Wednesday, September 4, 2019

I SALUTE MY TEACHERS

तुम्ही खरे विद्यार्थी असाल तर शिक्षक तुमच्या आजूबाजूलाच असतात हे लक्षात असू द्यावे.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.

आज शिक्षक दिन . काही शिक्षक तुमच्या आयुष्यात येतात . त्यांनी तुम्हाला प्रत्यक्ष शिकविलेले नसते . तुम्ही त्यांच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी नसतात .त्यांचे तुमच्यावर त्यांच्या विद्यार्थ्यांसारखे प्रेम असते . आपुलकी असते . असा एक शिक्षक मला मिळाला . त्यांचे नांव प्रोफेसर जे जी काणे . ते युडीसीटीचे डायरेक्टर होते . त्यांचा विषय होता ऑइल टेक्नॉलॉजी . मी युडीसीटी मध्ये पदार्थविज्ञान विभागात पी. एचडी .करीत होतो . यूजीसीची ३ वर्षाची शिष्यवृत्ती संपली होती .थिसीस लिहिण्याचे काम सुरु होते . म्हणून मी औरंगाबादच्या ज्ञान -विज्ञान महाविद्यालयात लेक्चरर झालो . माझे मुंबई - औरंगाबाद येणे - जाणे सुरु झाले . त्यामुळे थिसिसचे काम मागे पडले . काही प्रयोग करणे राहिले होते . असेच एके दिवशी काणे सर मी प्रयोग करीत असताना आमच्या प्रयोगशाळेत आले . त्यांनी माझी विचारपूस केली .माझी युजीसी शिष्यवृत्ती संपली आहे हे त्यांना माहित होते . मी मुंबई - औरंगाबाद येणे - जाणे करतो हे त्यांना समजले होते . माझे काम मागे पडते आहे हे त्यांना समजले . त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात भेटीसाठी बोलविले . मी भीतभीत त्यांना भेटायला गेलो . त्यांनी मला कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅब , माटुंगा - युडीसीटीच्या जवळच असलेली - ह्या संस्थेत सायंटिफिक असिस्टंटची जागा आहे . तेथे प्रयत्न कर असा सल्ला दिला . 'तेथे नोकरी मिळाली तर तुला सोयीचे होईल . तुला युडीसीटी जवळ असेल . तुझ्या कामाला गती येईल .लवकर थिसीस पूर्ण करता येईल .तुझी आर्थिक विवंचना संपेल ' . मी अर्ज केला आणि निवडला गेलो. मी त्या संस्थेतील संचालकांचा सायंटिफिक इन्फर्मेशन सहाय्य्क झालो . युडीसीटी जवळ होती . संध्याकाळी प्रयोगशाळेत हजर असे . लायब्ररी उघडी असे . माझे काम वेगाने झाले . मी सहा महिन्यात थिसीस सबमिट केला . काणे सरांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले . विद्यार्थ्यांबद्दल एवढी आपुलकी असलेला , त्यांच्या समस्यांची जाण असणारा देवमाणूस असलेला शिक्षक म्हणजे काणे सर . आजही त्यांची मूर्ती मला माझ्या डोळ्यासमोर दिसते आहे . माझ्या पाठीवर हात ठेऊन ते मला हाक मारीत आहेत ...' नरेंद्र .... ' .
मी त्या देवमाणसाला नमस्कार करतो . असे माझे शिक्षक नसलेले शिक्षक . खरे मार्गदर्शक . माझे आयुष्य बदलून टाकणारे शिक्षक !

Today is a Teacher's Day in India . I pay my respect to my two great teachers who have made a great impact on my life . 1) Dr N K Choudhury, D.Sc. , my Ph.D research guide who guided me for achieving excellence in physics research and 2) Dr Billmeyer F W Jr of Rensselaer Polytechnic Institute , Troy , N Y who taught me Color science and technology which helped me to use it in industrial Color applications . Indian Color industry saved millions of Rupees by using industrial Color control.

Dr N K Choudhuri, D.Sc.
My Research Guide 
 I cannot forget my teacher Dr N K Choudhuri . He was my Ph.D guide in physics at the University Department of Chemical Technology , University of Bombay . He taught me the importance of perfection in science research . He told me that in science research , you have to have " non-compromising attitude". A great personality. Thank you Dr Choudhuri.

Tuesday, September 3, 2019

शिकणे आनंदाचे


Image may contain: one or more people and people sitting

संगणकीय प्रौढ शिक्षण वर्ग 

चाळीस तासांचा वर्ग !
भारतात ३५ कोटी लोक निरक्षर आहेत. त्यात स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. आपल्या देशाच्या विकासाच्या वाटचालीत निरक्षर प्रौढांना साक्षर करणे अत्यंत आवश्यक आहे. विकासाची गती खुंटण्याचं, गरिबीबरोबरच निरक्षरता हेही एक कारण आहे. १५ ते ३० वयोगटातील निरक्षर लोक शाळेत जाण्यासाठी तयार नसतात. वृद्धांना त्यांच्या मुला-मुलींकडून शिकायचे नसते. पोटापाण्यासाठी त्यांना छोटीमोठी कामे करावी लागतात. त्यातून त्यांना वेळ मिळू शकत नाही. आता ह्या वयात शिकून काय करायचे? - असा त्यांचा मूळ प्रश्न. एकदा वय वाढल्यानंतर साक्षर करणे फार कठीण असते. त्यांना विकासात सहभागी करून घ्यायचे असेल तर त्यांना किमान लिहिणे-वाचणे आले पाहिजे. त्यांना सही करता आली पाहिजे. निरनिराळे फॉर्म भरता आले पाहिजेत. हिशोब समजला पाहिजे आणि किमान दोन अंकी आकडेमोड आली पाहिजे.
Image may contain: 2 people, people sitting
साक्षरतेसाठी नवे तंत्रज्ञान 
निरक्षरांना साक्षर करण्यासाठी नवे डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. आता प्रौढ शिक्षण सहज शक्य आहे. या नव्या डिजिटल क्रांतीमुळे ४० तासात निरक्षर लोकांना साक्षर करणे सहज शक्य आहे. या,वर्गात बसा,टीव्ही पाहिल्यासारखे स्क्रीनवर बघा आणि हसत-खेळत शिका. टीव्हीवर जशी सिरीयल नेमाने बघतात, तसे हे ४०- ५० धडे नुसते मन लावून ऐका. ३०० ते ५०० शब्दांची ओळख होईल आणि हे निरक्षर लोक वर्तमानपत्र वाचू लागतील. हे शक्य झाले आहे. ह्या योजनेत २ लाख निरक्षर लोक साक्षर झाले आहेत.
Image may contain: 1 person, smiling, standing and indoor
डॉ नरेंद्र गंगाखेडकर  ह्या प्रकल्पाची माहिती देत आहेत . शेजारी आहेत  जॅकोब कोशी  रोटरी क्लब ऑफ मुंबई अंधेरीचे अध्यक्ष . ह्यांनी रोटरीच्या माध्यमातून साक्षरतेसाठी अशी ८ केंद्रे सुरु केली होती.
या साक्षरता अभियानासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसिएस)चे माजी संचालक फकीरचंद कोहली ह्यांनी संगणकीय तंत्रज्ञानाच्या आधारे एक योजना राबवली. प्रौढ शिक्षणतज्ञांचा सल्ला घेऊन एक अतिशय सोपी संगणकीय प्रणाली तयार केली. दृक्‍-श्राव्य तंत्र असल्यामुळे प्रौढ निरक्षर लोक ऐकत–पहात शिकतात. कोणत्याही शिक्षकाची गरज नसते. क्लिक करा आणि कार्यक्रम बघा. ऍनिमेशन तंत्र वापरून वर्गपाठ आखलेला असतो.
या प्रणालीमुळे रोज नवे शिकता येते. रोज थोडी-थोडी शब्दांची ओळख होत जाते. शिकण्याचा उत्साह वाढत जातो. रोज वर्गावर यावेसे वाटते. आधी शब्द समजू लागतात आणि मग अक्षरओळख होते. निरक्षर व्यक्तीला शब्द माहीत असतातच. त्यांना अक्षरओळख नसते. शब्दातून अक्षराकडे असा हा प्रवास आहे. शब्द ओळखू लागले की अक्षरांची ओळख होत जाते. रोज ३० शब्द समजतात. पाच शब्द एका मिनिटात लिहिता येतात. १ ते १०० आकडे मोजता-लिहिता येतात. तीन आकडी बेरीज–वजाबाकी करता येते. दोन आकडी गुणाकार-भागाकार करता येतो. असे हे सोपे तंत्रज्ञान आहे.
महाकालीच्या वृद्ध आजी आता नातवाबरोबर अभ्यास करू लागल्यात. बसचा नंबर, स्टेशन कोणते आले हे वाचून समजते, बँकेत सही करता येते आणि वर्तमानपत्रातील ठळक बातम्या सहज वाचता येतात याचा त्यांना अधिक आनंद आहे.
-डॉ नरेंद्र गंगाखेडकर , मुंबई
संपर्क: TCS Corporate Adult Literacy Program (ALP) Group Tata Consultancy Services Ltd. (022) 6778 9393, (022) 6778 9378 (Direct) Email: Corporate.CBFL@tcs.com Website: www.tcs.com/cs
पुर्व प्रसिद्धी 

SuperSchool :स. भू. शिक्षणसंस्थेचा नवा शैक्षणिक उपक्रम


SuperSchool - आहे काय ?
काल औरंगाबादेत सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या एका आगळ्यावेगळ्या शिक्षणउपक्रमाच्या समारंभाला गेलो होतो . उपक्रम होता' सुपर स्कूल ' च्या उदघाटनाचा . माझा मेव्हणा केदार देशपांडे ह्याने त्याच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'सुपर स्कूल 'साठी ६ पैकी एक अत्याधुनिक वर्ग उभारण्यासाठी देणगी दिली होती . त्यामुळे त्या कार्यक्रमाला आम्हांला आमंत्रित केले होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्या अत्याधुनिक वर्गखोलीचे उदघाटन झाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष वर्गात जाऊन बसलो आणि ह्या नव्या शैक्षणिक पद्धतीची थोडी ओळख झाली . नंतरच्या दिमाखदार समारंभात संस्थेचे अध्यक्ष राम भोगले ह्यांचे ह्याच उपक्रमाबद्दल खूप विस्ताराने सुरेख भाषण झाले .सध्या ६ वर्गखोल्यासाठी ६ देणगीदार संस्थेस मिळाले आहेत. पालक - शिक्षक खूप उत्साही आहेत . त्या समारंभाची काही क्षणचित्रे खाली देत आहे . 

केदार देशपांडे ह्यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ सरस्वती भुवन प्रशाळेतील एक वर्गखोली देणगी देऊन अत्याधुनिक केली . 

SuperSchool  मधील हा अत्याधुनिक वर्ग 
Superschool 
महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड ह्या सरकारी संस्थेने विद्यार्थ्यांना सुपर परफॉर्मर होण्यासाठी आखलेला हा नवा शिक्षण उपक्रम .
हसत खेळत शिका . 
कंटाळा आलेल्या मुलांना अभ्यासात रस निर्माण करणारा हा शिक्षण प्रयोग . 
शिक्षकांना शिकविण्यासाठी उपलब्ध असलेले डिजिटल तंत्रज्ञान . डिजिटल नेटिंग असलेला विद्यार्थी अवघड संकल्पना सहज आत्मसात करू शकेल असा हा एक शिक्षण प्रयोग .
E-Learning शिक्षण प्रणाली .
भाषा - गणित - विज्ञान - समाजशास्त्र ह्या सर्वच विषयातील अवघड संकल्पना सोप्या करून सांगतणारा व रुची निर्माण करणारा संगणक असलेला सहशिक्षक .
शिक्षक - विद्यार्थी संवाद ,
विद्यार्थी - विद्यार्थी चर्चा घडवून आणणारा संवादक , 
प्रतिक्रिया देऊन मनोगत व्यक्त करण्याची सोय ,
विद्यार्थ्यांची आकलनक्षमता किती आहे ह्याचे शिक्षकांना सहज लक्षात आणून देण्याची सोय असलेले संगणकीय संख्याशास्त्र . शिक्षक - विद्यार्थी ह्यांचा आनंदी सहभाग .
दर १० मिनिटांनी शिक्षकाला सहज उपलब्ध होणारा वर्गखोलीचा रिपोर्ट - 
आपण शिकविलेले किती विद्यार्थ्यांना नीट कळले आहे ते समजणारे नवे तंत्र .
गृहपाठ - वर्गपाठ - मूल्यमापन ह्याची उत्तम सोय असलेला हा एकत्रित डिजिटल पाठ्यक्रम .
सध्यां ५ वी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध.

MKCL प्रशिक्षित शिक्षिका , लॅपटॉप . MKCL शेक्षणिक सॉफ्टवेअर , प्रोजेक्टर , वायफाय ,
प्रत्येक विद्यार्थ्याकडे एक सिमकार्ड नसलेले आयपॅड ( कॅमेरा , ब्लु टूथ ,अँड्रॉइड ,माईक उपलब्ध ), शिक्षक-विद्यार्थी संवाद उपलब्ध  

MKCL Superschool
काय हवे ह्या वर्गात :
शिक्षक - प्रशिक्षित
लॅपटॉप
वायफाय
प्रत्येक विद्यार्थ्याला हवा एक मोबाईल किंवा आयपॅड - त्यात कॅमेरा ,माईक ,ब्लूटूथ ,स्पिकर ,अँड्रॉइड असणे
आवश्यक. सिम कार्ड - Deactivated - नो फेसबुक , कोणतेही इतर अँप्लिकेशन नाही . ते नाहीतच . त्यामुळे कोणताही गैरवापर होणार नाही.
MKCL Superschool software
शिक्षकाला विद्यार्थी काय करतो ,कसा वापरतो हे सहज समजते .
( See MKCL Website for Demo - Video )
हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. MKCL च्या शास्त्रज्ञ - तंत्रज्ञ मंडळीचे मनापासून अभिनंदन.

लोकसहभाग हवा असा हा एक शैक्षणिक उपक्रम आहे.

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष SuperSchool ची संकल्पना मांडताना 
राम भोगले ह्यांनी त्यांच्या सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेसाठी हा शिक्षणउपक्रम अतिशय जोमाने सुरु केला असून त्याला उत्तम प्रतिसाद दिसून येतो आहे . ही नवी शिक्षणक्रांती असेल .

केदार देशपांडे ह्यांना ह्या  शिक्षणक्रमाला  देणगी देऊन जी अत्याधुनिक वर्ग खोली उभी राहिली त्याबद्दल झालेला आनंद .