स्टीव जॉब्स |
स्टीव जॉब्स ह्यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काहीं जणांना आमंत्रित केले होते. एका हिंदू म्हणीचा आधार
घेऊन त्यांनी निमंत्रण पत्रिकेत असे लिहिले होते ...
“ In the first 30 years of your life, you make your habits. For the
last 30 years of your life , your habits make you. Come and help me celebrating
mine.”
वयाच्या ३०व्या वर्षी व्यक्त झालेले हे मनोगत खूप काहीं सांगून जाते. स्टीव जॉब्स म्हणाले होते , “ My goal has always been not only to make great products , but to
build great companies. Walt Disney did that.” आज स्टीव जॉब्स गेल्यानंतर सुद्धा नवे नवे
products त्यांच्या कंपनीकडून बाजारात येतच आहेत.
बिल गेट्स |
स्टीव जॉब्सच्या यशासंबंधी बोलताना बिल गेट्स म्हणाले होते , “Here I am ,merely saving the world from malaria and that sort of things , and Steve is still coming up with amazing new products. May be I should have stayed in that game. “ काय गंमत आहे बघा. बिल गेट्स ह्यांनी ज्या Microsoft ची स्थापना केली आणि भरपूर पैसा कमविला आणि ज्यांचा जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून नावलौकिक झाला त्यांनीच आपले नवे ध्येय निवडले. दहा वर्षापूर्वी कंपनीचे रोजचे कामकाज पाहणे सोडून दिले आणि पोलिओ , मलेरिया आणि HIV ह्या रोगापासून जगाला मुक्त करण्यासाठी त्यांनी अनेक योजना जगभरात अंमलात आणण्यासाठी पुढाकार तर घेतलाच पण आपण मिळविलेला पैसा मुक्त मनाने दान केला आणि अजूनही ते त्यासाठी कार्यरत आहेत. काहीं वर्षापूर्वी ,Microsoft ह्या कंपनीला काहीजण “Evil Empire” असे म्हणत असत. आज बिल गेट्स वेगळीच मानवतावादी भूमिका बजावताना दिसत आहेत. "Business @ the speed of thoughts", असे म्हणणारा हा नव्या तंत्रज्ञान युगाचा शहेनशहा आज एका वेगळ्याच भूमिकेत कार्यरत आहे.
बिल गेट्स आणि स्टीव जॉब्स
ह्यांच्यातील फरक जाणून घेताना एक विश्लेषण केले जात असे ते असे - “ Fundamental
Divide In Digital Age “. किती चपखल शब्दात हे व्यक्त झाले आहे. आज गूगल आणि
फेसबुक ह्या दोन कंपन्यासंबंधीही हेच बोलले जाते आणि ते खरेच आहे.
आपण नेहमी दोन मोठ्या व्यक्तींची
तुलना करीत असतो.शाळेत असताना नेहमीच तुलना करा असा एक प्रश्न विचारला
जातो. मी शाळेत असताना असाच एक प्रश्न मराठीच्या प्रश्नपत्रिकेत विचारला गेला होता.
प्रश्न होता, "साहित्यात कोण आवडतात ? वि स. खांडेकर की ना. सी .फडके". त्यावेळपासून मला तुलना करावयाची
सवयच लागली. "पंडित नेहरू की सरदार पटेल" , “गांधीजी की सावरकर", अगदी अलीकडे टी
व्ही च्यानेलवर असते ती तुलना म्हणजे “ नरेंद्र मोदी की राहुल गांधी”. अशा तुलना न
कळत होत असतात . अशीच एक तुलना करावयाची आहे - "स्टीव जॉब्स की बिल गेट्स". असे जे सुपर स्टार्स
असतात त्याच्यातील एकमेकांचे संबंध आणि वैमनस्य ह्यावर लोकांत फार चर्चा होते. "आईन्स्टाईन
की नील भोर" ," थोमस जेफरसन की अलेक्झांडर ह्यामिलटन" अशा तुलना प्रसिद्ध आहेत. तशीच तुलना करावयाची आहे ती
आय टी क्षेत्रातील स्टीव जॉब्स आणि बिल गेट्स ह्यांची. दोघातील साम्य आणि भेद ओळखणे
आवश्यक आहे. दोघेही एकाच वयाचे. दोघेही मध्येच शिक्षण सोडून देणारे. दोघांनाही संगणक क्षेत्राची आवड. दोघेही व्यावसायिक. दोघांनीही भरपूर पैसा कमविला. दोघेही
एकमेकाचे स्पर्धक. बिल गेट्स Software मध्ये तर स्टीव जॉब्स Hardware आणि Software
मध्ये. दोघांनाही नव निर्मितीचा छंद. दोघेही आय.टी.क्षेत्रातील सुपर स्टार्स. दोघांनीही जगावर आपला
प्रभाव टाकला. दोघांनीही आजचे जग बदलून टाकले.
स्टीव जॉब्स शिस्तशीर , अंगभूत
शहाणपण (Intuition) असलेला, रोम्यांटिक ,मशीन डिझायनर , Perfectionist , Demanding , एक
वलयांकित व्यक्तिमत्व असलेला , बोलण्यात Rude म्हणून ओळखला जाणारा , बिनधास्त मनोवृत्तीचा , दुसर्यांना
आपल्यापेक्षा खूप तुच्छ मानणारा अशा व्यक्तिमत्वाचा होता. स्वतः खूप चांगला
प्रोग्रामर नव्हता. परंतु दुसर्याकडून काम करून घेण्यात यशस्वी झाला होता. त्याच्या चरित्रात ( त्याने स्वतःचे आत्मचरित्र लिहून घेतले होते) त्याचे हे सर्व गुण दिसून येतात. प्रत्येक व्यावसायिकाने / नवा उद्योग सुरु करणाऱ्या तरुणाने हे चरित्र वाचण्यासारखे आहे. त्याच्या चरित्रापासून यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय करावे हे जसे समजून घेता येईल तसेच काय करू नये हे ही समजून घेता येईल. ज्यांना स्वतःचा नवा उद्योग किंवा व्यवसाय सुरु करावयाचा आहे त्यांनी स्टीव जॉब्स आणि बिल गेट्स ह्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांच्यापासून शिकले पाहिजे.
बिल गेट्स खरा व्यावसायिक वृत्तीचा ,
सुपर सेल्समन , सुरुवातीच्या काळात चांगला प्रोग्रामर , व्यवस्थित आणि
नीटनेटकेपणासाठी प्रसिद्ध , वेळ पाळणारा , बोलण्यात Rude नसलेला पण थोडासा Polished ,
बुद्धिमान , चतुर, Smart and calculating ,तसेच समोरच्या व्यक्तीवर सहज प्रभाव पाडणारे
व्यक्तिमत्व. स्वतःच्या व्यवसायावर विलक्षण पकड असलेला. आय.टी. क्षेत्रात अनेक वर्षे कोणालाही त्याच्या पुढे जाणे जमले नाही. त्यांनी आय.टी. व्यवसायात स्वतःची जागतिक मोनोपोली निर्माण केली व अनेक वर्षे अधिराज्य गाजविले. एक उद्योजक गंमतीने म्हणत असत की जेंव्हा बिल गेट्स झोपी जातो तेंव्हासुद्धा त्याचे पैसे कमविणे चालूच असते. २४ x ७ त्याची Microsoft कंपनी जगातून पैसे वसूल करीतच असते.उद्योग असावा तर असा.
स्टीव जॉब्स तुमच्याकडे भेदक नजरेने
बघणारा तर बिल गेट्स डोळ्याला डोळे भिडवून संवाद साधणारा व तुम्हाला संमोहित करणारा.
स्टीव जॉब्स Uncompromising
attitude असलेला गणकयंत्र तंत्रज्ञ. बिल गेट्सने तसा कोणताही शोध लावलेला नाही (Never
Invented anything). स्टीव जॉब्स स्वतःकरिताच काम करणारा तर बिल गेट्स कोणत्याही कंपनी बरोबर भागीदारी ( Partnership) करण्यास तयार.
स्टीव जॉब्स Blunt तर बिल गेट्स गोडबोल्या. बिल गेट्स आकर्षक व्यक्तिमत्वाचा, विनोदी बोलणारा तर स्टीव जॉब्स गंभीर
प्रवृत्तीचा.
स्टीव जॉब्स तात्काळ निर्णय घेणारा.
एक घाव दोन तुकडे करणारा. बिल गेट्स सर्व समावेशक वृत्तीचा आदर्श व्यवस्थापक.
स्टीव जॉब्स स्वतःच्या
कल्पनाशक्तीच्या जोरावर निर्णय घेणारा तर बिल गेट्स इतर लोकांच्या कल्पनाशक्तींचा
आधार घेऊन पुढे जाणारा.
स्टीव जॉब्सने नव्या क्ल्पनावर
आधारित नवे तंत्रज्ञान निर्माण केले. तशी निर्मिती बिल गेट्सला जमली नाही. स्टीव जॉब्सने जादुगाराप्रमाणे त्याच्या पोतडीतून नवे नवे products बाहेर काढले. तो खर्या अर्थाने Innovative and Poetic होता."Simplicity is the ultimate sophistication" हे तत्व डोळ्यासमोर ठेवून नवे तंत्रज्ञान जगापुढे आणणारा."Don't make it cute' असे म्हणणारा पण त्याचवेळी " People do Judge a book by its cover" असे आपला मित्र मारकुला ह्याचे म्हणणे ऐकणारा व त्याप्रमाणे यंत्र निर्मिती करणारा.
दोघेही तसे व्हिजनरी. परंतू भिन्न
स्वभावाचे.
बिल गेट्स प्रामाणिक आणि Gracious. तर
स्टीव जॉब्स प्रामाणिक पण तुसडा म्हणजे आपल्या सहकार्यांशी तोडून बोलणारा आणि मन दुखावणारा. इतरांशी बोलतांना वागताना तो फार तुटक वागत असे.कधी कधी इतरांना अपमानितही करीत असे.
आपण ह्या जगात फार थोड्या वेळाकरीता
आलेलो असतो. आपले आयुष्य हे फार थोडं असतं.आपल्याला फार थोडा वेळ मिळत असतो की
ज्यामुळे आपण काहीतरी महत्वपूर्ण कामं पूर्ण करू शकतो. आपल्या हातून फार मोठं कार्य घडावं असं आपल्याला वाटत असतं पण त्यासाठी फार थोडा वेळ असतो.आपण किती वर्षे जगू
हे कोणीच सांगू शकत नाही. तेंव्हा आपल्या हातून लवकरात लवकर काहीतरी महत्वपूर्ण
घडावं असं स्टीव जॉब्सला वाटत असे. "मी तरुण असतानाच हे माझ्या हातून घडावं" असं स्टीव जॉब्सला
वाटत असे. तो त्याच विचारात गुंतलेला असे. त्यासाठी तो प्रयत्नशील असताना त्याला
चांगल्या सहकारी लोकांची आवश्यकता होती. तो अशा सहकारी लोकांच्या शोधात असे. जॉन
स्कली ह्यांची आणि त्याची भेट झाली तेंव्हा तो त्याला म्हणाला , “ Do you want to spend rest of your life selling sugar water , or do
you want a chance to change the world ? ‘ हे ऐकून जॉन स्कलीच्या
पोटात गुद्दा मारल्यासारखे झाले आणि त्याने स्टीव बरोबर काम करावयाचा निर्णय
घेतला. आणि दैवदुर्विलास असा की पुढे काही दिवसांनी ह्याच स्कलीने स्टीव जॉब्सला त्यानेच सुरु केलेल्या त्याच्या स्वतःच्याच कंपनीतून काढून टाकले. पुढे कंपनी डबघाईला आल्यानंतर स्टीवला पुन्हा
बोलवावण्यात आलं ही गोष्ट वेगळी.म्हणजे प्रत्येकाचे भाग्य कसे असते हे लक्षात येईल.
ह्या तंत्रज्ञानाच्या युगात लोकांना
काय हवे हे माहितच नसतं. आपण त्यांना नवे तंत्रज्ञान दाखवलं तर ते त्यांना हवे
असते.हे स्टीव जॉब्सला चांगले माहीत होतं म्हणून तो म्हणत असे की टेलिफोनचा शोध
लावणारा ग्राहम बेल ह्यांनी कसलाही मार्केट रिसर्च केला नव्हता. मार्केट रिसर्चची
आवश्यकताच नसते असं त्याला ठामपणे वाटत असे.
हेनरी फोर्ड म्हणत असत , “ मी जर
लोकांना विचारलं असतं की तुम्हाला काय हवं? , तर लोक म्हणाले असते की आम्हाला
वेगाने धावणारा घोडा द्या. मी जेंव्हा त्यांना घोड्यासारखी वेगाने धावणारी मोटार
दाखविली तेंव्हा त्यांना ती हवी हवीशी वाटली." लोकांना काय हवं ह्यासाठी मार्केट रिसर्च
करण्याची गरज नसते. त्यांना नवीन आणि उपयुक्त तंत्रज्ञान दाखवायचं असतं. स्टीव्ह जॉब्सने हेच केलं.तो तंत्रज्ञान निर्माता होता. चांगला तंत्रज्ञ होता पण विक्रेता नव्हता. त्याला नव्याचा ध्यास
होता. तो जादुगार होता. नवे तंत्रज्ञान म्हणजे जादूची कांडी आहे असे त्याला वाटत
असे. जादुगाराचे शहाणपण त्याच्याजवळ होते. बिल गेट्स सुरुवातीला तंत्रज्ञान निर्माता ( Creator) होता परंतु नंतर
तो उत्तम विक्रेता (Super Salesman) झाला. व्यावसायिक यशासाठी हे फार महत्वाचे असते.
“ Don’t Compromise” असा स्टीव जॉब्सचा बाणा होता. “ Be
an architect of ideas “ असा त्याचा विश्वास होता. He was Perfectionist ‘ त्याला
नेहमी असे वाटे की “ THINK DIFFERENT". त्याच्या ह्या विचार पद्धतीमुळे तो इतरांच्यापेक्षा वेगळा
होता. “ Stay Hungry , Stay Foolish “ ही त्याची वृत्ती होती. “ Computer Power
to the People “ हे त्याचे स्वप्न होते. त्याचा सहकारी Woznaik ह्याने पहिला Apple I हा संगणक तयार केला तेंव्हा त्याला तो लोकांना फुकट द्यायचा होता. स्टीवला मात्र तसे वाटत
नव्हते. त्याला त्या तंत्रज्ञानातून पैसे कमवायचे होते. बिल गेट्सचेही पैसे कसे
कमवायचे हेच प्रमुख ध्येय होते. स्टीव जॉब्सचा अगदी जवळचा भांडवल पुरविणारा मित्र Mike Markulla म्हणत असे , “ You should never start a company with a goal of getting rich. Your
goal should be making something you believe in and making a company that will
last.” स्टीव जॉब्सला हे पटले होते आणि ते त्याला व्यवसायात चांगले जमले. बिल गेट्सने खूप पैसा कमावला.पण त्यासाठी त्यांनी अनेक यशस्वी भागीदारांची मदत घेतली.
आपलं आयुष्य म्हणजे On-Off स्वीच
सारखं आहे असं स्टीव जॉब्सला वाटत असे. आपण हे सगळं जगतो. नवे नवे शोध लावतो. अनुभव
मिळवतो. थोडेसे शहाणपण गाठी बांधतो आणि एक दिवस हे जग सोडून जातो. Off स्वीच
दाबलं की सगळं संपतं. ह्या On-Off स्वीचचा त्याला राग होता म्हणून त्याने त्याच्या
यंत्रावर असं स्वीच कधीच लावलं नाही.
“The people who are crazy enough to
think can change the world” असं स्टीव जॉब्सला वाटत असे. तो तसा crazy होता.
तरुण वयात भारताबद्दल अध्यात्मिक आकर्षण असल्यामुळे हिमालयाचा प्रवास केल्यानंतर तो अमेरिकेत परत गेला तेंव्हा भारत आणि भारतीय लोक ह्यांच्याबद्दल काय वाटते असे विचारल्यावर त्याने जे भाष्य केले ते असे. “ Coming back to America , for me , much more of a cultural shock than going to India. The people in Indian countryside do not use their intellect like we do, they use their intuition instead , and their intuition is far more developed than the rest of the world. Intuition is very powerful thing , more powerful than than the intellect, in my opinion. Power of intuition and experimental wisdom is more important .That had a big impact on my work.' भारत भेटीचा हा प्रभाव त्याच्यावर पडला होता परंतु भारत आणि भारतीय संस्कृतीचा प्रभाव असूनही त्याने आपल्या कंपनीची वाढ भारतात होऊ दिली नाही. कारण भारत हे मार्केट आहे अशी भारताची आर्थिक स्थिती नव्हती हे त्याला माहित होते.अलीकडे भारतात मार्केट मिळाले ही गोष्ट वेगळी.
बिल गेट्स भारतास वर्षातून दोन तीन वेळा भेटी देतात. उत्तर प्रदेश - बिहार ह्या राज्यात अनेकवेळा जातात . तेथील मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि आरोग्य योजना राबविण्यासाठी सढळ हाताने मदत करतात. पोलिओ आणि मलेरिया ह्या रोगापासून जग मुक्त असावे म्हणून सढळ हाताने मदत कार्य करतात.हे त्यांचे कार्य फार महत्वाचे आहे. असा हा देणारा माणूस खरा दाता आहे . समाजासाठी आपण काहीतरी भरीव केले पाहिजे असे त्याला कळकळीने वाटते. हे त्यांचे मोठेपण लक्षात घेण्यासारखे आहे.
___________________________
संदर्भ :
तरुण वयात भारताबद्दल अध्यात्मिक आकर्षण असल्यामुळे हिमालयाचा प्रवास केल्यानंतर तो अमेरिकेत परत गेला तेंव्हा भारत आणि भारतीय लोक ह्यांच्याबद्दल काय वाटते असे विचारल्यावर त्याने जे भाष्य केले ते असे. “ Coming back to America , for me , much more of a cultural shock than going to India. The people in Indian countryside do not use their intellect like we do, they use their intuition instead , and their intuition is far more developed than the rest of the world. Intuition is very powerful thing , more powerful than than the intellect, in my opinion. Power of intuition and experimental wisdom is more important .That had a big impact on my work.' भारत भेटीचा हा प्रभाव त्याच्यावर पडला होता परंतु भारत आणि भारतीय संस्कृतीचा प्रभाव असूनही त्याने आपल्या कंपनीची वाढ भारतात होऊ दिली नाही. कारण भारत हे मार्केट आहे अशी भारताची आर्थिक स्थिती नव्हती हे त्याला माहित होते.अलीकडे भारतात मार्केट मिळाले ही गोष्ट वेगळी.
बिल गेट्स भारतास वर्षातून दोन तीन वेळा भेटी देतात. उत्तर प्रदेश - बिहार ह्या राज्यात अनेकवेळा जातात . तेथील मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि आरोग्य योजना राबविण्यासाठी सढळ हाताने मदत करतात. पोलिओ आणि मलेरिया ह्या रोगापासून जग मुक्त असावे म्हणून सढळ हाताने मदत कार्य करतात.हे त्यांचे कार्य फार महत्वाचे आहे. असा हा देणारा माणूस खरा दाता आहे . समाजासाठी आपण काहीतरी भरीव केले पाहिजे असे त्याला कळकळीने वाटते. हे त्यांचे मोठेपण लक्षात घेण्यासारखे आहे.
___________________________
Steve Jobs