Wednesday, July 17, 2013

माणूस आणि त्याच्या गरजा ( Needs & Wants )


माणसाच्या गरजा निर्माण होतात त्या त्याच्या इच्छा- अपेक्षातून ( Desires ). आपल्या गरजांचे  दोन प्रकार, १) आवश्यक गरजा – Needs २) आपणास हव्या हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी ( Wants ). माणसाला आवश्यक गरजा पूर्ण झाल्यातरी काहीं गोष्टी हव्या हव्याशा वाटतात ( Wants ). त्यांची आवश्यकता असतेच असे नाही. काहीं वेळा किंवा बर्याच वेळा आपली ऐपत नसतांना. आर्थिक कुवत नसतांनाही आपण अशा गोष्टी मिळाव्यात म्हणून अपेक्षा करीत असतो किंवा ह्या किंवा त्या मार्गांनी मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यातून अपेक्षा भंग होत असतो. कधी कधी आपले प्रयत्नच अपुरे पडतात. आपली तशी क्षमताही नसते. मराठीत एक म्हण आहे. “ हात पाय पाहून पांघरून पसरावे “. हे  खरेंच आहे. त्यामुळे निराशा पदरी पडत नाही माणूस दुखी होत नाही.
Wants मुळे माणसाची भूक वाढते. तो Greedy होत जातो . तो असमाधानी होतो . दु:खी होतो. Wants वाढविणे चांगले नसते. आपण छोट्या घरात रहात असतो. कुटुंब मोठे होते म्हणून मोठे घर घ्यावयाचे असते. आपली गरज वाढते म्हणून आपण मोठ्या घरात किंवा बंगल्यात जातो. मग प्रतिष्ठा हवी म्हणून शहराच्या अतिशय महत्वाच्या ठिकाणी घर घ्यावेसे वाटते. अशा Wants वाढत जातात. हे धोक्याचे आहे तसेच स्वतःला विनाकारण असमाधानी करणे आहे.
आपल्याकडे छोटी कार असते. मग मोठी लक्झरी गाडी घ्यावीशी वाटते. आपल्याकडे साधा मोबाईल असतो. मग नवा सर्व सोई असलेला मोबाईल घ्यावासा वाटतो. तसेच टी.व्ही.चे . असे प्रत्येक गोष्टीचे होऊ लागते. हे मध्यमवर्गीयांचे दुखणे आहे. ज्ञानाच्या जोरावर गरिबीतून  वर आलेला हा मध्यम वर्ग ,खालच्या मध्यम वर्गातून (Lower Middle Class ) मध्यम मध्यम वर्गात ( Middle Middle Class ) जातो आणि मग त्याचा प्रवास  उच्य मध्यम वर्गाकडे ( Higher Middle Class) होतो .  गेल्या काहीं वर्षात हा बदल झपाट्याने होतो आहे. उच्च मध्यम वर्गाचा प्रवास नव श्रीमंत वर्गाकडे ( Neo Class Rich)  चालू आहे तर अति श्रीमंत हे Filthy Rich होत आहेत. त्यामुळे ह्या सर्वांच्या Wants वाढत आहेत. गरीब आणि अती श्रीमंत  वर्गाचे मात्र असे नसते.गरिबांना आवश्यक गरजाही पूर्ण करता येत नाहीत तर अतीश्रीमंतांना पैसा सहज उपलब्ध असल्यामुळे सर्व प्रकारच्या  Wants सहज उपलब्ध करून घेता येतात. 
मध्यम वर्गीय माणसास आपल्याला आवश्यक नसतांना नोकर –चाकर –ड्रायव्हर ठेवासा वाटणे , आपण दुसर्यांना श्रीमंत आहोत हे दाखविणे , नवीन नवीन गोष्टी घेत राहणे, त्या आपल्याजवळ आहेत म्हणून जगाला दाखवीत राहणे , त्याचा गर्व बाळगणे अशा गोष्टी करण्याचे वेड लागते. ह्या सार्या प्रकारामुळे ही भौतिक सुखे मिळवीत असताना आपण दु:खी कष्टी होत जातो हे त्याला कळतच नाही. 
 हे सारे मिळवायचे तर आपली आर्थिक क्षमता वाढवावयास  हवी. त्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवे. खरं म्हणजे अनेक वेळा आपल्यास बर्याच गोष्टींची आवश्यकताच नसते. तरीही आपण विनाकारण असा खर्च करीत असतो. त्यामुळे कधी कधी कर्जबाजारीही होतो. आपल्याजवळ Disposable पैसा असेल तर तो असाही वापरला जातो. "आणखी, आणखी" च्या मागे लागले की असे  होते.
अलिकडे गरजाच वाढत आहेत हे खरे. मोबाईल ही गरज आहे पण महागडा मोबाईल ही काही आवश्यकता नाही. ती आवश्यकता असेल ही. त्यासाठी तुमच्या कामाचे स्वरूप तसे असावयास हवे.
आपले जगणे म्हणजे आनद मिळवण्यासाठी धडपडणे. आपल्याला खूप प्रवास करावासा वाटणे, जग पहावेसे वाटणे , त्यासाठी भ्रमंती करणे हे आवश्यक नसले तरी आनंद मिळवण्यासाठी करणे समजू शकते. जगण्याचे ते प्रयोजन असू शकते. स्वतःला आनद मिळावा म्हणून हे करणे समजू शकते. त्यासाठी इतर गरजा कमी करून आपण ह्या गोष्टी साधू शकतो.
काही जणांना नव्या तंत्रज्ञानाचे वेड  असते. नवा पी.सी . नवा मोबाईल , नवा टी. व्ही., नवा प्रिंटर , नवा क्यामेरा, नवी गाडी हे सारेच हवे असते. 

नव्या नव्या गोष्टी येतच असतात. त्याकरिता Need Based Technology चाच स्वीकार करावयास हवा.
प्रत्येकाने स्वतःच स्वतःच्या आवश्यक गरजा (Needs) आणि इतर गरजा ( Wants) ठरवावयच्या असतात. प्रत्येकाचा स्वभाव , आवडी निवडी, आर्थिक कुवत , धडपडण्याची वृत्ती , आणि प्रयत्नवाद ह्यावर हे सारे अवलंबून असते. आपल्यातील कमतरता ( Limitations ) समजून घेतल्यातर  आपण आनंदी होऊ शकतो. Needs and Wants ह्यातील फरक लक्षात आला तर आनंदी होणे शक्य आहे. गरजा वाढू नं देणे हे कितीही चांगले असले तरी   Quality of Life सुधारण्यासाठी प्रयत्न करणे फार म्हत्वाचे आहे. Wants वाढविणे म्हणजे जीवनशैली (Lifestyle) बदलणे व त्यातून थोडेसे असमाधान होणे अपरिहार्य आहे. जीवनशैली (Lifestyle) वेगळी व मानसिक समाधान वेगळे. त्यांचा समन्वय साधने आवश्यक असते . तेच आपल्या हातात असते. Wants च्या मागे जाऊन असमाधानी होण्यापेक्षा आवश्यक त्या गरजा पूर्ण करीत समाधानी जगणे हाच सुखाचा खरा मंत्र.