There are
three archetypes that are essential for invention.The dreamer, the first person
who thinks of an idea. The Engineer who reduces the idea to prototype. And then
the entrepreneur who takes that one prototype and works out the marketing,
financing and business model to make thousands or millions of them. – Tom
Zimmerman
इंटरनेटचा गोल्ड रश संपला होता . आतां नवीन काय ? ह्या विचारात काही ब्रेनी लोक होते . फेसबुकची आयडिया मार्क झुकरबर्गच्या डोक्यात घोळत होती. त्याचे दोन तीन मित्र उत्तम इंजिनिअर होते. त्यांनी त्यावर काम करायला सुरु केलं. मार्क खरा उद्योजक विचाराचा होता. आणि त्याने थोड्याच काळात फेसबुकचे साम्राज्य निर्माण केले. इंटरनेट सुरु झालं . त्याला ३० वर्षात १ बिलियन युजर्स मिळाले. फेसबुकला केवळ १० वर्षात १ बिलियन युजर्स मिळाले. आज फेसबुकने जवळजवळ सर्व विश्वच व्यापून टाकलंय. ज्याच्या हातात स्मार्ट फोन दिसतो तो थोड्याथोड्या वेळाने फेसबुकवर न्यूजफीड वाचत असतो. नाहीतर फोटो पहात असतो. त्याचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला त्याच्या फेसबुक तंद्रीतून जागे करावे लागते. अशा ह्या फेसबुकचा इतिहास थोडासा समजावून घ्यायचा असेल तर Adam Fisher चे Valley of Genius हे पुस्तक वाचा. त्यातील ' I am CEO ... Bitch ' - Zuck moves to Silicon Valley to 'dominate' ( and does ) हा लेख वाचा. त्यात झुक आणि त्याचे सहकारी आपल्याला फेसबुकबद्दल माहिती सांगताना दिसतात. तुमच्या हे लक्षात येईल की उद्योगात यशस्वी होण्यासाठी नवी कल्पना सुचणारा एक माणूस लागतो. ती अमंलात आणणारा इंजिनिअर लागतो आणि उद्योगाची उभारणी करणारा उद्योजक लागतो. DREAMER,ENGINEER And ENTREPRENEUR हे सर्व जेंव्हा एकत्र येतात तेंव्हाच तुम्ही गुगल किंवा मायक्रोसॉफ्ट सारखी जागतिक इंटरनेट कंपनी उभी करू शकतात.
इंटरनेटचा गोल्ड रश संपला होता . आतां नवीन काय ? ह्या विचारात काही ब्रेनी लोक होते . फेसबुकची आयडिया मार्क झुकरबर्गच्या डोक्यात घोळत होती. त्याचे दोन तीन मित्र उत्तम इंजिनिअर होते. त्यांनी त्यावर काम करायला सुरु केलं. मार्क खरा उद्योजक विचाराचा होता. आणि त्याने थोड्याच काळात फेसबुकचे साम्राज्य निर्माण केले. इंटरनेट सुरु झालं . त्याला ३० वर्षात १ बिलियन युजर्स मिळाले. फेसबुकला केवळ १० वर्षात १ बिलियन युजर्स मिळाले. आज फेसबुकने जवळजवळ सर्व विश्वच व्यापून टाकलंय. ज्याच्या हातात स्मार्ट फोन दिसतो तो थोड्याथोड्या वेळाने फेसबुकवर न्यूजफीड वाचत असतो. नाहीतर फोटो पहात असतो. त्याचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला त्याच्या फेसबुक तंद्रीतून जागे करावे लागते. अशा ह्या फेसबुकचा इतिहास थोडासा समजावून घ्यायचा असेल तर Adam Fisher चे Valley of Genius हे पुस्तक वाचा. त्यातील ' I am CEO ... Bitch ' - Zuck moves to Silicon Valley to 'dominate' ( and does ) हा लेख वाचा. त्यात झुक आणि त्याचे सहकारी आपल्याला फेसबुकबद्दल माहिती सांगताना दिसतात. तुमच्या हे लक्षात येईल की उद्योगात यशस्वी होण्यासाठी नवी कल्पना सुचणारा एक माणूस लागतो. ती अमंलात आणणारा इंजिनिअर लागतो आणि उद्योगाची उभारणी करणारा उद्योजक लागतो. DREAMER,ENGINEER And ENTREPRENEUR हे सर्व जेंव्हा एकत्र येतात तेंव्हाच तुम्ही गुगल किंवा मायक्रोसॉफ्ट सारखी जागतिक इंटरनेट कंपनी उभी करू शकतात.
मार्क झुकरबर्ग हा फेसबुकचा
निर्माता. फेसबुक ही त्याचीच संकल्पना. ती अंमलात आणणारे मित्र
त्याचेच. इंटरनेटचा गोल्ड रश संपला होता . हार्वर्डचे विद्यार्थी काहीतरी नव्याच्या
शोधात होते. वसतिगृहात राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची यादी संगणकावर टाकायची होती.
विद्यार्थ्याचा फोटो , वसतिगृहाचे नांव , रूम नंबर , त्याचा फोटो संगणकावर टाकून
एकमेकाशी संपर्क साधायचा ही संकल्पना समोर ठेऊन पहिली डिरेक्टरी बनविली गेली तिचे
नांव होते facebook. सोशल मिडियाचे पर्व सुरु झाले ते असे. त्यावेळी डॉटकॉम पर्व संपले होते
. Napster हा सोशल मिडीयाचा पहिला प्रयोग तरुणांना आकर्षित करीत होता. ब्लॉग हा
प्रकार तेंव्हा नुकताच सुरु झाला होता आणि विद्यार्थी ब्लॉगमधून व्यक्त होऊ लागले होते . ते संवाद साधू लागले. तेथील
आजूबाजूच्या सर्व विद्यापीठात हे लोन पसरत गेले. MySpace ही सोशल मिडिया साईट त्यावेळी विद्यार्थीप्रिय होती, त्यात पोरनोग्राफीची चित्रे पहावयास मिळत होती.
झुकच्या मनांत
फेसबुकची संकल्पना तयार होती. तो न्यूयार्कला होता, त्याचे काही मित्र सिलिकॉन valleyत
होते. ते २-३ मित्र त्याला भेटायला न्यूयॉर्कला
आले. त्यांची चर्चा झाली . झुकने सिलिकॉन Valley ला जाण्याचे
ठरविले . एका छोट्या घरात त्यांनी कंपनी सुरु झाली . ही तरुण मुले म्हणजे हिप्पी मुलांचा गट होता. सर्व रुममध्ये संगणकाचे जाळे उभारले गेले . सर्वजण तेथेच जमत . गप्पा , चर्चा , सिगारेट ओढणे , बिअर पिणे , रात्रंदिवस संगणकावर
बसून काम करणे चालू असे. अशी ही कंपनी सुरु झाली. Sean Parker, Ruchi Singhavi,
Aaron Sitting आणि Mark Zukkerberg ही सुरुवातीची मंडळी. नंतर अनेक जण येऊन मिळाले.
झुकच्या एका संकल्पनेवर सुरु झालेला हा छोटा उद्योग.
ही मंडळी तेंव्हा
चर्चा करीत होती , गुगल की फेसबुक ? Kate Losse हा तरूण इंजिनिअर म्हणतो , “ मला नाही वाटत मी गुगलमध्ये
काम करू शकेल? मला फेसबुक अधिक आकर्षक वाटत
असे. तो गुगलमध्ये काम करण्यास 'Nerdy' म्हणजे मुर्खपणा समजत असे. त्याचे कारण
त्याला सोशल नेटवर्कवर काम करणे अधिक आवडत असे. त्या मुलांना BEER PONG हा बिअर पिणाऱ्या लोकांचा सोशल क्लब अधिक आवडत असे. ह्या
Beer Pong खेळात बिअर पिणारे लोक समोर ठेवलेल्या बिअर ग्लासवर टेनिसचा चेंडू टाकत
असत . ज्या ग्लासमध्ये आपला चेंडू पडत असे तो बिअर ग्लास तुम्हाला पिण्यास मिळत असे. हा त्यांचा
सोशल क्लब.
Terry Winogard
म्हणतो , “गुगल म्हणजे पदवीप्राप्त इंजिनिअर लोकांची कंपनी होती तर फेसबुक म्हणजे
पदवीपूर्व शिकलेल्या पण शिक्षण अर्धवट सोडून दिलेल्या मुलांची कंपनी होती. हा कंपनी कल्चरचा मुळ फरक होता”.
Jeff Rothschild ला फेसबुकमध्ये
काम करताना सुरुवातीला असे वाटले की ही जमलेली मुले येथे डेटिंगची साईट तयार करण्याचे काम करतात व डेटिंग पार्टनर शोधत असतात. त्याला तेथील कामाचे स्वरूप कळायला ८-१० दिवस लागले . मग मात्र तो त्यात रमला. एकदिवस मार्कने त्याचा
क्लास घेतला व त्याचे फेसबुकचे स्वप्न सांगितले. मार्कने आपण सोशल नेट्वर्किंग Platform
कसा तयार करणार आहोत?, MySpace पेक्षा ते कसे वेगळे असेल, मित्रांच्यामध्ये
नेट्वर्किंग चर्चा कशी करता येईल?, ह्याबद्दल खूप माहिती दिली आणि त्याला त्याच्या कामाचे खरे स्वरूप समजले. मार्क बोलत होता व तो मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता.
Max Kelly आणि मार्क ह्यांच्यात ही अशीच चर्चा झाली तेंव्हा त्याने आपली संकल्पना अधिक स्पष्ट केली.
‘ लोकांना नेटवर एकमेकाशी कसा संपर्क साधता येईल?, तुम्ही कोण आहात?, कुठे आहात?
, तुमच्या डोक्यात कसला विचार चालू आहे ?, तुमच्या आयुष्यात काय बदल होत आहेत ?, तुम्ही एकमेकांशी कसा संपर्क साधू शकता ?, अशा अनेक विचारांची देवाणघेवाण करणारा मित्रसमूह म्हणजे फेसबुक. FIND FRIENDS .CONNECT FRIENDS and SHARE WITH FRIENDS. USE INTERNET.” हा फेसबुकचा उद्देश त्याने सर्वाना स्पष्ट केला.
, तुमच्या डोक्यात कसला विचार चालू आहे ?, तुमच्या आयुष्यात काय बदल होत आहेत ?, तुम्ही एकमेकांशी कसा संपर्क साधू शकता ?, अशा अनेक विचारांची देवाणघेवाण करणारा मित्रसमूह म्हणजे फेसबुक. FIND FRIENDS .CONNECT FRIENDS and SHARE WITH FRIENDS. USE INTERNET.” हा फेसबुकचा उद्देश त्याने सर्वाना स्पष्ट केला.
ही सर्व मुले
इन्टरनेटने प्रभावित झालेली होती. त्यांना हा प्रकल्प खूप नवा होता. वेगळा होता. सोशल
मिडिया हा एक नवा विषय होता. इंटरनेटवर एकाच वेळी अनेक मित्र एकमेकाशी कसा संपर्क
साधू शकतील ह्याचीच कार्यप्रणाली ते तयार करीत होते. तेच तर फेसबुकचे खरे वैशिष्ट्.
इंटरनेट व सोशल मिडीयावर आधारलेला हा प्रकल्प त्यांना आकर्षित करीत होता. Aaron
Sittig म्हणतो, ‘ २००५ मध्ये मार्क झुकने आपल्या सहकार्यांना फेसबुकसंबंधी आपली
भूमिका अधिक स्पष्टपणे विषद केली. त्याला ५ प्रमुख गोष्टींचा अंतर्भाव करावयाचा होता.
1) NEWS FEED -मित्र नेमके काय करतात हे एकमेकाला कळविणे.
* 2)फोटो टाकणे3)आजूबाजूच्या Eventsची माहिती देणे.4)Party करण्यासंबंधी एकमेकाला कळविणे 5)Local Business Product संबंधी माहिती देणे
अगदी
सुरुवातीला News Feed हा प्रकार फेसबुकमध्ये नव्हता . फोटो टाकता येत नव्हते. प्रोफाईल फोटो
टाकतां येत असे. तो बदलला की लोक पुन्हा प्रोफाईल उघडून फोटो बघत असत . त्यावेळी
लोकांना प्रोफाईल फोटो सारखा बदलण्याचे जणू वेड लागले. आजही आपण अनेकजण तो बदलत
असतो पण आपल्याला ते लगेच लक्षात येते. त्यावेळी त्यांनी एक महिन्यात फोटो लोड करण्याची सोय
करून दिली आणि लोक वेडे झाले. ती फेसबुक क्रांती होती . लोकांना फोटो टाकण्याचे वेड
लागले. पहिल्याच दिवशी एका व्यक्तीने स्वतःचे ७०० फोटो टाकले. मग त्यात अल्बमची सोय झाली.
सर्वात फेसबुक
क्रांती झाली ती Tagging ह्या सोयीमुळे. हा प्रकार Game Changing होता . एका महिन्यात
५० लाख लोक युजर्स झाले.ते सगळे महाविद्यालयीन विद्यार्थी होते. हा प्रोग्राम तेथील सर्व
विद्यापीठातील विद्यार्थ्यापर्यंत अतिवेगाने पसरला.
Max
Kelley म्हणतो , ‘ फोटो टाकण्याच्या सोयीमुळे तुम्ही प्रत्येक लग्नाला उपस्थित
राहू लागला .तुम्ही जेथे जात तेथील फोटो मित्रांना सहज दिसू लागले.ही भन्नाट
कल्पना लोकांना खूपच आवडली. मात्र फेसबुक इंजिनिअरचे काम वाढू लागले. सिस्टीम प्रश्न
निर्माण झाले. ३ महिन्यात इंटरनेटवर सगळ्यात जास्त फोटो फेसबुकच्या माध्यमातून टाकले
गेले . ई-मेलने फोटो पाठविणे त्रासदायक होते. Tagging केल्यामुळे आपल्या मित्रांना ,
नातेवाईकांना ते जगांत कुठेही असले तरी सहज दिसू लागले.हे सर्व स्वस्त आणि मस्त
होते. वेळ खूप कमी लागत असे. Tagging मुळे खूपच फायदा झाला. संपर्क सहज होऊ लागला. सुरुवातीला
महाविद्यालयीन मुलासाठी असलेला हा प्रोग्राम वेगाने सामान्य माणसात प्रिय झाला. २००६
मध्ये News Feed मुळे फेसबुक म्हणजे २४ तासाचे जागतिक वृत्तपत्र झाले. एका क्षणात
बातम्या जगभर पसरू लागल्या. त्याचे नांवच “What is new?” असेच होते. सुरुवातीला तुम्ही
काय करता ?, इतर लोक काय करीत आहेत ? ह्या मर्यादित स्वरुपाची माहिती इतरांना
देणारे २४ तासाचे जागतिक वृत्तपत्र झाले. News Feed तुमचे होम पेज झाले. वैयक्तिक ,
कौटुंबिक , सामाजिक , राजकीय , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय बातम्या एका क्षणात जगभर
पसरू लागल्या. Tagging मुळे तुमच्या आप्तस्वकियाना तुमची माहिती सहज उपलब्ध झाली.
वर्तमानपत्रांची आवश्यकता कमी भासू लागली. १० अब्ज वर्तमानपत्रे म्हणजे फेसबुक. तुमचे
स्वतःचे 'मतपत्र'. मर्यादित किंवा अमर्यादित लोकासाठी .हा एक नवा चमत्कार होता .
ह्यामुळे जग बदलले तसेच अनेक नव्या समस्या निर्माण झाल्या .
रुची
संघवी हा झुकचा पहिल्यापासुनचा एक सहकारी. एक दीड वर्षात फेसबुकचे स्वरूप वेगाने
बदलले होते. अनेक नव्या समस्या निर्माण होऊ लागल्या. त्या वाढू लागल्या. तो म्हणतो
,’ आम्ही एक अवाढव्य न्यूज डीस्ट्रीब्यूटेड सीस्टीम तयार केली खरी पण त्यामुळे जग
वेगाने बदलू लागले.’ फेसबुकचा उपयोग करणारे काही लोक अतिसुज्ञ असतात तर काही लोक अतिमूर्ख
असतात, हे आमच्या लक्षात येऊ लागले'.त्यामुळे त्यांच्याकडे असंख्य चौकशा करणारे
लोक येऊ लागले आणि ते बेजार होऊ लागले.काहीना असं वाटू लागलं की हे सर्व सगळ्या
लोकांना अगदी सहज समजू लागलंय . ते धोकादायक आहे . नको त्या गोष्टींची माहिती नको त्या लोकांना होऊ
लागली.त्यामुळे काहीजण खूपच चिंतेत पडले. वैयक्तिक काहीच राहिलं नाही. हे अनेकांना
धोकादायक वाटू लागलं.चुकीची माहिती नकळत जगांत क्षणात पसरू लागली. लोकांच्या समस्या
वाढू लागल्या. आजही त्या चालू आहेत. सोशल मिडीयाने नुसता धुमाकूळ घातला आहे.वैयक्तिक
माहिती मर्यादित कशी ठेवता येईल ह्याचाही विचार होऊ लागला.
News
Feed खाली सुरुवातीला AWESOME बटण होते . ते नंतर LIKE झालं. COMMENTS हे बटण असल्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया वाढू लागल्या. मोबाईल इंटरनेटने अधिकच धुमाकूळ
घातला.
रुची
संघवी म्हणतात , ‘ लोक फेसबुकवर रागावले. प्रतिक्रिया वाढू लागल्या. कायद्याचे
प्रश्न निर्माण होऊ लागले.माहितीच्या गोपनीयतेचा प्रश्न निर्माण झाला.न्यायालयीन तंटे
निर्माण झाले. अनेक नव्या समस्या निर्माण झाल्या. फेसबुकवर बदल घडवून आणण्यासाठी
मागण्या होऊ लागल्या.१० टक्के लोकांनी फेसबुक सोडून दिले.एका बाजूला फेसबुकवर टीका होत होती तर दुसर्या बाजूला फेसबुकचा वापर दुप्पट – चौपट वाढला’. काही लोकांना फेसबुकची झिंग आली. जगांत सतत काहीतरी घडते आहे आणि ते जाणून
घेण्यासाठी फेसबुक उघडण्याची लोकांना संवय झाली . त्याचेच वेड लागले.
लोकांना त्याचे व्यसनच लागले.
रुची
सिंघवी ह्यांनी पहिला ब्लॉग फेसबुकवर लिहिला तेंव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद
मिळाला.मार्क झुकने अनेक जागतिक परिषदा घेतल्या.लोकांनी असंख्य प्रश्न त्याच्यासमोर
मांडले. सिस्टिममध्ये सतत बदल करावे लागले आणि ते चालूच आहेत. आज लोकांना News
Feed ची संवय झाली आहे. तेच फेसबुकचे वरदान – खरे बूम .
आज
फेसबुक म्हणजे फेसबुक युजर्सची जागतिक Directory झाली आहे .कोणालाही कोणाचीही एका
क्षणात माहिती अगदी सहज मिळते. आज सर्वच लोक ते वापरतात. त्यांचे नेटवर्किंग झाले
आहे.फेसबुकवर आपले आस्तित्व असणे लोकांना आवश्यक होऊन बसले आहे.
मार्कचे
एकच ध्येय होते . “ DOMINATE”
तो
नेहमी म्हणत असे, 'My aim is to Dominate on Internet'.
आज त्याने त्याचे 'Domination' सिद्ध केले आहे.
त्याने
त्याची कंपनी याहूला विकली नाही. त्याने तो प्रस्ताव ठुकरून लावला. त्याला असे वाटत
असे की ९० टक्के मर्ज झालेल्या कम्पन्या नंतर यशस्वी होत नसतात . त्याने आपली
कंपनी विकली नाही आणि आज 'फेसबुक' गुगल – MICROSOFT
सारखे इंटरनेटवर DOMINANT झाले
आहे.
Domination !!!
काही सहकार्यांच्या मदतीने उभे केलेले हे झुकचे इंटरनेटवरील साम्राज्य !
झुक म्हणजे इंटरनेट जगातले एक Dominant व्यक्तिमत्व !
आज फेसबुकने सामाजिक – राजकीय बदल वेगाने घडवून आणले
आहेत. सामाजिकशास्त्राचे तज्ञ हा गुंता कसा सुटेल ह्यासाठी विचारविनिमय करीत आहेत.
सोशल मिडीयाचा गैरवापर , कायद्याचे प्रश्न , राजकीय – सामाजिक परिणाम जगभर दिसून
येत आहेत. इंटरनेटला पुढे कुठे जायचे हे इंटरनेट ठरवीत आहे. पण लोकांना काय पाहिजे
हे त्यांचे तेच ठरविणार.
Erza Collahan झुकला म्हणतात , ‘ DOMINATION हा शब्द वापरू नकोस .
Sean
Parker म्हणतो , “ एकदा तू DOMINANT झालास की तुला कोणीही स्पर्धक रहाणार नाही.
स्पर्धक हा हवाच !’
स्टीव्हन
जॉन्सन म्हणतो , ‘ इंटरनेट सुरु झालं . त्याला ३० वर्षात १ बिलियन युजर्स मिळाले. फेसबुकला केवळ १० वर्षात १ बिलियन युजर्स मिळाले. Facebook is not
a service or an application. It is fundamentally a platform , on the same scale
as the internet itself.
Steve Jobs हा झुक्चा चाहता होता. तो म्हणतो .' झुकने पैशासाठी कंपनी विकली नाही आणि इन्टरनेटवर स्वतःचे
साम्राज्य निर्माण केलं म्हणून तो ग्रेट '.
कंपनी सुरु केली तेंव्हा मार्क झुकरबर्गच्या व्हिजीटिंग कार्डवर लिहिलेलं होतं
'"I am CEO …. Bitch". अशी ही व्यक्ती आणि वल्ली .
( संदर्भ आणि लेखाचा आधार :
VALLEY OF GENIUS
by Adam Fisher )