Tuesday, September 30, 2014

“Make In India” कसे राबवता येईल ?

आर.आय.( रेसिडेंट इंडियन्स)चा एन.आर.आय (नॉन.रेसिडेंट.इंडियन) वर राग का?

गेल्या साठ सत्तर वर्षात भारतीय अमेरिकेत आणि इतर देशात कां गेले ? ब्रेनड्रेन चा प्रश्न का निर्माण झाला ? आय आय टी / आय आय एम झालेले लोक जसे गेले तसेच ह्या देशात पुढील शिक्षणाची संधी मिळाली नाही म्हणून इतर पदवीधर देश सोडून गेले. सुरुवातीला ह्या लोकामध्ये उच्च वर्णीय लोकांचा भरणा होता. अलिकडे बहुतेक मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले-मुली सुरुवातीला शिक्षणासाठी जातात आणि कालांतराने तेथेच स्थाईक होतात. ह्यासाठी प्रामुख्याने आपल्या देशातील सर्वच क्षेत्रातील आरक्षण जबाबदार होते. आता सुरुवातीला जे आरक्षण मिळून शिक्षित झाले होते तेही देश सोडून जाण्याची संख्या भरपूर आहे. ओ बी सी गटातील परदेशी जाणार्यांची संख्याही लक्षणीय आहे. महाराष्ट्र – बंगाल – कर्नाटक – आंध्र ह्या प्रांतातून जाणारे संख्येने खूप आहेत. ह्याचा अर्थ आपल्या सरकारने गेल्या ६० – ७० वर्षात ह्याबाबतीत काहीही केलेले नाही.

काही समूह शिक्षणासाठी न जाता इतर कारणासाठी परदेशी जातात. छोटे मोठे व्यवसाय करतात. एकजण गेला की कुटुंबातील पाच-सात जण जातात. छोटी दुकाने काढतात. मोटेल काढतात. रेस्टोरंट चालवतात. ह्यामध्ये गुजराती समाज जास्त दिसून येतो. वाहन चालविणारे सरदारही संख्येने खूप आहेत. काहीजण पेट्रोल पंप चालवतात. पडेल ती छोटी मोठी कामे करून पैसा मिळवतात. त्यांची दुसरी – तिसरी पिढी तेथेच वाढली असल्यामुळे अधिक शिक्षित असते व विविध क्षेत्रात काम करते. देशातील सर्वच भागातून लोक तेथे जातात व आपले जीवन अधिक चांगले करण्यासाठी धडपडत असतात. युरोपमधील सर्वच  देशात भारतीय रेस्टोरंट दिसून येतात. तेथे छोटीमोठी कामे करणारी भारतीय मंडळी कशी राहतात हे समजून घेतले तर त्यांच्या हालअपेष्टा संपल्या आहेत असे जाणवत नाहीत.
मोदींच्या सत्कारासाठी न्युयॉर्क मधील सभेसाठी १८००० भारतीय जमले होते. त्यात संख्येने गुजराथी समाज जास्त होता. तो अधिक सुखवस्तू होता. सरासरी १००००० डॉलर उत्पन्न असणारा होता. त्यांच्यातील उत्साह दांडगा होता. ते मोदीभक्त होते असे काही जणांचे मत आहे. ह्या गुजराती समाजाची संख्या त्या भागात खूप जास्त आहे. त्यात पटेल हा वर्ग अधिक आहे. ते अमेरिकेत स्थाईक झाले असले तरी गुजराती पद्धतीनेच आपले जीवन जगत असतात. एकंदर सारेच भारतीय तेथे राहत असले तरी अमेरिकन पद्धतीचे आयुष्य जगत नाहीत. ते तसे भारतीय जीवनपद्धतीच जगतात. थोडेफार अमेरिकन पद्धतीने राहतात व त्यामुळे सेव्हिंग्ज करतात व पैसा बाळगून असतात . त्यांचे एक मन भारतात असते. सुरुवातीला ते नियमितपणे भारतात येत असतात. मग हळूहळू येणे कमी होत जाते. साधारणतः ४-५ वर्षे तेथे काढल्यानंतर व एकदाचे ग्रीन कार्ड मिळाल्यावर भारतात कोणी परत येत नाही. ते अधून मधून भारत भेटी देतात.
ह्या “मोदीभक्त” एन आर आय वर भारतातील लोक का रागावले आहेत ? गेल्या काही वर्षापासून गुजरात बदलले आहे. पूर्वीचे राहिलेले नाही. मोदीच्या काळात झपाट्याने प्रगती झाली. दरवर्षी मायदेशी येऊन भेट देणाऱ्या लोकांना बदल दिसू लागला. मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जेंव्हा निवड झाली तेंव्हाच ह्या एन आर आय लोकांना खूप आनंद झाला आणि निवडणुकीच्या काळात अनेक जण सुट्टी काढून मोदींच्या प्रचारासाठी भारतात आले. त्यांनी आपला पैसा आणि वेळ दिला. त्यांना ह्या नेतृत्वात एक स्वप्न दिसले. ते त्यांच्यासाठी मनापासून झटले. ह्या एन आर आय ची संख्या खूप मोठी होती. आणि न्युयॉर्कच्या सभेत हेच लोक संख्येने अधिक होते. त्यांना आपल्या नेत्याचा सत्कार करावयाचा होता म्हणून ते अधिक उत्साही होते.
त्यांचा एक पाय भारतात आणि एक पाय अमेरिकेत ठेऊन जगायचे आहे. त्यांचे मन भारतात आहे पण येथे त्यांना चांगले आयुष्य जगणे शक्य नव्हते म्हणून ते देश सोडून अधिक चांगले जगण्यासाठी तेथे गेले. आज त्यांना त्यांच्या स्वप्नाचा भारत दिसतो आहे कारण त्यांनी बदललेला गुजरात बघितला आहे. The Key to success is having dreams आणि मोदींच्या नेतृत्वाकडे ते आशेने बघत आहेत कारण त्यांना असे वाटते की The key to success is making your dreams come true. ती वेळ आली आहे . त्यांच्याकडे गुंतवण्यासाठी पैसा असल्यामुळे त्यांना “ MAKE IN INDIA “ हे फार मोठे आकर्षण वाटते.
MAKE IN INDIA
एक साधे उदाहरण देतो. एका कंपनीने PCXT बाजारात आणला होता. अमेरिकेत असलेल्या एका गुजराती संगणक तंत्रज्ञाने ह्या कंपनीची एजन्सी मिळवली होती. अमेरिकेत विक्री केंद्र सुरु केले होते. बर्यापैकी पैसे कमावले. नवे तंत्रज्ञान होते. एका भारत भेटीत भारताची गरज त्याच्या लक्षात आली. त्याने अमेरिकेत कंपनी सुरु केली. भारतातही स्वतःच्या घरण्या माणसांची मदत घेऊन एक कंपनी सुरु केली. भारतात “ MAKE IN INDIA” करणारी ही PCXT कंपनी त्याच्या अमेरिकेतील कंपनीकडून  PCXTचे पार्टस घेऊन भारतात PCXT तयार करू लागली. थोड्याच दिवसात खूप मोठी विक्री होऊ लागली आणि एक मोठी कम्पुटर कंपनी झाली. हेच तंत्र इतर लोकांच्या लक्षात आले आणि थोड्याच दिवसात अनेक PC तयार करणाऱ्या कंपन्या भारतभर सुरु झाल्या. एवढेच काय तर साधा इलेक्ट्रोनिक्स डिप्लोमा घेऊन एक दोन वर्षे काम करणारा इंजिनिअर स्वतःचा PC तयार करणारा व्यवसाय करू लागला. आजही असे अनेक उद्योजक माझ्या ओळखीचे आहेत. असे डोके गुजराथी माणसाचेच असते. अमेरिकेत स्थाईक झालेले अनेक गुजराथी हे TECHNOLOGY TRANSFER सहज करू शकतात. मराठी इंजिनिअर अधिक पगाराची नोकरी करून समाधानी राहतो. त्यांचे तसे नसते.अनेक क्षेत्रात संशोधन करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ मंडळीना ह्या क्षेत्राची चांगली कल्पना आहे.
अमेरिकेत Technology आणि Innovation इतक्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. ते लायसन्स विकत घेऊन उपलब्ध झाले तर भारतात अतिशय कमी किमतीत हे Products तयार होऊ शकतात. तुम्ही १५-२० दिवसाच्या दौर्यात २-४ Technology Products त्यांची योग्य ती लायसन्स फीस देऊन सहज घेऊन जाऊ शकतात. “ Make In India” ज्यांना करावयाचे आहे त्यांनी ह्या एन आर आय लोकांचा अधिकात अधिक उपयोग करून घ्यावा. छोट्या उद्योजकाने ह्या कल्पनेचा कल्पकतेने उपयोग केला तर अनेक वस्तू भारतात कमी किमतीत बनवता येतील.
म्हणून मला मोदींची “ MAKE IN INDIA” ही कल्पना नवी नसली तरी अधिक आकर्षक वाटते. 
डॉ नरेंद्र गंगाखेडकर
drnsg@rediffmail.com 



Thursday, September 25, 2014

Wish You Best of Luck ह्या सदिच्छेचा उपयोग होतो काय ?

महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध शस्त्रक्रिया विशारद होते. त्यांनी लाखो यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. प्रत्येक शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ते शस्त्रक्रिया सभागारातील देवाच्या फोटोपुढे नतमस्तक होत आणि मगच शस्त्रक्रिया सुरु करीत असत. एकदा त्यांना ह्या संबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी असे उत्तर दिले , ' माझ्या हाताच्या पलीकडेही अशी काही शक्ती आहे की तिच्या हातात संपूर्ण यश मिळण्याची किमया आहे म्हणून मी त्या शक्तीला नमन करतो .माझा तसा विश्वास आहे. माझी तशी श्रद्धा आहे.' माणसाची अशी श्रद्धा असते . 
आपण परीक्षेला जात असतो . खूप अभ्यास केलेला असतो. आपल्याला आपले मित्र - हितचिंतक शुभेच्छा देतात . ' बेस्ट ऑफ लक ' असे म्हणतात . हे लक कुठे असते? त्याचा काही उपयोग होतो कां? यश तर आपल्या अभ्यासावर अवलंबून असते. मग ह्या शुभेच्छांचा काय उपयोग? 
पाश्चिमात्य देशातही अशा शुभेच्छा कां देत असतात ? 
त्यांच्याकडे बहुतेक सर्वजण बोलताना शेवटी ' God Bless You ' असे कां म्हणतात? 

एवढेच काय, सकाळी कोणी भेटल्यास ओळख नसली तरी ' Good Morning ' असे कां म्हणतात ? त्यामुळे आपली सकाळ खरोखरच चांगली जाते कां? 
आपण आपल्या आई- वडिलांच्या किंवा वडीलधार्या माणसांच्या पाया पडतो किंवा वाकून नमस्कार करतो. त्यांचे हात आपल्या पाठीवर पडतात व ते आपल्याला ' यशस्वी भव ' असा आशीर्वाद देतात. त्या आशीर्वादामुळे आपण यशस्वी होतो कां? ह्या शुभेच्छा किंवा आशीर्वादामुळे आपणास न कळत एक शक्ती प्राप्त होत असते कां ? एक आत्मिक बळ मिळत असते कां? 
मंगलयान मोहीम यशस्वी व्हावी म्हणून ह्या मोहिमेचे प्रमुख डॉ राधाकृष्णन ह्यांनी मोहिमेपुर्वी तिरुपतीच्या बालाजीचे दर्शन घेऊन मंगलयानाची प्रतिकृती देवाला अर्पण केली . ती त्यांची श्रद्धा होती . त्यांचा देवावर विश्वास होता . तो त्यांच्यावर लहानपणापासून झालेला घरातील संस्कार होता. असे केल्याने त्यांना एक आत्मिक बळ मिळाले असणार . हा त्यांचा वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्न होता. त्यांची ही श्रद्धा दुसर्या कोणासाठी हानिकारक नव्हती. काही जणांना ती अंधश्रद्धा वाटते. पण त्यांना ती आत्मबळ देणारी वाटत असावी . ज्यांना देव आहे असे वाटते , त्यांच्यासाठी तो आहे व ज्यांना देव नाही असे वाटते त्यांच्यासाठी तो नाही. त्यामुळे स्वतःला आत्मिक बळ मिळण्यासाठी जे लोक देवाचे स्मरण करतात त्यांच्या कृतीवर बोलण्याचा इतरांना काय अधिकार ?
दुसर्यांच्या भावनाचा आदर करणे आवश्यक आहे. उगाच 'उचलली जीभ आणि लावली टाळ्याला ' असे होता कामा नये
माझ्या ओळखीचे समाजवादी विचाराचे , देवाधर्मावर विश्वास नसलेले , परखड विचाराचे , वर्तमानपत्राचे ख्यातनाम संपादक होते. त्यांचे सहकारी देवभक्त होते. ते लघुरुद्र / सत्यनारायण पूजा करीत असत. संपादक त्यांच्याघरी तीर्थ प्रसादाला व मेहूण म्हणून जेवावयास येत असत. त्यांनी त्यांच्या श्रद्धेची कधीच चेष्टा केली नाही. त्यांच्या श्रद्धेचा आदर केला. 
आपल्याला जरी पटत नसले तरी इतरांच्या श्रद्धेचा आदर करावयास शिकले पाहिजे . जो पर्यंत ही श्रद्धा वैयक्तिक असते व दुसर्यांना हानिकारक नसते तो पर्यंत इतरांनी त्यावर बोलण्याचा अधिकार नाही. ती त्या माणसाची गरज असते व त्याला आत्मिक बळ देते .

डॉ नरेंद्र गंगाखेडकर
·         Chandan Pawar : खूपच छान लेख आणि मनाला भिडणारा .....धन्यवाद

·          
Kalyan Shitole Purnapane Sahamat 

·          
Vijay Mainkar Fully agree to these views.
· 
·          

Vijay Habbu Superb commentary, Dr. Gangakhedkar !!!