Steve Jobs: एस्किमोलाही फ्रिज विकणारा विक्रेता !
स्टीव्ह वोझनीक आणि स्टीव्ह जॉब्स दोघेही Apple चे निर्माते. वोझनीक म्हणतो , ‘ Apple संबंधी लोकांना थोडीच माहिती आहे. मी आणि जॉब्स ह्यांनी Apple उभी केली हे तेवढे खरे नाही ‘.
अल अलकॉर्न म्हणतो, ‘ आम्ही त्यांना सुरुवातीला खरी मदत केली. त्यांना ६५०२ हा मायक्रोप्रोसेसर हवा होता. १८ - १९ वर्षाचे जॉब्स आणि वोझनीक ह्यांच्याकडे काहीच पैसे नव्हते. त्यांच्याजवळ क्रेडिट कार्ड नव्हते. बँक अकाउंट नव्हते. ट्रेड अकाउंट नव्हते. ते अल कडे आले आणि म्हणाले , ‘ आम्ही हायस्कुल किड आहोत. आम्हाला धंदा उभा करायचा आहे’ . अल म्हणाला , ‘मी माझ्या मित्रांशी बोलेन. थोडे भांडवल मिळवुन देईन. तुमच्याबद्दल बोलेन’. अल त्याच्या मित्राशी बोलला . तो मित्र म्हणाला, ‘ दोन्ही स्टीव्ह आम्हाला भेटले , त्यांना आमच्याकडून पार्टस पाहिजे होते . त्यांचे ट्रेड अकाउंट नव्हते. बँक अकाउंट नव्हते. आमच्याशी जॉब्स किंमत कशी कमी करायला पाहिजे ह्याच्याच गप्पा मारीत होता. कोणाचीही गॅरंटी देत नव्हता.अशा माणसाला पार्टस कसे देणार? ,वोझनीक जॉब्सला समजावून सांगत होता. पण जॉब्स किंमत कमी करण्याच्या गप्पा मारीत होता. जॉब्स वोझचे तोंड गप्प करण्याचाच प्रयत्न करीत होता. टेबलाखाली जॉब्स वोझनीकचे पाय दाबून खुणा करीत होता. ह्या खटपटीत बारका असलेला जॉब्स टेबलाखाली पडला . त्याला शेवटी ओढून काढावे लागले . शेवटी अलकॉर्नने त्यांच्याशी ९० दिवसाची मुदत असलेला करार करायचे ठरविले .
त्यांचे ९० दिवस असलेले क्रेडिट अकाउंट काढून दिले खरे. वोझनीक पुढे सांगतो , ‘ आम्हाला एक एंजेल भेटला . नशीब आमचे . तो आमच्यासाठी देवदूत निघाला . तो आमच्यावर खूष होता, आमच्या धंद्यात पैसे घालण्यास तयार झाला . तो गृहस्थ तरुण आणि खूप श्रीमंत होता. त्याचे नांव माईक मारकुला .
मारकुला म्हणतो, ‘ जॉब्स आणि वोझनीक मला भेटले खरे. त्यांचे व्यक्तिमत्व मला विशेष वाटले नाही. दाढीचे खुंट वाढविलेली ती दोन तरुण शाळकरी दिसणारी मुले . अंगाला कसला तरी वास येणारी.गंमतीदार कपडे घालणारी . हिप्पी वाटणारी’. माइकने त्याचा मित्र आर्थर रॉकला विचारले , ‘ तू Apple मध्ये पैसे घालायला तयार आहेस का ? रॉकला त्यात काही स्वारस्य नव्हते. त्याचे कारण म्हणजे त्या दोघांनी ब्लुबॉक्स नावाचे एक यंत्र तयार करून पैसे चोरणारी खोटी टेलिफोन कंपनी चालविण्याचा उद्योग केला होता. ते त्याला मुळीच आवडले नव्हते.
मार्कला मात्र वोझनीकचे कॉम्पुटर डिझाईन खूप आवडले होते.
अलकॉर्न म्हणतो, ‘ १८ - २० वर्षाची तरुण पोरं ! त्या मुलांना धंदा काय जमणार ? , त्यांना साधे ड्रिंक कसे घेतात ?, हे माहित नाही! कसली कम्पनी सुरु करणार ? वेडी मुले!
आणि माईक मारकुला ह्याने जॉब्स आणि वोझनीक ह्यांच्या कंपनीत पैसे ओतले आणि १९७७ साली Apple सुरु झाली . वेस्ट कोस्टच्या प्रदर्शनात त्यांनी Apple कॉम्पुटर दाखविला आणि ते नावारूपाला आले. अशी ही धडपडणारी मुले. त्यांना भांडवल पुरवणारा माईक मारकुला. स्टीव्ह वोझनीक खरा निर्माता तर जॉब्स हा एस्किमोलाही फ्रिज विकणारा विक्रेता!
( Reference: Valley of Genius by Adam Fisher )
No comments:
Post a Comment