Monday, March 2, 2020

कार्यकर्ते

माझा अतिशय जिवलग मित्र आहे . सध्या तो सुप्रीम कोर्टात वकिली करतोय . आम्ही बी.एस्सी .ला बरोबर होतो . शेवटचा गणिताचा पेपर होता  . त्याने ४० मार्क मिळतील एव्हढा पेपर सोडवला आणि तो वर्गातून बाहेर पडला . त्याला एव्हढी घाई कसली होती ? त्याला  पुण्याला रास्वसंच्या उन्हाळी शिबिराला जायचे होतं . संध्याकाळी तो तेथे थेट  जाऊन हजर . पुढे तो  पूर्ण वेळ प्रचारक झाला  . तो गेला थेट आसाम आणि बंगालमध्ये . नंतर २ वर्षांनी  परत आला .मुंबई विद्यापीठात एल.एलबी झाला  .नंतर एल.एलएम केलं . विद्यापीठात अभाविपतर्फे  निवडणूका लढविल्या  . मुंबई विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची निवडणूक जिंकली . अनेक वर्षे संघटन काम केलं . सध्या दिल्लीत स्थायिक आहे . त्याच्या घरी कार्यकर्ते नेहमीच असतात . त्याला कोणतेही पद सहज मिळू शकले असते . पण तो कायम कार्यकर्ता . सतरंज्या उचलण्यापासून खटले चालवण्यापर्यंत सगळी कामे करणारा . मी त्याचा कायमचा टीकाकार . त्यावर तो नुसता हसणारा . मैत्री जपणारा . हा हे सर्व का करतो ?,ते मला आजपर्यंत कधीच समजले नाही .
दुसराही  असाच एक मित्र . इंजिनिअर झाल्यावर घर सोडले .गुजरातमध्ये संघ प्रचारक झाला  . तेथून तो गेला अमेरिकेत . एम.एस. नंतर तेथेच विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता झाला .काहीवर्षांनी भारतात परत आला . आसाम - अरुणाचल मध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता होता . त्याने  विविध प्रकारची कामे केली  . त्याचे नांव कुठेही येत नाही . सध्या तो  दिल्लीत मुख्य कार्यालयात असतो म्हणे .४० वर्षात भेटला नाही . घर सोडल्यापासून  तो घरी फिरकलाच नाही .
हे कार्यकर्ते पाहिले म्हणजे काँग्रेसयुक्त भाजपचा संताप येतो . अशी असंख्य धडपडणारे कार्यकर्ते कुठेत आणि ह्यांचे आजचे नेते कुठेत ?
मी जी दोन उदाहरणे दिली आहेत त्यांची कसलीही अपेक्षा नसते . त्यांची मानसिक जडणघडण तशीच आहे . त्यांची कार्यक्षमता , बुद्धिमत्ता आणि संघटन कौशल्य पाहिल्यानंतर इतर नेते आणि चमकोगिरी करणारे पुढारी ह्यांना जे अवास्तव महत्व मिळते आहे , ते योग्य नाही . ह्यासाठी हा उल्लेख केला .
असे अनेक कार्यकर्ते आहेत . त्यांचा भ्रमनिरास येत्या काळात होण्याची शक्यता आहे .
राष्ट्रसेवादलातही माझे काही मित्र होते. त्यांनी खूप काम केलं होतं . प्रसिद्धीच्या झोकात काहीजण होते. आजही आहेत. पण त्यांच्या मर्यादा दिसून येतात. जनता राजवटीत सत्तेच्याजवळ काहीजण होते.
मी ह्या दोन्ही संस्था शाळा कॉलेजात असताना जवळून पाहिल्या . मग लक्षात आलं , हे आपले काम नोहे . मी अध्ययन , अध्यापन आणि संशोधनात रमलो . नंतर योगायोगाने उद्योगात प्रवेश केला.

चित्रकुटला नानाजी देशमुखांनी जे उच्च विद्याविभूषित कार्यकर्ते जमा केलेत ते कार्यकर्ते म्हणजे Unsung Heroes आहेत . ( This was my comment on status of  DrSubodh Naik . I am reproducing it. )
I think many sincere & committed karyakarta meet the same fate regardless of their ideology. Right from Sena(s), Samajwadi, Rashtra Seva Dal, Communists. All these organizations got power  by the hardwork of such unsung heros. They did not get anything.
Comments on my Facebook Post:
Sharad Marathe -
On different note, even noted Bhai and Mafias also owe their fame to small group of commited goons who virtually deserted their families to work for 'boss'. I know many examples where such goons got killed in encounter, mother or sisters are doing petty work including selling their own body and fortune of 'boss' flourished many fold including MLA and educational institutions. Now for boss, it is below dignity to show the solidarity with old comreds family.
Lalit Pathak
अरे मिञाबद्दल इतके चांगले मत वाचून मन सुखावले.पण नको असलेल्याना पद देणे ही कॉग्रेस ची संस्कृती  इथे रूजत आहे. ह्याचे दुःख होते.
Shard Marathe
पूर्वी लढायांमध्ये शत्रूपक्षांचे मोठमोठे दरवाजे तोडण्यासाठी हत्तींना धडका द्यायला लागायच्या. नंतर असे करता येऊ नये म्हणून दरवाजांवर मोठमोठे टोकदार खिळे लावले जाऊ लागले. हत्ती मूल्यवान, मग नुकसान कमी होण्यासाठी दरवाजांवर उंट उभे करायचे म्हणजे धडक दिल्यावर हत्तीला इम्पॅक्ट कमी व्हायचा. युद्ध जिंकल्यावर मेलेल्या उंटांची आठवण कोणाला पडलीय?
Sandeep Godbole
ढाल आणि तलवार यातील फरक. दोघांचे टीमवर्क असते पूरक आणि प्रेरक.
Mandar Deodhar
खरे आहे. कॉंग्रेसयुक्त भाजपा हा medium term अथवा long term मध्ये फारच वाईट पर्याय होणारे हे नक्की. गेल्या एका पिढीने अक्ख आयुष्य खर्च करून भाजपला सत्ता आणून दिलीये. जर सत्ता उद्याही हवी असेल तर आजचा कार्यकर्ताही तसाच हवा, पण त्याच्या डोक्यावर तुम्ही बाहेरून आयात केलेली धेंड बसवलीत तर पुढे काय होईल हे त्यांनाच कळायला हवे. बघू, कधी कळेल ते .

No comments:

Post a Comment