Friday, August 18, 2023
ओपनहायमर - ३
Wednesday, August 9, 2023
ओपनहायमर - २
( चित्रपट पाहिल्यानंतर Los Alamos येथील प्रयोगशाळेबद्दल मिळवलेली माहिती )
न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात अमेरिकन सरकारने Los
Almos येथे अणुबॉम्ब निर्मितीसाठी एक संशोधन केंद्र उभारले होते. Manhattan
Project प्रोजेक्ट असे त्याला नाव दिले होते. त्या प्रकल्पाचे
प्रमुख होते जॉर्ज रॉबर्ट ओपनहायमर. त्या प्रयोगशाळेत रॉय ग्लुबेर हे शास्त्रज्ञ काम करीत होते. Atomic
Scientists ह्या नियतकालिकाच्या जुलै २०२३च्या अंकात त्यांची एक
मुलाखत Dan Drollette Jr. यांनी घेतली
आहे. Memories of Oppenheimer या लेखात
ते म्हणतात “Oppenheimer did not speak the ordinary language”. Roy J. Glauber यांनी हार्वर्ड विद्यापीठातून Ph.D. पूर्ण केले
होते. त्यावेळी तेथील प्रयोगशाळेतील Hans Bethe यांच्याबरोबर
ते काम करीत होते. त्या प्रयोगशाळेत १४०० शास्त्रज्ञ काम करीत होते. २००५ मध्ये Glauber
यांना पदार्थविज्ञानात नोबेल पुरस्कार मिळाला होता. ह्या मुलाखतीत
त्यांनी अणुबॉम्ब निर्मिती करताना त्यांना जो अनुभव मिळाला त्यासंबंधीची माहिती दिली
आहे. त्यावेळी त्यांना ओपनहायमर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव मिळाला. अर्थात
या क्षेत्रात काम करताना खूप गुप्तता पाळावी लागते. त्यामुळे सर्व माहिती अशा मुलाखतीत
मिळू शकत नाही. त्या मुलाखतीच्या आधारावर जी माहिती मिळाली ती येथे संक्षेपात देत
आहे.
Dorothy McKibbin ही ओपनहायमर यांची सचिव होती.
त्यांना ह्या प्रकल्पाची संपूर्ण माहिती होती. सांता फे येथील कार्यालय त्या बघत
असत. Richard Feynman हा एक प्रमुख शास्त्रज्ञ त्याच
प्रयोगशाळेत काम करीत होता. Feynman यांनी पदार्थविज्ञान विषयावर
अनेक पुस्तके लिहिली आहेत. पदार्थविज्ञानशास्त्राच्या विद्यार्थ्याना हे चांगलेच
माहीत आहे. आम्ही ती पुस्तके अभ्यासली आहेत. तरुण Feynman हे
एक विनोदी व्यक्तिमत्व होते. Glauber यांनी Feynmanच्या विनोदी स्वभावाचे खूप कौतुक केले आहे. त्यामुळे तेथील वसतीगृहातील ते
एक आवडते शास्त्रज्ञ होते. तेथील शास्त्रज्ञांच्या गप्पा रंगून जात असत ते
त्यांच्या विनोदी बोलण्याने. त्यांच्या गप्पामध्ये सतत हास्यकारंजी उडत असत. खरे
म्हणजे Feynman हे एक बुद्धिमान गणीतज्ञही होते. अणुबॉम्ब
पूर्वी जी Trinity Test झाली होती ती
दूरच्या अंतरावरून कारमध्ये बसून बघणारे Feynman हे एकटेच
शास्त्रज्ञ असावेत. त्यावेळी Glauber हे १८ वर्षाचे हुशार
विद्यार्थी होते. त्या प्रयोगशाळेत कोण शास्त्रज्ञ काय काम करतो?, हे बाजूच्या
शास्त्रज्ञालाही माहीत नसे. तेथे इतकी गुप्तता पाळली जात असे.
१९३० च्या आसपास Enrico Fermi या अणूशास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा उपयोग करून यूरेनियम विघटणावर काम सुरू केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नव्या अणूकणांचा शोध लावला होता. युरेनियम फिशनप्रक्रिया त्यांनीच शोधून काढली होती. फिशन चेन रिअॅक्शनची प्रक्रिया सुद्धा त्यानीच शोधून काढली. त्या आधारेच अणुबॉम्ब निर्मितीचे काम तेथे सुरू झाले होते. त्यावेळच्या संशोधाकाना हे सर्व नवीनच होते. Nuclear Fissionया प्रतिक्रियेबद्दल त्यावेळी खूप गुप्तता पाळण्यात येत होती. तेथील शास्त्रज्ञांना आणि तंत्रज्ञांना असे वाटत असे की तेथे युद्ध तयारीसाठी काही अण्वस्त्र/क्षेपणास्त्रे निर्मिती चालू असावी. तेथे जे तरुण विद्यार्थी भरती केले जात होते त्यासाठी एक National Roster of Scientific Personnel तयार करण्यात आले होते. अनेक हुशार विद्यार्थी त्यांचा चालू असलेला अभ्यासक्रम सोडून ह्या प्रकल्पासाठी निवडले गेले व ते नेमके कशासाठी निवडले गेले याची ही त्यांना पूर्ण माहिती नव्हती. निवडल्यानंतर त्यांना ट्रेनचे तिकीट काढून दिले जात असे व त्यांचे सामान पोस्टाने पाठविले जात असे.
Albert Einstein and Robert Oppenheimer |
Glauberला शिकागो नंतर कुठे जायचे हेच माहीत नव्हते. आपण न्यू मेक्सिकोला जात आहोत, हे ही नीट माहीत नव्हते. त्याच्यासाठी सांता फे रेल रोडचा प्रवास नवीन होता. त्यांना स्टेशनवर भेटण्यासाठी आलेला एक तरुण पोरगा वेगळ्या रंगाची फर टोपी घालणारा होता व तो एक ब्लँकेट घेऊन त्याच्याकडे आला आणि त्यांना घेऊन पुढे निघाला. जेव्हा तो स्टेशनवर उतरला तेव्हा त्याला घेऊन जाणारा Lamy हा मुलगा पिवळ्या रंगाचा शर्ट घालून १० गॅलनची Hat घालुन त्याला शोधत आला होता. आणि तो मुलगा एक चांगला गणीतज्ञ होता. ते दोघे चालत असताना तो गणित या विषयावरच सारखा बोलत होता. त्याचे नाव होते न्यूमन. ते दोघे टेकडीवरच्या शास्त्रज्ञांच्या हॉस्टेलकडे जात होते. असे होते तेथील प्रयोगशाळेत काम करण्यासाठी आलेले नवे होऊ घातलेले शास्त्रज्ञ आणि त्यांचे जगणे. त्या ठिकाणी एका उंच टेकडीवर छोटी छोटी टुमदार घरे होती. तेथे मुलांच्या करिता शाळा होत्या. सुंदर
फ्लॅटस असलेल्या छोट्या छोट्या अनेक
इमारती होत्या. तेथे राहणाऱ्या शास्त्रज्ञांच्या छोट्या कुटुंबाची थोड्याच दिवसात मोठी
कुटुंबे झाली. काही दिवसातच तेथील छोट्या प्रसूतीगृहाचे रूपांतर एका मोठ्या
प्रसूतीगृहात झाले होते यावरून लक्षात येईल की तेथील तरुण वैज्ञानिकांचा विरंगुळा काय
होता. तो गजबजलेला भाग झाला होता. तेथे यु.एस.आर्मी असल्यामुळे लष्करी सैनिकांची
संख्या सारखी वाढत होती. असा तो गजबजलेला Los Almos चा
परिसर. एका शास्त्रज्ञाला दूसरा शास्त्रज्ञ काय काम करतो आहे?, याची काहीही कल्पना नव्हती. अनेक विद्यापीठातील
नावाजलेले पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ आणि गणितशास्त्र प्राध्यापक त्यांच्या विद्यापीठाची
नोकरी सोडून येथे आले होते व त्यांच्या हाताखाली तरुण विद्यार्थी मदतनीस म्हणून
काम करीत होते. नवीन विद्यार्थ्याना काही दिवस विविध विभागात ट्रेनिंग दिले जात
असे. आपण तेथे काय काम करणार आहोत?, व कशा करिता निवडले गेलो आहोत याची त्यांना काहीही
कल्पना नव्हती. तेथील वाचनालय फार छान होते. पण तेथे जी गुप्त कागदपत्रे ठेवली
होती ती फक्त ठराविक शास्त्रज्ञांनाच मिळत असत. काही दिवसांनी वरिष्ठ वैज्ञानिक
तरुण सहाय्यकाला आपण कोणते काम करणार आहोत याची थोडीशी कल्पना देत असत. बऱ्याच
तरुण शास्त्रज्ञांना हे खूप उशिरा समजत असे. जेव्हा Glauberला
समजले की अणुबॉम्ब निर्मितीचे काम तो करणार आहे तेव्हा तो काहीसा अपसेट झाला. पण
त्याची प्रतिक्रिया अशी होती – “I was really quite upset by that – the
notion that this was not going to be so much about a gift to mankind, but a
weapon. And it did take some weeks and
months to overcome that feeling … and to discover that
there were really interesting mathematical problems involved in making this
bomb. त्यांचे संशोधन विविध विषयावर व विविध अंगाने चालू असे. That
kept him busy for next two years. तेथे वयोवृद्ध नागरिकांना
प्रवेशच नसे आणि त्यांना कसलीही नोकरी देत नसत. या वसाहतीचे सगळेच गूढ होते. तेथे दळणवळणाची
फारशी सोय नव्हती. फारच थोड्या लोकांच्या जवळ मोटारी होत्या. वाहने अशी नव्हती.
रस्ते ही फारसे चांगले नव्हते. तेथे रेशनिंग होतं. गॅसची उपलब्धता कमी होती. फोन /
रेडिओ संपर्क नव्हता. ते अतिशय गुप्त ठिकाण होते. इतराना तेथे जाण्यास बंदी होती. अतिशय
कडक सुरक्षाव्यवस्था होती. हे सर्व जाणून
घ्यायचे असेल तर वर उल्लेख केलेल्या नियतकालिकातील Glauberची
मुलाखत असलेला लेख वाचावा. Glauberला ओपनहायमर बद्दल विचारले
असता तो म्हणाला, “Oppenheimer was an ultra-intellectual American, and he
loved to express himself in poetic images and phrases. When Oppenheimer was in
college – I think it took him only three years to go through Harvard – he
developed the knack of reading Sanskrit and a passion of Indic poetry.
Oppenheimer was a very different personality. He did not sound like a typical
American Leader at all. He was about as opposite an individual as you could
imagine from General Groves, the head of military side of operations. They were
like two polar opposites. They often appeared together in public – the leader
of science and the leader of the military. They were very careful that at
important, strategic times, they would both appear together”.
तेथे अनेक स्त्री वैज्ञानिक/तंत्रज्ञ संशोधन करीत होत्या. Maria Goeppert Mayer या तेथे काम करणाऱ्या स्त्री वैज्ञानिकेला १९६३ साली नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांनी येथील प्रकल्पात अतिशय महत्वाची भूमिका निभावली होती. तेथे एक लायब्ररियन स्त्री (Charlotte Server) होती. ती ओपनहायमरचीची खास सल्लागार होती. तिचा उल्लेख त्यांनी अनेकदा केला होता. लिली होरनिग ह्या झेक-अमेरिकन स्त्री वैज्ञानिकेने या प्रकल्पात अतिशय महत्वाचे काम केले होते. तिने प्लुटोनियम ह्या रसायनावर काम केले होते. तिचे पती डोनाल्ड होरनिग यांना तेथेच नेमणूक मिळाली होती. Katherine “KITTY” Opppenheimer was a German- American botanist and she played a role of wife of Los Almos Scientific Direcor J. Robert Oppenheimer. तेथील प्रयोगशाळेत Elezabeth Riddle Graves या स्त्री वैज्ञानिकेने जेव्हा पहिला चाचणी अणूस्फोट (Trinity) झाला तेव्हा दूरच्या अंतरावरून चाचणी प्रयोगात भाग घेतला होता. आणि त्यावेळी ती गरोदर होती. अलिस स्मिथ आणि तिचा नवरा हे दोघेही ह्या प्रयोगशाळेत संशोधन करीत होते. त्यावेळीच त्यांच्या लक्षांत आले होते की तेथे जगाची प्रचंड हानी करणारे एक अण्वस्त्र निर्माण करण्याचे प्रयोग चालू आहेत. त्यामुळे जग उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. अनेक लोक मृत्युमुखी पडणार आहेत. ती Nuclearismची ती सुरुवात आहे असे त्यांना व तेथील काही शास्त्रज्ञांना वाटू लागले होते.पहिल्या अणुबॉम्ब चाचणी स्फोटाचे Code Name होते Triniti. १६ जुलै १९४५ला सकाळी ५ वाजून २९ मिनिटांनी हा अणुस्फोट करण्यात आला. Los Almos पासून २१० मैलावर हा स्फोट करण्यात आला. तो अणुस्फोट २५ किलोटन टीएनटी क्षमतेचा होता. यू.एस.आर्मीच्या सहकार्याने तो स्फोट घडवून आणण्यात आला होता. जेव्हा Trinityचा चाचणी अणुस्फोट झाला तेव्हा वीजा चमकत होत्या. पाऊस पडत होता. रात्रभर काम करून सकाळी ५:३० वाजता काही शास्त्रज्ञ त्या ठिकाणाहून त्यांच्या घरी परतले होते. वीज ज्या ठिकाणी पडली होती त्याच्या जवळच चाचणी अणुबॉम्ब ठेवला होता. एका १०० फुट उंचीवरील टॉवरवर अणुबॉम्ब ठेवला होता. वीज जर त्यावर पडली असती तर एक मोठे संकट निर्माण झाले असते. काही शास्त्रज्ञ चाचणी अणुस्फोट कसा होतो?, हे पाहण्यासाठी तेथेच दुरवरच्या अंतरावर थांबले होते. जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा Enrico Fermi, Hans Bethe, Richard Feynman, Leslie Groves, Robert Oppenheimer, Frank Oppenheimer, Geoffrey Taylor, Richard C.Tolman, Edward Teller, आणि John Von Neumann हे शास्त्रज्ञ स्फोटाच्या जागेपासून दूर अंतरावर उभे होते. त्यांच्या प्रयत्नाना मिळालेल्या यशामुळे ते खूप आनंदी होते.
वर उल्लेख केलेल्या मुलाखतीत पत्रकाराने Glauber या शास्त्रज्ञाला शेवटचा प्रश्न हायड्रोजन बॉम्ब बद्दल विचारला होता, तेव्हा
तो लगेच म्हणाला..
“Hydrogen
bomb has never done anybody any good. It does exist, and it is an enormous
threat, but it has accomplished nothing in constructive terms.
Nothing for science.
Nothing for anybody.
Nothing for security”.
*****
* All photos from Google
Saturday, August 5, 2023
ओपनहायमर - १
तुझा मुख ज्वाळ आणि जिव्हा चळण I
तेणे करूनी होतसे सर्व लोक ग्रासन II
त्या ज्वाळा भितरी त्रिभुवन I
ऐसे उग्र रूप विष्णू तुझे II
विनोबाची गीताई (अध्याय ११, श्लोक ३०-३२)
६ ऑगस्ट, १९४५ला सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी पहिला अणुबॉम्ब स्फोट झाला तो जपानच्या
हिरोशिमावर. त्यात एक लाख लोक मृत्युमुखी झाले. केवळ सहा लोकच जिवंत होते आणि
त्यांना असे वाटत होते की आपणच कसे जिवंत राहिलो. ७ ऑगस्टला जपानच्या लक्षात आलं
की एक नव्या प्रकारचा अणुस्फोट घडवून आणण्यात आला आहे व त्याची निर्मिती अमेरिकेने
केली आहे. सूर्यामध्ये रोज असंख्य अणुस्फोट होत असतात. त्याला अग्निसूर्य असे
म्हणतात. सूर्य म्हणजे अग्निसूर्य. ती एक अग्निदेवता. गीतेमध्ये त्या
अग्निसूर्याचे जे वर्णन केले आहे ते वर दिलेले आहे.
अमेरिकेने केलेल्या अणुस्फोटाचे जनक होते जॉर्ज रॉबर्ट ओपनहायमर. ते अणुबॉम्ब स्फोटाचे निर्माताप्रमुख होते. ते एक नावाजलेले पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ होते. त्या अग्निसूर्याची निर्मिती त्यांनी केली. त्यांच्यावर काढलेला “ओपनहायमर” हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. American Prometheus ह्या ओपनहायमर यांच्या चरित्रावर आधारित हा चित्रपट काढला आहे Christopher Nolan यांनी. चरित्र लेखक आहेत Kai Bird आणि Martin j. Smith. हे चारित्रात्मक पुस्तक म्हणजे, “It is triumph and tragedy of J Robert Oppenheimer”. हा एका वैज्ञानिकावर केलेला चित्रपट आहे. त्यामुळे काही लोकाना तो समजण्यास थोडासा कठीण आहे.
Prometheus म्हणजे God of Fire) - अग्निदेवता. अग्निसूर्याला आपण अग्निदेवता म्हणतो कारण त्यात सतत
अग्निस्फोट होतच असतात म्हणूनच ‘तेज’ निर्माण होते. परमेश्वराची रुपे म्हणजेच पंचमहाभूते असे आपण मानतो (पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश.) American Prometheus
म्हणजे अमेरिकन अग्निसूर्य. अमेरिकन अणुस्फोटाचा निर्माता
ओपनहायमर. त्यामुळेच Prometheus ह्या शब्दाचा उपयोग लेखकांनी केला असावा. त्यांना हेच
अभिप्रेत असावे, असे दिसते.
हिरोशिमावर हा अणुस्फोट झाल्यानंतर आणि तेथील
जीवितहानी बघितल्यानंतर ओपनहायमर म्हणाला, “I am become death, the
destroyer of the world’s”? श्रीकृष्णाचा अर्जुनाशी झालेला संवाद
त्यांना आठवला. ह्या अग्निसूर्याच्या स्फोटातील मनुष्यहानी बघून त्यांना गीतेची
आठवण झाली. त्यांनी गीतेचा अभ्यास केला होता. त्यांना गीतेतील खालील श्लोकांची
आठवण झाली.
मी काळ लोकांतक वाढलेला I
भक्षावया सिद्ध इथे जनांस II
नष्ट होतील तुझ्या विना हि I
झाले उभे जे उभयत्र वीर II
तो अणुस्फोट व त्याचे परिणाम बघून ओपनहायमरला वाटले
..
जसे नद्यांचे सगळे प्रवाह I
वेगे समुद्रांत चि धावं घेती II
तसे तुझ्या हे जळत्या मुखांत I
धावूनी जाती नरवीर सारे II
(संदर्भ: विनोबांची “गीताई” किंवा सोपनदेवाची “सोपानदेवी”)
ओपनहायमर यांना त्या अणुस्फोटाची भयानकता लक्षात आली.
ते विषण्ण झाले. म्हणूनच त्यांना गीतेतील वरील तत्वज्ञानाची प्रकर्षाने आठवण झाली
असावी.
ओपन हायमर एक ज्यू. त्यांचे आई-वडील अमेरिकेत स्थाईक
झालेले. त्यांनी व्यवसायात बऱ्यापैकी धनसंपत्ती जमा केली होती. ओपनहायमर
शिक्षणासाठी इंग्लंडच्या Cavendish प्रयोगशाळेत काम करीत होते. त्यांचे मन प्रयोगशाळेत फारसे रमत नसे. Patrick Blackett हा त्यांचा
प्रयोगशाळेतील शिक्षक. काही कारणामुळे ते त्याच्यावर रागावलेले असावेत. त्यांनी
रागाच्या भरात त्यांच्या शिक्षकांच्या सफरचंदला एक विषारी Injection दिले. शिक्षकांनी ते सफरचंद खाण्यापूर्वीच
ओपनहायमरला त्यांची चूक लक्षात आली व त्यांनी ते सफरचंद शिक्षकाच्या हाती पडू दिले नाही. असे होते विद्यार्थीदशेतील ओपनहायमर!
त्यांचे मन इंग्लंडच्या शिक्षणात रमले नाही. Niels Bohr, Enrico
Fermi, Einstein, Heisenberg या शास्त्रज्ञांनी
गाजविलेला तो काळ होता. ओपनहायमर त्यानंतर जर्मनीला पदार्थविज्ञान शास्त्रात Ph.D. करण्यासाठी गेले. ते University of Gottingen मध्ये Max Born यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करीत होते. त्यांना २२ व्या वर्षीच
पदार्थविज्ञान शास्त्रात डॉक्टरेट मिळाली. अमेरिकेत परतले ते एक नावाजलेले
शास्त्रज्ञ म्हणूनच. १९२०च्या आसपास पदार्थविज्ञान शास्त्रात Quantum Mechanics हे नवे संशोधन
क्षेत्र सुरू झाले. जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे अमेरिकेने अणुबॉम्ब निर्मिती
करण्याचे ठरविले होते. न्यू मेक्सिको येथिल Los Alamos येथे अणुबॉम्ब निर्मितीसाठी मोठी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली होती. त्या
प्रयोगशाळेचे मुख्यप्रमुख म्हणून ओपनहायमर यांची नेमणूक करण्यात आली. त्या संशोधन
केंद्रात ४००० वैज्ञानिक/तंत्रज्ञ काम करीत असत. त्यावेळी अमेरिकेने
शास्त्रज्ञांची एक मोठी साखळी निर्माण केली. Hans Bethe, Philip
Morison, Herbert York, George KristiyaKowaski यासारख्या
शास्त्रज्ञानी ओपनहायमरच्या नेतृत्वाला तेव्हा सलाम केला होता. Niels Bohr हा ओपनहायमरचा शिक्षक आणि मार्गदर्शक. त्यांची खास मैत्री होती. त्याने
अनेक वेळा अणूसंशोधन केंद्राला भेट दिली होती व संशोधनात मार्गदर्शन केले होते.
प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइनचा अणूविज्ञान क्षेत्राशी तसा फारसा
संबंध नव्हता. पण त्यांनी अमेरिकन अध्यक्षाना पत्र लिहून अमेरिकेने अणुबॉम्ब
निर्मिती करावी असा सल्ला दिला होता. कारण त्यावेळी जर्मनी हा एक युद्धखोर देश
होता व या क्षेत्रात खूप पुढे होता. आइनस्टाइन हा तसा ओपनहायमरचा मित्र होता व
त्यांची विविध विषयावर चर्चा होत असे. या सिनेमात ते दोन तीन शॉटमध्ये दाखविले
आहे.
ओपनहायमरच्या सहवासात दोन स्त्रिया आल्या होत्या.
त्याची पहिली प्रेयसी Jean Tatlock आणि दुसरी Kitty. किटी बरोबर त्याचे लग्न झाले होते. Jean Tatlok वर त्याचे प्रेम
होते पण तिने विवाह करण्यास नकार दिला होता. या दोन्ही स्त्रिया चित्रपटात दिसतात.
The Trouble with Oppenheimer is that he loves a woman who does not love
him or marry him. या दोन्ही स्त्रिया कम्यूनिस्ट कार्यकर्त्या होत्या. त्याच कारणामुळे नंतर
सरकारने त्याच्यावर देशद्रोहाचा खटला भरला होता. ओपनहायमर यांचे रशिया किंवा
जर्मनी बरोबर लागेबांधे असावेत असा एक संशय पसरला होता
ओपनहायमरचे आयुष्य, त्याच्या जीवनातील
अनेक चढउतार, त्याने मिळविलेले यश, अणुस्फोट
झाल्यानंतर लाखो लोकांच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत, असे सतत वाटत असल्यामुळे त्याच्या मनात निर्माण झालेली विषण्णता, - म्हणजे हा चित्रपट. Oppenheimer’s creation of atom bomb
was a Faustian bargain. It was based on his knowledge of physics and not for
power or riches. It was for his own country. Oppenheimer stood for “Nuclear
Ethics” after explosion of Atom Bomb.
मी या लेखाच्या दुसऱ्या भागात Manhattan projectवर आणि तिसऱ्या भागात त्याच्यावर
चाललेल्या देशद्रोही खटल्यावर लिहिणार आहे.
(फोटो: गुगल वरुन घेतले आहेत)
*****