हैदराबादचा ओवैसी आणि गल्फ मधला हैद्रबाद्चाच हुसैन उभा राहतो तेव्हा मला हुसैन मध्ये जावेद अख्तर दिसतो .
( १७ मार्च २०१६, माझे फेसबूक स्टेटस )