Ha Long Bay - Wonder of the World
युरोप - अमेरिका बघण्यासाठी सगळेच जण पहिली पसंती देतात. अलीकडे पूर्वेकडील देशांना बरेच जण जात आहेत. अमेरिका- व्हिएतनाम युद्धापासून मला व्हिएतनामला एकदा जावे असे वाटत असे. अमेरिकेत एका व्हिएतनामी विद्यार्थ्यांशी ओळख झाली होती . तेव्हा खूप गप्पा झाल्या आणि तेव्हाच ठरवले व्हिएतनामला जायचे. व्हिएतनाम दक्षिण- उत्तर खूप पसरलेला देश आहे . रुंदीला थोडा लहान आहे. कम्बोडिया , लाओस आणि चीन हे आजूबाजूचे देश. व्हिएतनामने तीन मोठी युद्धे पाहिली आहेत. चीन, कम्बोडिया आणि अमेरिकेबरोबरच्या तीन युद्धात व्हिएतनामची पूर्ण वाताहत झाली आहे. लाखो व्हिएतनामी ठार झाले . हो ची मिन्ह हा एक असा नेता मिळाला की ज्याच्यामुळे दक्षिण आणि उत्तर व्हिएतनाम एकत्र आले आणि मध्य व्हिएतनामच्या भागातून कंबोडियाला माघार घेऊन परतावे लागले . अमेरिकेबरोबरच्या १७ वर्षाच्या युद्धात अमेरिकेला सळो की पळो करून सोडणारे व्हिएतनामी सैनिक म्हणजे देशभक्तीचे उत्तम उदाहरण . आजही व्हिएतनामी ' My Country ' असा सतत उल्लेख करताना दिसतात . आमचा गाईड एक व्हिएतनामी तरुण होता . खूप बोलका . हसविणारा . स्वतः बद्दल, आई - वडिलांबद्दल - बायकोबद्दल मोकळेपणाने बोलणारा . सतत व्हिएतनामचा इतिहास सांगताना ' My Country 'असा उल्लेख करणारा .
अशा व्हिएतनाममध्ये दोन ठिकाणांना भेट देणे आवश्यक आहे. एक उत्तरेतील हनोई तर दक्षिणेतील हो ची मिन्ह सिटी ( पूर्वीचे सायगांव).
हनोई शहर एक व्हायब्रण्ट सिटी. न झोपणारे शहर. गर्दीचे शहर. उत्साही शहर. गरीब - श्रीमंतांचे शहर. कामकरी लोकांचे शहर. उद्योगी शहर. येथील धडपडणारी उद्योगी माणसं पाहिलीकी आपल्यात उत्साह शिरतो . मला मुंबईकरांची आठवण झाली.
'No trip to Vietnam is complete without a visit to Halong Bay' , असं वाचलं होतं . हनोईला आलो आहोत तर १८० किलोमीटर दूर असलेल्या हालॉंग बे ला गेलंच पाहिजे . जगातील ७ नव्या नैसर्गिक आश्चर्यापैकी एक म्हणजे हालॉंग बे. असंख्य छोट्या छोट्या बेटांचा समूह . निसर्गरम्य समुद्र किनारे. ह्या असंख्य बेटावर जाणे तसे कठीण नाही पण तेवढा वेळ असावा लागतो . त्यावर उत्तम उपाय म्हणजे क्रूजची सफर . दिवसभर क्रुजमधून ही बेटं पहात फिरायचे . २००० बेटं आहेत. युनेस्को ने वर्ल्ड हेरिटेज दर्जा दिल्यापासून प्रवासी संख्या खूप वाढली आहे. लाइमस्टोन च्या टेकड्या असलेली छोटी छोटी बेटं. निसर्गाचा चमत्कार . ५००० लाख वर्षांपूर्वीची ही निसर्गनिर्मिती .माणूस जन्माला येण्यापूर्वी चा हा पृथ्वीचा पूर्वेकडील भाग. तेही एक आश्चर्यच . आयलंड टॉवर्स ची उंची ५० मीटर ते १०० मीटर. १५५३ चौरस किलोमीटरच्या परिसरात १९६० टेकड्या असलेली बेटं. अप्रतिम निसर्ग सौन्दर्यानी नटलेला हा हालॉंग बे. आजूबाजूला फ्लोटिंग फिशिंग व्हिलेजेस . ह्या छोट्या छोट्या बेटावरील दाट जंगल खुणावत राहते . आपली बोट अगदी जवळ जाते. आपण चिंचोळ्या मार्गाने पुढे जात राहतो आणि पुन्हा आपण नवीन बेटांच्या परिसरात जातो . सगळेच आश्चर्यकारक . आपण एक दोन बेटावर जातो. लाइमस्टोनच्या टेकड्या चढतो . आतमध्ये गुहेत जातो आणि निसर्गाच्या चमत्कारांनी तोंडात बोटे घालतो . गुहेमधील प्रकाश किरणांचा खेळ अचंबित करणारा. लाइमस्टोनच्या गुहेत अनेक शिल्पाकृती . आपण बघावी आणि आपल्याला कल्पनेला जे वाटतं ती शिल्पाकृती समोर दिसते . आपल्या कल्पना शक्तीच्या बाहेर असा हा खेळ. ३६० डिग्री कोनातून कुठेही पहा . अनेक शिल्पाकृतींचे म्युझियम पाहिल्यासारखे आपण फिरत राहतो.
Magnificent , Gracious and Graceful Country , Towering Limestone Pillars , Tiny Islets , Emerald Waters of Gulf of Tonkin , Ethereal Beauty , Classic cruise journey , To see the Wonder of the World ....Wow !!! Wow !!! Worth visiting ! Must visit ! East is East as good as West !!! My impressions of Ha Long .