Monday, September 14, 2020

संशोधक विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक


Sarkar प्रकरण तसे नवीन नाही . हा संशोधक विद्यार्थी निराश झाला आणि त्याने आत्महत्या केली. मला इतर संशोधक विद्यार्थी आणि त्यांचे गाईड आठवू लागले. काही गाईड फार विचित्र वागत असतात .एखाद्या गाईड आणि विद्यार्थ्याचे जमले नाही तर खूपच मानसिक त्रासातून जावे लागते .एक गाईड अतिशय बुद्धिमान .श्रेष्ठ दर्जाचे वैज्ञानिक . जगातील सर्व प्रसिद्ध नियतकालिकातून शोध निबंध प्रसिद्ध झालेले . १८ वर्षाचे संशोधन केल्यानंतर त्यांच्या गाईड ने D.Sc . दिली . त्यामुळे ते त्यांच्या विद्यार्थ्यांना संशोधन पूर्ण करून ही Ph .D . ८- १० वर्षे देत नसत . दोन तीन हुशार विद्यार्थी सोडून गेले . नोकरी - लग्न आणि कौटुंबिक जबाबदारी असल्यामुळे ते वैतागलेले असत . त्या विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येत असे .एकदोनदा गाईडला मारावे असाही विचार त्यांनी बोलून दाखविला होता . उच्च शिक्षणातील तणाव , शिष्यवृत्तीचा प्रश्न ,तरुण वय ,गाईडचा छळ ,संशोधनातील अडचणी , केलेले संशोधन चोरणे व पेपर प्रसिद्ध करून नवेपणा घालविणे , विद्यार्थ्यांचे संशोधन स्वतः च्या नावावर छापणे , अवार्ड मिळवणे असे अनंत प्रकार चालत असतात .अमेरिकेतही असा छळ करणारे खूप प्राध्यापक आहेत .
अमेरिकेतील एक नावाजलेले प्राध्यापक / संशोधक भारतात / मुंबई विद्यापीठात आले . त्यांची भाषणे झाली . त्याच विषयावर एका विद्यार्थ्याने बरेच संशोधन केले होते . तो आणि त्याचा भारतीय गाईड ह्यांनी त्या अमेरिकन प्राध्यापका बरोबर चर्चा केली .आपले निष्कर्ष सांगितले . मार्गदर्शनाची अपेक्षा केली . त्यांनी कामाची तोंड भरून स्तुती केली .ते प्राध्यापक मायदेशी परत गेले . सहा महिन्यांनी त्यांचे पुस्तक बाजारात आले . त्यात त्यांनी ते संशोधन स्वतः चे म्हणून प्रसिद्ध केले .त्या विद्यार्थ्याची गोची झाली . एकदा प्रसिद्ध झालेले निष्कर्ष स्वतः चे म्हणून थिसिस मध्ये सामील करून घेता येत नाहीत . पुन्हा नव्याने विषय बदलून संशोधन करावे लागले . त्यात दोन वर्षे गेली . संशोधक असा इतरांच्या संशोधनावर डल्ला मारीत असतात . असे अनेक संशोधक / प्राध्यापक असतात . खूप सावध रहावे लागते .
एक प्राध्यापक त्यांच्या शिष्याने केलेले संशोधन प्रथम स्वतः चे नाव टाकून छापत असत . त्यामुळे अवार्ड त्यांना मिळाले .
एका अतिशय नावाजलेल्या भारतीय प्राध्यापक / संशोधकाची गोष्ट . थोडेसे नाव झाल्यावर ह्या प्राध्यापकाने Ph D झालेले विद्यार्थी घेण्यास सुरुवात केली . ह्या विद्यार्थ्यांना फारसे मार्गदर्शन करावे लागत नाही . त्यांचे ते संशोधन करीत असतात . दोन तीन महिन्यातून एकदा चर्चा . थोड्याच महिन्यात शोध निबंध तयार . पहिले नाव प्राध्यापकाचे .मग पुस्तके लिहिणे असेच .विशेष काही करावे लागत नाही . असे ८-१० विद्यार्थी काम करतात . हे प्राध्यापक जगभर फिरत त्यावर भाषणे देत जागतिक कीर्तीचे होतात .मग राष्ट्रीय पुरस्कार मिळवतात . विद्यार्थी मागेच राहतात .
एक प्राध्यापक त्यांच्या शिष्याने केलेले संशोधन प्रथम स्वतः चे नाव टाकून छापत असत . त्यामुळे अवार्ड त्यांना मिळाले .
एका अतिशय नावाजलेल्या भारतीय प्राध्यापक / संशोधकाची गोष्ट . थोडेसे नाव झाल्यावर ह्या प्राध्यापकाने Ph. D. झालेले विद्यार्थी घेण्यास सुरुवात केली . ह्या विद्यार्थ्यांना फारसे मार्गदर्शन करावे लागत नाही . त्यांचे ते संशोधन करीत असतात . दोन तीन महिन्यातून एकदा चर्चा . थोड्याच महिन्यात शोध निबंध तयार . पहिले नाव प्राध्यापकाचे .मग पुस्तके लिहिणे असेच .विशेष काही करावे लागत नाही . असे ८-१० विद्यार्थी काम करतात . हे प्राध्यापक जगभर फिरत त्यावर भाषणे देत जागतिक कीर्तीचे होतात .मग राष्ट्रीय पुरस्कार मिळवतात . विद्यार्थी मागेच राहतात .

No comments:

Post a Comment