Wednesday, April 28, 2021

राजकीय रंगतरंग: डॉ. नरेंद्र गंगाखेडकर

 

मी 2013 पासून तरंग हा ब्लॉग लिहीत आहे. त्यातील लेखांची दोन पुस्तके तरंग आणि विचारतरंग ही e-Book स्वरुपात प्रकाशित झाली आहेत. ते माझे ललित लेखन आहे. त्यावेळी मी ब्लॉगमध्ये काही वेळा राजकीय विषयावरही लेखन केले होते. त्यातील काही निवडक लेखांचे हे पुस्तक.

माझे मित्र प्रा. राम देशपांडे, शरद मराठे आणि विजय तरवडे ह्यांना मी ह्या पुस्तकावर प्रतिक्रिया लिहून देण्याची विनंती केली. त्यांनी ती आनंदाने मान्य करून ह्या पुस्तकावर  परीक्षणात्मक लेख लिहून दिले. ते लेख म्हणजेच  ह्या पुस्तकाचे प्रास्ताविक. मी ह्या सर्व मित्रांचा आभारी आहे.

आपणास हे पुस्तक वाचताना मी आपल्याशी राजकरणावरील गप्पा मारीत आहे, असे वाटेल, असे मी गृहीत धरतो.

रंगशास्त्रज्ञाने निर्मित केलेले रंगतरंग  

डॉ नरेंद्र गंगाखेडकरानी मला हे पुस्तक पाठविले आणि त्यांचे राजकीय विषयावरचे लिखाण वाचण्याची संधी मिळाली. राजकारण हा विषय तसा लिहायला खूपच सोपा पण जर पक्षातीत दृष्टीकोनातून लिहायचं तर निश्चितच तारेवरची कसरत करायला लावणारा. तेंव्हा डॉक्टर गंगाखेडकरानी ही कसरत हातात कुठल्याही विचारसरणीची काठी न घेता करून दाखविली आहे. ह्या रंगशास्त्रज्ञाने हातातील तैलरंग राजकारणासारख्या गढूळ पाण्यावर फेकून एक सुंदर संकल्पचित्र रेखाटले आहे. त्यांनी स्वातंत्र्यापासून आणि गांधी-नेहरू-पटेल ह्याच्यातील मैत्री किंवा वादाबाबतीत जे समज आणि गैरसमज आहेत त्याची विश्लेषणात्मक आणि सांगोपांग चर्चा केली आहे. त्यातील संदर्भ आणि त्यावर आज होणारे वाद सुद्धा लक्षात घेतले आहेत. गांधींच्या बाबतीत एक बाब म्हणजे त्यांचा हेकेखोरपणा, ते हटवादी होते कारण त्यांनी कधीही आपल्या बाजूला तडजोड स्वीकारलीच नाही. पटेल हे केंव्हाही तडजोडीला आणि सेल्फ रियलायझेशनला तयार असायचे. पुढे जाऊन, हिंदुत्व आणि धार्मिक तेढ कशी निर्माण झाली ह्याबद्धल विवेचन करताना गंगाखेडकरानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जडणघडण आणि त्यापासून राजकारणात झालेले फायदे (किंवा त्या कार्यकर्त्यांचा वापर) ह्यावर ही भाष्य केले आहे. इतिहास हा तसा थोडा जड विषय आहे आणि त्यातून जर राजकारणाचा इतिहास पारखायचा असेल तर एक निर्भेळ प्रवृत्ती असावी लागते आणि ती शास्त्रज्ञात असते आणि त्याचा प्रत्यय वाचताना येतो. हयात समाजवादाची परवड आणि लोपता समाजवाद ह्यावर सुद्धा केलेले विचारमंथन हे अंतर्मुख करायला लावते. एकीकडे सर्व धर्मात पसरणारी धार्मिक कट्टरता, देशाची अखंडता आणि त्यावर आपली पोळी भाजण्याची राजकारण्यांची स्पर्धा हयात सामान्यजणांना विचार करणे कठीण होत आहे आणि हळूहळू समाज दुभंगत आहे.  त्यात झुकणारा लंबक हा विनाशाकडेच जास्त झुकतोय असं वाटते आहे. अण्णा हजारे काय किंवा अरविन्द केजरीवाल  काय, ही पावसाळी मशरूम फार काळ टिकत नाहीत कारण समाजाची चौकटच बदलते आहे. त्यात धर्म, जात, समूहाचे (शेतकरी किंवा कामगार)  राजकारण हे इतर प्रश्न किरकोळ समजून दडपून टाकले जात आहेत. एकूण हे राजकीय रंगतरंग ह्या रंगशास्त्रज्ञाने अतिशय सुंदर उकलून दाखविले आहेत. समाजशास्त्रात वा राज्यशास्त्रात लिखाण ही एक कला आहे आणि ती  विचार प्रगल्भतेतूनच निर्माण होऊ शकते. त्यामुळे हे पुस्तक वाचताना एक तरल आनंद मिळाला.  

धन्यवाद.

राम देशपांडे 

(Professor Ram S Deshpande is now Visiting Professor at ISEC. He was Nanjundappa Chair Professor CMDR and ICSSR National Fellow. He was formerly, Director, Bengaluru Dr B R Ambedkar School of Economics. He was Director, Institute for Social and Economic Change.) 

Please send me your e-mail address. I will send you e-Book.

 CONTENTS

राजकीय रंगतरंग

१. सरदार, नेहरू आणि गांधी - १८             

२. सरदार पटेल हिंदुत्ववादी होते का? - २६            

३. पंडित नेहरु – ३१

४. बा आणि बापू – ३४

५. स्वातंत्र्यवीर सावरकर – ४२

६. भारतीय मुसलमान आणि हिंदुत्व - ४७

७. सेक्युलर आणि हिंदुत्व – ५१

८. प्रणव मुखर्जी ह्यांच्या आत्मचरित्रातून - ५६ 

९. पुरोगामी - समाजवादी- हिंदुत्ववादी – ५८

१०. रास्वसं , हिंदुत्व , सावरकर आणि इतर काही ...... – ८७

११. कार्यकर्ते – ९४

१२. लंबक कुठे झुकतोय? – ९८

१३. मोदीना गांधी जवळचे तर नेहरू दूरचे – ९९

१४. आपल्या देशाच्या नेतृत्वाला झालं आहे तरी काय? – १०२

१५. हा देश कधी कधी माझा आहे ......... -११२

१६. मी अण्णा हजारे नाही – ११६

१७. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कां होतात ? - ११९

१८. गुजरातचा विकास – १२५

१९. कुंभमेळा आणि स्वच्छता अभियान- १२६

२०. विनोबा भावे: एक आठवण – १२९

२१. जात नाही ती 'जात' – १३१

२२. जागतीकरण आणि भारत- १३४

*****

 

 


 

No comments:

Post a Comment