कादंबरी वाचानाकडून लघुकथा वाचनाकडे केलेला प्रवास वेगळा
असतो. लघुकथा वाचायला कमी वेळ लागतो.
कादंबरीचा आकार पसरट असल्यामुळे पानांची संख्या खूप असते . धावपळीच्या जगण्यात वेळ
तसा कमी असतो आणि मग वाचन टप्प्याटप्प्याने करावे लागते . त्यामुळे मला लघुकथा हा
प्रकार अधिक आवडतो. महाविद्यालयीन जीवनात
आम्हाला पांच लघुकथाकार हे पुस्तक होते . त्यातील अरविंद गोखले आणि वामन चोरघडे हे
दोन कथाकार त्यावेळी खूप आवडून गेले. त्यानंतर अनेक कथाकार वाचत गेलो . नंतर कादंबरी वाचनाकडेही वळलो . दीर्घकथा हा प्रकार ही वाचत गेलो. दीर्घकथा
हा प्रकार कमी पसरट असल्यामुळे तो अधिक
आवडत गेला .
झुम्पा
लहिरी ही खर्या अर्थाने वैश्विक कादंबरीकार . Namesake आणि The Low Land ह्या त्यांच्या
दोन प्रसिद्ध कादंबरया वाचल्या होत्या . ह्याच लेखीकेचे Hell – Heaven हे दीर्घकथा असलेले पुस्तक किंडलवर डाऊनलोड केलं
आणि एका दमात वाचून टाकलं . Frank O’ Connor International Story Award मिळवणारी ही
कथाकार तशी कादंबरीकार म्हणून खूपच प्रसिद्ध आहे. तिच्या साहित्याचा आवाका मोठा
आहे . तिच्या साहित्यातून एकाचवेळी बंगाली ( भारतीय ) आणि अमेरिकन जीवनाची ओळख होते.
तिच्या कथा – कादंबर्यातून NRI आणि
अमेरिकन अशी दोन्ही पात्रे भेटतात . ही कथा लेखिका एका अमेरिकेत स्थाईक झालेल्या बंगाली
कुटुंबातील आहे . त्यामुळे तिला दोन्ही संस्कृतीची चांगली ओळख आहे . भारतीय
कुटुंबे अमेरिकेत स्थाईक झाल्यावर त्यांची दुसरी – तिसरी पिढी एका वेगळ्या तणावात
जगत असते . त्याचेच चित्रण तिच्या साहित्यातून होत राहते . तिच्या साहित्यातून आपण प. बंगाल मधील शहरातून
/ खेड्यातून फिरून येतो आणि अमेरिकन जीवनातील विविध रूपे पहात जातो. ह्या दोन
संस्कृतीतील फरकामुळे तेथील स्थाईक झालेल्या भारतीय कुटुंबातील ताणतणाव आपल्या लक्षात येतात. ज्यांनी
अमेरिकेत स्थाईक झालेल्या भारतीय कुटुंबाना जवळून पाहिलं आहे त्यांना हे साहित्य
अधिक भावतं .
अशाच एका बंगाली दाम्पत्याची उषा नावाची मुलगी
ही दीर्घकथा आपल्याला सांगत जाते. आपले आई-वडील भारतीय असल्यामुळे वर्षानुवर्षाच्या सहवासाने एकत्र राहिल्यामुळे एकमेकावर
सहज प्रेम करू लागतात हे ह्या मुलीच्या फार उशिरा लक्षात येतं, लहान असताना आई –
वडिलांचा दुरावा तिच्या सहज लक्षात येतो आणि आपली आई त्यांच्या घरी येणाऱ्या वडिलांच्यापेक्षा
खूप लहान असणाऱ्या एका बंगाली तरुणाच्या प्रेमात कशी पडते , हे तिला लहान असतानाच जाणवते. त्यांची प्रेम कहाणी ती आपल्याला सांगत जाते . तिचे वडील मात्र आपण संशोधनात गर्क असल्यामुळे आपल्या पत्नीला कोणीतरी कम्प्यानियन
मिळाला म्हणून त्या तरुणाकडे पहातात असे
तिला जाणवते . माणूस आणि नाती तशी अगम्य आहेत. एकांडा पुरुष असाही असतो हेच ह्या
कथेत दिसून येतं . पुढे हा तरुण एका अमेरिकन मुलीबरोबर लग्न करून संसार करू लागतो .
इथे आपल्याला तेथील अमेरिकन जीवनाची ओळख होत जाते आणि त्या तरुणाला पुढे घटस्फोट घेऊन वेगळे जीवन
कसे जगावे लागते ते ह्या कथेत चित्रित केलं आहे . एकाच वेळी हेल आणि हेवन असा दोन्हीचा
अनुभव जगताना येणे हाच ह्या कथेचा आत्मा आहे.
कथा खूप प्रवाही आहे . अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय माणसांची घुसमट सांगणारी ही
कथा आहे . शेवटी हे चांगले की ते चांगले असा प्रश्न उभा करते . हा अमेरिकेत स्थाईक
झालेल्या भारतीय माणसांचा शोध खूप छान घेतला आहे .
No comments:
Post a Comment