दहा वर्षापुर्वीची
गोष्ट आहे. इंटरनेटचे दिवस सुरु झाले होते
. आयटी सिटी बंगलोरला मुलीकडे होतो. संध्याकाळची वेळ होती. रात्री जेवायला बाहेर
जायचा विचार होता . कोणत्या हॉटेलमध्ये जेवायला जायचे ह्यावर आम्ही बोलत होतो .
कोणत्या हॉटेलमध्ये जायचे आणि कुठे
जेवायचे टेबल बुकिंग करायचे ? , हा विषय चालला
होता . शेजारी ६-७ वर्षाचा नातू बसला होता. तो त्याच्या बाबांना पटकन म्हणाला , “
बाबा , गूगल कर . हॉटेल शोधून काढ ,फोन नंबर मिळव आणि टेबल बुक कर”. “ गुगल कर”
असा सल्ला देणारा तो लहान मुलगा नव्या युगाचा खरा प्रतिनिधी . कुठे काय शोधायचे ,
हे त्याला त्या वयात गणकयंत्राची फारशी ओळख नसतानाही ऐकून माहित झाले होते . मी
थोडासा आश्चर्यचकितच झालो. तसा मी अनेक वर्षे संगणकाशी संबंधित आहे. जग वेगाने
बदलत आहे . संगणक आकाराने लहान होतहोत स्मार्टफोनमध्ये सामावले असून त्यांचा वेग
वाढत आहे.
Larry Page & Sergey Brin |
Adam Fisher “ह्याचे
व्ह्याली ऑफ जीनियस” हे पुस्तक वाचतो आहे . त्यांत The Shape of Internet ह्या
भागात Larry Page आणि Sergey Brin ह्या Stanford विद्यापीठातील दोन मुलांच्या
गंमतीजमती वाचत होतो . हेच ते गूगल चे शिल्पकार . विद्यापीठात प्रवेश घेतला खरा पण
त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या . डोक्यात भन्नाट कल्पना . त्यांना कॉम्पुटर सायन्स
मध्ये Ph.D. करावयाचे होते . त्यांना इंटरनेटवर काही विकायचे नव्हते , विकत
घ्यायचे नव्हते . त्यांना इंटरनेटवर ब्लॉग लिहायचा नव्हता किंवा कसलेही लिखाण
करावयाचे नव्हते . त्यांना पीएच.डी. साठी संशोधन करावयाचे होते. त्यासाठी नवे
शोधून काढणे आवश्यक होते . त्यासाठी माहिती मिळवण्यासाठी गणकयंत्र आणि इंटरनेट
ह्याचा वापर करणे आवश्यक होते . ब्रिनला Data मायनिंग करणे आवडत असे. त्या दोघांनी
गणकयंत्रावर माहिती जमविणे सुरु केले. त्यावेळी माहिती मिळविणे आजच्यासारखे सोपे
नव्हते. हजारो पाने उघडूनही पाहिजे ती माहिती मिळवणे खूपच त्रासदायक होते . तसा तो
वैतागच होता . ब्रिनला वाटले की ही माहिती मिळवताना जो प्रोग्राम आहे त्यात गणिती
सूत्र वापरले तर नेमकी माहिती मिळविणे सहज सोपे होईल. त्या दोघांनी रात्रंदिवस गणकयंत्राशी
झगडून एक प्रणाली तयार केली. आणि त्याच प्रणालीचे आजचे रूप म्हणजे "गुगल". त्यांनी
इंटरनेटला तर्कशास्त्रीय , उपयुक्त आणि माहिती शोधक यंत्र बनविले . आज माझा ६-७
वर्षाचा नातू मला माहितीशोधक यंत्र ( गुगल ) वापरून टेबल बुक करा असा सल्ला देतोय.
Larry आणि ब्रिन
बद्दल त्यांचे मित्र आणि सहकारी अनेक गंमतीजमती सांगतात. ही मुले Stanford पीएच.डी.शिक्षणासाठी आली .
त्यांना पीएच.डी साठी पूर्व परीक्षा देणे आवश्यक होते . ती परीक्षा खूप अवघड असते .
दहा परीक्षा उतीर्ण व्हाव्या लागतात . अनेकजण बर्याचवेळा २-३ दा नापास होतात .
त्यात २-३ वर्षे जातात. ब्रिन हा अतिशय हुशार मुलगा . पहिल्याच झटक्यात तो सर्व
पेपर मध्ये पास झाला . असा हा अतिशय बुध्दिमान . Larry ला तेवढे चांगले यश मिळाले
नव्हते . त्याचा कल ऑटोमेशन आणि नव्या कारच्या डिझाईनमध्ये होता .
ब्रिन हा खूप गप्पिष्ट
आणि सर्वांशी मैत्री करणारा तर पेज हा खूप कमी बोलणारा – घुमा . दोघेही भिन्न
स्वभावाचे . पेजला आपल्याला काय करायचे हे निश्चितपणे माहित होते . १९९५ मध्ये पेजला
अत्यंत आधुनिक अशी स्वयंचलित कार तयार करावयाची होती. आजही त्याचे स्वप्न अंतराळात
लिफ्टने कसे जाता येईल असे आहे .
Stanford मध्ये अनेक
संशोधन प्रकल्प चालू असतात . विद्यार्थी त्यांना आवडलेल्या प्रकल्पात भाग घेतात .
ते दोघे 'डिजिटल लायब्ररी' ह्या प्रकल्पात सामील झाले . On Line Information कशी शोधायची
ह्यावर काम चालू होते . त्यासाठी तेंव्हा पैसे द्यावे लागत असत . अचूक माहितीसाठी
खूप जास्त पैसे द्यावे लागत असत . ब्रिन आणि पेज ह्यांना हे काम आवडू लागलं .
ब्रिनला data mining ह्या विषयाची आवड होती तर पेजला वेब पेज शोधणे आणि
संशोधनासाठी त्याचा क्रमवार अभ्यास करणे आवडू लागले . पेज २३ वर्षाचा असेल . एके दिवशी
पेजला स्वप्न पडले. त्याने सर्व वेब पेज डाऊनलोड केले आणि केवळ त्या पेजच्या लिंक तेवढ्या
नोंद करून ठेवल्या . लिंक उघडली की पाहिजे ती माहिती उपलब्ध होईल , असे त्याला
वाटले . हे एका स्वप्नात . तो कामाला लागला . वेब मध्ये मागे आणि पुढे कसे जाता
येईल हे त्याला करून बघावयाचे होते. त्याचे विचारचक्र सुरु झाले. ब्रिनला माहिती
जमविणे आणि त्याचा कसा उपयोग करता येईल ह्याची अधिक आवड होती. पेजने त्याच्या मार्गदर्शक
शिक्षकाला आपण सर्व वेबपेज ८ दिवसात लोड करून दाखवितो, असे सांगितले. मार्गदर्शक त्याला
म्हणाला , 'करून बघ' . त्याला माहित होते की हे काम ८-१० दिवसांत होणे शक्य नाही. तो मनांतल्या
मनांत हसला . पेजने त्यासाठी Web Crawler हा प्रोग्राम लिहिला . संपूर्ण वेब
डाउनलोड करणे अवघड होते कारण संगणकाच्या मेमरीची क्षमताच तेव्हढी नव्हती. त्यासाठी
किती संगणक लागतील? , त्यांना कसे जोडता येईल ?, पाहिजे ती माहिती पाहिजे त्या
संगणकाकडून कशी मिळवता येईल ?, त्यासाठी किती वेळ थांबावे लागेल ?, कळ दाबली की
माहिती कशी समोर दिसेल ?, असे अनेक प्रश्न होते . ते महाकठीण काम होते . स्कॉट हसन
हा पेजच्या कामात मदत करू लागला . पेजने जावा ह्या भाषेत प्रोग्राम लिहिला होता हसनला
लिनक्स अधिक चांगली अवगत होती. हे सर्व काम
पीएच. डी. च्या संशोधनात बसत नव्हते . त्यात ओरिजिनल रिसर्च नव्हते . त्यांच्या हे
लक्षांत आले की जावा किंवा लिनक्स मध्ये एव्हढी माहिती जमा करणे शक्य नाही . त्यासाठी
त्यांनी पायथोन ह्या संगणकीय भाषेचा वापर करण्याचा विचार केला . १९९६ च्या शेवटी
हसनने नवीन Web Crawler लिहून काढले १५०
लाख वेबपेज डाऊनलोड करणे त्यांना शक्य झाले . वेबवर मागे – पुढे पाहिजे त्या पेजवर जाणे
शक्य झाले . पेजच्या लक्षांत आले की आपण एक सर्च इंजिन तयार करू शकतो. त्यावेळी
अनेक सर्च इंजिन बाजारात होते .पण ते वेगवेगळ्या विषयांचे होते . वैद्यकीय विषयाचे वेगळे ,
अभियांत्रिकी विषयाचे वेगळे . त्यांना एकत्र कसे जोडणार ? त्यासाठी ते लोक कसे तयार होणार
? अनेक प्रश्नांचा गुंता होता .त्यावेळी Alta Vista ह्या नावांचे एक वेगवान सर्च इंजिन
होते . हे सर्व डिग्री मिळवण्यासाठी उपयुक्त नव्हते . ह्या संबंधी इतर काही
लोकांनी आधीच काम करून ठेवले होते . नवे शोधणे आवश्यक होते . त्यामुळे पदवीही मिळणार
नव्हती. Web Crawler हा काही गुगलचा शोध नाही . त्यांनी नंतर PageRank शोधून काढले
आणि त्यामुळे गुगलची वेगाने वाढ झाली. पेजचे लक्ष होते “ Random Surf” . ब्रिनला
पेजची कल्पना आवडली आणि त्यासाठी आवश्यक असलेले गणित ( Eigenvector of a matrix )
वापरून सिस्टीम तयार केली. त्यातून PageRank हा प्रोग्राम तयार झाला . ब्रिनला चार
गिगाबाईटचा गणकयंत्र पाहिजे होता . त्यांच्या विद्यापीठात ग्राफिक Lab मध्ये असा
गणकयंत्र होता. पेजला त्या गणकयंत्रावर काम करण्याची परवानगी होती. त्यावर त्यांनी
PageRank हा प्रोग्राम चालविण्याचा प्रयत्न केला .BackRub हे सर्च इंजिन ही चालवून
बघितले .मग नवे अधिक शक्तिमान सर्च इंजिन बनविण्याचे
ठरविले .त्यात अनेक अडचणी आल्या .हसन आणि ब्रिन ह्यांनी ८ आठवड्यात नवे सर्च इंजिन
बनविले . त्यावेळी अनेक सर्च इंजिन होते आणि त्यांच्याशी जोडणे ह्या मंडळीना जमले .काही
नवे प्रश्न निर्माण झाले . बाकीच्या सर्च इंजिनचे लायसन्स असणे आवश्यक होते. पेजला पीएच .डी पूर्ण करणे अधिक महत्वाचे वाटत होते . ही मंडळी व्हेन्चर कॅपिटल कसे मिळेल ह्याचा विचार करू लागले .
माहिती शोधून काढणे म्हणजे १२० इतर सेवा पुरवन्यासारखी एक सेवा असा लोकांचा दृष्टीकोण होता ,१९९७ साल उजाडले . त्यांनी विद्यापीठातील सर्वं SUN , IBM , Number of PCs जमा
केले आणि त्यांचे प्रोग्राम चालविले. त्यामुळे विद्यापीठातील सर्व गणकयंत्रे बंद पडली. आणि विद्यापीठाने त्या सर्वाना चांगल्या
पद्धतीने विदयापीठ सोडून जाण्यास सांगितले . गंमत म्हणजे जर तुम्हाला पीएच.डी.
करावयाचे असेल तेंव्हा विद्यापीठात अवश्य या असे ही सांगितले . असे हे आगळे विदयापीठ.
त्यांना नवा उत्साह
होताच . प्रकल्पाला पैसे कसे उभे करायचे ? , हा मुख्य प्रश्न होता . David Cheriton ह्या त्यांच्या सहकार्याने Andy Bechtolsheim ह्या पैसे गुंतवणार्या व्यक्तीची त्यांच्याशी ओळख करून दिली. पेज
आणि ब्रिन इतर सहकार्याबरोबर त्याला भेटायला गेले. Andy ह्यांनी पहिला प्रश्न केला
, “ तुम्ही ह्यातून पैसे कसे मिळवणार ?” . त्यांनी ते पैसे कसे मिळवणार ह्याचे
तोडकेमोडके उत्तर दिले . Andy ह्यांना त्यात व्यवसाय आहे असे वाटले नाही. मिटिंग
संपली . ते उठून जाण्यास निघाले . Andy उठले .त्यांनी कपाटातले चेकबुक काढले . एक
चेक लिहिला . त्यांनी ब्रिनला हंड्रेड थाऊजंड डॉलरचा एक चेक दिला . हे सर्व नाट्यमय होते . चेकवर लिहिले होते “ Google Inc.”. ही कंपनी त्यावेळी अस्तित्वात
नव्हती. आणि तोच मोठा प्रश्न ब्रिन आणि पेज समोर उभा होता .त्यांची कंपनी नव्हती.
कसलीही यंत्रणा उभी नव्हती. जागा नव्हती. गणकयंत्रे नव्हती. त्यांच्याकडे काहीही
नव्हते . फक्त आयडिया होती. त्या आयडियावर आधारित प्रकल्प होता .त्यांना पैसे गुंतवणारा मिळाला आणि त्यांनी GOOGLE INC ही कंपनी सुरु
केली .
अशी ही बुद्धीवान
माणसे – Larry Page / Sergey Brin . असा हा
व्हेन्चर भांडवल देणारा - Andy Bechtolsheim . अशी ही जिनिअस माणसे . असे गुंतवणूक करणारा लक्षाधीश .
Reference: Valley of Genius, “ The Shape of the Internet”
, Adam Fisher Pg 268-282 , Hachette Book Group, NY 10104 ( 2018)
Photo credit : Google Image