I organised Seminar on ' Computer Color Matching ' at Hotel Tajmahal in Mumbai in 1986 and launched a small business. |
२० जानेवारी १९८६ साली मी मुंबईच्या हॉटेल ताजमहाल मध्ये Computer Colour Matching For Paints ,Plastis,Inks and Textiles ह्या विषयावर राष्ट्रीय सेमिनार आयोजित केला होता. देशातील ११० उद्योजक, त्यांचे प्रतिनिधी आणि तंत्रज्ञ त्यावेळी उपस्थित होते. त्याच सेमिनार मध्ये मी माझा छोटा सर्व्हिस उद्योग सुरु केला. माझ्या ९ ते ५ सुखी जीवनाला सुट्टी मिळाली. उद्योगात Idea महत्वाची असते. रंगविज्ञान आणि तंत्रज्ञान हा माझा विषय . अर्थात हा नंतरचा प्रवास. काही घटना अपघाताने होतात . मी तसा पदार्थवैज्ञानिक. एशियन पेंटसचे टेकनिकल म्यानेजर सी जे भूमकर माझ्या संपर्कात आले . त्यांनी मला त्यांच्या संशोधन विभागात येण्याचे आमंत्रण दिले . माझी कंपनीच्या संचालकाबरोबर मुलाखत ठरली. कंपनीचे एक मालक आणि संचालक अश्विन दाणी ह्यांच्या बरोबर माझी मुलाखत झाली. त्यांचे इडीपी म्यानेजर वीरराघवन त्यावेळी तेथे उपस्थित होते. रंगविज्ञानाचा आधार घेवून आणि संगणकाचा आधार घेवून तंत्रज्ञान विकसित करण्याचे ठरले . मी केंद्र सरकारची सुखासीन नोकरी सोडून खाजगी उद्योगाची असुरक्षित नोकरी स्विकारली म्हणून माझ्या वडिलांनी मला वेड्यात काढले. अर्थात मला मिळणारा पगार सरकारी नोकरी पेक्षा जास्त होता. मी ६ महिन्यात Computer Color Matching Software विकसित केले. कंपनीत इतर तंत्रज्ञ लोकांचा विरोध सुरु झाला. मी संचालकांचा Blue Eyed Boy होतो. मला युरोप -अमेरिकेच्या दौर्यावर तेथील तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी पाठविण्यात आले. मी अमेरिकेत रेन्सलियर विद्यापीठात विशेष शिक्षण घेवून परत आलो. आम्ही हे तंत्रज्ञान कंपनीत यशस्वी करुन दाखविले. पेंटमध्ये कलरंटची किंमत ६०-७० %असते. आमच्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे त्यामध्ये १५ ते २०℅ बचत झाली. अचूक रंग पहिल्याच झटक्यात मिळणे शक्य झाले. कोणताही रंग द्या , तुम्हाला लगेच तोच रंग तयार करुन देतो ,हे सहज शक्य झाले. रंगक्रांती आणि पैशाची बचत सहज शक्य झाली.
हे चालू असतांना वस्त्रोद्योग समोर होता. तेथे ह्या तंत्रज्ञानाला अधिक वाव होता . एक दोन ठिकाणी मी हा प्रयोग यशस्वी करून दाखविला . आणि लक्षात आले की हे क्षेत्र खूप मोठे आहे. पेंट क्षेत्रात ५-१० कंपन्या तर वस्त्रोद्योग क्षेत्रात असंख्य कंपन्या. मी ठरवले की आपण ह्या क्षेत्रात जावे . आणि स्वतः चा व्यवसाय सुरु केला. हा सेमिनार घेतला.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला . त्या सेमिनारमध्ये जे जे आले होते ,त्यापैकी ६०℅ माझे गिर्हाईक झाले. आणि विशेष म्हणजे मला दोन स्पर्धकही मीच तयार केले. मीच त्यांना शिक्षित केले . हे चालतच असतं. मला व्यवसायात स्पर्धक तयार करु नयेत हे फार उशिरा समजले. मी अहमदाबाद ,मुंबई आणि कोइंबतोर येथील सर्व मोठ्या कापड उद्योगात माझे तंत्रज्ञान विकले.
असा हा माझा प्रवास . अध्यापन आणि संशोधन सोडून उद्योग व्यवसायात मी आलो ह्याचे आजही मला आश्चर्य वाटते . असेच असते आयुष्य. ठरवतो एक आणि होते एक. संधी येतात . आपण त्याचा फायदा घेतला तर आयुष्याचे गणित जमते.
This is my office . I use to offer Computer Color Matching Service to small industries who can not afford a costly color measuring instrument and computer .
विजय भाटकर म्हणतात , ' तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय प्रगतच ' . ८० च्या दशकातील हा शास्त्रज्ञ - तंत्रज्ञ . माझ्या पिढीचाच . काही आठवणी जाग्या झाल्या . मी पदार्थविज्ञानातील Ph . D . घेऊन बाहेर पडलो . अचानक उद्योग क्षेत्रात मला उपयुक्त संशोधनाची संधी चालून आली .एशियन पेंट्स ह्या कंपनीने मला कॉम्पुटर कलर मॅचिंग ह्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी आमंत्रित केले . स्पेट्रोफोटोमीटर - कॉम्पुटर - कलर मॅचिंग सॉफ्टवेअर ह्यांचा एकत्रित उपयोग करून तंत्रज्ञान शोधून काढणे हा प्रकल्प .त्यावेळी कॉम्पुटर हार्डवेअर व सॉफ्टवेअरवर कस्टम ड्युटी २०० टक्के होती . अतिमहागडे तंत्रज्ञान होते. आम्ही दोन वर्षात ते उपयुक्त तंत्रज्ञान विकसित केले . अश्विन दाणी ह्या संचालकाची ती दूरदृष्टी होती . पेंट कंपनीत ३० टक्के खर्च हा पिगमेंटवर होतो . ह्या नव्या तंत्रज्ञानामुळे पिगमेंटच्या खर्चात १५ ते २० टक्के बचत होते हे सिद्ध झाले होते . इतर अनेक फायदे होते . आम्ही हे तंत्रज्ञान यशस्वी करून दाखविले . आज कोपऱ्यावरच्या हार्डवेअरच्या दुकानात सुद्धा तुम्हाला छोटे कॉम्पुटर कलर मॅचिंग मशिन दिसून येईल .
त्यानंतर हेच तंत्रज्ञान रिलायन्सच्या अहमदाबाद फॅक्टरीत कापड उद्योगात कलर मॅचिंगसाठी वापरण्यास सुरुवात झाली आणि तंत्रज्ञान वेगाने पसरत गेले . कापडउद्योग , रंग उद्योग , प्लास्टिक उद्योग , शाई उद्योग ह्या सर्वच क्षेत्रात त्याचा उपयोग सुरु झाला . करोडो रुपयांची बचत झाली . मी स्वतः ३५० उद्योगांना हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले . दोन तीन भारतीय कंपन्या ह्या उद्योगात आल्या . भारतात रंग क्रांती झाली .
संगणकाने सॉफ्टवेअर उद्योगाची उभारणी केली हे खरे .पण संगणकामुळे अशा प्रकारचे नवे तंत्रज्ञान उद्योगासाठी उभे करता येऊ शकते ह्याकडे विशेष लक्ष दिले जात नाही . आज फ्लिपकार्टचा उद्योग ज्यांनी उभा केला तोच उद्योग करोडो डॉलर्सला विकला गेला की आपण डोळे विस्फारून बघत असतो .
This was first Computer Color Matching Instrument installed in Textile Mill,Ahemedabad . It consists of Spectrophotometer integrated with IBM PC XT and Color Matching Software for Textile Dyeing and Printing
आपण भारतीय तंत्रज्ञानात प्रगत आहोत ह्यात वाद नाही . उपयुक्त संशोधन असे राबविले पाहिजे . मूलभूत संशोधनाइतकेच ते अधिक महत्वाचे आहे .
Chromatic Notes हा माझा ब्लॉग आहे . विशेष माहितीसाठी अवश्य वाचा . जगातील ६० हजार पेक्षा अधिक लोकांनी तो वाचला आहे .
No comments:
Post a Comment