आम्ही अलीकडेच पूर्व युरोपातील देशांचा [ पूर्वीची पूर्व जर्मनी ,पोलंड ,हंगेरी ,झेक ,स्लोव्हाकिया( पूर्वीचा झेकोस्लाव्हाकिया) ,क्रोएशिया ( पूर्वीचा युगोस्लाव्हियाचा भाग )]दौरा केला. साम्यवादी राजवटीला धुडकावून टाकल्यानंतर गेल्या २० वर्षात पूर्व युरोपातील ह्या देशांचा झालेला कायापालट प्रत्यक्ष पाहिला. नव्याने विकास होताना दिसतो आहे ,परंतु ह्या देशांच्या इतिहासाची आठवण जागोजागी दिसते. प्राग ,वॉर्सा आणि बुडापेस्ट ह्या ऐतिहासिक शहरांना भेट दिल्यावर पहिल्या आणि दुसर्या महायुद्धाच्या वेळी ह्या देशात काय काय घडले असेल हे सहज लक्षात येते.
" दै. मराठवाड्या" चे संपादक अनंत भालेराव ह्यांनी 'कावड ' ह्या सदरात "पूर्व युरोपात : की तोडीला तरु फुटे आणखी भराने' हा लेख २० जानेवारी १९९० लिहिला होता. तो वाचण्यात आला होता. त्यावेळी त्यांचे ते आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचे भाष्य डोळे विस्फारून टाकणारे होते. आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडींचा आढावा असलेल्या ह्या लेखाचा प्रभाव माझ्या मनावर अनेक दिवस होता. त्या देशांना भेट देताना ह्या लेखातील विवेचन अनेक वेळा समोर आले.
त्या लेखात अनंतराव लिहितात ," पूर्व युरोपात गेल्या काहीं महिन्यापासून राजकीय घटना एवढ्या वेगाने घडून येत आहेत की ,इतिहास गाजवून गेलेल्या " क्रांत्या " मंद व सौम्य वाटाव्यात. दुसर्या महायुद्धानंतर अक्ष राष्ट्रांच्या व प्रामुख्याने जर्मनीचा पराभव झाल्यावर मध्य युरोपातील भूखंडाची दोस्त राष्ट्रांनी वाटणी करून घेतली.
जी राष्ट्रे सोव्हिएत संघाकडे आली तेथे स्टालिनच्या अधिपत्याखाली कम्युनिस्ट राजवटी स्थापन झाल्या. सत्तेवर कम्युनिस्ट पक्षाची मत्तेदारी निर्माण केली गेली.आणि अशा रितीने रशियाने पोलादी पडद्याच्या रक्षणार्थ सहा-सात कम्युनिस्ट राष्ट्रांची संरक्षक तटबंदी उभी केली. हंगेरी ,झेकोस्लोव्हाकिया ,पोलंड ,पूर्व जर्मनी ,रुमानिया या राष्ट्रामध्ये कम्युनिस्ट राजवटी आल्या. रशियाचा लष्करी हस्तक्षेप त्यास कारणीभूत होता."आमचे भवितव्य आम्हाला घडवू द्या व आमचा वर्तमान काळ आमच्या स्वाधीन करा",अशी मागणी ह्या देशातील लोकांनीं अनेकदा केली. लष्कराच्या जोरावर ती दडपली गेली.
गोर्बाचेव्ह यांनी त्यांच्या सुधारणा जाहीर केल्या आणि ह्या राष्ट्रातील स्वातंत्र्याकांक्षेला उत्तेजन मिळाले. रशियन संघ फुटू लागला. तेच वारे पूर्व युरोपात वाहू लागले. साम्यवाद असो की लोकशाही ,जनतेच्या विश्वासावाचून अस्तित्वात येऊ शकत नाही. कम्युनिस्ट राजवटी धडाधड कोसळू लागल्या. या राष्ट्रांनी कम्युनिस्ट रशियाशी संबंध तोडले. रशिया विरोधी भावना तीव्र होत गेल्या.
स्टालिनने जे जे म्हणून नष्ट केले ते ते पुन्हा उभे केले. कम्युनिस्टाना धर्म ,चर्च , मशिदी मान्य नव्हत्या. त्या चर्चेस पुन्हा नव्यानी जशाच्या तशा उभारण्यात आल्या. पोलंड झेक ,हंगेरी मध्ये त्या दिसून येतात.. मुक्त बाजारपेठांना वाव मिळाला. पूर्व युरोप खुला झाला . नवी बाजारपेठ उपलब्ध झाली.साम्यवादी व्यवस्थांचा पराभवच पहावयास मिळतो. स्टालिनच्या काळात कम्युनिस्ट पक्षांनी हजारो पुस्तकावर व लेखकावर बंदी घातली. ती बंदी उठली. साहित्य आणि लोक ह्यांचा संबंध पुन्हा प्रस्थापित झाला.असा साम्यवादाचा बुरखा फाटला."
हे त्यावेळी केलेले वर्णन तंतोतंत बरोबर आहे. आज ह्या देशामधून फिरताना ते जागोजागी दिसून येते. आपण आपल्या देशातील श्रीमंत देवळासंबंधी नेहमी बोलत असतो. पूर्व युरोपातील डोळे दिपवून टाकणारी चर्चेस पाहिलीकी चर्चचा प्रभाव किती मोठा आहे हे सहज लक्षात येते. ह्या लोकांच्यावर असलेला धार्मिक पगडा कणभरही कमी झालेला दिसत नाही. लोक धार्मिक आहेत. त्यांच्या रूढी आणि परंपरा तशाच आहेत. कदाचित नवी पिढी तेवढी धार्मिक नसेल. पण चर्चचा पगडा आजही कायम आहे.
इतर सर्व व्यवस्थांच्या तुलनेत साम्यवादी व्यवस्था निर्दोष असून तिच्यामध्ये वशिलेबाजी ,व्यक्तिगत स्वार्थ भ्रष्टाचार व घराणेशाही यांना वावच मिळू शकत नाही असे दावे कम्युनिस्ट करीत आले आहेत आणि दुर्दैव असें कीं ,आतां जे काहीं परिवर्तन घडून आले आहे त्यांत साम्यवादी व्यवस्थांचा पराभवच जगाच्या निदर्शनास दिसून आला आहे.
स्टालिनच्या काळांत कम्युनिस्ट पक्षांनी हजारो पुस्तकावर आणि लेखकावर बंदी घातली. ज्ञान ही साम्यवादी चाळणीतून चाळले गेले पाहिजे. लोकांपर्यत ते मुक्तपणे पोचून भागणार नाही. अशी त्यांची धारणा होती.
१९४५ मध्ये हिटलर विरोधी मित्र राष्ट्रांनी प्राग ह्या शहराचा ताबा मिळविला. जर्मन आणि नाझी प्रागमधून पसार झाले .आज प्रागमध्ये जर्मन फारच अल्प आहेत.
१९४८ ते १९८९ ह्या काळात झेकोस्लाव्हाकीयात लष्कराची सत्ता होती व सोव्हियत युनिंच्या वर्चस्वाखाली कम्युनिस्ट प्रणाली सत्तेवर होती. झेकोस्लाव्हाकियामध्ये लेखक, नाटककार आणि बुद्धिवादी वर्ग जागा झाला होता. १९६७ साली लेखकांची आंतरराष्ट्रीय सभा झाली आणि त्यांनी कम्युनिस्ट सत्तेविरुद्ध बुलंद आवाज उठविला. २१ ऑगस्ट १९६८ मध्ये सोव्हियत युनिंयनने झेकोस्लाव्हाकीयावर हल्ला केला आणि चळवळ करणाऱ्या लोकांची मुस्कटदाबी केली. १९८९ मध्ये वेलवेट क्रांती झाली आणि विद्यार्थ्यांनी नवे बंद पुकारले. प्राग मधील सर्व रस्त्यावर मोठ्या संखेने तरुण विद्यार्थी जमा झाले. नवी हवा निर्माण झाली. चळवळीने जोर धरला. आणि १९९३ मध्ये झेक आणि स्लोव्हाकिया हे दोन देश निर्माण झाले. झेक ह्या देशाचा पहिला राष्ट्रपती Dr Havel हा नाटककार होता. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांनी नव्या झेकचे स्वप्न पाहिले होते. विजय तेंडुलकरांनी " रामप्रहर " हे त्यांचे पुस्तक ह्या झेक नाटककाराला समर्पित केले होते. मी त्या पुस्तकाचा प्रकाशक होतो. जेंव्हा त्यांनी सगळ्यात शेवटी त्या पुस्तकाची अर्पण पत्रिका लिहिली होती तेंव्हा त्या दिवशी Dr Havel भारतात दिल्लीत होते. झेक आणि प्राग विषयी माझ्या मनात त्या वेळेपासून औत्सुक्य होते. मी प्रागला भेट दिली तेंव्हा बरोबरच्या गाईडला नाटककार / राष्ट्राध्यक्ष Havel ह्यांच्या संबंधी विचारले तेंव्हा तो सहज बोलून गेला , " तो आमचा भूतकाळ आहे. आतां भविष्याचा विचार हवा. "
१९९० पासून प्राग हे पुन्हा युरोपचे प्रमुख केंद्र बनले आहे. राजकीय ,सामाजिक आणि आर्थिक चळवळीचेही केंद्र झाले आहे. इ.स .२००० मध्ये जागतिकरणाच्या विरुद्ध १५००० निदर्शकांनी IMF आणि WORLD BANK ह्यांच्या विरुद्ध मोर्चा काढला होता. आज नव्या अर्थ व्यवस्थेत प्राग शहर महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. पूर्व युरोपचे PARIS असेही म्हंटले जाते. हे खरे ग्लोबल शहर वाटते.
प्राग , बुडापेस्ट आणि वॉर्सा ह्या शहरातून फेरफटका मारला की मुक्त बाजारपेठ पाहून जे परिवर्तन दिसून येते ते पाहिले की साम्यवादी व्यवस्थांचा पराभव निदर्शनास येतो. स्लोव्हाकिया ह्या राष्ट्राने आय टी क्षेत्रात भरारी मारलेली असून बंगलोरशी स्पर्धा चालू आहे .पूर्व युरोपातील ही राष्ट्रे स्वतंत्र झाली आणि जुना( परंपरावादी) आणि नवा ( आधुनिक ) पूर्व युरोप एकाचवेळी पहावयास मिळतो.
दोन महायुद्धे , सतत ३० वर्षे युद्ध परिस्थिती व कम्युनिस्ट राजवटीत झालेली वाताहत हे सर्व सोसल्यानंतर आज पूर्व युरोपातील प्रमुख शहरे दिमाखाने उभी आहेत. Global Cities म्हणून ह्या शहराकडे पाहिले जाते.
असा हा पूर्व युरोप . खूप बघण्यासारखा आहे.
ह्या प्रवासाचे वर्णन वाचावयाचे असेल तर माझ्या खालील ब्लॉगला अवश्य भेट द्या.
" तरंग "
डॉ नरेंद्र गंगाखेडकर
drnsg@rediffmail.com
प्राग मधील चर्च |

पार्लमेंट ,हंगेरी |

बुडा आणि पेस्ट |

चर्च - सोनेरी पेंटिंग ,पोलंड |

राज महाल , वॉर्सा |
१९९० पासून प्राग हे पुन्हा युरोपचे प्रमुख केंद्र बनले आहे. राजकीय ,सामाजिक आणि आर्थिक चळवळीचेही केंद्र झाले आहे. इ.स .२००० मध्ये जागतिकरणाच्या विरुद्ध १५००० निदर्शकांनी IMF आणि WORLD BANK ह्यांच्या विरुद्ध मोर्चा काढला होता. आज नव्या अर्थ व्यवस्थेत प्राग शहर महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. पूर्व युरोपचे PARIS असेही म्हंटले जाते. हे खरे ग्लोबल शहर वाटते.
प्राग , बुडापेस्ट आणि वॉर्सा ह्या शहरातून फेरफटका मारला की मुक्त बाजारपेठ पाहून जे परिवर्तन दिसून येते ते पाहिले की साम्यवादी व्यवस्थांचा पराभव निदर्शनास येतो. स्लोव्हाकिया ह्या राष्ट्राने आय टी क्षेत्रात भरारी मारलेली असून बंगलोरशी स्पर्धा चालू आहे .पूर्व युरोपातील ही राष्ट्रे स्वतंत्र झाली आणि जुना( परंपरावादी) आणि नवा ( आधुनिक ) पूर्व युरोप एकाचवेळी पहावयास मिळतो.
ग्लोबल सिटी : वॉर्सा |
दोन महायुद्धे , सतत ३० वर्षे युद्ध परिस्थिती व कम्युनिस्ट राजवटीत झालेली वाताहत हे सर्व सोसल्यानंतर आज पूर्व युरोपातील प्रमुख शहरे दिमाखाने उभी आहेत. Global Cities म्हणून ह्या शहराकडे पाहिले जाते.
असा हा पूर्व युरोप . खूप बघण्यासारखा आहे.
टिटो चौक , झाग्रेब ,क्रोएशिया |
ह्या प्रवासाचे वर्णन वाचावयाचे असेल तर माझ्या खालील ब्लॉगला अवश्य भेट द्या.
" तरंग "
डॉ नरेंद्र गंगाखेडकर
drnsg@rediffmail.com
Adriyatic Sea, ZAGREB, CROATIA |
No comments:
Post a Comment