Monday, September 14, 2020

माझी मराठी ,मराठाच मीही

मराठी भाषा ही ब्राह्मणी भाषा /प्रमाणभाषा अशी चर्चा जोरात चालू आहे . ललित साहित्यात बोली भाषा असणे ,त्यात वावगे काहीच नाही . ललितसाहित्य  विकास म्हणजे भाषा समृद्धी नव्हे . भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा प्राप्त करून देणे म्हणजे भाषा समृद्धी .मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हणता येणार नाही . सर्व ज्ञान शाखेचा विस्तार मराठी भाषेत झालेला नाही . जागतिक मराठी संमेलने भरवून भाषा जागतिक होत नाही .त्यासाठी ती ज्ञानभाषा असावी लागते . विविध ज्ञान शाखांमध्ये ज्या वेगाने ज्ञान वाढते आहे ते मराठी भाषेच्या माध्यमातून मराठी लोकांपर्यंत पोहोचते का ? इंग्रजीत उपलब्ध असलेले ज्ञान एका क्षणाचाही वेळ वाया न घालविता जर्मन , जापनीज किंवा रशियन भाषेत उपलब्ध होते , तसे मराठीत किंवा इतर भारतीय भाषेत का उपलब्ध होऊ शकत नाही ?
मराठीतील ललित साहित्य सुद्धा किती वेगाने इतर जागतिक भाषेत उपलब्ध होते ? भाषेचा नुसता अभिमान असून उपयोग नाही . प्रमाणभाषेचा वेगाने विकास होऊन ज्ञानभाषेचा दर्जा प्राप्त होणे आवश्यक आहे .बोलीभाषा त्यासाठी फारशा उपयोगी नाहीत . त्यांची मर्यादा ललित साहित्यापुरतीच .काही वर्षात मराठीच बोलीभाषा होण्याची शक्यता अधिक .
आजच्या मराठीला मिंग्लीश म्हणतात. इंग्रजी शब्द वापरल्याशिवाय कोणीही मराठी बोलू शकत नाही. मराठी साहित्यिकही शुध्द मराठीत बोलताना दिसत नाहीत. हिंदी भाषिक बर्यापैकी शुध्द हिंदीत बोलताना दिसतात. दक्षिणी भाषा फारच कमी इंग्रजी शब्द वापरतांना दिसतात. मराठी साहित्यिकांनी इंग्रजीतील शब्दांना सोपे मराठी शब्द शोधले नाहीत ,रुळवले नाहीत. ललित साहित्यात इंग्रजी शब्दच वापरतात. भाषा शुध्दी हवीच . दासबोध आणि  तुकारामाची गाथा हीच खरी  मराठी भाषा. ज्ञानेश्वरीतील शब्द मराठीत रूळले नाहीत. त्यामुळे ती समजायला अवघड आहे. मराठी प्राध्यापकांनाही ती समजत नाही. आपल्यासारख्या सामान्यांचे काय?
मींग्लिश
मराठी ज्ञानभाषा होणे नजिकच्या काळात तरी शक्य दिसत नाही.
काही दिवसांनी मराठी बोलीभाषाच असेल. घरात आजोबा-आजी मराठीत बोलत असतील तर ....
मराठीत बोलण्यासाठी मराठीत विचार करावा लागतो .विचार करताना शब्द सुचतात ते इंग्रजीच असतात .अशिक्षित  हेच  शब्द वापरतात. स्टेशनवर जातोय. लोकल पकडायची आहे .पेन हरवली आहे .कपडे लॉन्ड्रीत टाकायचे आहे .नाटकाचे तिकीट काढायचे आहे .कारने पुण्याला जाणार आहे .कंडक्टर भांडत होता .स्टेशनमास्तर कुठे आहे ?गाडी प्लॅटफॉमवर आली नाही .लिफ्टने सहाव्या मजल्यावर या . कसे बोलणार मराठीत ?

No comments:

Post a Comment